Monday 7 April 2014

युवकांनी हाती घेतली मतदान जनजागृती

जास्तीत जास्त नागरिकांनी आपला मतदाचा हक्क बजावावा  यासाठी सनराईज प्रतिष्ठानच्या वतीने काही तरुणांनी आज (रविवारी) निगडीतील भक्ती-शक्ती उद्यान व परिसरात मतदान जनजागृती केली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान जनजागृतीसाठी पिंपरी-चिंचवड मधील काही युवकांनी मिळून जनजागृती करण्याचे काम सुरू केले आहे.
सनराईज प्रतिष्ठानमध्ये एकूण 8 ते 10 तरूण आहेत. सर्व तरूण हे उच्चशिक्षित असून ते आयटी कंपन्यांमध्ये नोकरी करतात. हे सर्व तरूण ट्रेकींगच्या माध्यमातून एकमेकांना भेटले व समाजासाठी काहीतरी करावे यासाठी ते सध्या मतदान जनजागृती करीत आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये नागरिकांचा त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद असल्याचे प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अतुल पाध्ये यांनी सांगितले.

माजी नगरसेवकाच्या अनधिकृत हॉटेलवर कारवाई

ताथवडे येथील सर्व्हे क्रमांक 51/3/1 मधील श्रीरंग विहार सहकारी गृहरचना संस्थेच्या मोकळ्या जागेतील माजी नगरसेवक सतीश दरेकर यांचे हॉटेल उच्च न्यायालयाने अनधिकृत ठरविले आहे. कारवाईसाठी दिलेली चार आठवड्यांची स्थगिती उठवत हॉटेलचे बेकायदा बांधकाम भुईसपाट करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महापालिकेकडून आज (सोमवारी) हे हॉटेल हटविण्याची कारवाई सुरु करण्यात आली.  

पवारांवरचे प्रेम सिद्ध करण्याची वेळ आली आहे - पालकमंत्री शशिकांत शिंदे

पिंपरी - चिचवडकरांची शरद पवारांवरचे प्रेम सिद्ध करण्याची वेळ आली आहे असे प्रतिपादन सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शशिकांत शिंदे यांनी केले. मावळ लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाचे उमेदवार अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन काळेवाडी येथे करण्यात आले होते त्याप्रसंगी ते बोलत होते.

विरोधकांचे 'डिपॉझिट' जप्त होईल - जगताप

आपण विकास कामे करीत असताना विरोधक त्यावर टीका करुन प्रसिध्दी मिळवत होते. समाजात गैरसमज पसरविणा-या लबाडांना जनतेने मागील विधानसभेत मोठ्या मताधिक्याने पराभूत केले होते. यावेळी त्यांचे 'डिपॉझिट' जप्त होईल, असा टोला आमदार लक्ष्मण जगताप यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार श्रीरंग बारणे यांचे नाव न घेता लगावला. 

रणधुमाळीच्या शेवटच्या टप्प्यात ...

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी शेवटच्या टप्प्यात आली असून पिंपरी-चिंचवड शहरात बड्या नेत्यांमध्ये वाक्‌युध्द रंगणार आहे. रोड शो, सभांनी प्रचारांची रंगत अधिकच वाढणार आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाला अवघे अकरा दिवस उरले आहेत. प्रचारासाठी जेमतेम आठवडाभराचा कालावधी उरला आहे. त्यामुळे मावळ मतदार संघात प्रचाराचा ज्वर चांगलाच तापला आहे. कालावधी कमी उरल्याने अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांना कसरत करावी लागत आहे. उमेदवार तसेच त्यांचे कुटुंबीय जोर लावून प्रचार करीत आहेत. शहरातील चौक उमेदवारांच्या फ्लेक्सने भरले आहेत.

भारत बनसोडे यांची रिपाई आठवले गटामधून 2009 साली हाकलपट्टी

भारत बनसोडे यांची रिपाई आठवले गटामधून 2009 साली पक्षातून हाकलपट्टी करण्यात आलेली आहे. त्यामुळे पक्षाचा आणि त्यांचा काहीही संबंध नाही जर त्यांनी पक्षाच्या नावावर वर्गणी अथवा निधी मागितल्यास त्यांच्यावर रितसर कारवाई करण्यात येईल अशी माहिती पिपंरी -चिंचवड रिपाई पार्टीचे अध्यक्ष गणेश शिर्के यांनी दिली आहे.

जगताप यांनी घेतले श्री श्री रविशंकर यांचे आशीर्वाद

मावळ लोकसभा मतदार संघाचे शेकापचे अधिकृत आणि मनसे पुरस्कृत उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांना अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी आज (शनिवारी) आशीर्वाद दिले.
आमदार जगताप यांच्या पिंपळेगुरव येथील निवासस्थानी रविशंकर सकाळी साडेअकराच्या सुमारास आले होते. त्यांचे भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार जगताप व त्यांच्या पत्नी अश्विनी यांनी त्यांची पाद्यपूजा करुन आशीर्वाद घेतले.

