Saturday 24 May 2014

अजितदादांच्या आदर्श पिंपरी ‘मॉडेल’समोर अडचणींचे डोंगर

केंद्र सरकारने ‘बेस्ट सिटी’ ठरवलेल्या पिंपरीतील महत्त्वपूर्ण प्रकल्प पूर्णत्वाला नेताना सत्ताधाऱ्यांची दमछाक होत असून, शहरविकासाच्या मार्गावर अडचणींचे डोंगर उभे राहिल्याचे चित्र आहे.

बीआरटीएससाठी तांत्रिक सल्लागार नेमणार

दोन वर्षांसाठी 30 लाखांचा खर्च
पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीतील बीआरटीएस प्रकल्पासाठी महापालिका आता तांत्रिक सल्लागार नेमणार आहे. दोन वर्षासाठी नेमण्यात येणा-या या सल्लागारावर दरमहा सव्वा लाख याप्रमाणे 30 लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. येत्या मंगळवारी होणा-या स्थायी समितीच्या सभेपुढे याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.

चिंचवड येथे शनिवारी मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन

प्रशांत शेट्टी प्रतिष्ठानच्यावतीने शनिवारी (दि. 24) मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन चिंचवड येथे करण्यात आले आहे.

'जेईई' व 'एनईईटी'वर गुरुवारी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट च्या वतीने रावेत येथे नव्याने सुरु करण्यात येत असलेल्या एस. बी. पाटील कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्सच्या वतीने 'जेईई' आणि 'एनईईटी' याविषयी 29 मे रोजी मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 
रावेत येथील एस. बी. पाटील कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्सच्या सभागृहात सकाळी दहा ते दुपारी दोन यावेळेत ही कार्यशाळा होणार आहे. यावेळी कॉलेजमधील जेईई आणि एनईईटी या क्षेत्रातील तज्ज्ञ त्यात मार्गदर्शन करणार आहेत.
मार्गदर्शन शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी राधिका श्रीनिवासन 9225147867 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कॉलेजचे कार्यकारी संचालक प्रा. गिरिश देसाई यांनी केले आहे.

वीज बचतीसाठी वाकडच्या ऑरेंज सोसायटीत सोलर वॉटर पंप

टोलेजंग इमारतीवरील टाक्यांमध्ये पाणी भरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वीजेचा वापर होतो. याबाबत जागरुकता बाळगत वाकड येथील 'ऑरेंज प्रॉव्हिन्स हाऊसिंग सोसायटी'ने सोलर वॉटर पंप बसवून घेतला. नगरसेवक विनायक गायकवाड व पीसीएमटीचे माजी अध्यक्ष सुरेश चोंधे यांच्या हस्ते त्याचे उद्‌घाटन करण्यात आले.

शहरातील बीआरटीएस मार्गांवर लवकरच 'रेनबो' बससेवा

नवीन 500 बस खरेदी करणार, पीएमपीएमएल भाडेवाढीचा प्रस्ताव नामंजूर

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला अत्याधुनिक चेहरा देणा-या बस रॅपिड ट्रान्झीट सिस्टीमचे (बीआरटीएस) नामकारण 'रेनबो' (इंद्रधनुष्य) असे करण्यात आले आहे. अहमदाबादमधील 'जनमार्ग' किंवा इंदोरमधील 'आय बस' प्रमाणे आता ही नवी आरामदायी, सुरक्षित, तत्पर आणि जलद बससेवा 'रेनबो बस' म्हणून ओळखली जाणार आहे. पीएमपीएमएलच्या संचालक मंडळाने या नवीन 'ब्रॅण्ड नेम' ला मंजुरी दिली आहे.