Friday 25 April 2014

Maharashtra govt to reimburse fees from class one

Schools should not collect any kind of fees (brochure, tuition, registration) from parents and must provide free education to children up to primary level.

विशेष स्वच्छता मोहिमेत पाच ट्रक कचरा गोळा

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी सुरु केलेली विशेष स्वच्छता मोहीम आज (गुरुवारी) वाकड येथे राबविण्यात आली. त्यात अडीच तासात पाच ट्रक कचरा गोळा करण्यात आला.
यावेळी सहआयुक्त पांडुरंग झुरे, सहायक आयुक्त दिलीप गावडे, कार्यकारी अभियंता गुलाब दांगट, शरद जाधव, संदेश चव्हाण, उपअभियंता डी. एस. सोनवणे, सुधीर रत्नपारखी, रामनाथ टकले, विनय ओहोळ, फारुख शेख, रवींद्र पवार, नितीन देशमुख, सहायक आरोग्याधिकारी एम. एम. शिंदे, विनोद बेंडाळे, कनिष्ठ अभियंता नरेश जाधव, सूर्यकांत मोहिते, अंकुश कोंडे, प्रवीण धुमाळ, संदीप पाडवी, नीलेश दाते, अमित दिक्षीत, गणेश राऊत, विश्वनाथ पाडवी, कुतुवळ, राऊत, मुख्य आरोग्य निरिक्षक रमेश भोसले, अजय जाधव, आरोग्य निरिक्षक रमेश सरोदे, राकेश सौदाई, अतुल सोनवणे, एस. एस. गायकवाड, अंकुश जीटे, संदीप कोतवडेकर यांच्यासह या मेहिमेमध्ये आरोग्य विभागाचे सत्तर कर्मचारी सहभागी झाले होते.

महापालिकेच्या लेखा विभागात 1863 मुदतबाह्य धनादेश पडून

महापालिकेच्या लेखा विभागात गेल्या चार वर्षापासून तब्बल 1 हजार 863 मुदतबाह्य धनादेश वाटपाअभावी पडून आहेत. धनादेश घेण्यासाठी संबंधित येत नसल्याने लेखा विभागाला मात्र अंदाजपत्रकीय ताळमेळ साधण्यात समस्या निर्माण होत आहे.
सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल विनोद यांनी क्रेंद्रीय माहिती अधिकार कायद्यांतर्गत मिळविलेल्या माहितीतून ही बाब उघड झाली आहे. महापालिकेच्या विविध विभागाकडून देयके लेखा विभागाकडे मंजुरीसाठी पाठविली जातात. ही देयके लेखा विभागाकडून तपासून त्यांचे धनादेश काढले जातात. यामध्ये ठेकेदारांच्या हे धनादेश संबंधित कर्मचारी, ठेकेदार अथवा नागरिक हे लेखा विभागातून समक्ष स्विकारतात.

बेडौल, थकलेले, म्हातारे जीवरक्षक

पिंपरी : सुटलेले पोट, बेडौल अशी शरीरयष्टी.. काही पावलांचे अंतर चालत येण्यासाठी ज्यांना दहा ते पंधरा मिनिटांचा अवधी लागेल, असे वयस्कर कर्मचारी महापालिकेच्या तरण तलावांच्या ठिकाणी दिसून येतात. अशा शरीरयष्टीचे जीवरक्षक एखाद्या बुडणार्‍या व्यक्तीचा जीव कसा वाचवतील? असा प्रश्न त्या ठिकाणी भेट देणार्‍याला पडल्याशिवाय रहात नाही. चिंचवड येथे घडलेल्या दुर्घटनेमुळे तरण तलावांच्या व्यवस्थापन, सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला असून, महापालिकेने त्वरित सुधारणा घडवून आणाव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

जीवरक्षक निरुपयोगी

पिंपरी : दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळी सुटीच्या प्रारंभीच महापालिकेच्या तरण तलावात एकाचा बुडून मृत्यू झाला. पोहायला शिकणार्‍यांची अमाप गर्दी आणि बेफिकीर जीवरक्षक ही यामागील प्रमुख कारणे आहेत. पण, महापालिका बदलाला तयार नाही. ही यातील शोकांतिका आहे. एका बॅचमध्ये किती जणांना प्रवेश द्यावा. नवोदितांनी किती खोल उतरावे, हुल्लडबाजांना कसे रोखावे, दुघर्टना घडू नये यासाठी कर्मचार्‍यांनी किती दक्ष राहावे, आणि घटना घडलीच तर हवी असणारी उपचार यंत्रणा तत्काळ कशी उपलब्ध होईल.. याविषयीचे नियम बासनात ठेवल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत दिसले.

महावितरणच्या डीपीतून 40 अनधिकृत जोड


पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी कॅंप ही मुख्य बाजारपेठ आहे. तेथे होणाऱ्या वीजचोरीची पाहणी "सकाळ'च्या प्रतिनिधीने व छायाचित्रकाराने केली असता ही धक्‍कादायक बाब उघडकीस आली. एकेका डीपी बॉक्‍समधून तब्बल पंधरा ते वीस, तर काही ठिकाणी ...

शहर, उपनगरातील रिंग रोडचा प्रस्ताव अखेर मार्गी

मध्य पुणे आणि उपनगरांमधील वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी आखण्यात आलेला ३५ किलोमीटर लांबीचा रिंग रोड सत्तावीस वर्षांनंतर अखेर मार्गी लागला आहे.