Tuesday 18 September 2018

देशातील ‘या’ तीन बँकांचे विलिनीकरण होणार


देशातील महत्वाच्या बँकांपैकी एक असलेल्या देना बँक, विजया बँक आणि बँक ऑफ बडोदा यांचे विलिनीकरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. अर्थखात्याचे सचिव राजीव कुमार यांनी याबाबत माहिती दिली. आम्ही देना बँक, विजया बँक आणि बँक ऑफ बडोदा यांचे विलिनीकरण करण्याचा निर्णय घेतल्याचे कुमार यांनी सांगितले. या विलिनीकरणानंतर ही देशातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बँक ठरणार असल्याचेही कुमार यांनी स्पष्ट केले आहे.

PMPML struggles to keep mud, dirt off its buses

PUNE: The muddy makeover, which the Pune Mahanagar Parivahan .. 

Pimpri-Chinchwad: Small, medium industries body protests against power tariff hike

The Pimpri Chinchwad Small and Medium Scale Industries Association has claimed that the increase in power tariff will hit the members and the agriculture sector the most. Sandeep Belsare, president of the association, said the new tariff has been effected without taking the ground reality in consideration.

For violating rule on BRTS lane: In a first, car drivers to pay Rs 1,000 as fine

As many as eight drivers who strayed into the Nigdi-Dapodi BRTS lane and violated the ban last week will have to cough up a fine of up to Rs 1,000 each. The fine imposed by the Pimpri-Chinchwad police is the first of its kind in Pune city. Each car owner will have to pay a fine of Rs 1,000.

आयटीतील लाखो वाहनांच्या नियोजनासाठी फक्‍त ४८ पोलिस

हिंजवडी ‘आयटी हब’मध्ये जुन्या आकडेवारीनुसार तब्बल तीन लाखांपेक्षा जास्त वाहनांची वर्दळ आहे. या वाहनांचे नियोजन केवळ 48 पोलिसांवरच अवलंबून आहे. तोडक्या मनुष्यबळावर आयटीच्या या वाढता पसार्‍याचे नियोजन करताना वाहतूक विभागातील पोलिसांची दमछाक होत असल्याचे चित्र आहे. आयटीच्या वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यासाठी हिंजवडीच्या वाहतूक विभागाचा ताण हलका करण्याची गरज आहे.

नदीतील तरंगत्या कचर्‍यासाठी ‘फ्लोटिंग वॉटर ड्रोन’

शहरातील पवना, इंद्रायणी व मुळा नदीपात्रातील तरंगता कचरा स्वच्छ करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने ‘फ्लाटिंग वॉटर ड्रोन’ची मदत घेतली आहे. गणेशोत्सवात प्रायोगित तत्त्वावर पवना व इंद्रायणी नदीवरील विसर्जन घाटावर त्याचा वापर करण्यात येणार आहे. 

पीएमपीएमएल’चे 154 कर्मचारी महापालिका सेवेत सामावून घेण्यास आयुक्तांचा स्पष्ट नकार

पीएमपीएमएल’च्या 154 कर्मचाऱ्यांना पुन्हा पिंपरी-चिंचवड महापालिका सेवेत सामावून घेण्यास आयुक्त श्रावण हर्डिकर यांचा स्पष्ट नकार आहे. तसेच कर्मचारी वर्ग करुन घेण्याच्या प्रस्तावावर सही करण्यास आयुक्तांनी हात आखडता घेतला आहे. तब्बल एक महिन्यापासून तो प्रस्ताव आयुक्तांच्या टेबलावर पडून राहिला आहे. याबाबत ते कर्मचारी स्थानिक राजकारणांशी संबंधित असल्याने काम करीत नाहीत, त्याना महापालिका सेवेत रुजू करुन घेण्यास पालिका विभाग प्रमुखासह सत्ताधारी नेत्यांच्या विरोधामुळे त्या प्रस्तावावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही

स्मार्ट सिटीतही वारकरी परंपरा जपू

पिंपरी-चिंचवड शहराला स्मार्ट सिटी करण्याबरोबरच येथील वारकरी सांप्रदायाची परंपरा जपण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही महापौर राहुल जाधव यांनी आकुर्डीत बोलताना दिली. शहरविकासाच्या कामासाठी राजकारण बाजूला ठेवून एकत्रित प्रयत्न करू, असेही ते म्हणाले.

