Saturday 23 September 2017

तळवडे ५८ एकर जागेत तुम्हाला कोणते उद्यान पहायला आवडेल? पालिकेची ऑनलाईन सर्वेक्षण मोहिम!

पिंपरी चिंचवड शहरात मौजे तळवडे येथील सुमारे ५८ एकर जागेत प्राणिसंग्रहालय (डीयर सफारी / झू पार्क) करण्याचे नियोजन आहे. सदर संदर्भाने पिंपरी चिंचवड महानगरपालिका नागरीकांचे अभिप्राय जाणुन घेऊ ईच्छीते. सर्व नागरीकांना आपले अभिप्राय नोंदवुन मनपास सहकार्य करण्याची विनंती. Pimpri Chinchwad Municipal Corporation earmarked an area of 58 acres in Village Talawade for development of a zoo / safari park. PCMC wish to understand a citizen’s opinion for the proposed project and is appealing to all citizens to participate

 Online Link - goo.gl/8WDCW3

पहिल्या अँटोमॅटीक टॉयलेटचे उद्घाटन

शहरात निगडी बसस्टॉप येथे सॅमटेक क्लिन अँड केअर कंपनीच्या खर्चातून अँटोमॅटीक टॉयलेट बसविण्यात आले आहे. या टॉयलेटचे उद्घाटन सोमवारी (दि. २५) सकाळी दहा वाजता पालकमंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते होणार आहे.

‘समरसता’ गुरुकुलम आर्थिक अडचणीत

पिंपरी - चिंचवड येथील समरसता पुनरुत्थान गुरुकुलम या संस्थेतर्फे वंचित समाजातील ३२९ विद्यार्थ्यांना निवासी शाळेत शिक्षण दिले जाते. विनाअनुदानित असलेल्या या संस्थेला आजपर्यंत अनेक मान्यवरांनी, राष्ट्रीय नेत्यांनी भेट देऊन या उपक्रमाचे कौतुकही केले आहे; मात्र सध्या ही संस्था आर्थिक अडचणीत सापडली आहे. वीजबिल न भरल्याने येथील विद्यार्थी १५ दिवस अंधारात होते. आजही लाखो रुपयांचे वीजबिल, मिळकतकर आणि शिक्षकांचे पगार थकले आहेत.

[Video] खड्डे बुजविण्यासाठी पिंपरी पालिका वापरणार 'जेट' पॅचर यंत्रणा

पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. खड्डयामुळे रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. पालिका आता शहरातील खड्डे बुजविण्यासाठी 'जेट' पॅचर पोथॉल मशिनचा अवलंब करणार आहे. या आधुनिक मशिनद्वारे खड्डे बुजविण्यास शुक्रवारी नाशिक फाटा येथून सुरुवात करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील बहुतांशी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. मान्सूनपूर्व डागडुजी करण्यात न आल्याने उद्योगनरीच्या रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. खड्डे बुजविताना पालिकेकडून शास्त्रशुद्ध पद्धतीने अवलंब केला जात नाही. त्यामुळे खड्ड्यांची समस्या दिवसें-दिवस उग्र बनत आहे. खड्ड्यांच्या वाढत्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने खड्डे बुजविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निश्चित केले आहे

[Video] कुदळवाडीत भंगारच्या गोडाऊनला भीषण आग; चार बंब घटनास्थळी

कुदळवाडी येथील भंगाराच्या गोडाऊनला भीषण आग लागली आहे. आग नेमकी कशामुळे लागली हे नेमके समजू शकली नाही. आज (शुक्रवारी) दुपारी तीनच्या सुमारास ही आग लागली आहे. कुदळवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात भंगाराची गोडावून आहेत. या गोडाऊनला अनेकदा आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. गुप्ता वजन काटा येथील भंगाराच्या गोडाऊनला शुक्रवारी दुपारी अचानक आग लागली आहे. धुराचे लोट बाहेर येत आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. पिंपरी, संत तुकारामनगर अग्निशामक दलातील चार बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

15 scrap shops gutted in Chikhali, none injured

According to the information provided by the Pimpri-Chinchwad Municipal Corporation's (PCMC) fire brigade department, around 3.30 pm some welding work was going on when fire broke out at Gupta Wajan Kata godown shop. The flames spread rapidly in ...

‘बोचलं म्हणून’ सोशल मीडियावर व्हायरल झाली कविता

पिंपरी -  महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या भोसरी येथील कार्यक्रमात एका तरुणाने शेतकऱ्याची व्यथा आणि देशातील राजकारणावर सादर केलेली कविता सध्या सोशल मीडियावर भलतीच व्हायरल झाली आहे. या कवितेला खूप लाइक मिळत असून ती शेअरदेखील केली जात आहे.

पवना जलवाहिनीला विरोध कायम

पिंपरी -  ‘‘पवना धरणापासून निगडी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतच्या नियोजित जलवाहिनीला आमच्या संघटनेचा आणि मावळवासीयांचा ठाम विरोध आहे,’’ असे भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष शंकरराव शेलार यांनी गुरुवारी ‘सकाळ’ला सांगितले. नदीचा प्रवाह वाहता राहिल्यास जलप्रदूषण होणार नाही, तसेच शेतकऱ्यांनाही पुरेसे पाणी मिळेल, असे त्यांनी सांगितले.

'संस्कार ग्रुप'च्या पदाधिकाऱ्यास पोलिस कोठडी

पिंपरी - करोडो रुपयांच्या ठेवी गुंतवणूकदारांना परत न दिल्याच्या प्रकरणात पोलिसांनी गुरुवारी (ता.21) ठोस कारवाई सुरू केली. संस्कार ग्रुप महिला बचत गटाच्या उपाध्यक्षा कमल ज्ञानेश्‍वर शेळके यांना दिघी पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानातून अटक केली. न्यायालयात हजर केले असता त्यांना 29 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत सुनावण्यात आली. 

पत्रकबाजीपेक्षा खुल्या चर्चेला या!

– खासदार बारणे यांचे जगतापांना आव्हान 
– “सोशल मीडिया’तून भंपकबाजी बंद करा
पिंपरी – पत्रकबाजी करुन शहरवासीयांची करमणूक करण्यापेक्षा शहर विकासात काय दिवे लावले? याचे उत्तर देण्यासाठी खुल्या व्यासपीठावर चर्चेला या… असे आव्हान खासदार श्रीरंग बारणे यांनी भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांना दिले आहे. “सोशल मीडिया’तून भंपकबाजीपेक्षा विकासकामांकडे लक्ष द्या…अन्यथा वाल्हेकरवाडीतील रिंग रोड बाधितांनी पिटाळून लावल्याच्या घटनांची पुनरावृत्ती शहरभर होईल…असा खोचक सल्लाही खासदार बारणे यांनी दिला आहे.