Sunday 17 December 2017

[Video] Mega E-Waste Collection Drive | Video 2

Watch this video to know the concept behind E-Waste collection, modus operandi and info on Swachhta App. We request citizen of PCMC to download Swachhta App https://goo.gl/yMUP7R to report waste issues in our city. Complaints registred on App will be monitored by Center govt through Swachh Bharat Mission - Urban

[Video] Mega E-Waste Collection Drive | Video 1

Inaugural event at Jadhavwadi, River Residency society. Organized by PCMC, ECA, Cummins and Shree Recycler & supported by various NGOs in PCMC 

[Video] पवना जलपर्णीमुक्त अभियान | Week 5

Lead by Rotary Club of Walhekarwadi and supported by 30_ PCMC NGO. Drive entered into 5th week. Recently PCMC applauded this initiative and gave immediate sanction to daily wages of workers

‘आयटी पार्क’च्या मार्गावर सर्वाधिक अपघात

पुण्याला ‘आयटी हब’ अशी ओळख मिळवून देणाऱ्या हिंजवडी ‘आयटी पार्क’मधील लाखो कर्मचाऱ्यांना दररोज अपघातांच्या मार्गावरूनच प्रवास करावा लागत आहे. वाहतूक पोलिसांनी जाहीर केलेल्या ‘ब्लॅक स्पॉट’पैकी हिंजवडी येथील स्पॉटवर यंदाच्या वर्षामध्ये सर्वाधिक अपघात झाले आहेत. त्यामुळे या सर्व ठिकाणी तातडीने सुधारणा करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

निगडी-दापोडी बीआरटीएस मार्गाचे काम अंतिम टप्यात

पिंपरी – पिंपरी पालिकेच्या वतीने आठ वर्षांपूर्वी काम सुरू झालेला निगडी ते दापोडी दरम्यानचा बीआरटी मार्ग अद्याप सुरू होऊ शकलेला नाही. या बीआरटीएस मार्गाचे काम अंतिम टप्यात असून आठ दिवसात पूर्ण होईल, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. तसेच त्यानंतर बीआरटीचे प्रात्यक्षिक घेऊन न्यायालयात जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले. 

मेट्रोच्या पहिल्या “व्हाया डक्‍ट सेगमेंट’ची उभारणी

पिंपरी – पुणे मेट्रो प्रकल्पाचा पहिला “व्हाया डक्‍ट सेगमेंट’ कासारवाडी येथे उभारण्यात आला आहे. प्रकल्प पूर्ण होण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीचा चेहरा बदलला जाणार आहे, अशी माहिती पुणे महामेट्रो व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे.

निगडीपर्यत मेट्रोसाछी पालिका खर्च करू शकेल – आयुक्त हर्डीकर

पिंपरी ते स्वारगेट मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत करण्यासाठी महापालिका खर्चाचा भार उचलू शकते, असे मत पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त  श्रावण हर्डीकर यांनी म्हटले आहे. त्यांच्याआधी महापालिकेने खर्च करण्याची तयारी दर्शविल्यास निगडीपर्यंत मेट्रो तातडीने होऊ शकते, असे महामेट्रोच्या अधिका-यांनी म्हटले होते.

PCMC chief to mediate in hospital row

PIMPRI CHINCHWAD: Municipal commissioner Shravan Hardikar has decided to intervene in the alleged harassment of medical superintendent of civic-run Yashwantrao Chavan Memorial (YCM) hospital at the hands of officer on deputation for the proposed postgraduate institute (PGI) here.

Highway footpaths, service road to stay clogged for now

Pimpri Chinchwad: Much to the dismay of commuters, encroachments on the footpaths of the Pune-Mumbai highway between Nigdi and Dapodi will stay for some more time.
This is because the civic body will be re-inviting bids for allotting the contract to a private contractor. "There has been poor response to the tender process, due to which the civic body will be re-inviting the bids for allotment of this contract," Shravan Hardikar, PCMC commissioner, said on Friday.

PCMC shelves plan to shift offices to SPM building

Pimpri Chinchwad: Increasing opposition to the plan to shift a few departments out of the Pimpri Chinchwad Municipal Corporation headquarters has forced the civic administration to come up with an alternative plan. Now, PCMC will start a study centre for girls at the Savitribai Phule Memorial building in Pimpri. It will later decide what to do with the rest of the space in the building.

काळेवाडी परिसराला अतिक्रमणाचे ग्रहण

काळेवाडी- काळेवाडी परिसरातील तापकीर मळा चौक ते पंचनाथ चौक दरम्यान रस्त्यावर अतिक्रमणाने बाजार भरवला आहे. या बाजारामुळे या परिसरातील नागरिकांना रोज प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
या वाहतूक कोंडीसाठी वाहनांच्या वाढत्या प्रमाणासोबत शहरातील रस्त्यावर झालेली अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे जबाबदार आहेत. दिवसागणिक शहराची लोकसंख्या वाढत आहे. त्यातच वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने रस्ते वाहतुकीसाठी कमी पडत आहे. त्यातच काळेवाडी परिसरात लहान-मोठ्या व्यावसायिकांची अतिक्रमणे वाढत चालली आहेत.

