Thursday 20 December 2018

Pune: CM Fadnavis bats for 1,000 e-buses

PUNE: Chief minister Devendra Fadnavis on Tuesday said 1,000 new green electric buses, along with the three Metro lines, would ease traffic congestion in 

कासारवाडीतील श्री. दत्त मंदिरामध्ये मान्यवरांची मांदियाळी

कासारवाडी (दि. १९ डिसें.) :-  कासारवाडी येथील श्री. दत्त मंदिरामध्ये दत्त जयंतीनिमित्त आयोजित कीर्तन सोहळ्यास अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शविली.
या महोत्सवा दरम्यान हभप शंकर महाराज शेवाळे यांच्या कीर्तन प्रसंगी बंजरंग राजवडे यांच्या समवेत सामाजिक कार्यकर्ते विजू जगताप,  माजी नगरसेवक शंकर जगताप, आप्पा बागल व जनविकास युवा मंचाचे अध्यक्ष सचिन पांढरकर व आदी मान्यवर उपस्थित होते.

महापालिका शाळांसाठी राबविण्यात येणार्‍या क्रीडा धोरणाला मंजुरी

पुणे : महापालिकेच्या क्रीडा विभागाने तयार केलेल्या क्रीडा धोरणाला स्थायी समितीच्या बैठकीत एकमताने मंजुरी देण्यात आली. स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

खबरदार! आधारसाठी दबाव टाकल्यास होणार एक कोटींचा दंड व १० वर्षांची शिक्षा

नवी दिल्ली – आधार कार्ड सक्तीवरून केंद्र सरकाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता तुम्हाला बँक खाते किंवा मोबाईल सिम घेण्यासाठी आधार कार्ड देणे बंधनकारक राहणार नाही. ते पूर्णतः ऐच्छिक असणार आहे. बँक किंवा टेलिकॉम कंपन्यांना ओळख आणि पत्त्याच्या पुराव्यासाठी आधार कार्ड देण्यावर दबाव टाकला तर एक कोटीपर्यंत दंड भरावा लागणार आहे. एवढेच नव्हे तर कंपनीतील संबंधित कर्मचाऱ्यांना ३ ते १० वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.

“पीएमपी’ला मोफत प्रवास योजनेला “नकारघंटा’

पिंपरी – पीएमपीकडे अधिकाधिक प्रवासी आकृष्ट व्हावेत, यासाठी दर महिन्याला एक याप्रमाणे वर्षांला 12 दिवस पीएमपीतून मोफत प्रवासाची योजना पीएमपीने आखली. यासाठी पुणे महापालिकेने हिरवा कंदील दाखवला असला तरी, पिंपरी पालिकेने मात्र नकारघंटा दर्शवली आहे. एका पालिकेचा होकार व दुसऱ्याचा नकार राहिल्यास या योजनेचे भवितव्य अधांतरी राहण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे.

During a ‘smart’ pitch by PCMC chief, citizens ask for the basics

PIMPRI CHINCHWAD: At the Pimpri Chinchwad Municipal Corporat .. 

In a first, PCMC, not SRA, plans to rehabilitate slums on private land

After years of progressing at a snail’s pace, the Pimpri-Chinchwad Municipal Corporation seems to have now decided to seriously implement its policy of a slum-free city, which has been gathering dust for more than a decade. For a start, it has planned a first-of-its-kind project to rehabilitate slums on a private land. “We have decided to implement a first-of-its-kind project of slum rehabilitation on private land. It will be a pilot project,” Municipal Commissioner Shravan Hardikar said on Tuesday.

‘अर्बन स्ट्रीट डिझाईन’नुसार रस्त्यांचा विकास

पुणे शहरातील औंध परिसरात करण्यात आलेल्या ‘अर्बन स्ट्रीट डिजाईन’नुसार पिंपरी-चिंचवड शहरातीत रस्तेही ही सुशोभित केले जाणार आहेत. हे रस्ते व पदपथ पर्यावरणपुरक असणार असून, त्यावर सर्वांधिक महत्व पादचारी व सायकलस्वारांना दिले जाणार आहे. या कामासाठी पालिका तब्बल 52 कोटी 5 लाख रूपये खर्च करणार आहे.  

