Saturday 13 May 2017

Temporary bridge to come up over Mula

Elaborating, Hardikar said, "The PCMC has sent the design of the permanent bridge to defence authorities for final approval. Once approved, we will invite bids from contractors. That process will take two-three months. The monsoon will set in next ...

No-entry to visitors after official time: PCMC chief

Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) chief on Thursday issued a circular, banning the entry of visitors, including citizens, contractors or businessmen after the official time — between 10 am and 5.45 pm. This is an attempt to curb corruption ...

पिंपरी पालिकेतील बेशिस्तीला आळा

पिंपरी - महापालिकेच्या स्थापत्य, बांधकाम परवाना आणि नगररचना विभागात कार्यालयीन वेळेनंतर येणाऱ्या ठेकेदारांची संख्या लक्षणीय असते. याशिवाय जादा काम केल्याचे दाखवून या विभागातील काही अधिकारी व कर्मचारी ओव्हर टाइमचा पगारही घेतात. या बेशिस्तीला आळा घालण्यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कठोर पावले उचलण्यास सुरवात केली आहे.

पीएमपीच्या प्रत्येक बसला आता “जीपीएस’ यंत्रणा

आर्थिक गाडा रुळावर येण्याची शक्‍यता : डेपो मॅंनेजरकडे असणार कंट्रोल
पुणे – गेल्या काही वर्षांपासून आर्थिक भार सोसत अडखळणाऱ्या पीएमपी प्रशासनाने आता “हायटेक’ च्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेला आर्थिक गोलमाल थांबविण्यासाठी प्रत्येक बसेसना “जीपीएस’ यंत्रणा बसविण्याचा महत्वपूर्ण निर्णय प्रशासनाने घेतला आहे. विशेष म्हणजे, ही यंत्रणा वाहकाच्या ई-तिकिटिंग मशीनमध्ये बसविण्यात येणार आहे. त्यामुळे तिकिटाचे पैसे खाण्यात माहीर असणाऱ्या वाहकांनाही प्रमाणात लगाम बसणार आहे. त्यासाठी प्रत्येक डेपोमध्ये कंट्रोल रूम सुरू करण्यात येणार आहे. त्याचे कंट्रोल संबधित डेपो मॅंनेजरकडे असणार आहे.

पीएमपीएलकडून दैनंदीन पास योजना बंद

हद्दीच्या बाहेरील प्रवाशांच्या संख्येत तीस ते चाळीस टक्‍क्‍यांनी घट
  • उत्पन्नात घट झाल्याने प्रशासनाकडून निर्णय
पुणे – पीएमपीएल प्रशासनाची उत्पन्न गळती होवू लागल्याने पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीबाहेरील प्रवाशांसाठी सवलतीचा दैनंदीन पास योजना बंद करण्यात आली आहे. त्यामुळे माहापालिका हद्दीबाहेरील प्रवाशांना आता दैनंदिन पाससाठी 70 रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे पीएमपीच्या उत्पन्नात वाढ होईल असा प्रशासनाचा कयास होता. मात्र, प्रशासनाचा हा अंदाज साफ चुकला असून महापालिका हद्दीच्या बाहेरील प्रवाशांच्या संख्येत तीस ते चाळीस टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. परिणामी महसूलाचा टक्काही घटला आहे.

निगडीत राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेचे आयोजन

– महिला, पुरुषांच्या 44 संघांचा सहभाग
पिंपरी, (प्रतिनिधी) – क्रीडा भारतीच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त डॉजबॉल फेडरेशन ऑफ इंडियाशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशनच्या मान्यतेने येत्या 13 ते 16 मे दरम्यान अकराव्या पुरुष आणि महिला राष्ट्रीय खुल्या डॉजबॉल स्पर्धेचे निगडीत आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत महिला व पुरुष गटात प्रत्येकी 22 असे एकूण 44 संघांचे 550 खेळाडू सहभागी होणार आहेत, अशी माहिती क्रीडा भारतीचे अध्यक्ष भगवान सोनवणे यांनी गुरुवारी (दि. 11) पत्रकार परिषदेत दिली.