दोन हजार रुपयांपर्यंतचे सर्व ‘डिजिटल’ व्यवहार नि:शुल्क होणार

नवी दिल्ली -डिजिटल पेमेंट अर्थात कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारने दोन हजार रुपयापर्यंतचे डिबेट कार्डवरचे सर्व व्यवहार आता नि:शुल्क केले असून . दोन हजार रुपयांपर्यंतच्या डिजीटल पेमेंटवर ग्राहकांना आता एमडीआर म्हणजेच व्यापारी सवलत दर द्यावा लागणार नाही. या निर्णयामुळे डिबीट कार्ड, भीम प्रणाली यूपीआय प्रणाली वापरुन, दोन हजार रुपयांपर्यंत व्यवहारावर दोन वर्षं एमडीआर लागणार नाही.

इंद्रायणीच्या नशिबी पुन्हा काळे पाणी

मोशी – आपले दोन्ही काठ सुजलाम सुफलाम करत संथ वाहणाऱ्या इंद्रायणीने जना-जनाच्या मनातच नव्हे संतांच्या अभंगातही मानाचे स्थान मिळविले आहे. परंतु आज त्याच इंद्रायणीची दूरवस्था झाली आहे. इंद्रायणीच्या नशिबी पुन्हा एकदा काळे पाणी आले असून, या काळसर व रासायनिक तवंग असलेल्या पाण्यावर जलपर्णीचा वेढा वाढू लागला आहे. पावसाळा संपल्यानंतर अवघ्या दीड ते दोन महिन्यातच पुन्हा जलपर्णी अवतरली असून इंद्रायणीचे प्रदूषण दुर्गंधीने जाणवू लागले आहे.

आरोग्य निरीक्षकांना नियमबाह्य बक्षिसी?

पिंपरी – सार्वजनिक जागेवर, रस्त्यावर अस्वच्छता पसरवणारे नागरीक, संस्था यांचेकडून महापालिका आरोग्य विभाग प्रशासकीय खर्च वसूल करते. ही स्वच्छता मोहीम यशस्वीपणे राबवण्यासाठी काम करणाऱ्या आरोग्य निरीक्षकांना वसूल केलेल्या रकमेच्या 20 टक्‍के बक्षीस म्हणून देण्याची परंपरा पाळली जात आहे. त्यानुसार अ, ब आणि क-प्रभागातील आरोग्य निरीक्षकांना सुमारे पाच लाख रुपये बक्षीस वाटप करण्यात आले असून याकरिता आयुक्‍तांची कुठलीही परवानगी घेतली नसल्याचे उघड झाले आहे.

राज्यातील रिक्षा चालकांना दिलासा

पिंपरी – रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात येईल. ओला-उबेर या भांडवलदार कंपन्यांसाठी नियमावली तयार करण्यात येईल. नियमावलीची तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी त्यांना परिवहन कायदा लागू करणार आहे. रिक्षा पासिंगसाठी अद्ययावत ट्रॅक उपलब्ध करून रिक्षाचालकांचा प्रश्न सोडवू, असे आश्वासन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिले आहे, अशी माहिती रिक्षा चालक-मालक संयुक्‍त कृती समितीचे सरचिटणीस बाबा कांबळे यांनी दिली.

“पवनाथडी’च्या प्रसिद्धीवर भर द्या!

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून सांगवी येथे पवनाथडी जत्रेचे आयोजन केले आहे. त्यात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, म्हणून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात यावी, अशी सूचना महापौर नितीन काळजे यांनी प्रशासनाला केली.

कचरावेचकांना “पीएफ’ कधी?

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही शहरातील कचरावेचकांना पीएफची रक्‍कम मिळेना झाली आहे. ठेकेदारांकडून कचरावेचकांवर अन्याय होत आहे. याबरोबरच महापालिका देखील त्याची दखल घेत नाही. त्यामुळे कचरावेचकांनी न्याय कोणाकडे मागायचा? असा सवाल शहरातील कचरावेचक संघटना उपस्थित करत आहेत.

कुदळवाडीतील रस्त्यांना क्रमांक देण्याची मागणी

चिखली – कुदळवाडी परिसरातील रस्त्यांना क्रमांक देण्याची मागणी श्री महेशदादा लांडगे युवा मंच अध्यक्ष दिनेश यादव यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे की, कुदळवाडीतील मुख्य रस्त्यालगत अनेक अंतर्गत रस्ते आहेत. लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. बाहेरून येणाऱ्या नागरिकांना पत्ता सापडणे अवघड होत आहेत. तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांना देखील काम करताना अडचणी येतात.

बसस्टॉप की जाहिरात केंद्र ?

काळेवाडी – पिंपरी-चिंचवड शहरातील पीमपीएमएलच्या अनेक बसथांब्यांचे जाहिरातीचे पत्रके चिकटवून विद्रुपीकरण करण्यात येत आहे. शहरातील कित्येक बसथांबे सध्या जाहिरातीच्या पत्रकांनी अक्षरशः माखले आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पीएमपीएमएलचे शहरात मोठे जाळे आहे. कित्येक गावांनी बनलेल्या या शहरात प्रत्येक गावात किमान दोन ते तीन तरी बसस्टॉप आढळतात. प्रवाशांना चांगली सुविधा देण्यासाठी चांगले बसथांबे देण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु वेगवेगळ्या कारणांनी आणि विघ्नसंतोषी प्रवृत्तीच्या लोकांनी या बसथांब्यांची दूरवस्था केली. आधीच जर्जर होऊ लागलेल्या या बसथांब्यांचे जाहिरातबाजीने विद्रुपीकरण देखील सुरू केले आहे.