Thursday 21 December 2017

Bapat to hold meeting on pending civic projects

Pimpri Chinchwad: Guardian minister Girish Bapat will hold a review meeting on pending projects of the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) that need approval from the state government.

Twin cities want stake in Metro name

PCMC mayor says major part of project’s work has begun in Pimpri-Chinchwad, so it should be part of naming
Even though it has been christened the Pune Metro project, work for this mammoth initiative actually began in Pimpri-Chinchwad first, in June 2017. But, a few months after work began, Pimpri-Chinchwad Mayor Nitin Kalje realised that the twin towns have not been duly represented in the naming of the project. Now, the leaders of Pimpri-Chinchwad have demanded that the government should formally rename the project as Pune-Pimpri-Chinchwad Metro.

PCMC chief seeks records of expenditure

PIMPRI CHINCHWAD: Shravan Hardikar, the Pimpri Chinchwad municipal commissioner, has sought all the records that pertain to the objections raised — regarding expenditure of about Rs 1,700 crore — in the audit report. While records for Rs 969 crore of expenditure have already been submitted, the records for the remaining amount are still pending.

स्वारगेट-हिंजवडी फेज-3 औंध मार्गे बस सुरु; पीसीसीएफच्या पाठपुराव्यास यश

पिंपरी, (प्रतिनिधी) – स्वारगेट-हिंजवडी फेज-3 या मार्गावर औंध, बालेवाडीमार्गे अखेर पीएमपीएमएलची बस सुरु करण्यात आली आहे. यामुळे औंध आणि बालेवाडी या मार्गावरून हिंजवडीकडे जाणा-या प्रवाशांची सोय झाली आहे. या मार्गावर बस सुरु करण्यासाठी पिंपरी चिंचवड सिटीझन फोरमने (पीसीसीएफ) पाठपुरावा केला. बस सुरु झाल्याने पीसीसीएफच्या पाठपुराव्यास यश आले आहे.

“आयटीआय’चे विद्यार्थी होणार पालिकेचे मदतनिस

पिंपरी – महापालिकेच्या आयटीआय मधील कॉम्प्युटर ऑपरेटर कोर्स झालेल्या गरजू विद्यार्थ्यांना विविध विभागात अधिकाऱ्यांना प्रशासकीय कामकाज करण्यासाठी मदतनिस म्हणून मानधनावर नियुक्‍त करण्यास आज (बुधवारी) स्थायी समितीने ऐनवेळी मान्यता दिली.

Walhekarwadi plans to go plastic bag-free from Jan 1

Pimpri Chinchwad: Activists and citizens' groups in Walhekarwadi in Chinchwad have proposed to emulate Pimple Saudagar and go plastic carry bag-free from the New Year.
The Pimpri Chinchwad Citizens Forum (PCCF), Sachin Chinchwade Youth Foundation and other social organizations want the area free from plastic bags from January 1.

Pimple Saudagar residents march against use of polythene carry bags

Hundreds of residents of Pimple Saudagar, carrying placards and shouting slogans, marched on the the road from PCMC ground to Shivar Chowk and back on Sunday in a drive against plastic carry bags.

सिटी सेंटरसह ४० कोटींची कामे स्थायीत मंजूर

शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे ४० कोटी ४४ लाख ४० हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.  स्थायी समिती सभागृहात आज (बुधवारी) झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी सीमा सावळे होत्या.

इन्फोसिस कंपनीतर्फे प्रदूषणविरोधी यात्रा

इन्फोसिस पुणे डेव्हलपमेंट सेंटर (डीसी) इको क्लबतर्फे इन्फोसिस कंपनीच्या हिंजवडी परिसरातील कॅम्पसमध्ये बुधवारी प्रदूषणविरोधी यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. फेज २ कॅम्पस ते फेज १ कॅम्पस अशी ही यात्रा काढण्यात आली. रस्त्यावरील वाढत्या वाहनांमुळे हिंजवडी परिसरातील वाढत असलेल्या प्रदूषणाबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने यात्रेचे आयोजन करण्यात आले.

