Wednesday 7 November 2018

‘नोटा’ला सर्वाधिक मते पडल्यास होणार अधिक फेरनिवडणूक!

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत उमेदवारांऐवजी ‘नोटा’ म्हणजेच कोणीही उमेदवार पसंतीचा नाही, या पर्यायास मतदारांनी सर्वाधिक पसंती दिल्यास अशा मतदारसंघात फेरनिवडणूक घेतली जाईल, असा ऐतिहासिक निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतच्या कोणत्याही कायद्यात ‘नोटा’चे महत्व अधोरेखित करणारी कोणतीही स्पष्ट तरतूद नसल्याने आयोगाने स्वत:च्या अधिकारात ‘नोटा’ला प्रभावी करण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाकडे ‘नोटा’चे महत्व अधोरेखित करण्याची मागणी येत होती.

FYJC admissions: Over 30,000 seats remain vacant this yr, 33 divisions have no student

After nearly ten rounds of admissions for first year junior college seats that continued till mid-October including four special rounds to attract students to take admissions on vacant seats, several junior colleges in the city failed to attract students resulting in thousands of seats going vacant.

‘Made in India’ products in demand this Diwali, shopkeepers rue poor turnout

At Raviwar Peth’s Bohri Ali, which is the epicentre of sorts for Diwali shoppers in the city who clog the narrow lanes, ‘Made in India’ and eco-friendly products are the new hoot this year.

Air quality likely to be better this Diwali, predicts SAFAR

The air quality during this Diwali is expected to be better than last year, scientists at the System of Air Quality and Weather Forecasting and Research (SAFAR) have predicted. But the prevailing weather condition will aggravate the smoke level and push the air quality to a poor range on November 8 (a day after Diwali and Laxmi Puja).

भाजपा मावळ, शिरुरसाठी ‘अटल’ की दबावतंत्र

भारतीय जनता पार्टीच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरात प्राधिकरणातील धिंग्रा मैदानात शनिवारी (दि. 3) मावळ व शिरुर लोकसभा मतदारसंघासाठी अटल संकल्प महासंमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात भाजपने या दोन मतदारसंघात आपली ताकद दाखवितानाच राज्यात लोकसभा व विधानसभा मदारसंघांसाठी युती करण्यासाठी अप्रत्यक्षरित्या शिवसेनेवर दबाव आणण्याची खेळी मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी केली आहे. या दबावाला शिवसेना बळी पडते की युती करुन सामंजस्याने जादा जागा पदरात पाडून घेते हे येणारा काळच सांगणार आहे. 

अर्बन मोबिलिटी इंडिया परिषदेत महा मेट्रो प्रथम

एमपीसी न्यूज – अकराव्या अर्बन मोबिलिटी इंडिया 2018 परिषदेत महा मेट्रोला बेस्ट एक्झिबिशन स्टॉल या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नागपूर येथील चिटणवीस सेंटर येथे आयोजित तीन दिवसीय अकराव्या अर्बन मोबिलिटी इंडिया 2018 परिषदेची रविवार (दि. 4) सांगता झाली. या समारोहात विविध स्पर्धेमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले. 

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कचरावेचक कर्मचाऱ्यांचा साडी, पोशाख व मिठाई देऊन सन्मान

एमपीसी न्यूज – दिवाळी निमित्त पिंपळे गुरव-सांगवी प्रभाग क्र. 29, 31 आणि 32 मधील महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. महिला कामगारांचा साडी, मिठाई देऊन; तर पुरुष कामगारांचा संपूर्ण पोशाख देऊन सत्कार करण्यात आला. सोबतीला मिठाईचा गोडवा आणि ’सांज स्वरांची : अभंगवाणी- मंगलगाणी’ या कार्यक्रमाचा आस्वादही कामगारांना घेता आला.

‘प्रदुषण करणा-या भंगार व्यावसायिकांच्या सुविधा बंद करा’

एमपीसी न्यूज – चिखली, मोशी, कुदळवाडी परिसरातील भंगार व्यावसायिक दुरुउपयोगी साहित्याची जाळून विल्हेवाट लावतात. त्यामुळे परिसरात धूर व दुर्गंधी पसरते. याचा परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वायूप्रदुषण करणा-या भंगार व्यावसायिकांना पालिकेतर्फे देण्यात येणा-या सोयी-सुविधा बंद कराव्यात. 

शहरवासियांना दिवाळी भेट; शास्तीकर माफीची अंमलबजावणी सुरु – एकनाथ पवार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकरांना सत्ताधारी भाजपने दिवाळी भेट दिली आहे. एक नोव्हेंबरपासून शास्तीकर माफीची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. 600 चौरस फुट आकाराच्या 30 हजार निवासी बांधकामांची 80 कोटी तर 601 ते 1 हजार चौरस फुट आकाराच्या पुढील 18 हजार मिळकतीचा 74 कोटी असा एकूण 150 कोटी शास्तीकर माफ होणार आहे. 