दापोडी परिसरात ऐन सणासुदीच्या काळात पाण्याचा खोळंबा

दापोडी - परिसरात गेली पंधरादिवसापासुन अनियमित कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने ऐन सणासुदीच्या काळात दापोडीकर पाण्यासाठी त्रस्त झाले आहेत. दापोडी प्रभाग पाणीपुरवठ्याचा शेवटचा टप्पा आहे. गेली अनेक दिवसांपासुन अनियमित व विस्कळीत पाणीपुरवठा होत असल्याने नागरीकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. 

भूमकर चोकातील वाहतूकीमधील बदलामुळे चालकांमध्ये गोंधळ

पिंपरी (पुणे) - भूमकर चौकातील वाहतुकीमध्ये पोलिसांनी सोमवारपासून (ता. 17) बदल केला. यामुळे भूमकर चौकाने मोकळा श्‍वास घेतला. मात्र मारूंजी वाय जंक्‍शन चौकात टू-टर्न घेण्यासाठी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. दरम्यान या वाहतूकीमधील बदलांची पोलिस आयुक्‍त आर. के. पद्‌मनाभन यांनी पाहणी केली. 

पालिकेपुढे ‘टॉप टेन’चे आव्हान

पिंपरी -  स्वच्छ भारत अभियानाचे दोन ऑक्‍टोबरपासून चौथे वर्ष सुरू होत आहे. पहिल्या वर्षी देशात पहिल्या दहा शहरांत स्थान पटकाविलेले पिंपरी-चिंचवड थेट ७२व्या स्थानावर फेकले गेले. त्यात थोडी फार सुधारणा केलेल्या शहराला तिसऱ्या म्हणजे चालू वर्षी ४३ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. आगामी २०१८-२०१९ या वर्षात पहिल्या दहामध्ये स्थान मिळविण्याचे आव्हान शहरासमोर आहे. त्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेची धडपड सुरू आहे. 

अतिक्रमणांची साफसफाई

पिंपरी - वाहतूक पोलिसांनी हिंजवडीत सुरू केलेला एकेरी वाहतुकीचा प्रयोग यशस्वी करण्यासाठी शिवाजी चौक परिसरातील रस्त्यांवरील अतिक्रमणे शनिवारी (ता. ८) काढण्यात आली. पोलिस, एमआयडीसी आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्‍त प्रयत्नांतून ही कारवाई करण्यात आली. सकाळी साडेआठ वाजता सुरू झालेली मोहीम संध्याकाळपर्यंत सुरू होती. यामध्ये या परिसरातील ४०० अतिक्रमणे काढून टाकण्यात आली. पुढील तीन दिवस ही कारवाई सुरू ठेवण्यात येणार आहे. 

रावेत बंधाऱ्याबाबत दिरंगाई

पिंपरी - रावेत बंधाऱ्याची दुरुस्ती करून उंची वाढविण्यासाठी अथवा नवीन बंधारा बांधण्यासाठी आवश्‍यक असलेले सर्वेक्षण करण्यात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून दिरंगाई होत असल्याने याबाबतचा निर्णय लांबणीवर पडू लागला आहे. गेले वर्षभर सर्वेक्षणाचे काम झालेले नाही. 

डीम्ड कन्व्हेयन्ससाठी गृहनिर्माण संस्थांना सहकार्य

पुणे - सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या डीम्ड कन्व्हेयन्सची (मानीव अभिहस्तांतरण) प्रक्रिया सोपी करण्यात आली असून, त्यासाठी आठच कागदपत्रे जोडावयाची आहेत. डीम्ड कन्व्हेयन्ससाठी गृहनिर्माण संस्थांना संपूर्ण सहकार्य करण्यात येईल. मात्र त्यासाठी गृहनिर्माण संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक बी. टी. लावंड यांनी येथे केले.

बेवारस वाहनांच्या तक्रारी नोंदविता येणार

पुणे – महानगरपालिकांच्या मालमत्ता, रस्त्यावरील बेवारस वाहनांच्या तक्रारी नोंदविण्यासाठी तक्रार निवारण यंत्रणा स्थापन करण्याचे आदेश शासनाने सर्व महानगरपालिकांना दिले आहेत. तसेच प्राप्त तक्रारींबाबत आवश्‍यक ती कार्यवाही तत्काळ करावी, अशा सूचनाही शासनाने दिले आहेत.

