Saturday 31 March 2018

मोशी कचरा डेपोला मोठी आग; बारा तासानंतरही आग आटोक्यात नाही पिंपरी :

पिंपरी :  मोशी येथील कचरा डेपोला गुरुवारी (ता.२९) रात्री लागलेली आग बारा तासानंतरही आटोक्यात आलेली नाही.
 मोशी येथील कचरा डेपोला आग लागल्याची वर्दी गुरुवारी (ता.२९) रात्री सव्वा आठ वाजताच्या सुमारास अग्निशामक दलास मिळाली. त्यानुसार सुरुवातीला भोसरी येथील अग्निशामक उपकेंद्राचा बंब घटनास्थळी दाखल झाला. मात्र आगीचे स्वरूप पाहता आणखी चार बंब घटनास्थळी दाखल झाले. 

More delay as work on Nigdi-Kiwale BRTS road runs into space obstacles

Pimpri Chinchwad: A delay in land acquisition may have a domino effect on the under-construction Bhakti-Shakti Chowk-Kiwale Bus Rapid Transit System (BRTS) road.The key road is being developed by Pimpri Chinchwad Municipal Corporation to improve the city’s north-south connectivity.

Bus halt on highway leads to traffic jams, poses risk to passengers

PIMPRI CHINCHWAD: State transport buses frequently halt at Nigdi, Akurdi, Chinchwad and Pimpri on the central lanes of 12.5 km stretch of Mumbai-Pune highway, between Nigdi and Dapodi, leading to traffic jams and posing a risk for passengers who have to cross from central lanes to service roads.

३३ वर्षांत वाहतुकीचे २३ आराखडे पिंपरी

पार्किंग धोरणामुळे शहरातील वाहतुकीच्या प्रश्नांबाबत आणि वाहतूक सुधारणेबाबत चर्चा सुरू असली तरी वाहतूक सुधारणेसाठी गेल्या ३३ वर्षांत तब्बल २३ आराखडे करण्यात आले आहेत. मात्र या आराखडय़ांची प्रभावी अंमलबजावणी होण्याऐवजी ते कागदावरच राहिल्यामुळे शहरातील वाहतुकीचा प्रश्न तसाच असून आराखडय़ांच्या निमित्ताने सल्लागारांवर केलेला कोटय़वधी रुपयांचा खर्चही त्यामुळे वाया गेला आहे. शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी नवनवीन आराखडे करण्याऐवजी आहेत त्या आराखडय़ांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी होत आहे.

दोन ट्यूबमधून धावणार भूमिगत मेट्रो

पुणे - मेट्रोच्या शिवाजीनगर - स्वारगेट दरम्यानच्या भूमिगत मार्गाची नेमकी अलाइनमेंट निश्‍चित झाली आहे. या मार्गावर पाच स्थानके असतील. मेट्रो मार्गात दोन वर्तुळाकार ट्यूब असून त्यातून मेट्रोची वाहतूक होणार आहे. या मार्गाच्या निविदा तयार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोचली आहे. त्यामुळे भूमिगत मेट्रोसाठी येत्या दोन महिन्यांत कामाला सुरवात होणार आहे. 

प्लॅस्टिक बंदीमुळे हॉटेल व्यावसायिकांची हतबलता; ३० टक्के व्यवसाय ‘पार्सल’वर

पुणे - आज घरी स्वयंपाक करायचा कंटाळा आलाय.. हॉटेलमधून पार्सल घेऊन जाऊया का, असे जर तुमच्या बायकोने विचारले, तर सर्वप्रथम तुमच्याकडे स्टीलचे डबे आहेत का हे तपासा. होय, कारण प्लॅस्टिक बंदीमुळे आता तुम्हाला हॉटेलमध्ये प्लॅस्टिकची पिशवी किंवा डब्यात काहीही दिले जाणार नाही. शहरात चालणाऱ्या हॉटेल्समध्ये तब्बल ३० टक्के व्यवसाय हा ‘पार्सल’वर अवलंबून आहे. होम डिलिव्हरीची सुविधा सर्वांना सोयीची वाटते, पण त्यामध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि डब्यांचा वापर अधिक असल्यामुळे आता त्यावरही मर्यादा येण्याची शक्‍यता आहे. 

प्राधिकरण हद्दीतील 40 हजार बांधकामे अनधिकृत

सध्या पिंपरी चिंचवड शहरात अनधिकृत बांधकाम प्रश्‍न ऐरणीवर आहे. 1 लाख,20 हजार पेक्षा जास्त अनधिकृत बांधकामे संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात उभी आहेत. त्यामध्ये 40 हजारपेक्षा जास्त बांधकामे नवनगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील आहे. त्यास पहिल्यापासून प्राधिकरण प्रशासनाची मुकसंमती आहे. घर बचाव संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक विजय पाटील यांनी माहिती अधिकार 2005 अन्वये सदर महत्वाची बाब उघड केलेली आहे.

नव्याने ‘शेअर रिक्षा’ राबवण्याच्या हालचाली

प्रशासनाने याबाबतही लक्ष घालून कारवाईमध्ये सातत्य ठेवावे, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये पाणीकपात नाही

पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणामध्ये ४८ टक्के पाणीसाठा आहे.

PCNTDA in merger dilemma as state, corporators differ on plan

PIMPRI CHINCHWAD: Local leaders have demanded that the Pimpri Chinchwad New Township Development Authority (PCNTDA) be merged with Pimpri Chinchwad Municipal Corporation instead of the Pune Metropolitan Regional Development Authority, as planned by the state government.

Mosquito menace casts shadow on Old Sangvi


संत तुकारामांच्या गाथेची हिंदी आवृत्ती राष्ट्रपतींना भेट

पिंपरी - खासदार श्रीरंग बारणे यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची बुधवारी (ता. २८) भेट घेऊन त्यांना संत तुकाराम महाराजांच्या गाथेची हिंदी आवृत्ती भेट म्हणून दिली. बारणे यांनी यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी व परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनाही गाथा भेट दिली होती.

संत तुकारामांच्या गाथेची हिंदी आवृत्ती राष्ट्रपतींना भेट

पिंपरी - खासदार श्रीरंग बारणे यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची बुधवारी (ता. २८) भेट घेऊन त्यांना संत तुकाराम महाराजांच्या गाथेची हिंदी आवृत्ती भेट म्हणून दिली. बारणे यांनी यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी व परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनाही गाथा भेट दिली होती.

कुंकूमार्चन, लक्ष्मी होमला पिंपरीत प्रतिसाद

चौफेर न्यूज – आर्ट ऑफ लिव्हिंग, वेदिका धर्म संस्थानतर्फे चैत्र नवरात्री अष्टमीनिमित्त पिंपरीत कुंकूमार्चन व लक्ष्मी होमचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 1800 नागरिक उपस्थित होते.

पुणे - जुनी सांगवी शिवसृष्टी उद्यानाबाहेर कचऱ्याचे ढीग

जुनी सांगवी (पुणे) : जुनी सांगवीतील महापालिकेच्या शिवसृष्टी उद्यानाच्या सिमा भिंतीलगतचा कचरा दिवसेंदिवस वाढत आहेत. यामुळे या परिसराला बकालपणा आला आहे. मुळा नदीपात्रातील जलपर्णी व अस्वच्छतेमुळे सांगवीत डासांचे प्रमाण वाढले आहे.

Friday 30 March 2018

मोशी कचरा डेपोला मोठी आग; बारा तासानंतरही आग आटोक्यात नाही

पिंपरी :  मोशी येथील कचरा डेपोला गुरुवारी (ता.२९) रात्री लागलेली आग बारा तासानंतरही आटोक्यात आलेली नाही.
 मोशी येथील कचरा डेपोला आग लागल्याची वर्दी गुरुवारी (ता.२९) रात्री सव्वा आठ वाजताच्या सुमारास अग्निशामक दलास मिळाली. त्यानुसार सुरुवातीला भोसरी येथील अग्निशामक उपकेंद्राचा बंब घटनास्थळी दाखल झाला. मात्र आगीचे स्वरूप पाहता आणखी चार बंब घटनास्थळी दाखल झाले. 

‘पवना’तून शहराला जादा पाणी

पिंपरी - पिंपरी- चिंचवड शहरासाठी पवना धरणातून पुरेसे पाणी देण्यात येणार असून, आवश्‍यकतेनुसार मंजुरीपेक्षा जादा पाणी देण्याचीही तयारी जलसंपदा विभागाने दर्शविली. सर्व सांडपाण्याचे शुद्धीकरण करून ते पाणी पुन्हा नदीत सोडण्याचे महापालिकेने मान्य केले आहे.

