Tuesday 28 January 2014

Hazare bats for Pimpri-Chinchwad civic chief

Business Standard
Social activist Anna Hazare today came out in support of Pimpri-Chinchwad municipal commissioner, who is reportedly being transfered, saying if the government acts against the bureaucrat he would lead a people's agitation on the issue. Hazare today ...
Support for PCMC chief goes viral online

Eve-teasing, a growing menace in Pradhikaran

PIMPRI: If feedback from a section of locals is any indication, eve-teasing is a major problem in areas under the Pimpri Chinchwad New Township Development Authority (PCNTDA), popularly known as Pradhikaran.

बँडबाजा वाजताच जमा झाली मिळकतकर थकबाकी

पिंपरी: थकबाकीदारांच्या घराजवळ बँडबाजा वाजविण्याचा महापालिकेने गांधीगिरी मार्ग अवलंबताच, मोरवाडीतील एका उद्योजकाने लगेच मिळकतकराच्या थकबाकीचे साडेचार लाख रुपये करसंकलन विभागाच्या कर्मचार्‍यांकडे जमा केले. 
दंड आणि जप्तीची कारवाई टाळायची असेल, तर थकबाकी जमा करावी, अशा स्वरूपाची रिक्षाला लावलेल्या ध्वनिक्षेपकावरून इशारावजा दवंडी पिटणार्‍या महापालिकेच्या करसंकलन विभागाची नेहमीची पद्धती नागरिकांना परिचित होती. या वेळी मात्र थकबाकीदारांच्या घरासमोर बँडपथक हजर झाले. बँडबाजा वाजू लागताच, आजुबाजूचे लोक जमा होऊ लागले आहेत. कुतूहलाने त्या ठिकाणी जमलेल्यांना लग्नाच्या वरातीचा अथवा अन्य कोणत्या कार्यक्रमाचा बँडबाजा नसून, थकबाकीवसुलीचा बँडबाजा असल्याचे लक्षात येते. मिळकतकराची थकबाकी असल्याचा गाजावाजा होऊ लागताच खजिल व्हावे लागणारे मिळकतधारक थकबाकी रक्कम भरण्यास पुढे येऊ लागले आहेत.

अतिक्रमण निर्मूलन पथकातील पोलिसांसाठी 41 लाख देणार

महापालिका हद्दीतील अवैध बांधकामे पाडण्यासाठी तसेच अतिक्रमणांविरूद्ध कारवाई करणा-या पथकाच्या संरक्षणासाठी नेमलेल्या पोलीस पथकाला चार महिन्यातील भत्ता आणि वेतनापोटी 41 लाख रूपये देण्यात येणार आहेत.  

पूर्ण कार्यकाल मिळू द्या मग तुलना करा - आयुक्त

न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत बेकायदा बांधकामांवर कारवाई केली. त्यासाठी यंत्रणा कामाला लागली. अशाही परिस्थितीमध्ये न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेले महापालिकेचे प्रकल्प सोडविले. रेंगाळलेले अनेक प्रकल्प मार्गी लावले. मंदीच्या काळातही महापालिकेचा डोलारा सांभाळला. आपल्या पूर्वीच्या आयुक्तांना चार वर्षे मिळाली. चार वर्षांची तुलना अठरा महिन्यात करणे चुकीचे असून

'डॉ. परदेशींच्या बदलीबाबत हमी नाही'

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या बदलीबाबत आपण कोणतीही हमी देऊ शकत नाही असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. परदेशी यांच्या बदलीचे सूतोवाच केले.

श्रीकर परदेशी यांच्या बदलीच्या प्रश्नांवर अजित पवारांची चिडचिड

पिंपरी पालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या संभाव्य बदलीबाबत पत्रकार परिषदेत विचारण्यात आलेल्या प्रश्नांमुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांची चिडचिड सोमवारी स्पष्टपणे जाणवली.

परदेशी यांच्या बदलीची शक्‍यता

पुणे - ""कोणत्या अधिकाऱ्याची कुठे बदली करावी, ही बाब प्रशासकीय आहे.

सांगवीमध्ये गुरुवारपासून भरणार पवनाथडी

महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तुंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने भरविण्यात येत असलेल्या पवनाथडी जत्रेला गुरुवारपासून (दि. 30) सुरुवात होत आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल हे यंदाच्या जत्रेचे आकर्षण आहे.