शहरात मेट्रोचा दोन किलोमीटर अंतराचा स्पॅन पूर्ण

पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरीत दापोडीतील हॅरिस पूल ते चिंचवडच्या मदर टेरेसा उड्डाणपुलापर्यंतच्या मार्गावर पुणे मेट्रो प्रकल्पाचे काम वेगात सुरू आहे. आतापर्यंत एकूण 2 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्गिकेचा स्पॅन पूर्ण झाला आहे. नव्या वर्षात फेबु्रवारीत त्यावर लोहमार्ग (ट्रॅक) बांधणीचे काम सुरू करण्यात येणार आहे. मार्गिकेसाठी सेगमेंट जुळवणीचे काम गर्डर लाँचरच्या विविध 3 मशिनने सुरू आहे. खराळवाडी येथे बसविलेल्या गर्डर लाँचरने संत तुकारामनगर येथील मेट्रो स्टेशनपर्यंत स्पॅन जुळवणीचे काम पूर्ण झाले आहे. स्टेशनच्या कनकोर्स व आर्म पिलरचे काम सुरू असल्याने तेथे मशिन उतरवून स्टेशनच्या पुढील पिलरवर चढविले जाणार आहे. 

वेताळनगर प्रकल्पातील 224 लाभार्थ्यांना सदनिकेचे वाटप

चिंचवडच्या वेताळनगर पुनर्वसन प्रकल्पाताील ए 2 व ए 7 या दोन इमारतीमधील सदनिकांचे वाटप मंगळवारी (दि.18) करण्यात आले. संगणकीय सोडत काढून एकूण 224 कुटुंबांना सदनिकांचा लाभ देण्यात आला आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेने हा प्रकल्प राबविला आहे. चिंचवड येथील झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभागाच्या कार्यालयात ही सोडत काढण्यात आली.

ऑटो कल्स्टरच्या मैदानात भंगार जाळणाऱ्यांवर कारवाईची मागणी

एमपीसी न्यूज- चिंचवडच्या ऑटो कल्स्टर समोरील मैदानात भंगार व्यावसायिकांकडून रबर, प्लास्टिकचा भंगार माल जाळण्यात येत आहे. त्यामुळे या परिसरात काळ्याकुट्ट धुराचे साम्राज्य पसरल्याचे चित्र पाहायला मिळते. त्यामुळे अशा भंगार व्यावसायिकांवर कडक कारवाईची मागणी करण्यात येत आहे. 

पुणे-लोणावळादरम्यान १५ डब्यांच्या लोकल?

पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावर येत्या काळात १५ डब्यांची लोकल चालविणे शक्य होणार आहे. त्या दृष्टीने या मार्गांवरील रेल्वे स्थानकांतील प्लॅटफॉर्मची लांबी वाढविण्यात येणार असून, आवश्यक ठिकाणी लांब पल्याच्या गाड्यांना मार्ग देण्यासाठी स्थानकावर एक लेन वाढविण्याचा प्रस्ताव आहे. 

पिंपरीतील मिळकतींमध्ये दहा वर्षांत दुपटीने वाढ

पिंपरी : वेगाने नागरिकीकरण होत असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील मिळकतींची संख्या पाच लाखांच्या घरात पोहोचली आहे. मिळकतींची संख्या गेल्या दहा वर्षांत जवळपास दुपटीने वाढली आहे. पुण्या-मुंबईच्या जवळचे शहर, चांगल्या सुविधा, प्रशस्त रस्ते, राहण्यायोग्य आणि व्यवसाययोग्य मुबलक सुविधा शहरात असल्याने नागरिकांची पिंपरी-चिंचवडला अधिक पसंती मिळत आहे. दुसरीकडे वाढते नागरिकीकरण व लोकसंख्येमुळे शहरातील नागरी सुविधांवर ताण पडत असल्याचे चित्रही समोर आले आहे.