स्वतंत्र आयुक्तालयात 15 ठाणी

पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय करण्याचे आश्‍वासन भाजपच्या सर्वच नेत्यांनी यापूर्वी अनेकदा दिले आहे; मात्र सध्या हे आश्‍वासन पूर्ण होणार असे चित्र दिसत आहे; कारण शहरातील सर्वच प्रशासन यंत्रणा मनापासून स्वतंत्र पोलिस आयुक्तालयासाठी काम करताना दिसत आहे. नव्याने होणार्‍या पोलिस आयुक्तालयाच्या प्रस्तावात सध्या तरी पंधरा पोलिस ठाण्यांचा समावेश आहे.

दुभाजक सुशोभिकरणाचे “व्हीडिओ शुटिंग’

पिंपरी – शहरातील विविध भागातील रस्ते दुभाजक पालिकेच्या वतीने कोट्यावधी रूपये खर्च करून सुशोभिकरण केले जाते. परंतु, संबंधित ठेकेदार व्यवस्थित कामे करत नाहीत. त्यामुळे काम सुरू होण्यापूर्वी व काम झाल्यानंतर सुशोभिकरणाचे “व्हीडिओ शुटिंग’ व छायाचित्र काढून ठेवण्याचा निर्णय स्थायी समितीच्या सभेत घेण्यात आला.

सांगवीत जेष्ठांची पाणी बचतीसाठी जनजागृती

सांगवी – जागतिक पाणी दिनानिमित्त जुनी सांगवी येथे ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने पाणी बचतीसाठी प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात आली. पाण्याची बचत करा, पाण्याचा काटकसरीने वापर करा, गळणारे नळ, दुरूस्त करा, पाणी वाया घालवू नका, अशा घोषणा देत काढण्यात आलेल्या या प्रभात फेरीत विद्यार्थी, महिला, नागरीकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

“रेडझोन’ हद्दीत अनधिकृत “होर्डिंग्ज’चे पेव

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीचा काही भाग लष्कराच्या “रेडझोन’ने बाधित झाला आहे. या बाधित जागेत खासगी संस्थांकडून मोठमोठे “होर्डिंग्ज’ लावले जात आहेत. अशांवर कारवाई होत नसल्यामुळे महापालिकेचे लाखो रुपयाचे चलन बुडत असून लष्कराचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत. अशा अनधिकृत “होर्डिंग्ज’वर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निगडी येथील सजग नागरीक सतिश कदम यांनी केली आहे.

खड्डेमुक्‍त पिंपरी-चिंचवडचा पोकळ दावा

राज्यातील रस्ते 15 डिसेंबरपर्यंत खड्डेमुक्त करण्याची मुदत राज्याच्या सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी दिली होती; परंतु ही मुदत उलटून दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेला, तरी रस्ते खड्डेमयच आहेत. तीच परिस्थिती पिंपरी-चिंचवड शहरात पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी संपूर्ण शहर खड्डेमुक्‍त केल्याचा दावा सत्ताधारी व महापालिकेच्या वतीने करण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र संपूर्ण शहरात याउलट परिस्थिती आहे. विकासकामांसाठी खोदलेल्या रस्त्यांची अद्याप दुरुस्ती करण्यात आली नसून, या खड्ड्यांमुळे अपघातसदृश स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालवणे मुश्कील झाले असून, हे खड्डे कधी बुजवणार, असा संतप्त सवाल वाहनचालक करत आहेत.

पीएमपीच्या सीएनजी बसेसने आठ महिन्यात घेतला नऊवेळा पेट

अगोदरच खिळखिळी बनलेल्या पीएमपीला खरोखर ग्रहण लागले आहे की काय असे म्हणण्याची वेळ आली आहे .गेल्या आठ महिन्यात सुमारे नऊ सीएनजी बसेसने भर रस्त्यात पेट घेतलेला आहे. पेटलेल्या बहुतांशी बसेस या खासगी ठेकेदारांच्या आहेत. शॉर्ट सर्किट आणि वेळेवर मेंटनेस न केल्यामुळे या बसेस पेटल्या असल्या असल्याची प्राथमिक माहिती समोर येत असली तरी बस पेटण्यामागे नक्कीच  मोठे गौंडबंगाल असल्याची बाब आता समोर येऊ लागली आहे. त्यानुसार केवळ ‘इन्शुरन्सचा क्लेम’ मिळावा अशी शक्यता काही जाणकार व्यक्त करीत आहेत.

पुण्यातही मेट्रोमार्गावर बहुमजली उड्डाणपूल शक्य

नागपूर मेट्रोला बहुमजली उड्डाण पुलांसाठी महापालिका आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आर्थिक मदत केली आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये कचरा डेपोला भीषण आग

पिंपरी चिंचवडमधील कचरा डेपोला भीषण आग लागली आहे. महापालिकेचा हा कचरा डेपो मोशी येथे आहे. सव्वा आठच्या सुमारास आग लागली असून मोठ्या प्रमाणात कचरा असल्याने आग सर्वत्र पसरू लागलीये.

भोसरीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्केटिंग रिंक

भोसरी - येथील इंद्रायणीनगर प्रभाग क्रमांक आठमध्ये पेठ क्रमांक तीनमध्ये दीड एकर जागेत दोनशे मीटर लॅपिंग असणारे आंतरराष्ट्रीय स्केटिंग रिंक तयार करण्यात येत आहे. येत्या दोन महिन्यांत हे काम पूर्ण होणार असून, शहरातील स्केटिंगप्रेमींना खेळण्यासाठी उत्तम सुविधा निर्माण होणार आहेत.

सांगवीकर डासांच्या त्रासाने हैराण

जुनी सांगवी-  मुळा व पवना नदीपात्रातील जलपर्णीमुळे सांगवीत डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वाढलेल्या जलपर्णीमुळे गेली दोन महिन्यांपासुन सांगवीकरांना डासांच्या उपद्रवाला तोंड द्यावे लागत आहे. यावर प्रशासनाकडुन तात्काळ उपाययोजना सरू करून सांगवीकरांना डासमुक्त करावे अशी मागणी पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी निवेदनाद्वारे पालिका आयुक्तांकडे केली आहे.

दापोडीत श्री. फिरंगाई देवीचा उत्सव सुरू

जुनी सांगवी - दापोडी येथील ग्रामदैवत श्री.फिरंगाई देवीचा उत्सव सुरू आहे. या देवीचे मुळस्थान पुणे जिल्ह्यातील व दौंड तालुक्यातील कुरकुंभ या गावी आहे. दापोडी स्थित फिरंगाई उत्सवा दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये फिरंगाई महिला भजनी मंडळ, विठ्ठल रूक्मिणी महिला भजनी मंडळ, संत्सग महिला भजनी मंडळ, गणेश नगर महिला भजनी मंडळ, विठ्ठल रूक्मिणी महिला भजनी मंडळ पवारवस्ती, श्री.फिरंगाई देवी जागरण गोंधळ पार्टी यांचा भजनांचा कार्यक्रम यानिमित्ताने होणार आहे.

टपरी-पथारी धारकांचे पक्‍क्‍या गाळ्यांत पुनर्वसन

पिंपरी – कष्टकरी कामगार पंचायतीच्या मागणीची दखल घेत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी प्रत्येक प्रभागात “हॉकर्स झोन’ करण्यासाठी जागेचा शोध घेण्याचे आणि यासाठी क्षेत्रीय आधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमण्याचे आदेश दिले असल्याची माहिती बाबा कांबळे यांनी दिली.

नियमाप्रमाणे स्वीकृत नगरसेवक निवड करा

पिंपरी – महापालिकेच्या प्रभाग स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. ही निवड योग्य नियमांप्रमाणेच करावी, अशी मागणी भीम संग्राम सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली.

जमीन नकाशांच्या डिजिटायझेनसाठी 6 कोटींचा निधी

पुणे- संपूर्ण राज्यातील ग्रामीण भागातील जमिनींची पुर्नमोजणी प्रकल्प राबविण्यास शासनाने मान्यता दिली असून पहिल्या टप्प्यामध्ये प्रत्येक महसूली विभागात एक जिल्हा याप्रमाणे पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर आणि रायगड या सहा जिल्ह्यांमध्ये पुनर्मोजणी करण्यात येणार आहे. यासाठी या जिल्ह्यातील जमीन नकाशांचे डिजिटायझेशन करण्यासाठी शासनाने 6 कोटी 43 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

कल्याणकारी योजनांना “आधार’ जोडण्यासाठी 3 महिन्यांची मुदतवाढ

नवी दिल्ली – कल्याणकारी योजनांसाठी “आधार’ क्रमांक जोडण्यासाठी 31 मार्चपर्यंतची मुदत सरकारने आज आणखीन तीन महिन्यांनी वाढवली आहे. कल्याणकारी योजनांचे अनुदान थेट लाभ हस्तांतरण प्रक्रियेतून नागरिकांना मिळण्यासाठी “आधार’ क्रमांकाची जोडणी होणे आवश्‍यक असणार आहे.

Thursday 29 March 2018

निगडीत मेट्रोचे मल्टिमोडल हब - डॉ. ब्रिजेश दीक्षित

पिंपरी - ‘निगडीपर्यंत मेट्रो नेल्यास तिथे मल्टिमोडल हब होईल,’’ असा विश्‍वास महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी व्यक्त केला. मेट्रो प्रकल्प पिंपरीपासून निगडीपर्यंत वाढविण्याचा पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांचा मोठा दबाव आहे. त्यासाठी निगडीपर्यंतचा सविस्तर प्रकल्प अहवाल येत्या तीन महिन्यांत पूर्ण करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Nagpur-Maha-Metro

निधी कमी मिळाला तरी ‘मेट्रो’चे काम वेगातच

महामेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने सन 20018-2019 आर्थिक वर्षासाठी तब्बल 1 हजार 600 कोटी रुपये निधीची मागणी राज्य व केंद्राकडे केली होती. त्यातील 850 पैकी केवळ 310 कोटी निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे. टप्पाटप्याने हा निधी मिळेल, त्यामुळे कामांचा वेग कायम राहणार आहे, असे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले. 

मेट्रोच्या माहिती केंद्रासाठी संभाजी उद्यानात जागा

ल्या वर्षभरापासून या माहिती केंद्रासाठी महामेट्रोकडून जागेची शोधाशोध सुरू होती.

PCMC begins construction of two roads to airport

PIMPRI CHINCHWAD: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has started construction work of two roads in Charholi to ensure better and quick connectivity to the Lohegaon airport.

स्वच्छतागृहाच्या जागेची विक्री?

पिंपरी - साई चौकातील स्वच्छतागृह महापालिका प्रभागाने ठराव करून पाडले. तेथे वाचनालय बांधण्याचे नियोजन आहे. मात्र, स्वच्छतागृहाची जागा व्यापाऱ्याला कोटींच्या भावात विकण्याचा प्रयत्न स्थानिक लोकप्रतिनिधीच्या मध्यस्थीने सुरू असल्याची चर्चा आहे. दरम्यान, अयप्पा मंदिरामागील स्वच्छतागृह नुकतेच पाडले होते. या प्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

अग्निशामक विभागाकडे पालिकेचे दुर्लक्ष

पिंपरी - प्रस्तावित अग्निशामक केंद्र उभारणीकडे महापालिकेचे दुर्लक्ष झालेले आहे. मानधनावरील वाहनचालक नियुक्‍तीला खो बसला आहे. स्थायी समितीला केवळ खरेदीमध्ये रस आहे. असे प्रकार म्हणजे महापालिकेचे शहरातील नागरिकांच्या जिवाशी केलेला खेळच आहे.

लांडगे तलाव समस्यांच्या गर्तेत

भोसरी - येथील बाळासाहेब बबनराव लांडगे जलतरण तलाव केंद्राला चोरीस गेलेले शॉवर, तुटलेल्या फरशा, प्रथमोपचार पेटीचा अभाव, लाइफ गार्डची कमतरता, नादुरुस्त पंप, खांबावरील गायब दिवे आदी समस्यांनी ग्रासले आहे. तुटलेल्या फरशा आणि जाळ्यांचा पोहण्यास येणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे.

स्वीकृत सदस्य भाजपचेच?

पिंपरी - महापालिका प्रभाग समिती स्वीकृत सदस्य निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून, २६ एप्रिलपर्यंत ती चालणार आहे. आठही प्रभाग समित्यांवर भाजपचे वर्चस्व असल्याने त्यांच्याच कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे. एका समितीवर तीन याप्रमाणे २४ जणांची सदस्यपदी निवड होवू शकते.

शास्तीकर लवकरच रद्द - एकनाथ पवार

पिंपरी - 'पिंपरी चिंचवडमध्ये अनधिकृत मिळकतींवर लावलेला शास्तीकर पूर्वलक्षी प्रभावाने रद्द करण्यात येईल. त्या बाबतची राज्य सरकारची अधिसूचना आठवड्यात निघेल,'' असे महापालिकेचे सभागृह नेते एकनाथ पवार यांनी बुधवारी सांगितले. महापालिकेची शास्तीकराची थकबाकी 485 कोटी आहे.

मनमानी केल्यामुळे परवाना रद्द

पिंपरी - एक प्रवासी रिक्षात बसतो. इच्छित स्थळ सांगतो. मात्र, प्रवासी मीटर सुरू करायला लावतो. रिक्षाचालक मनमानी भाडे आकारतो. ‘दंड भर आणि तुझा परवाना रद्द झाला आहे’, असे जेव्हा तो प्रवाशाच्या वेशातील पोलिस सांगतो, तेव्हा रिक्षाचालकाची भंबेरी उडते. 

पुणे - सांगवीतील संत गोरोबा कुंभार उद्यानातील खेळण्यांची रंगरंगोटी

जुनी सांगवी (पुणे) : जुनी सांगवी आनंद नगर येथील संत गोरोबा कुंभार उद्यानाचे रूपडे सध्या पालटले आहे. या जुन्या उद्यानांच्या डागडुजी व सुशोभिकरणामुळे उद्यानास संजिवनी मिळाली आहे. उद्यानाअंतर्गत दुरूस्त्यांचे काम काही महिन्यांपुर्वी करण्यात आले यात नविन स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सिमा भिंतीचे रंगकाम, कोनशिला, उद्यान नामफलकाची रंगरंगोटी, जुन्या फरशा बदलुन नव्याने केलेला वॉकींग ट्रॅक यामुळे उद्यानाचे रूप पालटले आहे.सध्या रंग उडालेल्या खेळण्यांचे रंगरंगोटी करण्याचे काम सुरू आहे.येत्या आठवड्यात हे काम पुर्ण हाेईल.असे उद्यान अधिकारी जे.व्ही.पटेल यांनी सांगितले.

फ़ोटो- वीडियो नहीं दिया तो नहीं मिलेगा बिल

ठेकेदारों के लिए स्थायी समिति की नई शर्त
पिम्परी: पुणे समाचार ऑनलाइन
सुशोभीकरण के ठेकों में फ़ोटो और वीडियो के रिकार्ड पेश करने पर ही बिल अदा करने की अनोखी शर्त रखने की परंपरा स्थायी समिति ने शुरू की है। पिम्परी चिंचवड़ मनपा के ठेकेदारों के लिए निश्चित की गई इस शर्त के अनुसार काम शुरू करने के पूर्व और काम पूरा होने के बाद के फोटो और वीडियो बतौर रिकार्ड के रखना और पेश करना जरूरी है। इसके बिना ठेकेदारों को बिल न देने की भूमिका स्थायी समिति ने अपनायी है।

The story of one city and five civic bodies

Pune is one of the fastest growing cities in the state with hundreds of industries and IT firms fighting for space.

Hinjewadi neighbours willing to kill for parking space

The two accused had a long-standing fight with the injured person over parking space in Xerbia Society in Hinjewadi.

The car hit Ajit Bhalchandra, who is a driver by profession, from behind and injured him.

Is that blue ice in your juice glass? Better not consume it, warns FDA

PUNE: Officials of the Food and Drug Administration (FDA) have directed ice manufactures to use blue dye in the ice meant for industrial, cooling and storing purposes to distinguish it from edible ice.

During ‘clean-up’ for Venkaiah Naidu’s visit, man dies of heart attack as his kiosk is demolished by PCMC, cops

A 52-year-old man died of a heart attack after civic and police officials demolished his kiosk in Pimpri-Chinchwad, as part of efforts to spruce up the area for the visit of Vice-President M Venkaiah Naidu. Naidu will visit Pimpri-Chinchwad on Thursday to attend the convocation ceremony of the D Y Patil Institute. Officials of police and the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) have been evicting those who have set up shops and kiosks on the route to the institute. Ravi Tayade, 52, a resident of Phulenagar and the sole breadwinner of his family, died of a heart attack on Tuesday.

शास्तीकराबाबत नवा अध्यादेश येणार; जाचक अटी शिथील करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आमदारांना आश्वासन

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत आकारण्यात येणारा शास्तीकर जाचक असल्याने मिळकतधारकांना तो भरणे शक्य नव्हते. त्यामुळे शास्तीकर कपात करण्याबाबत नव्याने अध्यादेश काढण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच हा नवा अध्यादेश जारी करणार आहेत. त्यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळणार आहे. भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी याबाबत आश्वासन दिले असल्याची माहिती भाजपचे शहर प्रवक्ते अमोल थोरात यांनी दिली.

देशातील पहिले ‘संविधान भवन’ पिंपरी चिंचवडमध्ये उभारावे; आमदार लांडगेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

पिंपरी (Pclive7.com):- भारत देश हा जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेला देश आहे. विविध धर्म, जात, पंथ असूनही संविधानाने हा देश एकसंध बांधलेला आहे. या संविधानाविषयी प्रत्येक भारतीयाला साक्षर करणे गरजेचे आहे. त्यासाठी भारतीतील पहिले ‘संविधान भवन’ पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक पाच व आठमधील मोकळ्या भुखंडावर उभारावे, अशी मागणी भाजपचे भोसरीचे सहयोगी आमदार महेश लांडगे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

‘चाळिशीनंतरचे वेश्यांचे आयुष्य’ या विषयावर ३१ मार्चला पिंपरीत परिसंवाद

पिंपरी (Pclive7.com) :- ‘चाळिशीनंतरच्या वेश्यांचे जीवन एक चिंतन’ या विषयावर व ‘आफ्टर ४०’ या वेश्यांच्या जीवनावरील शॉर्ट फिल्मचा विशेष शो येत्या शनिवारी ( दि.३१) रोजी पिंपरीत होणार आहे. पिंपरी चिंचवड श्रमिक पत्रकार संघ व पत्रकार कै. भा.वि. कांबळे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित पिंपरीतील अ‍ॅटो क्लस्टर सभागृहात सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनिल लांडगे यांनी दिली.

[Video] पिंपरी चिंचवड RTO चा अनोखा उपक्रम !

पुणे जिल्ह्यातील जीवनावश्यक वस्तूंची ने-आण करणाऱ्या वाहनांना पासिंग करणे सोपे व्हावे या उद्देशाने पिपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे उभा वाहनांसाठी वेगळी गाडी पासिंग व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती पिपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील यांनी दिली

दोन रुपये वाचवताना तुम्ही जीवच धोक्यात घालताय!

‘‘अरे, थांब... सिटीमध्ये नको भरू पेट्रोल... सिटीबाहेर स्वस्त मिळतं... तिथं टाकी ‘फूल’ करूया,’’ 
असं आपण सहजपणे म्हणतो आणि तसं करतोही... पण हे ‘स्वस्त’ पेट्रोल अप्रत्यक्षपणे तुमच्याच जिवावर बेतणारे आहे याची कल्पना आहे? याच हलक्‍या दर्जाच्या पेट्रोल किंवा डिझेलचा ‘धुराडा’ शहराच्या रस्त्यांवर गाड्यांमधून बाहेर पडतो आणि तुमच्या-आमच्या नाका-तोंडात जातो.

विद्यार्थी, पालकांसाठी चिंचवडमध्ये मार्गदर्शन

पिंपरी - ‘सकाळ विद्या’ व ‘क्रिएटिव्ह ॲकॅडमी’तर्फे सातवी ते नववीत शिकणाऱ्या, तसेच दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी विनामूल्य चर्चासत्र आयोजित केले आहे. गुरुवारी (ता. २९) सायंकाळी ५.३० वाजता चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह येथे हे चर्चासत्र होणार आहे. हे चर्चासत्र विद्यार्थी व पालकांसाठी विनामूल्य आहे.

कोचिंग क्‍लासेसवर सनियंत्रण समितीचे बंधन रहाणार

कोचिंग क्‍लास कायद्याचा ड्राफ्ट तयार: शुल्क ठरविण्याचा हक्‍क क्‍लासेसकडेच
पुणे- कोचिंग क्‍लासेसवर नियंत्रण असावे या पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या मागणी लवकरच पूर्ण होणार आहे. कोचिंग क्‍लासचा कायदा करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने आपला मसुदा तयार केला असून त्यामध्ये सर्वानुमते कोचिंग क्‍लासवर सनियंत्रण समितीचे बंधन असणार असल्याचे ठरविण्यात आले आहे. तर कोचिंग क्‍लासचे शुल्क ठरविण्याचा अधिकार मात्र क्‍लासचालकांकडेच रहाणार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

सीबीएसईचे 10 वी, 12 वीचे फुटलेले पेपर पुन्हा होणार !

नवी दिल्लीकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईने पेपरफुटीमुळे मोठा निर्णय घेतला आहे. दहावी आणि बारावीचे फुटलेले पेपर पुन्हा घेण्यात येणार आहेत. दहावीचा गणिताचा आणि बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर पुन्हा होणार आहे. त्याबाबतचं वेळापत्रक लवकरच सीबीएसईच्या वेबसाईटवर जाहीर होणार आहे.

पालिकेच्या निष्काळजीपणामुळे बीएसएनएलची लाईन बंद

चौफेर न्यूज – महापालिकेच्या क प्रभागाअंतर्गत महात्मा फुले  पुतळ्यासमोर ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. या कामाच्या रस्ते खोदाईमुळे  बीएसएनएलची केबल तुटल्याने मंगळवारी दुपारी बारापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत पीजे चेंबर्ससह गांधीनगर परिसरातील टेलिफोन व इंटरनेट बंद होते. याबाबत बीएसएनएलला कोणतीही पुर्वसुचना देण्यात आली नव्हती.  पालिकेच्या अशा निष्काळी अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी नागरिकांमधून होत आहे.

Wednesday 28 March 2018

पुणे हवा बदलतीये...!

हवाबदलासाठी प्रसिद्ध असलेल्या आपल्या शहरात फक्त सहा महिने चांगली हवा वाहत आहे. विशेषतः नोव्हेंबर ते मे या कालावधीत हवेत विष भिनत जात आहे... 
‘छान हवा’ ही पुण्याची ओळख 
आता पुसली जात आहे...!


Branches take over Kasarwadi footpath

Pile of trimmed wood taking up pavement, creating risks for both pedestrians and commuters; citizens demand PCMC action

PCMC general body finally approves annual budget

PIMPRI CHINCHWAD: The general body (GB) of the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) on Tuesday approved the annual budget for 2018-19 with an outlay of Rs5,767 crore — around Rs505 crore more than the disbursement sum highlighted in the draft budget.

तहकुबीचे “ग्रहण’ सुटले: अर्थसंकल्पाची चिरफाड

पिंपरी- तहकुबीचे ग्रहण लागलेला पिंपरी-चिंचवड महापालिकेचा आगामी 2018-19 आर्थिक वर्षाचा 5 हजार 262 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प अखेर मंगळवारी (दि.27) मंजूर करण्यात झाला. सत्ताधारी भाजप नगरसेवकांनी केलेल्या तब्बल 1 हजार 112 उपसूचनांपैकी ग्राह्य ठरलेल्या 981 उपसूचनांसह हा अर्थसंकल्प मंजूर झाला. मात्र, उपसूचनांमुळे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाची पुरती चिरफाड करण्यात आली. तसेच, विकासकामांच्या नियोजनावर पाणी फेरले गेल्याने महापालिका प्रशासन तोंडघशी पडले आहे.

थकबाकीदारांवर कारवाई

सव्वा लाख मिळकतदारांना नोटिसा; ७७ मिळकतींना ठोकले टाळे

पाच हजार रुपयांपेक्षा अधिक मिळकतकराची थकबाकी असणाऱ्या मिळकतधारकांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. त्याअंतर्गत सुमारे सव्वा लाख मिळकतधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या असून थकबाकी असलेल्या ७७ मिळकतींना टाळे ठोकले गेले आहे.

दापोडी नदी पात्रालगत भराव टाकून अनधिकृत घरे उभारली

दापोडीजवळ नदीपात्रालगत भराव टाकून अनधिकृत घरे उभारली जात आहेत. प्रथम नदीपात्रालगत राडारोडा टाकायचा. त्यानंतर त्याचे सपाटीकरण करून त्याठिकाणी पत्र्यांची घरे ठोकायची आणि काही महिन्यानंतर पक्की घरे बांधायची. असा प्रकार राजरोसपणे सुरू आहे. काही ठिकाणी नाल्याकडेनेही घरे उभारली जात आहेत. याकडे महापालिकेचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. (अरुण गायकवाड - सकाळ छायाचित्रसेवा)

प्राधिकरणाचे विलीनीकरण अशक्य

पिंपरी - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे विलीनीकरण तूर्तास अशक्‍य असल्याचे पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) महानगर आयुक्त किरण गित्ते यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. ‘पीसीएनटीडीए’चे काम मर्यादित राहिल्याने गेल्या काही वर्षांपासून त्याच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू आहे. मात्र, तसे शक्‍य नसल्याचे गित्ते यांनी आवर्जून सांगितले.

जलपर्णी काढण्यासाठी आधुनिक मशिन

पिंपरी - नदीपात्रात फोफावलेली जलपर्णी काढण्याचे काम महापालिका प्रशासनासाठी दरवर्षी एक मोठे आव्हान असते. आता मात्र, ते संपुष्टात येणार आहे. जलपर्णी काढून जागेवरच विल्हेवाट लावणारे संपूर्ण देशी बनावटीचे मशिन पिंपरी-चिंचवडमधील उद्योजक प्रदीप तुपे यांनी तयार केले आहे. 

खोदलेले रस्ते बुजविण्यास ठेकेदारांची ना ना !

पिंपरी-चिंचवड शहरात रस्त्यांवर पावसाळ्यात पडलेले खड्डे बुजविण्यासाठी तब्बल ८ कोटी ३२ लाख ४१ हजार ७७२ रुपये खर्च करण्यात येणार आहेत. मात्र, संबंधित निविदा प्रक्रिया ‘ई’ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने खासगी कंपन्या व पालिकेने भूमिगत वाहिन्यांसाठी खोदलेले रस्ते बुजविण्यासाठी काढण्यात आल्याचा उल्लेख स्थायी समितीच्या विषयपत्रिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे शहरात खोदून ठेवलेले रस्ते व पदपथ दुरुस्तीचे काम संबंधित ठेकेदार करणार नाही. स्थापत्य विभागाकडून धूळफेक करणारा हा विषय मंजुरीसाठी ‘स्थायी’च्या बुधवारच्या (दि.२८) सभेपुढे ठेवण्यात आला आहे. 

“जेट पॅचर’मधून आता “थेट लूट’?

पिंपरी – पिंपरी-चिंचवडकरांना पावसाळ्यातील खड्‌डे नवीन नाहीत. संबंधित खड्डे बजुवण्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येतो. मात्र, तरीही महापालिका प्रशासन केवळ पावसाळ्यात निर्माण होणारे खड्डे बजुवण्यासाठी नवीन व्यवस्था करण्याच्या मन:स्थितीत आहे. त्यासाठी सुमारे 8 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रशासन “जेट पॅचर’मधून सर्वसामान्य नागरिकांच्या कररुपी पैशाची “थेट लूट’ करणार का? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

शहरबात पिंपरी : उद्योनगरीतील वाहतुकीचा बोजवारा

भले मोठे रस्ते आणि मर्यादित वाहतूक असतानाही पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा उडालेला आहे. शहरातील वाहतुकीचा विचका झाला असून त्याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. वाहनस्वारांची बेशिस्त, वाहतूक पोलीस व महापालिका प्रशासनाची निष्क्रियता व हप्तेगिरी, राज्यकर्त्यांच्या इच्छाशक्तीचा अभाव, यामुळे अतिक्रमणांकडे डोळेझाक केली जाते. त्यामुळे नुसताच बोलघेवडेपणा करून उपयोगाचे नाही, तर ठोस कृतिशील कार्यक्रम राबविला पाहिजे.

शहरात हॉटेलचालकांकडून खाद्यपदार्थासाठी फॉईल पिशव्या

राज्यातील प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका हॉटेल व्यावसायिकांना बसला आहे. खाद्यपदार्थ पार्सल घरी नेणाऱ्या ग्राहकांना या निर्णयाचा त्रास होत असून त्यावर तोडगा म्हणून आतून लॅमिनेटेड असलेल्या फॉईल पिशव्या आणि कंटेनरचा वापर करून अन्नपदार्थ पार्सल देण्यास सुरुवात झाली आहे.

कारवाईच्या धसक्यामुळे कागदी पिशव्यांचा वापर!

मागणी वाढल्याने कागदी पिशव्यांचा तुटवडा

प्लास्टिकबंदीचे आदेश सरकारकडून देण्यात आल्यानंतर बाजारातील भाजी तसेच फळ विक्रेते, किराणामाल विक्रेत्यांसह अनेक व्यावसायिकांनी त्यांच्या दुकानातून प्लास्टिक पिशव्या हद्दपार केल्या आहेत. कारवाईच्या धसक्यामुळे कागदी पिशव्यांचा वापर सुरूकरण्यात आला असला तरी कागदी पिशव्या जादा वजनाचा माल ठेवण्यास तकलादू ठरत असल्याची ओरड विक्रेते करत आहेत.

PWD to use plastic waste to build ‘superior quality’ roads

PUNE: The state public works department (PWD) will use the waste generated at various recycling points after the plastic ban in building asphalt roads.

कुत्री उठली जिवावर !

शहरात मोकाट जनावरांबरोबरच भटक्या कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सध्या शहरामध्ये अनेक वेळा भटक्या कुत्र्याने चावा घेण्याबरोबरच नागरिकांवर हल्ला केल्याच्या घटना घडत आहेत. अलीकडे भटक्या कुत्र्यांनी लहान मुलांना आपले लक्ष्य केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे भटक्या कुत्र्यांची दहशत वाढत असून, त्यांच्या संख्येचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये एप्रिल 2017  ते फेब्रुवारी 2018  या वर्षात 2678 व्यक्तींना कुत्र्याने चावा घेतल्याच्या घटना घडलेल्या आहे, तर सध्या चालू वर्षात 518 जणांना कुत्र्याने चावा घेतल्याच्या घटनांची नोंद आहे, तर खासगी रुग्णालयांत आणखी रुग्ण असण्याची शक्यता आहे. 

पीएमपी’च्या रोजच्या उत्पन्नात 10 लाखांचा तोटा

‘पीएमपी’साठी अत्यंत कडक शिस्तीचे लाभलेले अध्यक्ष  तुकाराम मुंढे यांची बदली झाल्यानंतर  पीएमपीची स्थिती अत्यंत भयावह झालेली दिसून येत आहे. मुंढे यांनी  ब्रेकडाउनचे प्रमाण कमी केले होते. तर  प्रवासी संख्यासुद्धा वाढली होती. आता मात्र  एका महिन्यातच विविध  मार्गांवरील बसची संख्या घटली आहेच,  शिवाय  प्रवाशांची संख्यासुद्धा कमी झाली आहे. परिणामी पीएमपीच्या उत्पन्नात रोज सुमारे दहा लाख रुपयांचा तोटा होऊ लागला आहे. तसेच रोजच्या प्रवाशांची संख्या सुमारे 80 हजाराने घटली आहे. दरम्यान  मनमानी करण्यास कर्मचार्‍यांना मोकळे रान मिळाले असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे.

अलायन्स क्‍लबतर्फे मोफत नेत्र तपासणी शिबीर

दिघी – अलायन्स क्‍लब ऑफ पिंपरी चिंचवड, अलायन्स क्‍लब ऑफ पुणे व संकल्प सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्‍त विद्यमाने आदर्शनगर दिघी येथे मोफत नेत्र चिकित्सा, रक्‍तदाब, मधुमेह व त्वचारोग तपासणी शिबीर संपन्न झाले. या शिबिरामध्ये एच.व्ही.देसाई नेत्र रुग्णालय येथील नेत्रतज्ञांद्वारे पाचशे नेत्ररुग्णांची तपासणी करण्यात आली.

महावीर जयंतीनिमित्त कत्तलखाने बंद ठेवण्याचे आवाहन; आमदार महेश लांडगे यांचे आयुक्तांना निवेदन

पिंपरी (Pclive7.com):- भगवान महावीर जयंती निमित्त शहरातील सर्व कत्तलखाने बंद ठेवण्यात यावेत. महावीर जयंती अंहिसेच्या मार्गाने साजरी व्‍हावी. सर्व मुक जनावरांची होणारी कत्तल थांबविण्याकरीता शहरातील मटण, चिकन व मांस विक्रेते यांनी आपली दुकाने बंद ठेवावीत, असे आवाहन भाजपचे सहयोगी सदस्य आमदार महेश लांडगे यांनी केले आहे. 

दोन वर्षानंतर “आयटी हब’ची गाडी रुळावर

हिंजवडी – सदस्यांची अपात्रतेच्या ग्रहणातून मुक्‍तता झाल्यानंतर हिंजवडी ग्रामपंचायतच्या कारभारास पुन्हा नव्याने सुरुवात झाली आहे. तब्बल दोन वर्षे प्रशासकांच्या अंमलाखाली असलेल्या हिंजवडी ग्रामपंचायतच्या सदस्यांनी जोरदार पुनरागमन करत पहिल्याच मासिक सभेत सात कोटी रक्‍कमेच्या विविध विकास कामांना मंजुरी दिली आहे. कित्येक नाट्यमय वळणानंतर आता कुठे हिंजवडी ग्रामपंचायतीची गाडी रुळावर आली आहे.

Tuesday 27 March 2018

बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयाचे रूप पालटणार

पिंपरी - चिंचवड-संभाजीनगर येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयामध्ये काळानुरूप विविध बदल केले जाणार आहेत. प्राणी आणि पक्ष्यांचा येथील वावर अनुकूल व्हावा, यासाठी नैसर्गिक वातावरण निर्मिती केली जाणार आहे. त्यामुळे हे प्राणिसंग्रहालय भविष्यात पर्यटकांच्या दृष्टीने आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल. 

सांगवी रुग्णालयात सुविधांची वानवा

पिंपरी - सांगवी येथील रुग्णालयाला सध्या विविध वैद्यकीय सुविधांची प्रतीक्षा आहे. छोट्याशा जागेत असलेल्या या रुग्णालयात महिलांच्या प्रसूतिगृहाची प्रामुख्याने व्यवस्था आहे. मात्र, सोनोग्राफी आणि तातडीच्या प्रसूती शस्त्रक्रियेसाठी महिलांना सांगवी फाटा येथील पुणे जिल्हा रुग्णालय किंवा महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात जावे लागते. 

पिंपरी-चिंचवड प्राधिकरण ‘पीएमआरडीए’त होणार विलीन

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण (पीसीएनटीडीए) पुणे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात (पीएमआरडीए) विलीन करण्याचा निर्णय मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये सोमवारी (दि.26) झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे प्राधिकरणाची सर्व मालमत्ता व जागा पीएमआरडीएकडे हस्तांतरीत केली जाणार आहे. मुंबईत झालेल्या या बैठकीत पीएमआरडीएचे अध्यक्ष किरण गित्ते, महापौर नितीन काळजे, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, आयुक्त श्रीकर परदेशी, मावळचे आमदार बाळा भेंगडे आदी उपस्थित होते. बैठकीत प्राधिकरणाचे पीएमआरडीएमध्ये विलिन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय झाला.

बोपोडीतील कोंडी सुटणार

पिंपरी - जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावरील बोपोडी येथील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे महापालिकेने रस्ता रुंदीकरण सुरू केले आहे. मात्र, हा भाग सलग नाही. काही मिळकती संपादित कराव्या लागणार आहेत. त्याचे संपादन झाल्यास सुमारे एक किलोमीटरचा रुंद रस्ता वाहनचालकांना मिळेल. त्यातून ही कोंडी सुटण्यास मदत होऊ शकतो. याच भागात मेट्रो रेल्वेचे कामही एप्रिलमध्ये सुरू होईल. त्या वेळी रस्ता रुंदीकरण केलेला काही भाग वाहनांना पर्यायी रस्ता म्हणून उपलब्ध होऊ शकेल, अन्यथा येथील वाहतूक अन्य मार्गाने वळवावी लागेल.

लोहमार्गालगतच्या अनधिकृत घरांची डोकेदुखी

पुणे - शहर व परिसरातील लोहमार्गांजवळील रेल्वेच्या जागांवरील अनधिकृत घरांचा प्रश्‍न मध्य रेल्वेसाठी डोकेदुखी झाला आहे. तो सोडविण्यासाठी अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे. विधी मंडळाचे अधिवेशन झाल्यावर महापालिका, रेल्वे आणि गृहनिर्माण सचिवांसोबत बैठक घेऊन तो सोडविणार आहे, अशी माहिती खासदार अनिल शिरोळे यांनी पत्रकार परिषदेत सोमवारी दिली. या घरांच्या पुनर्वसनासाठी धोरण ठरविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. 

खोदलेले रस्ते बुजविण्याच्या कामात धूळफेक

पिंपरी-चिंचवड शहरात रस्त्यांवर पावसाळ्यात पडलेले खड्डे बुजविण्यासाठी तब्बल 8 कोटी 32 लाख 41 हजार 772 रुपये खर्च करण्यात येणार आहेत. मात्र, संबंधित निविदा प्रक्रिया ‘ई’ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने खासगी कंपन्या व पालिकेने भूमिगत वाहिन्यांसाठी खोदलेले रस्ते बुजविण्यासाठी काढण्यात आल्याचा उल्लेख स्थायी समितीच्या विषयपत्रिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे शहरात खोदून ठेवलेले रस्ते व पदपथ दुरुस्तीचे काम संबंधित ठेकेदार करणार नाही. स्थापत्य विभागाकडून धूळफेक करणारा हा विषय मंजुरीसाठी ‘स्थायी’च्या बुधवारच्या (दि.28) सभेपुढे ठेवण्यात आला आहे.  

मेट्रो प्रकल्प, रिंगरोडला सर्वाधिक निधी

शहर आणि परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रस्तावित रिंगरोड आणि हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोसाठी भरीव तरतूद करण्यात आलेल्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या दोन हजार ५९१ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला सोमवारी मंजुरी देण्यात आली. वाहतूक प्रकल्पांसह 'पीएमआरडीए'च्या म्हाळुंगे येथील नियोजित नगररचना योजना (टीपी स्कीम) आणि पाणीपुरवठा, रस्ते-पूल बांधणी, अग्निशामक केंद्र या प्रकल्पांसाठी आवश्यक तरतुदी करण्यात आल्या आहेत.

रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे जलपर्णीमुक्त पवनामाई अभियानाचे 141 दिवस पूर्ण

रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी आयोजित जलपर्णी मुक्त स्वच्छ व सुंदर पवनामाई उगम ते संगम या अभियानाचा 141 वा दिवस केजुबाई बंधारा थेरगाव बोट कल्ब येथे पार पडला.

रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे जलपर्णीमुक्त पवनामाई अभियानाचे 141 दिवस पूर्ण

आतापर्यंत पिंपरी महापालिकेचे 22 कर्मचारी ‘लाच’प्रकरणी जाळ्यात

महापालिकेसंदर्भातील काम करण्यासाठी अधिकारी लाच मागतात. विशिष्ट रकम अदा केल्यानंतरच ‘फाईल’ पुढे सरकते. असे खाबूगिरी करणारे अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या (एसीबी) कचाट्यात अडकत आहेत. भाजपच्या ‘पारदर्शक’ कारभार्‍यांच्या काळातच अशी प्रकरणे मोठ्या संख्येने उघड होत असल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. गेल्या 26 वर्षांत तब्बल 22 अधिकारी खाबूगिरीत सापडले आहेत.

बसचा ‘टाईम’ नाही ‘सेट’ नागरिकांना करावा लागतोय ‘वेट’

निगडी बसस्टॉप येथून येरवडा व कोरेगाव पार्क येथे जाण्यासाठी कमी बसची संख्या आहे. बसच्या येण्या-जाण्याचीही वेळ लावण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांना दीड तास बसची वाट पाहावी लागत आहे. त्याबाबत संबंधितांशी संपर्क साधल्यास ते उद्धट बोलत आहेत. त्यामुळे बसचा ‘टाईम’ नाही ‘सेट’ नागरिकांना करावा लागतोय ‘वेट’ असे चित्र निगडी बसस्टॉपवर आहे. कामानिमित्‍त निगडीतून पुण्याला जाण्यासाठी भक्‍ती-शक्‍ती व निगडी पवळे उड्डाणपुलाखाली नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली असते.

शहरात अनधिकृत जाहिरात फलकांचे पेव

पिंपरी - शहरातील विविध भागांमध्ये अनधिकृत जाहिरात फलकांचे पेव फुटले असून, जागा मिळेल तिथे हे फलक लावण्याचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेच्या आकाशचिन्ह परवाना विभागातर्फे गेल्या महिनाभरात ३० मोठी होर्डिंग्ज हटविली; तसेच क्षेत्रीय कार्यालयांकडून कारवाई करण्यात आली.

शहरात ठिकठिकाणी बेवारस वाहने पडून

पिंपरी - शहरासह उपनगरात ठिकठिकाणी बेवारस वाहने धूळ खात पडून आहेत. या वाहनांमुळे रहदारीस अडथळा निर्माण होत असून, अन्य महापालिकांप्रमाणे पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही बेवारस वाहने संकलित करून त्यांचा लिलाव केल्यास महसूल तर मिळेलच तसेच रस्त्यावर अडवलेली जागाही मोकळी होईल. ती वाहने चोरीची असल्यास संबंधितांना ती परत मिळू शकतात. 

‘बबन’च्या कलाकारांचे पिंपरीत भव्य स्वागत

चौफेर न्यूज –  राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक भाऊसाहेब क-हाडे यांचा बहुचर्चित मराठी चित्रपट‘बबन’चा शुक्रवारी पिंपरीतील विशाल ई-स्क्वेअर  दिग्दर्शक क-हाडे व चित्रपटातील सर्व कलाकारांच्या उपस्थितीत प्रिमियर शो आयोजित करण्यात आला होता. यावेळी कलाकार भाऊसाहेब शिंदे, गायित्री जाधव, देवेंद्र गायकवाड, अभय चव्हाण, योगेश डिंबळे, पिंपरी चिंचवड मधील स्थानिक कलाकार जान्हवी कांबीकर, स्वप्निल पटेकर, नितीन वाघ या कलाकारांची शरदनगर चिखली येथून विशाल ई-स्क्वेअर पर्यंत वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. प्रिमियर शो ला प्रेक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.

Event: Pune Data Conference, 31 March

Pune Data Conference 2018 is a one-day conference on 31st March, at Westin Pune, from 8:30am to 6pm. It features 3 tracks of talks from topics in big-data, AI and ML, IoT, Cloud and Containerization.

अपंगांच्या स्वावलंबन आरोग्य विम्याचे अर्ज हाऊसफुल; लाभ बंद

अपंगांच्या स्वावलंबन आरोग्य विम्याचे अर्ज हाऊसफुल; लाभ बंद

कुत्र्यांच्या बंदोबस्ताला नियमांचा अडथळा

पिंपरी - निर्बीजीकरण शस्त्रक्रिया, उपचार किंवा पिसाळलेले असले, तरच भटक्‍या कुत्र्यांना नियमानुसार पकडता येते. अन्यथा इतर कोणत्याही कारणासाठी पकडून डांबून ठेवता येत नाही. एका भागातून पकडून दुसऱ्या भागात सोडता येत नाही. त्यामुळे भटक्‍या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणणे हाच पर्याय प्रशासनापुढे आहे. 

शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा; राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष अमित बच्छाव यांची मागणी

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील नागरीकांना गेल्या कित्येक दिवसांपासून भटक्या,मोकाट कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. दिवसाआड कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटना घडत आहेत. शहरात विविध भागांत भटक्या कुत्र्यांचा उपद्रव चालू असून, त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अमित बच्छाव यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

रिक्षा चालकांसाठी लवकरच महामंडळ

पिंपरी – महाराष्ट्रातील 20 लाख रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याची घोषणा महाराष्ट्र सरकारने केली आहे. लवकरच महामंडळाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. रिक्षा चालकांना कल्याणकारी मंडळाचा लाभ देण्यात येईल, असे आश्‍वासन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिले आहेत, अशी माहिती ऑटो रिक्षा कृती समितीचे सरचिटणीस बाबा कांबळे यांनी दिली.

Monday 26 March 2018

Civic bodies get one month to plan for plastic ban execution

PUNE: The local bodies in the state, including PMC and PCMC, just have one month to draw up a plan for effective implementation of the ban on plastic items within their jurisdiction, failing which they will face action.

प्लास्टिकबंदीबाबत पिंपरी पालिका अजूनही सुस्तच

प्लास्टिक व थर्माकोलच्या वस्तू वापरण्यास राज्य शासनाचे गुढीपाडव्यास (दि.18) बंदी घातली आहे. ती वापरणे, विक्री करणे आणि उत्पादन केल्यास शिक्षेची तरतूद केली आहे. याबाबत महिन्याभरात कारवाई करून शहरातील दुकानदार व उत्पादकांकडून प्लास्टिकची विल्हेवाट लावण्याबाबतचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. मात्र, आठवडा उलटूनही, अद्याप पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्याचे धक्कादायक चित्र आहे. 

Retailers to pass on additional cost to shoppers

PUNE: Buying groceries is expected to become costlier by Rs 4 to Rs 10 after the plastic ban.

Plastic eggs make round of stores in Chinchwad

A fitness enthusiast has sent samples to FDA, which says it will penalise miscreants

Eggs sold at Chinchwad are proving to be dangerous rather than healthy after a fitness enthusiast reported an untoward experience before consumption. From what seems like a new trend, eggs that look very much like the original ones have found to contain a strain of plastic. They are being sold throughout Chinchwad.

PCMC officials begin work on road along Pavana river

Pimpri Chinchwad: The civic body has started work on a 2km-long road along the Pavana river in a bid to mitigate the traffic congestion on other roads in Pimpri and Chinchwad.

मेट्रोचे काम सुसाट

पिंपरी - मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या पुढील टप्प्यातील कामे सुरू करण्याच्या उद्देशाने खराळवाडी ते संत तुकारामनगर दरम्यान उभारलेल्या खांबांवर पिअर कॅप बसविण्यास गेल्या पंधरवड्यात प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे खांबांवर व्हायाडक्‍ट बसविण्याचे काम लवकर पूर्ण करता येणार असल्याचे महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले. पुण्यापेक्षाही पिंपरी- चिंचवडमध्ये रस्ता रुंद असल्यामुळे वाहतूक कोंडी तुलनेने कमी होते. त्यामुळे मेट्रो प्रकल्प उभारणीच्या कामाला वेग आला आहे.

उड्डाण पुलाचे काम प्रगतिपथावर

पिंपरी - जगताप डेअरी ते साई चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने हाती घेतलेल्या उड्डाण पुलाचे काम प्रगतिपथावर आहे. 

Proposed police commissionerate office site recce

PIMPRI CHINCHWAD: A team of the civic body officials and police personnel on Friday inspected seven properties, including six municipal offices, for selecting a suitable site for the proposed new police commissionerate in Pimpri Chinchwad.

पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र आयुक्तालय

शहरातील कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी अनेक वर्षांपासून मागणी होणाऱ्या स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांची स्वप्नपूर्ती होणार आहे. पिंपरी-चिंचवडसह मीरा-भाईंदर आणि कोल्हापूर येथे स्वतंत्र आयुक्तालय सुरू करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. 

पहिले आयुक्त अप्पर महासंचालकदर्जाचे

पिंपरी: पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाची घोषणा होण्यापूर्वीच नवे आयुक्तपद अप्पर महासंचालक दर्जाचे की विशेष महानिरीक्षक दर्जाचे असणार यावरून मोठा खल झाला होता. मात्र, आता घोषणा झाल्यानंतर पिंपरी-चिंचवडच्या पहिल्या पोलिस आयुक्तपदी अप्पर पोलिस महासंचालक दर्जाचे अधिकारी असतील, अशी माहिती सूत्रांनी 'मटा'ला दिली. 

आरटीओची 95 टक्के कामे एका क्‍लिकवर

चिखली : वाहन परवान्यांच्या ऑनलाइन अपॉइंटमेंट पाठोपाठ आता आरटीओ कार्यालयासंबंधी 95 टक्के कामे घरबसल्या एका क्‍लिकवर करता येणे शक्‍य झाले आहे. यामुळे कार्यालयात होणारी नागरिकांची गर्दी कमी झाली आहे. त्यामुळे पूर्वी वाहन परवान्यासाठी दररोज 260 आणि योग्यता प्रमाणपत्रासाठी दीडशे ते दोनशे नागरिकांना शुल्क भरण्यासाठी तासन्‌तास रांगेत उभे राहावे लागत होते. आता हा त्रास कमी झाला आहे. 