पिंपरीगाव ते हडपसर, पिंपरीगाव ते हिंजवडी फेज 3 बस सेवा सुरु

एमपीसी न्यूज – पिंपरीगावातून विविध मार्गावर पीएमपीएलच्या बसेस सुरू करून सार्वजनिक वाहतूक सुविधा सक्षम करण्यासाठी प्रयत्न करू असे, आश्वासन नगरसेवक संदीप वाघेरे यांनी दिले. पीएमपीएमएलच्या वतीने पिंपरीगाव ते हडपसर शेवाळवाडी तसेच पिंपरीगाव ते हिंजवडी फेज 3 बस मार्गाचा शुभारंभ नगरसेवक वाघेरे व ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर यांच्या हस्ते झाला. 

पवनेच्या काठावर दिवाळी पहाट उत्साहात

एमपीसी न्यूज – खासदार श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाउंडेशनतर्फे पवनाकाठ दिवाळी पहाट हा कार्यक्रम सप्तसुरांच्या मैफिलीत संपन्न झाला. ही दिवाळी पहाट आज (मंगळवारी) पहाटे चिंचवड मधील जिजाऊ पर्यटन केंद्र येथे पार पडली. कार्यक्रमात मराठी व हिंदी गीतांमधून रसिकांची मने भारावून गेली.  

गहूंजे मैदानावर बँक ऑफ महाराष्ट्रचा ताबा ; MCA ने थकवले कर्जाचे हफ्ते

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पुण्याच्या गहुंजे मैदानाचा, बँक ऑफ महाराष्ट्रने प्रतिकात्मक ताबा घेतला आहे. मैदानाच्या निर्मितीसाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने बँक ऑफ महाराष्ट्रकडून 69.50 कोटींचं कर्ज घेतलं होतं. मात्र या कर्जाचे हप्ते थकल्यामुळे बँकेने ही कारवाई केल्याचं समजतं आहे. मात्र या कारवाईचा क्रिकेटवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सचिवांनी सांगितलं आहे.

नागरिकांच्या पैशावर विदेश दौऱ्यास विरोध

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी कंपनीच्या पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी करदात्या नागरिकांच्या पैशावर स्पेन दौरा करू नये, अशी मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी सोमवारी केली. त्याऐवजी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून नागरिकांना माहिती उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना त्यांनी केली आहे.

प्रवासी वाहनांना आता ‘ट्रॅकिंग डिव्हाईस’ बसविणे बंधनकारक

पुणे : सार्वजनिक प्रवासी वाहनांना आता यापुढे ‘व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाईस’ आणि आपत्कालीन बटण बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही दोन्ही उपकरणे असल्याशिवाय वाहनांना नोंदणी किंवा तपासणी करतेवेळी योग्यता प्रमाणपत्र दिले जाणार नाही. दरम्यान, ही उपकरणे वाहनांमध्ये बसविण्यासाठी डिसेंबरअखेरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मात्र, राज्यातील काही प्रादेशिक परिवहन कार्यालयांकडून या निर्णयाची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. त्यामुळे वाहतूकदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये सार्वजनिक वाहतूक वाहनांसाठी ‘व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाईस’ आणि आपत्कालीन बटण असा उल्लेख करण्यात आला आहे.

आकुर्डी रुग्णालयाच्या इमारतीचे काम कासव गतीने

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आकुर्डी रुग्णालयाची दुरावस्था झाली आहे. या ठिकाणी दोन मजली जुन्या इमारतीत रुग्णालय असून जागा अपुरी पडत आहे. तसेच, रुग्णालयात विविध वैद्यकीय सुविधांचा अभाव दिसत आहे. नवीन इमारतीचे काम कासवगतीने सुरु असल्याने गैरसोय सहन करण्याखेरीज रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना पर्याय राहिलेला नाही.

बोअरवेलच्या पाणी उपसावर निर्बंध येणार

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील भूजल पातळी कायम ठेवायची असेल, तर बोअरवेलच्या माध्यमातून होणारा पाण्याचा उपसा रोखण्याच्या बाबीवर स्थायी समितीच्या सभेत चर्चा करण्यात आली. त्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयाकडून असलेल्या सुचनांची अंमलबजावणी करण्यासाठी नव्याने महापालिकेत रुजू झालेले अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

300 अनधिकृत फलक काढण्यासाठी दीड कोटी

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात केलेल्या सर्व्हेक्षणात आतापर्यंत एकूण 300 अनधिकृत फलक आढळले आहेत. त्यासाठी एक कोटींचा ठेका यापूर्वीच दिला आहे. मात्र, सर्व्हेक्षणानंतर आढळलेल्या 300 फलक हटविण्यासाठी येणाऱ्या आणखी 50 लाख रुपयांच्या वाढीव खर्चाला स्थायी समितीने मान्यता दिली. सोमवारी (दि. 5) पार पडलेल्या स्थायी सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या.