“आधी केले, मग सांगितले’-दक्षता तरुण मंडळ

निगडी- “आधी केले, मग सांगितले’ उक्‍तीला सार्थ करणारे दक्षता तरुण मंडळ आहे. राष्ट्रभूषण सोसायटी, रुपीनगर येथे मंडळाने यंदा “खरा हिरो कोण?’ हा अप्रतिम देखावा सादर केला आहे. आंबेनळी घाटातील बस दुर्घटनेत मदत कार्य करणाऱ्या सह्याद्रि ट्रेकर्स संस्थेचे अध्यक्ष संजय पार्टे यांच्या जीवनावर आधारित जिवंत देखावा आहे. खरा हिरो संजय दत्त की संजय पार्टे, हे यात समजावण्यात आलेय. मंडळाने 25 फूट उंच डोंगराचा सेट उभा केला आहे. देखाव्याचे कंत्राट न देता मंडळाच्या कार्यकर्त्यांनी महाबळेश्वरला जाऊन संजय पार्टे यांना भेटून त्यांच्या जीवनावर स्क्रिप्ट लिहिले. कार्यकर्त्यानी स्वतःच्या आवाजात रेकॉर्डिंग केले आणि 20 कार्यकर्ते यात वेगवेगळ्या पात्रांत आहेत.

चिंचवड परिसरात देखाव्यांद्वारे जनजागृती

पिंपरी – आगळ्या-वेगळ्या पद्धतीचे देखावे चिंचवड परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदाही साकारले आहेत. गणपती पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचे मनोरंजन होत असतानाच जनजागृती देखील करण्याचा प्रयत्न मंडळांनी केला आहे. चिंचवडगाव, चिंचवड स्टेशन आणि वाल्हेकरवाडी परिसरातील गणेशोत्सव मंडळांनी नयनरम्य देखाव्यांसोबत नाजूक परंतु गंभीर विषयांत देखील हात घालून डोळे उघडण्याचे काम केले आहे.

वाहतूकदार, माथाडी कामगारांचे गणराज

निगडी- येथील वाहतूकनगरीमध्ये देशभरातील शेकडो ट्रक ड्रायव्हर, क्‍लिनर्स येतात. शेकडो माथाडी कामगार याठिकाणी कार्यरत आहेत. या विविध प्रांतातील तसेच जाती-धर्मातील श्रमिकांना एकत्र आणण्यात वाहतूकनगरीतील गणेशोत्सव मोलाचा हातभार लावत आहे. माल पोहचवण्यासाठी अनेक दिवस मजल-दरमजल करणाऱ्या ट्रक ड्रायव्हर, क्‍लिनर्सला वाहतूकनगरीत मुक्कामी आल्यानंतर गणरायाच्या आरती व पुजेमध्ये सहभागी होण्याची मिळत असलेली संधी त्यांच्यासाठी एक पर्वणीच ठरत आहे.

विद्यार्थ्यांना वाहतूक, स्वच्छतेचे धडे!

पिंपरी – परदेशामध्ये मुळांत मुलांना शाळांमधूनच वाहतूक व्यवस्था व स्वच्छतेच्या नियमांबाबत माहिती व शिक्षण दिले जाते त्यामुळे भावी पिढी चांगली घडते त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहरातील महापालिकेच्या शाळांमधूनच आपण आता वाहतूक स्वच्छतेबदद्दल शिक्षण देण्यास सुरुवात करणार आहोत, अशी माहिती महापौर राहुल जाधव यांनी दिली.

जाती आयोगाची आयुक्‍तांना नोटीस

पिंपरी – महापालिकेत काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग आणि राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाने पिंपरी – चिंचवड महापालिका आयुक्तांना नोटीस बजावली आहे. येत्या 30 दिवसांत कार्यपूर्तता अहवाल सादर न केल्यास समन्स जारी करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

बिल न भरल्यामुळे रुग्णाची अडवणूक करणे “गुन्हा’

नवी दिल्ली – डिस्चार्ज घेताना बिल भरण्यासाठी पैसे नसल्यामुळे अनेक रुग्णांची अडवणूक झाल्याचे प्रकार घडत असतात. एवढंच नाही, तर पैसे न भरल्यास मृतदेह सोडण्यासही काही रुग्णालयांकडून नकार देण्यात येत असतो. पण यापुढे आता बिलाचे पैसे न भरल्याने रुग्णाला डिस्चार्ज न देणे किंवा रुग्णाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात न देणे, हा गुन्हा ठरणार आहे.

रेशनवर मीठ देण्यास शहरात सुरुवात

पुणे – लोह व आयोडीन युक्त मिठाचा पुरवठा माफक दरात सर्वसामान्यांना करण्याचा निर्णय अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेतला आहे. त्यानुसार रेशन कार्डवर मीठ देण्यास सुरुवात झाली आहे. मिठामुळे शरीरातील हिमोग्लोबीन वाढण्यास मदत होते. नागरिक अधिक सशक्त होण्यासाठी शासनाने ही योजना आणली असल्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले.

