Monday 16 April 2018

पवना, इंद्रायणी नद्या ‘आजारी’

पिंपरी - पवना आणि इंद्रायणी या दोन्ही नद्यांची प्रकृती फार खराब आहे, त्या खूपच ‘आजारी’आहेत. लोकसहभागातून त्यांचे शुद्धीकरण नितांत गरजेचे आहे, त्यासाठी आपण स्वतः लक्ष घालणार असल्याचे ज्येष्ठ जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी आज येथे सांगितले.

Pimpri-Chinchwad: Row over garbage lifting contracts eases, 8 agencies to be appointed

The PCMC chief argued that vehicles based on latest technology would be employed for lifting the garbage. “Already there has been a delay in appointing the contracts and any further delay will aggravate the city’s garbage problem,” he said.

PCMC to table parking policy, keeps internal roads out of it

Draft policy prepared by PCMC to be tabled before General Body meeting this week; residents say corporation should have given priority to internal roads

Residents angry over PCMC’s ‘apathy’ in implementing safety measures on the stretch

PCMC chief says will provide pension to boy’s parents; minibus that hit the child was overspeeding, had illegally entered BRTS corridors, say police

बीआरटी पुन्हा अडचणीत

पिंपरी - निगडी दापोडी रस्त्यावर कोट्यवधी रुपये खर्चून लवकरच मार्गस्थ होण्याच्या तयारीत असलेली बीआरटी बससेवा आता मेट्रो प्रकल्पाने पुन्हा अडचणीत आली आहे. महापालिका भवनासमोर पदपथावरून असलेला मेट्रोचा नियोजित मार्ग बदलून तो आता बीआरटी मार्गातून जाणार आहे.

मेट्रोच्या अहवालासाठी चार कोटींचा खर्च

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेने पिंपरी ते निगडी आणि नाशिक फाटा ते चाकण या मार्गावर मेट्रो सुरू करण्याबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. हा डीपीआर तयार करण्यासाठी आठ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यासाठी तब्बल 4 कोटी 31 लाख रूपये पुणे महामेट्रोला देण्यात येणार आहेत.

पिंपरीत मेट्रोच्या कामास प्रारंभ

हॅरिस पुलाजवळ सिव्हिल वर्कला होणार सुरुवात; वाहतुकीत बदल

हॅरिस पुलावर मेट्रोच्या पीलरच्या कामास आज (सोमवार) पासून सुरुवात करण्यात येणार आहे. यामुळे हॅरिस पुलावरून पुण्याच्या दिशेने जाताना भाऊपाटील रस्त्याकडे वळण्यास वाहनांना मनाई करण्यात येणार आहे. महामेट्रोकडून पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील मार्गावर पिंपरी (खराळवाडी) ते सीएमई गेट दापोडीपर्यंत कामाला सध्या वेग आला आहे. त्यापुढे जाऊन आता हॅरिस पुलावर काम सुरू होत आहे.

“मिशन’ प्लास्टिक, थर्माकोलमुक्‍त उद्योगनगरी!

पिंपरी – महाराष्ट्र राज्य सरकारने गुढीपाडव्याच्या दिवशी प्लास्टिक आणि थर्माकोलवर बंदी घातली. न्यायालयाने देखील या निर्णयास योग्य ठरवत बंदी कायम ठेवली. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पर्यावरण संवर्धन समितीने प्लास्टिक आणि थर्माकोलमुक्‍त शहराचे मिशनफ हाती घेतले आहे. या मोहिमेला 19 एप्रिलपासून सुरुवात होणार असून 21 एप्रिल दरम्यान चालणाऱ्या या मोहिमेत प्लास्टिक, थर्माकोल संकलनाबरोबरच जनजागृती करण्यात येणार आहे.

हिंजवडी आयटी पार्क करणार चकाचक

पिंपरी - हिंजवडी आयटी पार्कमध्ये येणारी विदेशी मंडळी या परिसरातील स्वच्छतेबाबत कायम प्रश्‍न उपस्थित करीत असतात. या पार्श्‍वभूमीवर स्वच्छतेचा विषय कायमस्वरूपी मार्गी लागावा, म्हणून हिंजवडी इंडस्ट्रिअल असोसिएशनने क्‍लीन अँड ग्रीन आयटी पार्क इनिशिएटिव्ह या अनोख्या उपक्रमाची सुरवात केली आहे. 

चला, बालशास्त्रज्ञ होऊयात !

पुणे - शालेय विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन, तौलनिक विचारक्षमता, निर्णयक्षमता, निरीक्षण कौशल्य व कृतिशीलता वाढीस लागावी आणि वैज्ञानिक प्रयोगातून नवनिर्मितीचा आनंद मिळावा म्हणून होणारा ‘संडे सायन्स स्कूल’ उपक्रम पुणे आणि पिंपरी-चिंचवड-निगडीमध्ये रविवार (ता. २२) पासून सुरू होत आहे. ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘संडे सायन्स स्कूल’ यांनी हा उपक्रम आयोजिला आहे.

Revised development plan for old city areas to begin

Pimpri Chinchwad: The process of creating a revised development plan for the old city areas of the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) and the Pimpri Chinchwad New Township Development Authority (PCNTDA), covering a total 86 sq km, will begin within the next 15 days.