पुणे जिल्ह्य़ात ७१ लाख मतदार

जनजागृतीमुळे मतदारांची संख्या वाढली; शहरात २९ लाख मतदार
जिल्ह्य़ात गेल्या वर्षभरापासून घेण्यात आलेल्या मतदारनोंदणी मोहिमांमुळे मतदारांची संख्या वाढली आहे. जिल्ह्य़ाची मतदार यादी ७१ लाख ९६ हजार ७०१ मतदारांची झाली आहे. त्यात पुणे शहरातील मतदारांची संख्या २९ लाख १३ हजार २९८ तर पिंपरी-चिंचवडमध्ये ११ लाख ९५ हजार ३६६ एवढी आहे. आणखी ४९ हजार मतदारांचे अर्ज आले असून त्यांची नोंदणी झाल्यानंतर १० जानेवारी २०१८ रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे.

मेट्रोचे प्रभावक्षेत्र लवकरच निश्चित

मेट्रो प्रकल्पाच्या दोन्ही मार्गिकांच्या आखणीचे प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी केंद्र शासनाकडे पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे मेट्रोचे प्रभाव क्षेत्र (टीओडी झोन) लवकरच निश्चित होण्याची शक्यता असून विकास नियंत्रण नियमावलीनुसार (डीसी रुल्स) या प्रभाव क्षेत्रात अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक (प्रीमियम फ्लोअर स्पेस इंडेक्स- एफएसआय) मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

आधारविना निराधार

पिंपरी - केंद्र सरकारने बॅंका, पॅन कार्ड, एलआयसी, मोबाईल कंपन्या आदी ठिकाणी आधार कार्ड ‘लिंक’ करणे सक्तीचे केले आहे. मात्र शहराची लोकसंख्या बावीस लाखांवर असताना आधार केंद्रे केवळ ३१ आहेत. त्यांची अपुरी संख्या आणि कुचकामी यंत्रणा यामुळे शहरातील नागरिक, महिला आणि सेवानिवृत्त नागरिक हवालदिल झाले आहेत.

पोलिसांची सायकलवरून गस्त

पिंपरी - विकासाच्या अफाट वेगामुळे स्मार्ट सिटी अभियानात (एरिया बेस डेव्हलपमेंट) समावेश झालेल्या पिंपळे सौदागर परिसरातील वाहतूक पोलिसही ‘स्मार्ट’ झाले आहेत. वाहतूक नियोजन आणि नियमनाच्या विविध ‘स्मार्ट’ कल्पना अमलात आणण्यास सुरवात केली आहे. नागरिकांना पर्यावरण संरक्षण, निरोगी आरोग्यासाठी सायकलींचे महत्त्व पटवून देण्यासाठी येथील पोलिस अधिकाऱ्यांनी चक्क सायकल हाती घेतली आहे. 

देहूरोड, किवळे, रावेतला गैरसोय

देहूरोड - देहूरोड कॅंटोन्मेंटसह पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील रावेत, किवळे, विकासनगर भागात एकही अधिकृत आधार कार्ड केंद्र नाही. येथील असंख्य नागरिक आधार कार्डपासून वंचित आहेत.

अवेळी मिळणाऱ्या वीज बिलाने ग्राहक त्रस्त

  • विकासनगर किवळे : बील भरणा सवलतीपासून ग्राहक वंचित
  • गृह रचना संस्थांमध्ये बिले वाटपात कामचुकारपणा उघड
  • सर्व बिले ठेवतात एकाच पत्र पेटीत
देहुरोड, (वार्ताहर) – विकासनगर-किवळे परिसरात महा-वितरणकडून अवेळी मिळणाऱ्या वीज बिलाने ग्राहक त्रस्त झाले आहेत. महा-वितरणने तातडीने दखल घेऊन संबंधितांवर योग्य कारवाई करावी, अशी मागणी ग्राहक करीत आहे.
महा-वितरणाकडून दरमहा वीज ग्राहकांना वीज बिले घरपोच देण्यासाठी सर्वत्र ठेकेदारामार्फत व्यवस्था करण्यात येते. संबंधित ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांकडून विकासनगर-किवळे परिसरातील विविध भागात वीज बिले उशिरा मिळत असल्याची ग्राहक तक्रार करीत आहेत. येथील काही ग्राहकांना महा-वितरणाचे नोव्हेंबर महिन्याचे देयक (बील) 16 डिसेंबरला मिळाले आहे. वास्तविक या बिलाची तारीख 7 डिसेंबर 2017 असून हे बील ग्राहकांना मुदतीत मिळणे अपेक्षित असताना हे बिले मिळण्यास नऊ दिवसाचा अवधी लागला असल्याने ग्राहकांनी महा-वितरणच्या संबंधित ठेकेदाराच्या कारभाराबाबत खेद व्यक्‍त केला आहे.

