Wednesday 15 January 2014

PCMC trims school board budget by over Rs 6 crore

The fall in the Pimpri Chinchwad Municipal Corporation's income because of the Local Body Tax may have an impact on the civic body's educational spending this year.

PCMC revises terms of welfare schemes

PIMPRI: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has revised the terms and conditions for various women and child welfare schemes being implemented by the Urban Community Development Department.

अर्थसंकल्पात कपात साडेसहा कोटींची

पिंपरी : फर्निचर देखभाल-दुरुस्ती, साहित्यखरेदी, सहल यासाठीच्या खर्चाला कात्री लावून आयुक्तांनी शिक्षण मंडळाच्या १0८ कोटी १३ लाखांच्या अर्थसंकल्पात ६ कोटी २८ लाखांची कपात सुचवली आहे. त्यामुळे आता १0१ कोटी ८५ लाखांचा अर्थसंकल्प मंजुरीसाठी स्थायी समिती सभेपुढे ठेवण्यात येणार आहे. 

तालेरा रूग्णालयात मानधनावर तांत्रिक कर्मचाऱ्यांची भरती

विस्तारीकरण झालेल्या महापालिकेच्या तालेरा रूग्णालयात नागरिकांच्या सोयीसाठी काही वॉर्ड नव्याने स्थापन करण्यात आले आहेत. रूग्णांना सुविधा देण्यासाठी तांत्रिक कर्मचा-यांची सहा महिने कालावधीसाठी मानधनावर नेमणूक केली जाणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तालेरा रूग्णालयात विस्तारीकरणाचे

सर्पोद्यानाच्या संचालकांचे मानधन निम्म्याने कमी

स्थायी समितीपुढे प्रस्ताव
महापालिकेत सर्वच विभागांवर आपला वचक निर्माण करणा-या आयुक्तांनी आता आपला मोर्चा सर्पोद्यानाकडे वळविला आहे. सर्पोद्यानाच्या स्थापनेपासून मुदतवाढीच्या जोरावर संचालक म्हणून कार्यरत असलेले अनिल खैरे यांच्या मानधनात निम्म्याने कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

निगडीमध्ये सुधीर फडके स्मृती संगीत ...

मधुगंधर्वतर्फे 24 ते 26 जानेवारी दरम्यान सुधीर फडके स्मृती संगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व उदयोन्मुख व हौशी गायकांच्या गायन स्पर्धेबरोबरच वाद्यवादन (हार्मोनिअम व तबला) स्पर्धेचाही समावेश करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड चेंबर ऑफ इंडस्ट्रीज अ‍ॅड अ‍ॅग्रीकल्चरतर्फे चर्चासत्र

स्थानिक उद्योगांची खालावलेली स्थिती दिवसेंदिवस अधिक बिकट झाली आहे. या समस्येवर योग्य तोडगा काढण्यासाठी पिंपरी-चिंचवड चेंबर ऑफ इंडस्ट्रीज अ‍ॅड अ‍ॅग्रीकल्चरतर्फे 'स्थानिक व्यापार आणि उद्योग वाचवा' या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. शुक्रवारी (दि. 17) चिंचवडच्या अ‍ॅटो क्लस्टर येथे दुपारी दीड वाजता हे चर्चासत्र

भोसरी ते औंध बस सेवा सुरु करण्याची मागणी

औंध भागामध्ये  आयटीआय आणि आयटी क्षेत्रांतील असंख्य उद्योग सुरु झाहे आहेत. त्यामुळे साहजिकच येथे येणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यासाठी भोसरीहून थेट औंधला जाण्यासाठी थेट बससेवा सुरु करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश थोपटे यांनी केली आहे.

ज्ञानप्रबोधिनी विद्यालयात क्रीडा प्रात्यक्षिकांचे आयोजन

स्वामी विवेकानंदांच्या 150 व्या जयंतीनिमित्त ज्ञानप्रबोधिनी विद्यालयाच्या माध्यमिक विभागाच्यावतीने क्रीडा प्रात्यक्षिकांचे आयोजन शुक्रवारी (दि. 17) करण्यात आले आहे अशी माहिती उपकेंद्रप्रमुख मनोज देवळेकर यांनी दिली.  
शाळेच्या प्रांगणात सायंकाळी पाच

चापेकर चौकातील अतिक्रमणे हटवा

नेहमीच गजबजलेल्या अवस्थेत असणा-या चिंचवडगावातील चापेकर चौक अतिक्रमणांच्या विळख्यात अडकत चालला आहे. त्यामुळे नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून या चौकातील अतिक्रमणे त्वरीत हटविण्यात यावीत, अशी मागणी या भागातील नागरिकांतर्फे करण्यात आली आहे.

पवना बंद जलवाहिनीचा अहवाल सादर करा

पवना बंद जलवाहिनी प्रकरणी निवृत्त न्यायमूर्ती गायकवाड यांनी सादर केलेला अहवाल शासनाने जिल्हाधिका-यांमार्फत जनतेसमोर मांडावा, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात शिवसेना उपजिल्हाप्रमुख भारत ठाकुर

सोनसाखळी चोरांची उद्योगनगरीत दहशत

पिंपरी : दाट लोकवस्तीचा परिसर असलेल्या निगडी आणि चिंचवड परिसरात गेल्या वर्षभरात सोनसाखळी चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, या भागातील महिलांमध्ये सोनसाखळी चोरट्यांची मोठी दहशत निर्माण झालेली आहे. पोलिसांची गस्त आणि नाकाबंदी असतानाही दोन्ही पोलीस ठाण्यांच्या सोनसाखळी चोरीचे प्रमाण अधिक आहे. चोरट्यांनी जानेवारी ते डिसेंबर दरम्यान तब्बल ७५ घटनांमध्ये ३९ लाख रुपयांचा सोन्याचा ऐवज लांबवल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. 

वस्त्रहरणात फुटले भामट्याचे बिंग

रहाटणी : नियतीनं ज्यांच्या वाट्याला तृतीयपंथीयाचं जीणं दिलं, त्यांना ते समाजाच्या अवहेलना, कटू अनुभव घेत जगणं भाग पडत आहे. परंतु ज्यांच्या नशिबी नियतीनं असं जीवन दिलेलं नाही, असे अनेक धडधाकट तरुण तृतीयपंथीयाचे सोंग घेऊन पैसे मागत आहेत. विनाकष्ट पैसा मिळविण्यासाठी असे सोंग करणार्‍या एकाची काळेवाडीत खर्‍या तृतीयपंथीयाशी आमने-सामने झाली. भर रस्त्यात वस्त्रहरण नाट्य रंगले अन् बिंग फुटले.