वल्लभनगर एसटी स्थानकाच्या आवारात स्फोट

एकापाठोपाठ दोन स्फोट झाले. तेथे वावरणाऱ्या दोन भटक्या श्वानांचा जागीच मृत्यू झाला

पीएफ खातेधारकांना दिलासा

भविष्य निर्वाह निधीतून (पीएफ) दहा लाखांहून अधिक रक्कम काढण्यासाठीचा अर्ज ऑनलाइन पद्धतीनेच करण्याची सक्ती कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने (ईपीएफओ) मागे घेतली आहे. पीएफ काढण्यासाठी ऑनलाइन अर्ज करताना असंख्य अडचणी येत असल्याची तक्रार पीएफ खातेधारकांकडून केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर ईपीएफओने आपल्या निर्णयापासून यू टर्न घेत खातेधारकांना ऑनलाइन पद्धतीप्रमाणेच ऑफलाइन अर्ज करण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे अनेक पीएफ खातेधारकांना दिलासा मिळाला आहे. 

पिंपळे सौदागरमध्ये बंगाली नववर्ष बैसाखी मोठ्या उत्साहात साजरा

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडमधील पिंपळे सौदागरमध्ये बंगाली नववर्ष अर्थात बैसाखी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला…! पिंपळे सौदागर ओकियोनतान परिषदेच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन  करण्यात आले… या उत्सवाला चिंचवड आमदार आणि भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी नगरसेवक शत्रूघन काटे हे ही उपस्तिथ होते…! या वेळी जॉली मुखर्जी आणि त्यांच्या साथीदारांनी आर डी बर्मन यांच्या गीतांचं सादरीकरण करत उपस्तिथांची मन जिंकली…!

आयटी तरूणाईकडून पक्षांना चारापाणी

दिवसेंदिवस वाढत असलेली उन्हाची तिव्रता, नैसर्गिक पाणवठ्यावरील पाणी संपल्याने पक्षांचे या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात हाल होतात. यासाठी हिंजवडीतील आयटीयन्स मंडळी सरसावली आहे. या आयटीयन्स मंडळींनी व्हॉटस्‌ऍपच्या ग्रुपद्वारे् एकत्र येऊन पक्ष्यांची तहान भागवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. हेल्दी रोमिंग या नावाखाली आयटीयन्स समूहाने पक्ष्यांना खाद्य ठेवणे, पाणी ठेवणे असा उपक्रम सुरू केला आहे.

Committee forwards private coaching class bill to Maharashtra govt

PUNE: An expert panel has submitted the final draft of the Maharashtra Private Coaching Classes Regulatory Bill to the state government on Saturday. In the draft are provisions to limit the number of students in a single batch, registration of coaching classes, restriction of fee charged to students, among others. Once the draft is approved, the state government would immediately implement the rules and regulations across the state, officials said.

Social innovation lab to be set up at International Centre in SPPU

A dedicated Social Innovation and Entrepreneurship (Sino) Lab will be set-up at International Centre in Savitribai Phule Pune University (SPPU) to provide a platform to entrepreneurs, especially women entrepreneurs. The lab will be an ideal platform for conceptualisation and development of innovative ideas and to find solutions to social problems, said Vijay Khare, Director, International Centre (SPPU). The initiative aims at creating ideas to promote Clean India campaign and find an alternative technology to do away with ‘manual scavenging’, said Khare.

पुणे विद्यापीठात उभारणार सायनोलॅब

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील इंटरनॅशनल सेंटर विभागामध्ये सामाजिक बांधिलकी जपणारे उद्योजक आणि उद्योजिकांसाठी ‘सायनोलॅब’ची उभारण्यात येणार आहे. नावीन्यपूर्ण सामाजिक उपक्रम (सोशल इनोव्हेशन) आणि संकल्पना मांडण्यासाठी आणि राबविण्यासाठी ही लॅब असेल, अशी माहिती विभागप्रमुख डॉ. विजय खरे यांनी दिली.

पिंपरी- वाकडमध्ये उन्नाव व कठुवामधील बलात्काराच्या निषेधार्थ आंदोलन

पिंपरी (पुणे)- उत्तरप्रदेशातील उन्नाव, जम्मू काश्‍मीर मधील कठुवा व गुजरात मधील सुरत या ठिकाणी घडलेल्या बलात्काराच्या घटनांच्या विरोधात 'अपना वतन' संघटनेसह इतर संघटनांनी रविवारी (ता. 15) वाकड चौकात निदर्शने करून या घटनेचा निषेध व्यक्त केला. तसेच वाकड चौक ते वाकड पोलिस स्टेशनवर मार्च काढण्यात आला. 

पिंपरीत दोन ठिकाणी 38 वाहनांची तोडफोड

पिंपरी - पिंपरीतील खराळवाडी आणि बौद्धनगर परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी 38 वाहनांची तोडफोड करण्यात आली. तसेच आरोपींनी शस्त्राचा धाक दाखवत लूटमारही केली. शनिवारी घडलेल्या या दोन घटनांप्रकरणी या प्रकरणी पोलिसांनी तब्बल 41 जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. 

कोथिंबीर, मेथीचे भाव स्थिर

पिंपरी – मोशीतील नागेश्‍वर महाराज उपबाजारातील आठवड्यात फळभाज्या व पालेभाज्यांची आवक घटली आहे; मात्र पालेभाज्यांची आवक मात्र वाढली असून, भाव मात्र तेजीत आहेत. या आठवड्यात काकडी, टोमॅटो आणि लसणाची आवक वाढली आहे. तर कांदा, बटाटा आणि कैरीची आवक मात्र घटली आहे.

चिंचवडमध्ये आंबा महोत्सव

चिंचवड – धनश्री बचत गट व किर्ती बचत गटाच्या वतीने अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 16 एप्रिल ते 25 एप्रिल दरम्यान चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाच्या बेसमेंटमध्ये थेट शेतकरी ते ग्राहक असा “महाराष्ट्र माझा आंबा महोत्सव’ आयोजित केला आहे.