शहरबात पिंपरी : पालथ्या घडय़ावर पाणी

पिंपरी महापालिकेत सत्तांतर झाले. तरीही वर्षांनुवर्षे असलेल्या त्याच समस्यांची जंत्री जशीच्या तशी आहे. कारभारी आमदारांनी महापालिकेच्या कामांचा आढावा घेतला, तेव्हा जुन्याच समस्या नव्याने चर्चिल्या गेल्या. आयुक्तांचे नियंत्रण नाही. पुढचे पाठ आणि मागचे सपाट, अशी अधिकाऱ्यांची मानसिकता आहे. आमदारांमध्ये एकवाक्यता आणि सातत्य नाही. त्यामुळे पालथ्या घडय़ावर पाणी अशीच परिस्थिती सध्या दिसून येते.

आकुर्डी स्टेशन रस्त्यांचे रुंदीकरण

पिंपरी - आकुर्डी रेल्वे स्टेशनला जोडणाऱ्या चार रस्त्यांचे रुंदीकरण करण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशन परिसरासह प्राधिकरण, रावेत, बिजलीनगर व वाल्हेकरवाडी परिसरातील वाहतूक सुरळीत होणार आहे.

पुणे-नाशिक केवळ २ तासांत

पुणे - पुणे-नाशिक हायस्पीड लोहमार्गाला मंजुरी मिळाली असून; प्रकल्पाचे काम फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस सुरू करण्याचा प्रयत्न आहे. येत्या तीन वर्षांत हे काम पूर्ण होईल. या प्रकल्पामुळे पुणे ते नाशिक हे अंतर केवळ दोन तासांवर येणार असल्याची माहिती खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. 

डिसेंबर महिना मेट्रोला लाभदायक

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारळ फोडलेल्या शहरातील पिंपरी-स्वारगेट आणि वनाज-रामवाडी या मेट्रो प्रकल्पांच्या कामांनी गती घेतली आहे. पुढील वर्षी डिसेंबर महिन्यातच मेट्रोची ‘ट्रायल रन’ होणार आहे. त्यामुळे मेट्रोसाठी डिसेंबर लाभदायी ठरणार असल्याची चिन्हे आहेत. 

वाकडमध्ये १५ मीटर उंचीवर असणार मेट्रो

पिंपरी - शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्ग शहराच्या वाकड भागात सुमारे १५ मीटर उंचीवर असेल. त्याच्या कामास पीएमआरडीएने महापालिकेकडे परवानगी मागितली आहे. 
महामेट्रोकडून स्वारगेट ते पिंपरी आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे. तिसरा शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्ग ‘संकल्पना करा, बांधा, आर्थिक पुरवठा करा, वापरा व हस्तांतरित करा’ (डीबीएफओटी) तत्त्वावर सार्वजनिक खासही सहभागाने (पीपीपी) उभारण्यात येणार आहे.

“धन्वंतरी’साठी क्षेत्रीय कार्यालये उदासीन

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आस्थापनेवरील कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी धन्वंतरी स्वास्थ योजना लागू केली आहे. मात्र, महापालिकेच्या सर्वच क्षेत्रीय कार्यालयांतर्गत असलेल्या सुमारे 70 टक्के कर्मचारी व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या सदस्यांची नावेच वैद्यकीय विभागाला सादर केली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आणीबाणीच्या काळात एखाद्या कर्मचाऱ्याची गैरसोय झाल्यास त्याला संबंधित शाखा प्रमुखाला जबाबदार धरले जाणार आहे. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी याबाबतचे परिपत्रक काढले आहे. सर्व शाखा प्रमुखांना या परिपत्रकाद्वारे इशारा दिला आहे.

आमदारांनी घेतली झाडाझडती

पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील स्वच्छतेकडे अधिक लक्ष देऊन शहर स्वच्छ व सुंदर राहील या साठी प्रयत्न करावेत. कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी व शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी तातडीने उपाय योजना कराव्यात अशा सूचना आमदार लक्ष्मण जगताप व महेश लांडगे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

शहरात ‘आरटीई’च्या 529 जागा रिक्‍त

पिंपरी – अर्थिक दुर्बल आणि मागासवर्गीय मुलांसाठी “आरटीई’ अंतर्गत प्रवेश देण्यात आले आहेत. मात्र, या प्रवेशाची सहावी फेरी झाली नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना अजूनही प्रवेशाची प्रतिक्षाच करावी लागत आहे. सद्यस्थितीत “आरटीई’च्या पाचव्या फेरीअखेर शहरातील शाळांमध्ये 529 जागा रिक्‍त आहेत.