महापाैरांच्या प्रश्नावर क्रीडा सहाय्यक आयुक्त निरुत्तर

तीन दिवसात उत्तरे द्या, अन्यथा घरी जा, महापाैरांनी घेतला खरपूस समाचार
निर्भीडसत्ता न्यूज –
महापालिकेचा क्रिडा विभाग अडगळीस पडला आहे. त्या विभागाकडे आयुक्तासह क्रिडा समितीचे पदाधिकारी लक्ष देत नाहीत. परंतू, महापाैर राहूल जाधव यांनी क्रीडा व प्रबोधिनी विभागावर तब्बल 22 प्रश्न विचारले. त्यातील एकाही प्रश्नावर सहाय्यक आयुक्त मंगेश चितळे यांना नीट उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे तीन दिवस सर्व प्रश्नाची सविस्तर, आकडेवारीसह उत्तरे द्या, अन्यथा घरी जा, असा इशारा त्यांनी दिला आहे.

आयुक्तांच्या घरी पर्यावरणपूरक आकर्षक आरास

विविध कला साहित्यांचा केला वापर
पिंपरी : घरात गणपती म्हटलं की त्याच्यासाठी खास सजावट केली जाते. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या घरच्या गणेशासमोर आकर्षक आरास करण्यात आली आहे. विद्या आणि कलेची देवता असलेल्या गणपतीसमोर विविध कला साहित्यांची आकर्षक आरास करण्यात आली आहे. त्यामध्ये हार्मोनियम, तबला, तंबोरा तसेच पुस्तकांचा वापर करण्यात आला आहे. त्यातून पर्यावरण संवर्धन आणि कलेचे जतन करण्याचा संदेश देण्यात आला आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या मोरवाडीतील बंगल्यावर मोठ्या उत्साहात गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. आयुक्तांचा घरी अनेक वर्षांपासून गणपती बसविला जातो. त्यांच्या घरी पाच दिवसांचे बाप्पा येतात. दरवर्षी गणपती समोर वेगवेगळी आकर्षक अशी आरास केली जाते. यंदा गणपतीसमोर पर्यावरणपूरक कलांची आकर्षक आरास करण्यात आली आहे.

कचरा विलगीकरण व खतनिर्मितीसाठी नि:शुल्क मार्गदर्शन व प्रात्यक्षिक उपलब्ध

घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ (Solid Waste Management) मधील तरतूदीनुसार नागरिक व व्यावसायिक यांनी घर, परिसर, व्यवसाय इ. ठिकाणी उत्पन्न होणारा कचरा ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा करणे कायदेशीर बंधनकारक आहे. शहरातील सर्व वैयक्तीक कुटूंबे, गृहनिर्माण संस्था, निवासी सुकुले, बाजार संकुले, हॉटेल व उपहारगृहे, दुकाने, कार्यालये यामध्ये निर्माण होणा-या घनकच-याचे विलगीकरण करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

झोपडपट्टी पुनर्वसनासाठी वाढीव ‘एफएसआय’ द्या

पुणे - झोपडपट्टी पुनर्वसनासाठी पूर्वीइतकाच ‘एफएसआय’ (चटई क्षेत्र निर्देशांक) द्यावा, अशी शिफारस नगररचना विभागाने राज्य सरकारकडे केली आहे. यात पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील योजनांसाठी वेगवेगळा ‘एफएसआय’ द्यावा, असे म्हटले आहे. सरकारने या शिफारशी मान्य केल्या, तर झोपडपट्ट्यांचे रखडलेले पुनर्वसन  मार्गी लागण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

आता २१ प्रकारच्या दिव्यांगांना प्रमाणपत्रे

आतापर्यंत राज्यात केवळ सहा प्रकारच्या दिव्यांगांना दिव्यांगत्त्वाचे प्रमाणपत्र देण्यात येत होते. मात्र, आता केंद्र शासनाच्या ‘दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016’ची अंमलबजावणी राज्यात सुरू केली आहे. त्यानुसार या अधिनियमात नव्याने समाविष्ट केलेल्या 15 प्रकारातील दिव्यांगांनाही दिव्यांगत्त्वाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. त्यासाठी तपासणी प्रत्येक जिल्ह्यातील संबंधित रुग्णालयातून करण्यात येणार असून त्यासाठी ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहेत.