Thursday 20 July 2017

PCMC set to prepare new DP for old city areas

The state government had transferred some areas under Pimpri Chinchwad New Township Development Authority and had approved a separate DP for these areas in 1997. Prakash Thakur, deputy director, town planning , PCMC, said, "There is a need to ...

Are you facing a problem at Hinjewadi IT park? Here is the man tasked with solving all problems

Pune's guardian minister Girish Bapat at a meeting with government agencies and Hinjewadi Industries Association assigned the Pune collector as nodal officer ...

[Video] पिंपरी : ध्येयवेड्या तरुणीचा हस्तकला टिकवण्यासाठीचा उपक्रम

पिंपरी : ध्येयवेड्या तरुणीचा हस्तकला टिकवण्यासाठीचा उपक्रम

सौरऊर्जेचा वाढतोय वापर

पिंपरी - सौरऊर्जा साठवून ती "महावितरण'ला देण्याबाबत नागरिकांत जागृती होऊ लागली आहे. नवनगर विकास प्राधिकरणासह 30 नागरिकांनीही सोलर एनर्जी पॅनल बसविले असून, त्याद्वारे निर्माण होणारी वीज महावितरणला देण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे वीजबिलात मोठी बचत होत आहे. 

PCMC to raze 'unsafe' hosp building

Meanwhile, the engineering department of PCMC has proposed to appoint an architect and project management consultant for conducting the pre-tender and post-tender work of demolishing the building of Talera hospital and constructing a new one. Seema ...

‘रिंग रोड’बाबत जनमताची मागणी

पिंपरी – “रिंग रोड’साठी जनता दरबार भरवून जनमत जाणून घ्यावे, अशी मागणी कॉंग्रेस चिंचवड ब्लॉकच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात कॉंग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष संदेशकुमार नवले यांनी महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे.

पावणे तीनशे कर्मचाऱ्यांवर वाहतुकीची मदार

शहरातील वाहतुकीचा बोजवारा : वाहन चालकांची स्वयंशिस्त महत्त्वाची
पिंपरी – शहरात एकूण वाहन संख्येत दरवर्षी वाढत होत आहे. बावीस लाख लोकसंख्या आणि तब्बल अकरा लाख दुचाकी असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात वाहतूक नियमन करणारे केवळ पावणे तीनशे कर्मचारी आहेत. एवढ्या मोठ्या शहराच्या तुलनेत महापालिका आणि पोलीस प्रशासनाचे योग्य नियोजन नसल्याने संपूर्ण वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरासाठी अतिरीक्त पोलीस मनुष्यबळ मिळण्याची मागणी होत आहे.

पवना धरण @ ७०.४२ टक्के

पवनानगर  : पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण क्षेत्रात गेल्या आठवड्यापासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे  धरण ७०.४२ टक्के भरले आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेला धरण केवळ ५० टक्के भरले होते. जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून धरण क्षेत्रात पाऊस सुरू आहे. नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. भात लावणीच्या कामांना वेग आला आहे.

५० हजार जणांना श्‍वानदंश

पिंपरी- शहरातील भटक्‍या कुत्र्यांनी नागरिकांना सळो की पळो करून सोडले आहे. गेल्या चार वर्षांत ५० हजार जणांना भटक्‍या कुत्र्यांनी चावा घेतल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. महापालिकेकडेही सर्वाधिक तक्रारी या भटक्‍या कुत्र्यांच्या येत आहेत. शहरात भटक्‍या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस भयावह होत चालली आहे.

बेजबाबदारपणाचा ग्राहकांना "शॉक'

पुणे - नियमित मीटर रीडिंग न घेणे, चुकीचे रीडिंग घेणे, अव्वाच्या सव्वा बिले आकारणे, नादुरुस्त मीटर वेळेत न बदलणे, मीटरच्या तुटवड्यामुळे नवीन कनेक्‍शन विलंबाने मिळणे यांसारख्या असंख्य तक्रारी ग्राहक करीत असूनही महावितरणचा कारभार मात्र सुधारण्याचे नाव घेईना! त्यातच खासगी एजन्सीवरही महावितरणचे नियंत्रण नसल्याने त्याचा त्रासही ग्राहकांनाच नाहक सहन करावा लागतोय. 

चिंचवडमधील सुग्रास कारखान्यातील उत्पादन बंद

शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात पशुखाद्य उपलब्ध व्हावे यासाठी १९६५ मध्ये महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळाने सुग्रास या नावाने पशुखाद्याचे उत्पादन चिंचवड येथे सुरु केले. मात्र, बाजारातील स्पर्धा आणि शासनाकडून झालेले ...

शहरबात पिंपरी-चिंचवड : टक्केवारीच्या नादात शिक्षणाची 'ऐशीतैशी'

पिंपरी-चिंचवडमध्ये ६२४ शाळा आहेत, त्यातील जवळपास १५० शाळा महापालिकेच्या आहेत. १८ माध्यमिक आणि १३२ प्राथमिक असे त्याचे वर्गीकरण केले जाते. अलीकडेच, काही शाळा एकत्रित करण्यात आल्याने प्राथमिक शाळांची संख्या १२८ पर्यंत खाली आली ...

जागा मिळाली, निधी मंजूर; पण बांधकाम ना

एकाच खोलीमध्ये पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विभागाचे कामकाज चालते. सध्याच्या छोटय़ा इमारतीमध्ये सुविधा नाहीत. अन्न नागरी पुरवठा विभागाची राज्यातील सर्व कार्यालये ऑनलाइन झाली आहेत. मात्र, येथील कार्यालयामध्ये एक जुना संगणक ...

लोकलमध्ये हुल्लडबाजांचा स्टंट

... प्रथम श्रेणीच्या डब्यात सामान्य प्रवाशांचे अतिक्रमण, सुरक्षेसाठी असणारे पोलीस गायब अशी स्थिती पिंपरी ते देहूरोड आणि देहूरोड ते पिंपरी लोकल प्रवासात दिसून आली. पिंपरी-चिंचवड शहरातील लोकलचा प्रवास कितपत सुरक्षित व सोईस्कर आहे, ...

[Video] फेरीवाला धारकांनी नोंदणी प्रमाणपत्र नेण्याचे पिंपरी पालिकेचे आवाहन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पालिकेच्या 'ब' क्षेत्रीय कार्यक्षेत्रातील बायोमेट्रिक करण्यात आलेल्या फेरीवालेधारकांनी शुक्रवार (दि. 21) पर्यंत फेरीवाला नोंदणी प्रमाणपत्र घेऊन जाण्याचे, आवाहन पालिकेने केले आहे. 'ब' क्षेत्रीय कार्यक्षेत्रातील फेरीवाल्यांचे डिसेंबर 2012 मध्ये सर्वेक्षण करून आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज घेण्यात आले होते. त्यानुसार अर्ज पात्र झालेल्या फेरीवाल्यांचे बायोमेट्रिक करण्यात आले आहे. त्या फेरीवालेधारकांना पालिकेच्या 'ब' क्षेत्रीय कार्यालयात हॉकर्स नोंदणी फी व ओळखपत्र फी भरल्यानंतर फेरीवाला नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येत आहे. परंतु, अशा फेरीवालेधारकांनी अद्यापर्यंत 'ब' क्षेत्रीय कार्यालयातून स्वत:चे फेरीवाला नोंदणी प्रमाणपत्र नेलेले नाहीत. त्यांनी फेरीवाला नोंदणी पमाणपत्र फी, ओळखपत्र आणि आधारकार्ड दाखवून शुक्रवारपर्यंत 'ब' क्षेत्रीय कार्यालयातून घेऊन जाण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. अन्यथा त्यासंबंधीची कोणतीही जबाबदारी पालिकेची राहणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. ज्या पात्र व बायोमेट्री झालेल्या फेरीवाल्यांनी फेरीवाला नोंदणी फी व ओळखपत्र फी अद्यापपर्यंत भरली नाही. त्या फेरीवालाधारकांनी 'ब' क्षेत्रीय कार्यालयात आवश्यक ती कागदपत्रे दाखवून शुक्रवारपर्यंत फेरीवाला नोंदणी फी व ओळखपत्र फी चलनाद्वारे भरून फेरीवाला नोंदणी प्रमाणपत्र घेऊन जाण्याचे आवाहनही केले आहे.