Monday 4 May 2020

The Real Warrior : कोरोना विरोधात लढणा-या महापालिकेच्या अधिकारी, कर्मचा-यांचा भारतीय सैन्यदलाच्या वतीने सन्मान

कोरोनाला हरविण्यासाठी व कोवीड १९ वर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी नियोजन करून अंमलबजावणी करणाऱ्या महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर व कोरोना रूग्णांवर रूग्णालयात उपचार करणाऱ्या महापालिकेच्या डाॅक्टर्स, स्टाफनर्स व कर्मचाऱ्यांना “कोरोना वाॅरियर्स” म्हणून गौरविण्यात आले. बाॅम्बे इंजिनिअरींग ग्रूपचे प्रमुख स्टेशन कमांडंट ब्रिगेडीअर सेना मेडल एम. जे. कुमार यांनी सैन्यदलाच्या वतीने केक कापून व मिठाई देवून त्यांच्या कार्याला सलाम करण्यात आला. 

No shortage of PPE gear, have enough stock: Pimpri-Chinchwad civic body


कोणत्या झोनमध्ये कोणत्या गोष्टींना परवानगी आणि कोणत्या गोष्टींवर आहेत निर्बंध? जाणून घ्या

#PCMCCovid19Updates
What's allowed and not allowed in Maharashtra during the extended period of #Lockdown. Pimpri Chinchwad Municipal Corporation falls under PMR (Pune metropolitan region). Citizens of the city see the last column.
वाढविण्यात आलेल्या लॉकडाऊन कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्यात काय सुरु असणार आणि काय नाही? याची यादी. कोणत्या झोनमध्ये कोणत्या गोष्टींना परवानगी आणि कोणत्या गोष्टींवर आहेत निर्बंध? जाणून घ्या. पिंपरी चिंचवड महानगरपालिका PMR (pune metropolitan region) मध्ये येते. शहरातील नागरिकांनी शेवटचा रकाना पाहा.

COVID-19 PCMC War Room | 3 May - Zone wise statistics


लॉकडाऊन 3.0 मध्ये पिंपरी चिंचवड शहरातील 21 भागात कंटेन्मेंट झोन!

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा कालावधी तिसऱ्यांदा वाढवण्यात आला आहे. हा कालावधी 4 मे पासून 17 मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड प्रशासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 21 भागात कंटेन्मेंट झोन तयार केले आहेत. कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केलेल्या भागातून बाहेर अथवा बाहेरील भागातून आत जाता येणार नाही. पुढील आदेशपर्यंत हा भाग […] 

Outsiders in Pune, Pimpri Chinchwad to get police passes to go back home


PCMC set to prepare cost cutting plan

The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will prepare a plan for austerity measures in view of the likely reduction in income because of the lockdown, the municipal commissioner Shravan Hardikar said

Universities plan major shift in structure

The virtual is going to be real at top city-based universities that have planned a major shift in academics once the lockdown imposed to control the Covid-19 outbreak is lifted.

आकुर्डी गुरुद्वारा आणि मौनी बाबा वृद्ध आनंदाश्रमतर्फे रोज तीन हजार गरजूंना मिळतोय मायेचा घास

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या संकटामुळे दिवसेंदिवस लाॅकडाऊनचा कालावधी वाढत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी अडकून पडलेल्या तसेच हातावरचे पोट असलेल्या गरजू लोकांची उपासमार होत आहे. या गरजू लोकांना विविध संस्था पुढे येऊन मोलाचे सहकार्य करत आहेत. या सहकार्‍यांमध्ये आकुर्डी येथील मानसरोवर गुरुद्वारा आणि मौनी बाबा वृद्ध आनंदाश्रम देखील आपली मोलाची भूमिका  बजावत आहे. श्री वाहेगुरु गुरुनानक मानसरोवर […]

पुण्यातील नवे आदेश काय सांगतात?

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त , जिल्हाधिकारी याच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला आहे. त्यानुसार उद्यापासून नेमके काय सुरू असेल? आणि काय बंद? याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.

दारूविक्रीचा घोळ मिटला : पुणे, पिंपरी चिंचवडसह पूर्ण राज्यात ४ मे पासून दारूची दुकाने सुरू होणार (कंटेटमेंट वगळता)

मुंबई (Pclive7.com):- पुणे, पिंपरी चिंचवड आणि मुंबई महापालिका क्षेत्रातील (कंटेंटमेंट झोन वगळता) दारू दुकाने सुरू राहणार की नाही, यावरील गोंधळ आता संपला आहेत. आता उद्यापासून म्हणजे ४ मे पासून या दोन्ही शहरांतील दारू दुकाने खुले राहतील, अशी घोषणा राज्य सरकारचे सचिव भूषण गगराणी यांनी केली. या शहरांतील हाॅटेल, रेस्टाॅरंट मात्र बंद राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. दारूच्या दुकानांवर गर्दी होणार नाही याची खबरदारी घ्यावी लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

दापोडीतील सरस्वती अनाथ आश्रम येथे अन्नधान्य व भाजीपाला वाटप

गेल्या अनेक दिवसांपासून जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. यामुळे संपुर्ण भारतामध्ये लाॅकडाऊन जाहिर झाले आहे. गरजू व गरीबाची जीवन जगणे अवघड झाले आहे. हिच बाब लक्षात घेता शिवसेना माजी शहर प्रमुख रामभाऊ मारुती उबाळे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी युवासेनेतर्फे दापोडी येथील सरस्वती अनाथ आश्रम येथे अन्नधान्य व भाजीपाला वाटप करण्यात आले.

पुण्यात तयार केलं स्वदेशी बनावटीचं 'डिजिटल व्हेंटिलेटर'; आयसरमधील शास्त्रज्ञांनी केली निर्मिती!

पुणे : अत्यवस्थ अवस्थेतील कोरोनाबाधित रुग्णांसाठी व्हेंटीलेटरची आवश्‍यकता भासू शकते. रुग्णांची वाढती संख्या बघता पुरेशा संख्येत व्हेंटिलेटर उपलब्ध असणे गरजेचे आहे. हीच गरज ओळखून अत्यवस्थ अवस्थेमध्येही (क्रिटिकल कंडिशन) वापरता येईल, अशा डिजिटल व्हेंटिलेटरचे प्रारूप भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या (आयसर) शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे. 

योग्य नियोजन अभावी पिंपरी-चिंचवडमधील भाडेकरूं लाभार्थी योजना केली बंद

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या योग्य नियोजन अभावी भाडेकरूं लाभार्थी योजना केली बंद करण्यात आले आहे.