Sunday 3 June 2018

सीसीटीव्हींची व्याप्ती वाढविण्यासाठी पोलिसांनी कसली कंबर

पिंपरी – एखाद्या गुन्ह्यात कोणतही पुरावा नसताना केवळ सीसीटीव्हीच्या आधारे अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यामुळे शहरातील सीसीटिव्हींची संख्या वाढवून, गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील आहे. त्याकरिता शहरातील सोसायट्या व दुकानदारांना आवाहन करुन सोसायटी व दुकानाबाहेरील दृश्‍य कैद करु शकणारा एक कॅमेरा लावण्यासाठी आवाहन केले जात आहे.

महापालिकेच्या मुख्य लेखापरिक्षक पदी आमोद कुंभोजकर यांची नियुक्ती

महापालिकेच्या मुख्य लेखापरीक्षकपदी नागपूर कोषागार कार्यालयातील वरिष्ठ कोषागार अधिकारी आमोद आप्पाजी कुंभोजकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वित्त विभागाच्या सहसचिव शुभांगी शुभांगी सेठ यांनी या बदलीचे आदेश दिले आहेत.

आयटीत भलतेच ‘उद्योग’ ऐटीत

पुणे - जगाच्या नकाशावर पुणे शहर ‘आयटी हब’ म्हणून ओळखले जावे, यासाठी प्रयत्न होत असतानाच येथील खासगी आयटी पार्कमध्ये ‘आयटी’ऐवजी हॉटेल्स, क्‍लब सुरू असल्याचे उघड झाले आहे. शहरातील ३० टक्के आयटी पार्कमध्ये हे ‘उद्योग’ सुरू असून, ही बाब सरकार आणि पालिका यंत्रणेला ठाऊक असतानाही अधिकारी डोळ्यांवर कातडे ओढून घेत आहेत. परिणामी, ‘आयटी’चा विस्तार करून रोजगारनिर्मितीचा उद्देश बाजूला पडल्याचे स्पष्ट झाले आहे. 

पिंपरी विधानसभेच्या “रेस’मध्ये शेखर ओव्हाळ

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीतील पुढचे पाऊल टाकत पिंपरी विधानसभेकरिता आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्यांच्या या शक्ति प्रदर्शनामुळे पिंपरी विधानसभा मतदार संघातील इच्छूकांची संख्या वाढली असली, तरी देखील ओव्हाळ यांच्या रुपाने आणखी एक तगडा उमेदवार विधानसभेकरिता रिंगणात उतरणार असल्याचा दावा त्यांचे समर्थक करत आहेत.

ड्रेनेज चेंबर फोडणाऱ्यावर गुन्हा दाखल

सांगवी – नदीच्या काठाहून मैला शुद्धीकरण केंद्राकडे जात असणाऱ्या ड्रेनेज लाईनचा चेंबर फोडून सर्व मैलापाणी मुळा नदीत सोडण्याचे कृत्य गेल्या बऱ्याच दिवसांपासून घडत आहे. मैला शुद्धीकरण केंद्रात एक थेंबही पाणी न सोडता सर्व मैलापाणी नदीत सोडण्याच्या या कृत्याला दैनिक प्रभात ने प्रकाशित केले. याबाबत मनपा अधिकाऱ्याने ड्रेनेज चेंबर फोडणाऱ्या अज्ञात इसमाविरुद्ध सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

अखेर महापालिकेला जाग

पिंपरी – मॉन्सून पूर्व पावसाने झोडपल्यानंतर जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने आज तातडीची बैठक घेतली. अतिवृष्टी अथवा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्यास नदीकाठच्या भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होते. ही स्थिती हाताळण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने मुख्य प्रशासकीय इमारतीत पूरनियंत्रण आपत्ती निवारण कक्ष तर आठ प्रभाग कार्यालयातही कक्षाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला.

अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी आयुक्‍तांना निवेदन

पिंपरी – उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पिंपरी चिंचवड येथील सर्व अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी अशोक काची यांनी आयुक्‍तांना निवेदन दिले आहे.

खासदारांच्या कार्यपूर्ती अहवालाचे प्रकाशन

पिंपरी – मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या कारर्कीदीला चार वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यांच्या कार्यपूर्ती अहवालाचे प्रकाशन शुक्रवारी (दि.1) शिवसेना भवन मुंबई येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार मनोहर भोईर उपस्थित होते.

