Friday 1 March 2013

पुणे मेट्रोसाठी उघडले खाते

पुणे मेट्रोसाठी उघडले खाते: पुणे। दि. २८ (प्रतिनिधी)

दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर केंद्रीय अर्थसंकल्पात पुणे मेट्रो प्रकल्पासाठी खाते उघडले. पुण्यात मेट्रोसारख्या सार्वजनिक उपक्रमासाठी ९ कोटी ९९ लाखांची गुंतवणूक करण्यासाठी निधीची तरतूद केली आहे.  केंद्र व राज्य शासनाच्या अर्थसंकल्पातून पुणे मेट्रोला निधी मिळण्यासाठी राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीच्या नेत्यांकडून पाठपुरावा सुरू होता. मात्र, महापालिकेने सादर केलेल्या मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचा सुधारित आराखड्याला राज्य शासनाच्या मंत्रीमंडळाने अद्याप मान्यता दिलेली नाही. त्यामुळे केंद्र शासनाला सुधारित आराखडा वेळेत सादर झाला नाही. त्यामुळेच पुणे मेट्रोला एकूण प्रकल्पीय खर्चाच्या केवळ 0.१ टक्के इतका निधी केंद्राच्या अर्थसंकल्पात आज देण्यात आला.

७ वर्षांपासून पुणे मेट्रोचा प्रवास कागदावरच सुरू आहे. मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील वनाज ते रामवाडी मार्गाचा प्रस्ताव महापालिकेने २ वर्षांपूर्वी राज्य शासनाला व राज्य शासनाने एक वर्षांपूर्वी केंद्र शासनाला सादर केला. परंतु, केंद्र शासनाकडून अद्याप पहिल्या मेट्रो मार्गाला मान्यता दिलेली नाही. दरम्यान, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी महापालिकेतील सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक १0 जानेवारी २0१३ ला पुण्यात घेतली. त्यानंतर केंद्रीय नगर विकासमंत्री कमलनाथ व शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे व पिंपरी महापौर, पदाधिकारी व आयुक्तांची दिल्लीत बैठक झाली. त्यावेळी महापालिकेने पहिल्या टप्प्यातील दोन्ही मार्गांचा सुधारित आराखडा फेब्रुवारीच्या दुसर्‍या आठवड्यापर्यंत सादर करावा. तसेच, ‘स्पेशल पर्पज व्हेईकल’ (एसपीव्ही)ची स्थापना केल्यानंतर अर्थसंकल्पात तरतूद करण्याचे आश्‍वासन कमलनाथ यांनी दिले होते. परंतु, राज्य शासनाकडून वेळेत प्रस्ताव गेला नसला तरीही मेट्रोसाठी गुंतवणूक म्हणून अर्थसंकल्पात ही तरतूद झाली आहे.

दिरंगाईचा फटका..
महापालिकेने सुमारे १0,१८३ कोटीचा सुधारित आराखडा राज्य शासनाला जानेवारी अखेर सादर केला. परंतु, याला राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाने अद्याप मान्यता दिलेली नाही. तसेच, हा प्रस्ताव केंद्र शासनाला सादर करण्यात आला नसल्याने अर्थसंकल्पात पुणे मेट्रोला भरीव तरतूद झाली नसल्याची शंका उपस्थित केली जात आहे.

पिंपरी पालिकेचा २,0२४ कोटींचा अर्थसंकल्प

पिंपरी पालिकेचा २,0२४ कोटींचा अर्थसंकल्प: पिंपरी। दि. २८ (प्रतिनिधी)

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा २0१३-१४ या आर्थिक वर्षाचा २,0२४ कोटी १३ लाख ९४ हजार ४00 रुपयांचा, ९७ कोटी ८२ लाख आरंभीच्या शिलकीचा अर्थसंकल्प आयुक्त श्रीकर परदेशी यांनी आज स्थायी समिती सभापती जगदीश शेट्टी यांच्याकडे सादर केला. जेएनएनयूआरएम योजनेच्या १,२२४ कोटींसह हा अर्थसंकल्प ३,२४८ कोटींवर पोहोचला आहे. मिळकतकरात १ टक्का वाढ सुचविण्यात आली आहे. पर्यटनविकासाला चालना, समाविष्ट गावांच्या विकासाला प्राधान्य, अशी अर्थसंकल्पात तरतूद आहे.