अ‍ॅड. नार्वेकरांना निवडून देण्याची सामुदायिक शपथ

मोरवाडी येथील मधुबन सोसायटीच्या महिला बचत गटाच्या महिलांनी अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांना निवडून देण्याचा निर्धार व्यक्त करून इतरांना प्रवृत्त करण्याची सामुदायिक शपथ घेतली. राष्ट्रवादी पक्षाचे विभागीय समन्वयक गुलामअली भालदार यांनी शपथविधी घेतला. 

पिंपरी कॅम्पात आप्पा उर्फ श्रीरंग बारणे यांची पदयात्रा

मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-रिपाई-रासप-स्वाभिमानी शेतकरी संघटना महायुतीचे उमेदवार आप्पा उर्फ श्रीरंग बारणे यांनी आज (शुक्रवारी) पिंपरी कॅम्पात पदयात्रा काढून व्यापा-यांना मतदानासाठी आवाहन केले. आघाडी सरकारने व्यापा-यांवर टाकलेला एलबीटी कराचा बोजा हटवून सुकर करपध्दत राबवू, असे आश्वासन त्यांनी व्यापा-यांना दिले.

भापकर यांचा शेतक-यांशी संवाद

मावळ लोकसभा मतदार संघातील आम आदमी पक्षाचे उमेदवार मारुती भापकर यांनी शेतामध्ये जावून मावळातील शेतक-यांशी संवाद साधला.
'आप'चे भापकर यांनी सर्वसामान्यांमध्ये मिसळून प्रचार सुरु ठेवला आहे. रेल्वे, पीएमपी मधून प्रवास करीत तर कधी पदयात्रेव्दारे ते मतदारांशी संपर्क साधत आहेत. आप हा आपलाच पक्ष असून सर्वसामान्यांनी तुमच्यातील कार्यकर्ता म्हणून आपल्याला खासदार करावे, असे आवाहन ते करीत आहेत.

जगताप-भापकर यांची गळा भेट

मावळ लोकसभा मतदार संघाचे शेकाप-मनसे पुरस्कृत उमेदवार लक्ष्मण जगताप व आम आदमी पार्टीचे उमेदवार मारूती भापकर यांची आज (दि.4) रोजी प्रचारादरम्यान देहू येथील गाथा मंदिर येथे भेट झाली. प्रचारादरम्यान आज दोघेही गाथा मंदिर येथे आमने-सामने आले.
यावेळी जगताप व भापकर हे दोघेही परस्परांच्या विरोधात उभे असलेले उमेदवार एकत्र आल्याने कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या. लक्ष्मण जगताप व मारूती भापकर यांनी गळा भेट घेऊन एकमेकांना येणा-या लोकसभा निवडणुकीसाठी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. तरुण कार्यकर्त्यांसह मारुती भापकर हे प्रचार करीत होते तर असंख्य चाहते व कार्यकर्त्यांना घेऊन लक्ष्मण जगताप त्याच ठिकाणी प्रचारासाठी पोहचले.

मल्याळी व पाटीदार समाजाचा श्रीरंग बारणे यांना पाठिंबा

पिंपरी-चिंचवड शहरातील मल्याळी आणि पाटीदार समाजाने मावळ लोकसभेचे शिवसेना-भाजप-रिपाई-रासप-स्वाभिमानी शेतकरी संघटना महायुतीचे उमेदवार आप्पा उर्फ श्रीरंग बारणे यांना पाठिंबा दिला आहे. चारित्र्यवान व कृतीशील नेतृत्व आप्पा बारणेंचे आहे. त्यांना निवडून देवून देशात नरेंद्र मोदींना पंतप्रधान करू, असा निर्धार या समाजबांधवांनी केला आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडसाठी आणखी सहा पोलीस ठाणी मंजूर

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराचा झपाटय़ाने विकास होत आहे. शिक्षणाचे माहेरघर, आयटी हब असल्यामुळे बाहेरून येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे येथील लोकसंख्या वेगाने वाढू लागली आहे.

महिलांसाठी पिंपरी महापालिकेत अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन

कामाचे ठिकाणी महिलांच्या होणा-या लैंगिक छळास प्रतिबंध करण्यासाठी द सेक्स्युअल हॅरेसमेंट वुमेन अँक्ट वर्क प्लेस (प्रीव्हेंशन प्रोहीबीशन अँन्ड रिड्रेसल कायदा 2013) लागू झाला आहे. त्यानुसार महापालिकेच्या विभागामध्ये अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करण्याच्या सूचना आयुक्त राजीव जाधव यांनी दिल्या आहेत.
या अधिनियमातील कलम चारनुसार प्रत्येक कार्यालयामध्ये महिलांच्या लैंगिक