बढ़ते अपराधों की वजह देहूरोड बना बिहार ?

पिंपरी-चिंचवड के देहूरोड इलाके में दिन पर दिन अपराधियों की दहशत बढ़ती जा रही है, अपना वर्चस्व स्थापित करने के लिए गैंग रोजाना आतंक मचा रही है। जिसकी वजह से नागरिकों में भय का माहौल बढ़ता ही जा रहा है। दहशत फैलाने के उद्देश्य से गाड़ियों की तोड़फोड़, महिलाओं के साथ मारपीट, नाबालिग लड़कों का गैंग में सहभाग बढ़ता जा रहा है, बदमाशों के जन्मदिन को मनाने के लिए गाड़ियों की तोड़फोड़ और दिनदहाड़े तलवारे लेकर घूमने जैसा माहौल देहूरोड में आम बात हो गई है, इससे साफ जाहिर होता है कि देहूरोड अपराध जगत में बिहार बनता जा रहा है।

डिजिटल कार्यशाळेला महिलांचा प्रतिसाद

जुनी सांगवी : जुनी सांगवी येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने नगरसेविका शारदा सोनवणे यांनी आयोजन केलेल्या डिजिटल महिला कार्यशाळेला महिलांनी उत्सफुर्त प्रतिसाद दिला.

विद्यार्थ्यांसाठी उद्यापासून नऊ मार्गदर्शन केंद्रे

पुणे - अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेत सहभागी होणाऱ्या राज्य शिक्षण मंडळाव्यतिरिक्त सीबीएसईसह अन्य सर्व मंडळांच्या विद्यार्थ्यांना अर्जाच्या भाग एकमधील माहिती आणि गुणपत्रिकेसह कागदपत्रांची पडताळणी (अप्रूव्ह) अधिकाऱ्यांकडून करून घ्यावी लागणार आहे. त्याशिवाय अर्जाचा भाग दोन भरता येणार नाही. त्यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड भागांत नऊ मार्गदर्शन केंद्रे सोमवारपासून (ता. ४) सुरू होणार आहेत. 

विद्यार्थ्यांची हजेरी आता तीनवेळा!

पुणे : शालेय विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना आता महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने तयार केलेल्या "चिराग ऍप'ची माहिती विद्यार्थ्यांना देणे बंधनकारक आहे. विद्यार्थी शाळेत असताना त्याच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी शाळेची असेल. तसेच विद्यार्थ्यांची हजेरीही तीन वेळा नोंदवायची आहे. 

गौरी लंकेश हत्येचे पिंपरी-चिंचवड “कनेक्‍शन’?

पिंपरी – कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) तीन दिवसांपूर्वी म्हैसूरू येथील प्रा. के. एस. भगवान यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी चौघांना अटक केली होती. हे चौघेही एका संघटनेशी संबंधित असून त्यापैकी अमोल काळे उर्फ भाईसाहेब (वय-39) हा चिंचवड येथे राहणारा आहे. या चौघांचा कर्नाटकातील सामाजिक कार्यकर्त्या आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येशी संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे.

क्‍लायबिंग स्पर्धेत अमृता विद्यालयाच्या विद्यार्थिनींचे यश

निगडी – टोकियो येथे 2010 मध्ये होणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धेत समाविष्ट केलेल्या स्पोर्टस्‌ क्‍लायबिंग (स्पिड) या साहसी खेळाची राष्ट्रीय स्पर्धा नुकतीच झारखंड येथील टाटा नगर, जमशेदपूर येथे जे. आर. डी. स्पोर्टस्‌ कॉम्प्लेक्‍समध्ये पार पडली.

जगताप प्रतिष्ठानतर्फे कर्तुत्ववान 61 व्यक्‍तींचा गौरव

पिंपरी – कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित अधिक मास तथा पुरूषोत्तम पर्वकाळ याचे औचित्य साधून अखंड हरिनाम सप्ताह तथा ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा जगद्‌गुरु व्दाराचार्य रामकृष्णदास लहवितकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळे गुरव येथील रामकृष्ण मंगल कार्यालय येथे संपन्न होत आहे.

प्रामाणिकपणा अजूनही जिवंत!

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नेहरुनगर येथील जलतरण तलाव परिसरात प्रामाणिकपणाचे दर्शन एका महिलेला घडले.