साठ मीटर रुंद रस्ता झाला तीस मीटर; खर्च अठरा कोटी

पिंपरी (पुणे) - आळंदी-पुणे पालखी मार्गावरील दिघी-दत्तनगरनंतर जकात नाक्‍यापर्यंतच्या बाराशे मीटर लांब व साठ मीटर रुंद बीआरटी मार्गाच्या कामासाठी जागा हस्तांतरित केली. साठ मीटर रुंद रस्ता करणे अपेक्षित असताना पुढाऱ्यांच्या मिळकती वाचविण्यासाठी फक्त तीस मीटरच रस्ता रुंद केल्याने स्थानिकांनी महापालिका प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे. 

महापालिकेने नेमलेले खासगी सल्लागार रद्द करा

पिंपरी – महापालिकेने नेमलेले सर्व सल्लागार रद्द करावेत, असे फर्मान भाजप शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांनी काढले आहे. त्यामुळे भाजपच्या वर्षभराच्या कार्यकाळात नेमण्यात आलेले सल्लागार रद्द होणार का तसेच महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर याबाबत कोणती भूमिका घेणार याकडे महापालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Pune, Pimpri-Chinchwad and Khadki: As summer sets in, hyacinth menace returns to rivers

Domnic Lobo, a resident of Sangvi whose house is near the Mula river said if civic officials had acted earlier, the problem of hyacinth could have been dealt with on time.

पिंपरी महापालिकेचा कारभार समाजसेवकांविना

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा नागरवस्ती विकास योजना हा विभाग थेट नागरिकांशी संबंधित आहे. विभागाचे कामकाज सुरळीत व गतिमान होण्यासाठी 4 समाजसेवकांची पदे मंजूर आहेत. मात्र, ती ऑगस्ट 2016 पासून भरण्यात न आल्याने विभागाचे कामकाज खोळंबून राहात असून, त्यामुळे नागरिक व विद्यार्थ्यांना गैरसोईचा सामना करावा लागत आहे. संबंधित विभाग गतिमान करण्यासाठी 4 समाजसेवकांची नियुक्ती करण्याची मागणी होत आहे.

[Video] म्हाळुंगे- माण या गावांचा विकास आराखडा तयार


रसरशीत फळांमुळे उन्हाळा होतोय सुकर!

पिंपरी - वाढत्या उन्हाने शहरवासीय हैराण झाले असून, ‘गर्मी में भी थंडी का एहसास’ देणाऱ्या रसदार फळांची मात्र रेलचेल आहे. एरवी उन्हाळ्याच्या तोंडावरच महागणारी रसरशीत फळे यंदा मात्र सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतील, अशा किमतीत उपलब्ध आहेत. त्यामुळे फळांच्या खरेदीला शहरवासीयांनी प्राधान्य दिले आहे. ‘स्वस्त आणि मस्त’ असलेल्या या फळांनी लगडलेल्या हातगाड्या, टेंपो आणि स्टॉल पावलोपावली पाहायला मिळत आहेत.

भटक्‍या कुत्र्यांचा हल्ला; माणमध्ये बालकाचा मृत्यू

पिंपरी - भटक्‍या कुत्र्यांच्या साहिल भुट्टो अन्सारी (वय ५, रा. मोहिते वस्ती, माण, ता. मुळशी) याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास माण येथे घडली.

Relatives assault doctor after death of patient

A resident doctor was assaulted with a scalpel and a few paramedics were roughed up by relatives of 26 -year-old man after he suddenly died following a cardiac arrest at D Y Patil Medical College and Hospital in Pimpri late on Friday evening.

वाकड पोलिसांचा शिवसेनेच्या वतीने सत्कार

वाकड – तीन दिवसात बेपत्ता मुलीचा शोध घेणाऱ्या वाकड पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांचा शिवसेना रहाटणी काळेवाडी विभागाच्या वतीने सन्मान करण्यात आला.

पिंपरी-चिंचवड सी. ए. शाखेला उत्कृष्ट शाखा पुरस्कार

पिंपरी – दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंन्टस ऑफ इंडिया (आयसीएआय) वेस्टर्न रिजनतर्फे पिंपरी-चिंचवड शाखेला मध्यम गटात द्वितीय “बेस्ट ब्रॅंच ऑफ आयसीएआय’चा पुरस्कार मुंबई येथे प्रदान करण्यात आला. सलग पाचव्या वर्षी पिंपरी-चिंचवड शाखेने हा पुरस्कार पटकावला आहे.

थेरगाव येथे गतिरोधक बसविण्याची मागणी

थेरगाव – वाढत्या अपघाताचे प्रमाण पाहता थेरगाव येथील शिवकॉलनी कमानी चौक व खिंवसरा ट्रेडसमोरील दुभाजकाच्या दोन्ही बाजूस मोठे गतिरोधक बसविण्यात यावे, अशी मागणी ह्युमन राईट्‌स असोसिएशन फॉर प्रोटेक्‍शनच्या वतीने करण्यात आली आहे.

दीड लाख लाभार्थ्यांना योजनांचा लाभ

पिंपरी – महापालिका हद्दीत वास्तव्यास असणाऱ्या विविध घटकातील नागरिकांसाठी कल्याणकारी योजना राबविणाऱ्या नागरवस्ती विकास योजना विभागावर सर्वसाधारण सभेत सदस्यांनी अर्ज तापासले जात नसल्याचा आरोप केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून नागरवस्ती विकास योजना विभागाने 1 एप्रिल 2017 ते 6 मार्च 2018 या आर्थिक वर्षाच्या कार्यकाळात तब्बल 1 लाख 51 हजार 829 लाभार्थ्यांना योजनांचा लाभ दिल्याचा तपशील जाहीर केला आहे.

डॉक्‍टरला मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल

पिंपरी – डॉक्‍टरांच्या चुकीमुळे तरुण रुग्ण दगवल्याचा आरोप करत नातेवाईकांकडून डॉक्‍टरला मारहाण करण्यात आली. हा प्रकार पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात घडला. या मारहाणीच्या निषेधार्थ डॉक्‍टरांनी संप पुकारला होता. अखेर सायंकाळी पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर डॉक्‍टरांनी आंदोलन स्थगित केले.

पाणी, दुधाचे भाव वाढणार नाहीत…

मुंबई – प्लॅस्टिक बंदीतून दुधाच्या पिशव्या व पाण्याच्या बाटल्यांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे दुधाच्या पिशवीमागे 50 पैसे, तर पाण्याच्या अर्धा लीटरच्या बाटलीला 2 रूपये, तर एक लीटरच्या बाटलीला 1 रूपया इतकी अनामत रक्‍कम द्यावी लागणार आहे. पिशवी व बाटली परत केल्यानंतर ती रक्‍कम ग्राहकाला परत मिळणार आहे.

पिम्परी चिंचवड़ मनपा पर ‘थर्ड आई’ की नजर!

यूं तो पिम्परी चिंचवड़ मनपा के कामकाज में ‘बाहरी’ हस्तक्षेप नई बात नहीं है, कांग्रेस के वरिष्ठ नेता स्व. प्रो. रामकृष्ण मोरे से लेकर बीते 15 सालों से गत वर्ष तक राष्ट्रवादी कांग्रेस के वरिष्ठ नेता व पूर्व उपमुख्यमंत्री अजित पवार तक हर किसी ने मनपा की कमान अपने हाथों में रखने के लिए यहाँ के कामकाज पर अपनी नजर हमेशा गड़ाए रखी। मगर अब जब यहां सब कुछ भाजपा की तस्वीर है, तब से सीधे मुख्यमंत्री मनपा की कमान अपने हाथों में लिए हुए हैं। मनपा के कामकाज पर उनके दफ्तर यानि सीएमओ के ‘थर्ड आई’ की पैनी नजर है।

पिंपरी महापालिकेच्यावतीने सोमवारी कविसंमेलन

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने कला व सांस्कृतिक धोरणांतर्गत कविसंमेलन सोमवार दि.२६ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित केले असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन महापौर नितिन काळजे यांनी केले आहे.

Saturday 24 March 2018

‘वाय जंक्‍शन’ एप्रिलमध्ये खुला

पिंपरी - वाहतुकीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी वाकड फाट्याजवळ विकसित करण्यात आलेला भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याबाबत महापालिकेने दिलेल्या आश्‍वासनाची पूर्तता पाच महिन्यानंतरही झालेली नाही. त्यामुळे ‘भुयारी मार्गाला मुहूर्त कधी मिळणार?, असा प्रश्‍न रोजच्या वाहतूक कोंडीला वैतागलेले नोकरदार विचारत आहेत. दरम्यान, प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून, एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत तो वाहतुकीसाठी खुला केला जाईल, अशी माहिती बीआरटी विभागाचे प्रवक्ते विजय भोजने यांनी दिली.