डॉ. प्रतिमा इंगोले यांना बहिणाबाई पुरस्कार



लोककव‌यित्री व निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी यांच्या नावाने दिला जाणारा बहिणाबाई चौधरी साहित्यरत्न पुरस्कार विदर्भाच्या भुईची लेक डॉ. प्रतिमा इंगोले यांना प्राप्त झाला.पिंपरी-चिंचवड येथील साहित्य संवर्धन समिती आणि भारतरत्न ...

शिवसेना नगरसेविका व अधिकारी यांच्यात जोरदार खडाजंगी

महापालिकेच्या महिला बालकल्याण विभागाच्या व्यावसायिक प्रशिक्षण योजनांची माहिती अधिकारात मागितलेली माहिती देण्यास टाळाटाळ होत असल्याने संतप्त झालेल्या शिवसेनेच्या नगरसेविका सीमा सावळे व आशा शेंडगे यांनी प्रभारी समाज कल्याण अधिकारी संभाजी ऐवले यांना आज चांगलेच खडसावले. त्यावरुन त्यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. विशेष म्हणजे सहायक आयुक्त

मोशी टोलनाका फोडण्याचा मनसेचा डाव ...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या टोलबाबतच्या व्यक्तव्यानंतर मनसे कार्यकर्त्यांकडून टोलबंद आंदोलन सुरू आहे. पुणे-नाशिक महामार्गावर मोशी येथील टोलनाका फोडण्यासाठी आलेल्या मनसे कार्यकर्त्यांचा डाव पोलिसांनी उधळला. पोलिसांनी वेळीच खबरदारी घेत 14 मनसे आंदोलकांना ताब्यात घेतले.

‘लेक वाचवा’साठी सायकल प्रवास

आकुर्डी : पीएमपीएमएलचे कर्मचारी पुणे ते तिरुपती या यशस्वी ‘सायकल चालवा, पर्यावरण वाचवा’ मोहिमेनंतर ३१ जानेवारीला पुणे ते कन्याकुमारी सायकल प्रवास करून ‘लेक वाचवा, भ्रूणहत्या टाळा’ संदेश पोहोचविणार आहेत. या मोहिमेमध्ये ४ कर्मचारी सहभागी होणार असून, ३१ जानेवारीला सकाळी ९ ला निगडी येथील भक्ती-शक्ती आगारातून पुणे ते कन्याकुमारी सायकल प्रवास मोहिमेस सुरुवात करणार आहेत.

मानवी चुकांनी नद्या प्रदूषित

विश्‍वास मोरे - पिंपरी
उद्योगनगरीतून पवना, मुळा, इंद्रायणी या प्रमुख नद्या वाहतात. नागरी वसाहतींतील मैला सांडपाणी, तसेच येथील औद्योगिक वसाहतींतील पाणी प्रक्रिया न करताच थेट नदीत सोडले जात आहे. मानवी चुकांमुळे या नद्यांचे प्रदूषण वाढले आहे. वाढत्या प्रदूषणाने जलचरांचेही आयुष्य धोक्यात आहे. तरीही हे जलप्रदूषण रोखण्यासाठी महापालिका किंवा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून काही प्रयत्न होत नाहीत. नद्यांबरोबरच शहरातील चारही नैसर्गिक तलाव प्रदूषित झाल्याचे पर्यावरण अहवाल सांगतो. त्यासाठी योजलेले उपाय अद्यापही कागदावरच आहेत. 

देशभक्ती जागविणा-या उपक्रमांनी ...

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने महापौर मोहिनी लांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी तसेच नगरसेविका, नगरसेवकांसह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

पारदर्शी प्रशासनासाठी नागरिकांची सनद उपयुक्त ठरणार

नागरिकांना महापालिकेच्या कामकाजाची माहिती व महापालिकेकडून मिळणा-या सेवासुविधा अधिक गतिमान व्हाव्यात यासाठी नागरिकांची सनद उपयुक्त ठरणार असून पारदर्शी व गतिमान प्रशासन देण्यासाठी ‘नागरिकांची सनद' हे उत्तम माध्यम असल्याचे मत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंञी अजित पवार यांनी व्यक्त केले.

चापेकर स्मारकाचे काम लवकर पूर्ण करु ...

क्रांतीवीर चापेकर बंधुनी आपल्या देशाच्या स्वातंञ्यप्राप्तीसाठी आपले बलिदान दिले. अशा महान क्रांतीवीर चापेकर बंधूच्या समूह शिल्पाचे काम लवकरात लवकर पूर्ण करु, असे आश्वासन महापौर मोहिनी लांडे यांनी व्यक्त केले.