महापालिका स्थायी समिती सभागृहात आयुक्त परदेशी यांनी स्थायी समिती सभापती शेट्टी यांना अर्थसंकल्प सादर केला. शेट्टी यांनी ४ मार्चपर्यंत अभ्यासासाठी वेळ मागितला असून, त्यानंतर तो मंजूर केला जाईल.

अर्थसंकल्पात योजना जुन्या, तरतुदी नव्या

अर्थसंकल्पात योजना जुन्या, तरतुदी नव्या: पिंपरी । दि. २८ (प्रतिनिधी)

महापालिका अर्थसंकल्पात ‘जेएनएनयूआरएम’ योजनेच्या जुन्याच अर्धवट प्रकल्पांसाठी नव्याने तरतुदी करण्यात आल्या आहेत. पर्यटनास चालना देण्याच्या प्रकल्पासह ‘वायसीएम’ रुग्णालयाला संलग्न असे वैद्यकीय पद्व्युत्तर पदवी अभ्यासक्रम केंद्र हे यंदाच्या अर्थसंकल्पातील वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प आहेत. मिळकतकरात १ टक्का वाढवून सामान्यांवर कराचा बोजा टाकला आहे. समाविष्ट गावांच्या विकासाला प्राधान्य देणार असल्याचे म्हटले असले, तरी तरतूद स्पष्ट केलेली नाही.

२0२४ कोटींचा अर्थसंकल्प आयुक्त श्रीकर परदेशी यांनी स्थायी समितीकडे सादर केला. मूळ २८२४ कोटींसह जे एनएन यू आर एम च्या १२२४ कोटींसह एकूण ३२४८ कोटींचा हा अर्थसंकल्प आहे. अखेरची की आरंभीची शिल्लक २ कोटी ३८ लाख इतकी आहे. प्रशासकीय सुधारणांच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांचा या अर्थसंकल्पात आवर्जून समावेश केला आहे. अधिकारी, कर्मचार्‍यांसाठी आखलेल्या दहा कलमी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. जमा तपशिलात जकातीचे १२00 कोटी उत्पन्न अपेक्षित धरले आहे. मिळकतकरापोटी २५0 कोटी, पाणीपट्टी ५८ कोटी, बांधकाम परवानगी विभागा कडून २५0 कोटी, गुंतवणुकीवरील व्याज ४१ कोटी उत्पन्न अपेक्षित आहे.

हिंजवडी, चांदखेड, थेरगावचे तिघे अटक

हिंजवडी, चांदखेड, थेरगावचे तिघे अटक: - माथाडीच्या नावाखाली खंडणी
पिंपरी। दि. २८ (प्रतिनिधी)

माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे कार्यकर्ते असल्याचे सांगून हमालीच्या नावाखाली ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाकडून ३६ हजार रुपये उकळणार्‍या चौघांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. विकास बाबुराव शिनगारे (वय ३२, रा. सोनई, पवारनगर, थेरगाव), बाळासाहेब अरुण निकम (३१, रा. देशमुखवाडी, सदाशिव पेठ), अजय देवराम येवले (२५, रा. चांदखेड, मावळ), संजय ऊर्फ लाला गुलाब जांभुळकर (३0, रा. साखरेवस्ती, हिंजवडी) अशी त्यांची नावे आहेत.

बाहेरगावाहून शहरात काही माल आल्यावर काही जण या गाड्यांचा पाठलाग करतात. जेव्हा सामान उतरविले जाते. तेथे जाऊन तुम्ही जरी स्वत: अथवा अन्य लोकांकडून माल उतरुन घेणार असला तरी माथाडी कायद्याप्रमाणे तुम्हाला हमाली द्यावी लागेल, आम्ही कामगार युनियनचे कार्यकर्ते असल्याचे ते सांगत आणि जबरदस्तीने पैसे वसूल करीत असत. अशा अनेक तक्रारी यापूर्वी अनेकदा आल्या होत्या.

याबाबत गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुकत शहाजी सोळुंखे यांनी सांगितले, की या आरोपींनी ६ व ७ फेब्रुवारी रोजी आर. आर. रोडवेजचे सुपरवायझर दीपक शर्मा यांच्याकडे ४५ हजार रुपयांची मागणी केली होती. सिसको कंपनीच्या आवारात मुंबईहून कंटेनरमधून आणलेले साहित्य खाली उतरविण्यासाठी मजुरीपेक्षा जास्त पैशांची मागणी केली होती. पैसे दिले नाही तर माल उतरवू देणार नाही, अशी धमकीही दिली होती. आरोंपीनी शर्मा यांच्याकडून ३६ हजार रुपये उकळले होते.