‘स्वच्छ’च्या जनजागृतीसाठी पावणे अठरा लाखांचा खर्च

पिंपरी – स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत महापालिका हद्दीत 4 ते 6 जानेवारीला स्वच्छ सर्वेक्षण 2018 राबविण्यात येणार आहे. या स्वच्छ सर्वेक्षणाचा विविध माध्यमाद्वारे प्रसार आणि प्रचार करुन नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांच्या येणाऱ्या खर्चास आज (बुधवारी) स्थायी समितीने मंजुरी दिली.

‘पारदर्शक’ सत्ताधाऱ्यांचा तिजोरीवर डल्ला?

– रस्त्यांच्या कामात सुमारे 60 कोटींचा भुर्दंड 
– सर्व कामांची फेरनिविदा काढण्याची मागणी
पिंपरी – स्वच्छ पारदर्शकतेच्या नावावर सत्ताधारी भाजप करदात्यांच्या पैशावर डल्ला मारु लागले आहेत. 425 कोटी रस्त्यांच्या कामात पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी संगनमताने “रिंग’ केली आहे. त्या गैरकारभाराला थांबविण्याऐवजी आयुक्‍त श्रावण हर्डीकर हे पाठराखण करीत आहेत. त्यामुळे कोट्यवधी रुपयांच्या कामात निश्‍चितपणे “रिंग’ झाली असून सर्व कामांच्या फेरनिविदा काढण्यात याव्यात, अशी मागणी विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी बुधवारी (दि.20) पत्रकार परिषदेत केली. यावेळी नगरसेवक अजित गव्हाणे, दत्ता साने उपस्थित होते.

NH-4 road widening: NGT finds 'false' information in state agency's affidavits on tree felling

THE PUNE bench of the National Green Tribunal (NGT) said the affidavits submitted to it by the Maharashtra State Road Development Corporation Limited (MSRDCL) contained “false” information about some of the 188 trees affected during the National Highway (NH)-4 road widening project. The Tribunal has also noted “lack of guidelines” on ownership of the land.

वृक्षतोडीविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करणार

निगडी – निगडी-देहुरोड दरम्यानच्या रस्तारुंदीकरणात वृक्षतोड विरोधात दाखल केलेल्या दाव्याची मंगळवारी (दि. 19) सुनावणी झाली. राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाने 89 झाडे वाचविणार असल्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात दिले होते. मात्र वाचवणार असलेल्या झाडांमधील चार झाडांची कत्तल केल्याचे स्पष्ट झाले. यामुळे याविरोधात मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेच्या वतीने फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे.

रस्ते स्टॅन्डर्ड करण्यासाठी पेव्हींग ब्लॉक धोरण – आयुक्त श्रावण हर्डीकर

पिंपरी-चिंचवड शहरात बसविल्या जाणा-या पेव्हींग ब्लॉक बसविताना नियोजनबध्दरित्या बसविले जावेत. तसेच, शहरातील रस्ते स्टॅन्डर्ड करण्यासाठी महापालिका प्रशासनाने पेव्हींग ब्लॉकबाबत धोरण तयार केले आहे, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे. तर, स्थायी समितीच्या बैठकीत आज (बुधवारी) या धोरणावरून स्थायी समिती सदस्यांनी आयुक्तांना धारेवर धरले.

पेव्हिंग ब्लॉकवरून नगरसेवक “उखडले’

पिंपरी – तब्बल दोनशे कोटींची पेव्हिंग ब्लॉक बसविण्याची कामे करण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करून कंत्राटदारांना कामाचे आदेश देण्यात येत आहेत. त्यात आता प्रशासनाने ज्या ठिकाणी पेव्हिंग ब्लॉक बसविण्यात येणार आहेत, तेथील छायाचित्र काढून अहवाल सादर करण्याचा “फतवा’ काढला आहे. त्याला विरोध करत सर्वपक्षीय सदस्यांनी प्रशासनाच्या विरोधात स्थायी समिती सभेत जोरदार टीकास्त्र सोडले.

