Tuesday 16 May 2017

PCMC to launch awareness campaign on segregating garbage

PIMPRI-Chinchwad Municipal Commissioner Shravan Hardikar said on Monday that the civic body would increase garbage processing at its Moshi garbage depot, which was running out of space. He added that the Pimpri-Chinchwad Municipal Commission ...

‘स्वीकृत’ची नावे बदलणार?

पिंपरी - स्वीकृत सदस्य निवडीवरून शहर भाजपमध्ये निर्माण झालेला पेच दूर करण्यासाठी मंगळवारी (ता. १६) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप मुंबईत चर्चा करणार असल्‍याचे  विश्‍वसनीय वृत्त आहे. पक्षातील काही कार्यकर्त्यांनी गेल्या शनिवारी असंतोष प्रकट केल्याच्या पार्श्‍वभूमीवर ही बैठक होत असून, त्यात नव्याने नावे निवडली जाण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

दोन स्वीकृत “औट घटकेचे’?

भाजपमध्ये वाद पेटला : मुख्यमंत्र्यांच्या “कोर्टात’ निर्णय 
पिंपरी, (प्रतिनिधी) – स्वीकृत सदस्य पदावरून भाजपमध्ये सुरु झालेला वाद पेटतच चालला आहे. सदस्य निवडीत भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांच्या समर्थकांचा पत्ता कट केल्याने त्यांच्या राजकीय प्रतिष्ठेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. खासदार अमर साबळे व लोकलेखा समिती अध्यक्षांच्या पुतळा दहन प्रकरणाची भाजप “हायकमांड’ने गंभीर दखल घेतल्याचे समजते. दोन स्वीकृत सदस्यांची नावे बदलण्यात येणार असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. पक्षनेता एकनाथ पवार यांनीही त्याला दुजोरा दिला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अंतिम निर्णय घेणार असल्याचे सांगितले.

पवना धरणातील गाळ काढण्याच्या कामास सुरवात

पिंपरी : पवना धरण पाण्यातील साठलेला गाळ काढण्याच्या कामाला सोमवारपासून सुरुवात झाली. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, पाटबंधारे खात्याचे उपअभियंता नानासाहेब मटकरी, शाखा अभियंता मनोहर खाडे, आदी उपस्थित होते. 

[Video] पिंपरी महापालिका शिक्षण मंडळाचे 151 कोटींचे अंदाजपत्रक!

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळाचे सन 2017-18 चे सुमारे 151 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मंजूरीसाठी सर्वसाधारण सभेसमोर सादर झाले आहे. शिक्षण मंडळ बरखास्त होऊन शिक्षण समिती अस्तित्वात येणार असल्याने मंडळाचे हे अखेरचे अंदाजपत्रक असणार आहे. 

पोहणारे १२ हजार, पण जीवरक्षक फक्त २४

पिंपरी-चिंचवड परिसरातील पालिकेच्या १२ जलतरण तलावातील अपुऱ्या सुरक्षा व्यवस्थेमुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. या परिसरात असणाऱ्या प्रत्येक जलतरण तलावामध्ये केवळ दोनच जीवरक्षक असल्याचे समोर ...

देखभाल पालिकेची; मालकी सरकारची

पिंपरी - राष्ट्रीय महामार्गालगत पाचशे मीटर अंतरावरील दारूची दुकाने बंद करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यानंतर महापालिकांनी महसुलासाठी हद्दीतील रस्ता ताब्यात घेऊन या दुकानांना अभय देण्याचा प्रयत्न केला. मात्र, जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावरील पिंपरी-चिंचवड हद्दीतील अकरा किलोमीटरचा रस्ता केवळ देखभाल आणि दुरुस्तीसाठी महापालिकेच्या ताब्यात असून, त्याची मालकी मात्र सरकारकडेच असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या हद्दीतील दारूची दुकाने बंदच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

मेट्रोच्या नऊ स्टेशनच्या बांधकामासाठी प्रक्रिया सुरू

पुणे मेट्रो प्रकल्पाच्या पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्स दरम्यानच्या १०.७५ किमीच्या 'प्राधान्य मार्गा'वरील नऊ स्टेशनच्या बांधकामासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (महामेट्रो) निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. मेट्रो स्टेशनच्या ...

पुण्यातील दारू दुकानांचा ओपनर 'सीएम'च्या हाती

पुणे : पुण्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग व राज्य मार्गांलगतची दारू दुकाने पुन्हा सुरू करण्यासाठी सर्वपक्षीय नेते एकत्र आले आहेत. या नेत्यांनी पुणे पालिकेच्या हद्दीतून जाणारे हे मार्ग पालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र यावरील अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. भाजपच्या काही नेत्यांनी याबाबत सीएमकडे "शिष्टाई' करण्याची तयारी दाखविल्याची चर्चा आहे. 

सचिन चिखले यांचे काम…आरोग्य विभागाची उंचावली मान !

निगडी : आजकाल चुकीच्या कामावर बोट ठेऊन टीका करण्याचे काम अनेक लोकप्रतिनिधी करताना दिसतात परंतू चांगल्या कामाचे कौतुक करून मनाचा मोठेपणा दाखविण्याचे साहस कोणीही करत नाही. परंतु आरोग्य विभागाच्या नियोजित कार्यपद्धतीमुळे यमुनानगर, निगडी विभागातील नाले सफाईचे काम वेळेत पूर्ण करण्यात आले. त्यामुळे मनसेचे नगरसेवक सचिन चिखले यांनी आरोग्य कर्मचा-यांचे आभार मानत त्यांचे अभिनंदन केले.