अतिक्रमणांविरुद्ध पालिका पुन्हा सक्रिय

अतिक्रमणांविरुद्ध पालिका पुन्हा सक्रिय पिंपरी - अनधिकृत बांधकामाबद्दल वारंवार ताकीद देऊनही नागरिक ऐकत नसल्याचे निदर्शनास आल्याने महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने बुधवारी (ता. 27) रुपीनगर, चिखली येथील बांधकाम चालू असलेल्या इमारतींवर बुलडोझर चालवला. त्यामध्ये शाळेच्या इमारतीचाही समावेश आहे. कारवाईला विरोध करणाऱ्या दोन नागरिकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला.

Industrialist Rahul Bajaj's wife dies of prolonged illness in Germany

Industrialist Rahul Bajaj's wife dies of prolonged illness in Germany: Industrialist and MP Rahul Bajaj's wife Rupa died of prolonged illness at a hospital in Germany on Thursday night.

Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) to invest Rs293 cr in Pavana pipeline

Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) to invest Rs293 cr in Pavana pipeline: Ambitious project to draw water from river was stalled for 1.5 yrs following Maval firing.

Expect infrastructure development worth Rs983.5 cr in twin town

Expect infrastructure development worth Rs983.5 cr in twin town: Municipal commissioner presents draft budget of `3,248 cr

24x7 water supply for 40% twin town residents

24x7 water supply for 40% twin town residents: PCMC draft budget makes provision of Rs155 crore for the purpose.

Dr Shrikar Pardeshi to present his first budget today

Dr Shrikar Pardeshi to present his first budget today: Pardeshi had earlier hinted that in the coming budget, focus will be on the development of newly merged villages.

PCMC budget emphasizes 24x7 water supply project

PCMC budget emphasizes 24x7 water supply project - Times of India:

PCMC budget emphasizes 24x7 water supply project
Times of India
PUNE: Pimpri Chinchwad municipal commissioner Shrikar Pardeshi presented a draft budget of Rs 3,248.14 crore for 2013-14 on Thursday. Substantial provisions for 24x7 water supply, Pavana river development project and a plan for promoting tourism are ...
Amid drought in state, Pimpri budget promises 24×7 waterIndian Express

all 4 news articles »

Amid drought in state, Pimpri budget promises 24×7 water

Amid drought in state, Pimpri budget promises 24×7 water - Indian Express:

Amid drought in state, Pimpri budget promises 24×7 water
Indian Express
Giving development a boost amidst ongoing recession, Pimpri-Chinchwad Municipal Commissioner Shrikar Pardeshi on Thursday presented a surplus budget of Rs 2,024 crore - which is Rs 200 more than the last budget presented by his predecessor ...

Pimpri Chinchwad corporation Budget -Youtube video

http://youtu.be/OV7bC9KaXiAVIDEO BY: www.mpcnews.in: http://youtu.be/OV7bC9KaXiA
VIDEO BY: www.mpcnews.in


Pimpri Chinchwad corporation Budget
एक टक्का करवाढीसह जुन्याच प्रकल्पांची नव्याने घोषणा करणारा 2013-14 या वर्षाचा मूळ 2024 कोटी तर जेएनएनयूआरएम योजनेसह 3248 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प पिंपरी-चिंच...

आम आदमी नाखुष तर उद्योजक खुष

आम आदमी नाखुष तर उद्योजक खुष
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

इमारतीच्या पार्कींग मध्ये उभ्या केलेल्या दुचाक्या पेटल्या

इमारतीच्या पार्कींग मध्ये उभ्या केलेल्या दुचाक्या पेटल्या
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा 3248 कोटींचा अर्थसंकल्प स्थायीसमितीसमोर सादर

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा 3248 कोटींचा अर्थसंकल्प स्थायीसमितीसमोर सादर.64 प्रभाग केंद्र प्रस्तावित.एलबीटीद्वारे 1200 कोटींचे उत्पन्न.मेट्रो, बीआरटीएस, पर्यटन विकास प्रकल्प, चोवीस तास पाणीपुरवठा, एसटीपी, इ ऑफिस, आकुर्डी मध्ये नवे प्रेक्षागृह हे आगामी वर्षाचे संकल्प.जानेवारी 2014 पासून बीआरटीएस सुरू होणार.