लोकप्रतिनिधींसोबत पंधरा दिवसांत बैठक - रणजित पाटील

नागपूर - भोसरी, निगडी, चिंचवड, आकुर्डी परिसरांतील बाधित शेतकऱ्यांना नियमानुसार साडेबारा टक्के जमिनीचा परतावा देण्याबाबत शासन सकारात्मक आहे. जागेची उपलब्धता, अतिक्रमण झालेल्या जागा यासंबंधीची पाहणी करण्यासाठी पंधरा दिवसांत स्थानिक लोकप्रतिनिधींसमवेत बैठक घेऊन किती व कोठे जागा उपलब्ध आहेत, हे पाहून जागा देण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी घोषणा नगरविकासमंत्री रणजित पाटील यांनी विधानसभेत केली

पूर्वलक्षी प्रभावाने शास्तीकर माफी?

  • मुख्यमंत्री फडणवीस सकारात्मक : आमदार लांडगे यांची माहिती
पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवडमधील निवासी मालमत्तांचा शास्तीकर पूर्वलक्षी प्रभावाने माफ करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसे संकेत दिले आहेत, अशी माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली.

रोटरी क्‍लब ऑफ चिंचवडतर्फे प्राथमिक शाळेत स्वच्छतागृहाचे लोकार्पण

पिंपरी, (प्रतिनिधी) – रोटरी क्‍लब ऑफ चिंचवडच्या वतीने देहूरोड येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय देहूरोडच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृह बांधण्यात आले. या स्वच्छतागृहाचे लोकार्पण शुक्रवारी करण्यात आले.
इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृहाची आवश्‍यकता लक्षात घेऊन रोटरी क्‍लब ऑफ चिंचवडच्या वतीने स्वच्छतागृह बांधण्यात आले. यासाठी एकूण अडीच लाख रुपये एवढा खर्च करण्यात आला. स्वच्छतागृहाच्या उभारणीसाठी स्कॉन प्रोजेक्‍ट्‌स प्रा. लि. व रोटरी डिस्ट्रिक्‍ट 3131 व रोटरी क्‍लब चिंचवडच्या सभासदांनी आर्थिक मदत केली.

आता गैरहजर वॉर्डनवर दंडात्मक कारवाई

पिंपरी – शहरातील महत्वाच्या चौकांत वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमलेल्या 150 ट्राफीक वॉर्डनला कामगार कल्याण विभागाच्या सूचनेप्रमाणे महागाई भत्ता व विशेष भत्त्यापोटी देण्यात येणाऱ्या रक्कमेत वाढ करण्यात येणार आहे. परंतु, एकाचवेळी अनेक वॉर्डन कामावर गैरहजर राहण्याचे प्रकार वाढल्याने आता त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून प्रतिमहा प्रत्येकी 5 हजार रुपये जादा दंड आकारण्यात येणार आहे. तसेच, गैरहजेरीच्या रक्कमेवर 10 टक्के अतिरिक्त दंडही आकारला जाणार आहे.

कागदपत्रे न दिल्याने फेरनिविदांची नामुष्की

  • स्थापत्य विभाग ः निविदेबाबत ठेकेदारांना मुदतवाढ देणे बंद
  •  376 कामांचे दिले आदेश
पिंपरी, (प्रतिनिधी)- महापालिकेच्या स्थापत्य विभागातील रस्ते डांबरीकरण यासह विविध कामांच्या निविदा ऑनलाईन भरण्यात येतात. त्या निविदा भरल्यानंतर 72 तासांच्या आत संबंधित ठेकेदारांने निविदेची कागदपत्रे स्थापत्य विभागाकडे आणून देणे बंधनकारक आहे. परंतू, त्याकडे ठेकेदार दुर्लक्ष करतात, त्या ठेकेदारांना अपात्र ठरवून पाचपेक्षा तीन निविदा असतील तरच निविदा उघडण्यात येते, अन्यथा सदरील निविदा प्रक्रिया रद्द करण्यात येत आहे. त्यामुळे आतापर्यंत 177 फेरनिविदा काढण्याची नामुष्की स्थापत्य विभागावर आली आहे.

एमआयडीसीच्या अभिलेखांचे होणार डिजीटायजेशन

पिंपरी, (प्रतिनिधी) – महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संचिका व अभिलेखांचे स्कॅनिंग करुन ते डिजीटायजेशन केले जाणार आहे. हे काम एका खासगी संस्थेला देण्यात आले आहे. पुण्यासह राज्यातील सर्व प्रादेशिक कार्यालयांमधील विविध विभागांच्या आवश्‍यक कागदपत्रांचा यात समावेश करण्यात आला आहे. याकरिता प्रत्येक कार्यालयाच्या सहमुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली नियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे.