Wednesday 3 May 2017

चिंता'तूर' शेतकर्‍यांना तरुणाईचा हात : तूरडाळ महोत्सव

पिंपरी : सध्याची तरुणाई सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात करताना दिसून येते. यामध्ये अनेकजण केवळ 'टाईमपास' म्हणून सोशल मीडियाकडे पाहतात. मात्र, सोशल मीडियावरील अनेक समुहांनी समाजाच्या उपयोगी पडणारे अनेक विधायक कामे करण्यास सुरवात केल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामधीलच एक उदाहरण म्हणजे तुरीचा मुद्दा चांगलाच गाजत असताना, शहरी भागात राहणार्‍या किसानपुत्रांनी तुरडाळ महोत्सव भरवण्याचे ठरवले. फेसबुक आणि व्हॉटस् अ‍ॅपच्या माध्यमातून एकत्र आलेल्या किसानपुत्रांनी भोसरीमधील इंद्रायणीनगरमध्ये रविवार (दि. 7) या दोन दिवशी पहिला तूरडाळ महोत्सव महोत्सव आयोजित केला आहे. 

वृक्षतोडीच्या संख्याबाबत महाराष्ट्र रस्ते विकास मंडळाकडून दिशाभूल

पिंपरी : देहूरोड-निगडी रस्ता रुंदीकरणासाठी अडथळा ठरत असलेल्या वृक्षतोडीच्या संख्याबाबत महाराष्ट्र रस्ते विकास मंडळाकडून दिशाभूल करण्यात आली आहे. मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेच्या वतीने हरीत लवादात दाखल केलेल्या दाव्याची सुनावणी झाली.

शहरातील प्रलंबित प्रश्न सोडविण्याची आयुक्तांकडे मनसेची मागणी

चिंचवड : मनसेचे नगरसेवक सचिन चिखले व शिष्टमंडळाने पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेऊन शहरातील प्रलंबित प्रश्न सोडविण्याची मागणी केली.

उद्योगनगरीचा ऐतिहासिक वारसा जपा - महापौर

पिंपरी चिंचवड शहरालाही ऐतिहासिक वारसा लाभला आहे. मात्र, त्या वास्तूंचे सर्वांनी एकत्र येऊन जतन करणे गरजेचे आहे, असे मत पिंपरी चिंचवडचे महापौर नितीन काळजे यांनी मांडले. पीसीसीएफच्या चौथ्या वर्धापन दिनाच्या औचित्यावर आयोजित करण्यात आलेल्या हेरिटेज वॉक कार्यक्रमात महापौरांच्या हस्ते चिंचवडगावातील वारसा स्थळांची माहिती छापलेले आकर्षक पत्रकाचे प्रकाशन करण्यात आले.

- via Sakal News

शहरबात पिंपरी-चिंचवड : पिंपरीत नव्या आयुक्तांपुढे जुनीच आव्हाने

'श्रीमंत' महापालिका म्हणून असलेला रुबाब आणि राजकीय पटलावर महत्त्व वाढलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील महापालिका आयुक्तपदी श्रावण हर्डीकर रुजू झाले आहेत. यापूर्वी ते दोन वर्षे नागपूर महापालिकेचे आयुक्त होते. मुख्यमंत्री देवेंद्र ...

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपविरोधी वातावरणनिर्मितीसाठी व्यूहरचना

भारतीय जनता पक्षाची प्रदेश कार्यकारिणी बैठक चिंचवडमध्ये झाली, त्यानिमित्ताने भाजपचे विरोधक एकत्र आले. चिंचवड स्टेशन येथे मंडप टाकून दोन दिवस संयुक्त आंदोलन करण्यात आले. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार राजू शेट्टी यांनीही ...

कामगार कर्तृत्वाचा गौरव

पिंपरी : महाराष्ट्र दिन, कामगार दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरातील शासकीय, निमशासकीय कार्यालये, तसेच विविध सामाजिक संस्थांच्या वतीने उपक्रम राबविण्यात आले. कामगारांच्या ... फ क्षेत्रीय कार्यालयात मोशी, कीटकनाशक कार्यालय-भोसरी, अग्निशमन केंद्र, इंद्रायणीनगर ...

Pimpri police bust betting racket, arrest eight

Pune: Late on Sunday night, the Pimpri police busted a betting racket with the arrest of eight men, who were accepting wagers on the ongoing Indian Premier League (IPL) cricket matches. The police have recovered as many as 10 mobile phones, an LCD ...

[Video] पिंपरी-चिंचवड महापालिकेचे संकेतस्थळ अपडेट करण्याची मागणी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे संकेतस्थळ गेल्या अनेक दिवसांपासून अपडेट झालेले नाही. त्यामुळे करदात्या नागरिकांना महापालिकेमार्फत होत असलेल्या कामांची माहिती मिळत नाही. त्यासाठी पालिकेचे संकेतस्थळ लवकरात-लवकर अपडेट करण्याची मागणी, नगरसेविका अश्विनी चिंचवडे-पाटील यांनी महापालिकेकडे केली आहे. 

[Video] अनधिकृत बांधकामे अधिकृत करणे व शास्तीकर माफ करण्याच्या मागणीसाठी 70 वर्षीय आजोबा मैदानात!

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी आणि 100 टक्के शास्तीकर माफ करावा, या मागणीसाठी 70 वर्षीय आजोबा मैदानात उतरले आहेत. शहरातील या जटील प्रश्नाकडे राज्यकर्त्यांचे लक्ष वेधण्यासाठी ते पिंपरी महापालिका भवनासमोर सलग 10 दिवस ठिय्या मांडणार आहेत. आकुर्डी येथे राहणारे चंद्रकांत राधाबाई दामोदर कुलकर्णी (वय 70) हे अनधिकृत बांधकामे नियमित करावीत आणि शास्तीकर रद्द करावा, या मागणीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भवनासमोर सलग दहा दिवस ठिय्या मांडणार आहेत. 

समांतर पुलास झोपडपट्टीचा अडथळा

– हॅरिस ब्रिजला समांतर ब्रिज: एकूण 23 कोटी रुपयांचा खर्च 
पिंपरी, (प्रतिनिधी) – पुणे-मुंबई महामार्गावर हॅरिस ब्रिजला समांतर उभारण्यात येत असलेल्या पुलाचे काम पिंपरी-चिंचडवड महापालिकेकडून युद्धपातळीवर सुरु आहे. येत्या दीड वर्षांत पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी दोन्ही महापालिकेकडून निधी उपलब्ध केला आहे. त्या पुलासाठी 24 कोटी रुपयांची अंदाजपत्रकीय तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सुटणार आहे. मात्र, समांतर पूल उभारणीच्या कामास पुणे मनपा हद्दीतील झोपडपट्टीचा अडथळा निर्माण झाला आहे. याबाबत पुणे मनपाला “पीसीएमसी’कडून पत्रव्यवहार करुनही प्रतिसाद मिळालेला नाही. परिणामी, डाव्या बाजूच्या पुलाचे काम रखडण्याची शक्‍यता आहे.

महावितरण विरोधात आंदोलनाचा इशारा

पिंपरी,  (प्रतिनिधी) – महावितरणच्या पिंपरी व भोसरी कार्यालयांच्या हद्दीत वीज चोरीच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनेक कामांच्या निविदा प्रसिद्ध करुन, या कामांमध्ये भ्रष्टाचार केला जात आहे. या भ्रष्टाचारात महावितरणच्या अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोप करत याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा टेलिफोन, गॅस, वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष श्रीरंग शिंदे यांनी दिला आहे.