मेट्रोलगत चार एफएसआय?

पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) आणि पुणे महानगरपालिकेने मेट्रोचे काम हाती घेतले आहे. नागपूरमध्ये मेट्रोच्या मार्गांच्या दोन्ही बाजूस सरसकट चार एफएसआय देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. नागपूर मेट्रोच्या प्रस्तावास राज्य सरकारने मान्यता दिल्यामुळे पुणे महापालिका आणि पीएमआरडीएच्या मेट्रो मार्गालगत नागपूरचा नियम लागू होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

बिंदूनामावलीच्या नोंदणीसाठी पुन्हा मुदतवाढ

पुणे – राज्य शासनाने शिक्षक भरतीसाठी सुरू केलेल्या पवित्र पोर्टलवर बिंदूनामावलीची (रोस्टर) नोंदणी करण्यासाठी शासकीय व खासगी शैक्षणिक संस्थांना आता 15 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

अस्वच्छतेच्या तक्रारी सोडवण्यासाठी दोन संपर्क क्रमांक जाहीर

पिंपरी – अस्वच्छता व आरोग्य विषयक काही तक्रार असल्यास सारथी हेल्प लाईनच्या 8888006666 क्रमांकावर किंवा आरोग्य विभागाच्या व्हॉट्‌सऍप 7745065999 क्रमांकावर अथवा संबंधीत क्षेत्रीय कार्यालयातील सहाय्यक आरोग्याधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. महानगरपालिकेच्या अ, ब, क, ड, इ, फ, ग, ह-क्षेत्रिय कार्यालयांतर्गत आरोग्य विभागामार्फत शहरातील दैनंदिन स्वच्छता विषयक कामे केली जातात.

…अखेर “एजीओ’ कंपनीतील कामगारांना बोन

पिंपरी- पिंपरी, नेहरुनगर येथील कायमस्वरुपी कामगारांची दिवाळी गोड होणार आहे. आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याने कंपनीतील 100 कामगारांना 16 हजार 400 रुपये बोनस मिळाला आहे. यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, असे “एजीओ’ कामगार संघटनेचे खजिनदार हनुमंत (बाळा)शिंदे यांनी सांगितले.

प्लास्टिक वापरणारांकडून 13 लाख रुपये दंड वसूल

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका प्लास्टिक वापरणाऱ्या दुकानदारांवर धडक कारवाई करीत आहे. 1 एप्रिल ते 28 ऑक्‍टोबर 2018 पर्यंत प्लास्टिक वापरणाऱ्या 263 दुकानदारांकडून 13 लाख 55 हजार रुपये दंड वसूल केला व 10 हजार 511 किलो प्लास्टिक, थर्माकोल जप्त केले, अशी माहिती अतिरिक्‍त आयुक्‍त दिलीप गावडे यांनी दिली. 23 मार्चला राज्य शासनाने प्लास्टिक बंदीची अधिसूचना जारी केली. त्यानंतर या वस्तूंचा साठा पूर्णपणे संपण्यासाठी 22 जूनपर्यंत मुदत दिली होती. प्लास्टिकच्या पिशव्या, चमचे, ग्लास, स्ट्रॉ, थर्माकोल ताट, ग्लास, वाट्या या वस्तूंना बंदी घातली आहे.

अमित गोरखे कष्टातून उदयास आलेले युवानेतृत्व!

पिंपरी चिंचवड ः ज्या व्यक्तीला आयुष्यात पैशाची किंमत कळलेली असते. पैशाची किंमत काय ते घाम घाळूनच कळते. सक्षम युवा नेतृत्व कसे असावे याचे उदाहरण द्यायचे असेल, तर ते अमित गोरखे हे आहेत. समाजात माणसाने जीवनांत कधी खचून जायच नसते. अमित गोरखे हे समाजप्रिय असलेले युवा नेतृत्व खर्‍या अर्थाने आदर्श व्यक्तिमत्व आहे, असे गौरवोद्गार पालकमंत्री गिरीष बापट यांनी चिंचवड येथे युवा नेते अमित गोरखे यांच्या अभिष्टिचिंतन सोहळ्यात व्यक्त केले.

सात विद्यालयांमध्ये अस्मिता योजनेंतर्गत ‘व्हेंडिग मशिन‘

पिंपरी चिंचवड ः वैयक्तिक स्वच्छतेबाबत जनजागृती होण्यासाठी राज्यात ग्रामीण भागातील महिला व शाळेतील 11 ते 19 वर्ष वयोगटातील किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळीदरम्यान सॅनिटरी नॅपकीन’ संदर्भात अस्मिता’ योजना प्रभावीपणे राबविली जात आहे. शहरातील मुलींनीही याबाबत सजग व्हावे, या उद्देशाने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 18 पैकी 7 शाळांमध्ये व्हेंडिग मशिन’ बसविण्यात आले आहे.