Thursday 25 October 2018

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पुण्यातील तंज्ज्ञांशी संवाद

पंतप्रधान नरेंद मोदी यांचा माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तंज्ज्ञांशी संवाद.

चाळीस हजार लॉंड्री व्यावसायिकांना सोलरसाठी अनुदान : ऊर्जा मंत्री

राज्यभरात चाळीस हजार कुटुंबे लॉंड्री व्यवसाय करत आहेत. त्यांना सध्या दिलेल्या वीजदराच्या सवलतीचा फायदा होणार आहे. पुढील तीन वर्षात विजेमध्ये क्रांती होणार असून, अपारंपरिक ऊर्जा देणे, कचर्‍यापासून वीजनिर्मिती असे वेगवेगळे प्रकल्प हाती घेतले जाणार आहेत. त्याचसोबत सौर ऊर्जेला प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे लॉंड्री व्यावसायिकांनी त्यांच्या दुकानाच्या छतावर सौर ऊर्जेचे पॅनल बसवून घ्यावेत त्यासाठी शासन २५ टक्के अनुदान देण्याची घोषणा करून त्याचा फायदा राज्यातील चाळीस हजार लॉंड्री व्यावसायिकांना होणार असल्याचे प्रतिपादन ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

पोलीस करणार मल्टीपर्पज ड्युटी – आर के पद्मनाभन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय सुरु झाल्यानंतर विविध शाखा आणि विभाग सुरु करण्यात आले आहेत. पण मनुष्यबळाची कमतरता आयुक्तालयला पावलोपावली जाणवत आहे. त्यामुळे आहे त्या मनुष्यबळाच्या जोरावर आयुक्तालयाचा कारभार सुरू आहे. वाढत्या कामाचा व्याप आवरण्यासाठी एक पोलीस एका वेळी अनेक कामे करणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी दिली. 

आंतरराष्ट्रीय योगपटूंचा महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते सत्कार

एमपीसी न्यूज –  आंतरराष्ट्रीय योगपटूंचा व योग साधकांचा महापौर राहूल जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  पुणे डिस्ट्रीक्ट योगा ऍण्ड फिटनेस इन्स्टिट्यूट या संस्थेच्या वतीने निगडीतील ज्ञानप्रबोधिनी विद्यालयात या सत्कार सोहळ्याचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्ञानप्रबोधिनीचे केंद्रप्रमुख मनोज देवळेकर, भारतीय योग संघाचे प्रशिक्षक चंद्रकांत पांगारे आदी उपस्थित होते. 

आंतरराष्ट्रीय केंद्राच्या जागी आता खुले प्रदर्शन केंद्र

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातर्फे मोशी येथे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र उभारण्याचा घेण्यात आलेला निर्णय रद्द करण्यात आला आहे. त्याच्याऐवजी आता खुले प्रदर्शन केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यासाठी प्रदर्शन केंद्राच्या मूळ आराखड्यात बदल करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय प्राधिकरणाच्या सभेत घेण्यात आला.  प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे अध्यक्षतेखाली प्राधिकरणाची सभा झाली. 

पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाचा वाहतूक नियंत्रण कक्ष सुरू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाचा वाहतूक नियंत्रण कक्ष आज (बुधवार) पासून सुरू करण्यात आला आहे. वाकड मधील जुने वाकड पोलीस स्टेशनच्या इमारतीत वाहतूक नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले. पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरु झाले आहे.

महापालिकेत सल्लागारांचा सुळसुळाट; आता फर्निचरसाठी सल्लागार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात कोट्यवधी रुपयांचे विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. मात्र, महापालिकेच्या अभियंत्यांना गलेलठ्ठ पगार दिले जात असताना रस्ते, उड्डाणपूल बांधण्यापासून आता फर्निचर बसविण्यापर्यंत सर्वच छोट्या-मोठ्या कामांसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्याचे पेव फुटले आहे. महापालिकेत सल्लागारांचा अक्षरशः सुळसुळाट झाला असून या सल्लागारांवर प्रकल्प रकमेच्या सव्वा ते तीन टक्के रुपयांची उधळपट्टी केली.

नदीसुधार आराखड्याचे सादरीकरण

सरकारच्या नदी सुधार प्रकल्पांतर्गत पवना आणि इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाचा विकास आराखडा (डीपीआर) पिंपरी-चिंचवड महापालिकेने तयार केला असून, त्याचे सादरीकरण पर्यावरण विभागाने पदाधिकाऱ्यांसमोर बुधवारी केले. आराखडा लवकरच राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे.

पवनेची महाआरती

नदी संवर्धनासाठी कार्यरत जलदिंडी प्रतिष्ठानच्या दशकपूर्तीनिमित्त चिंचवड येथील महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी घाटावर पवना नदीची मंगळवारी (२३ ऑक्टोबर) रात्री महाआरती करण्यात आली.

मेट्रो प्रकल्पासाठी विशेष तंत्रज्ञानाची मदत

पुणे : मेट्रो प्रकल्पाच्या कामात कोणतीही चूक राहू नये यासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून विशेष तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. देशात पहिल्यांदाच ५ डी-बीम या तंत्रज्ञानाचा वापर पुण्यातील मेट्रो प्रकल्पाच्या कामासाठी होत असून तंत्रज्ञानाच्या साहाय्याने खर्चापासून ते वेळेच्या नियोजनावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे.

Cell to boost coordination amid various transport bodies

Pimpri Chinchwad: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will form a transportation cell for better coordination between various transport bodies, including PMPML and BRTS.

भामा, आंद्रातून पिंपरीला पाणी

पिंपरी - पाणीटंचाईच्या समस्येने हैराण झालेल्या पिंपरीवासीयांना दिलासा देणारा निर्णय झाला असून, भामा आसखेड व आंद्रा धरणातून शहरासाठी पाणी घेण्याच्या फेरप्रस्तावाला मंत्रिमंडळ उपसमितीने मंजुरी दिली. महापालिकेने हा प्रकल्प वेगाने मार्गी लावल्यास दोन-तीन वर्षांनी शहराच्या पाणीपुरवठ्यात वाढ होईल. 

आंद्रा, भामाचा प्रस्ताव मंजूर

पिंपरी - आंद्रा व भामा आसखेड धरणांतून पिंपरी-चिंचवड शहरासाठी २.६६ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी देण्याच्या महापालिकेच्या फेरप्रस्तावाला पाच मंत्र्यांच्या उपसमितीने मंजुरी दिली आहे. येत्या दोन-तीन वर्षांत शहराला मिळणाऱ्या पाणीपुरवठ्यात एक टीएमसीने वाढ झाल्यास त्याचा फायदा सध्या पाणीटंचाईने हैराण झालेल्या व सध्या वेगाने विकसित होत असलेल्या शहराच्या पूर्व भागातील लोकांना होईल. 

‘मावळे’ अन्‌ आकर्षक किल्ले विक्रीसाठी

पिंपरी - दिवाळीनिमित्त राजस्थानी कारागिरांनी बनविलेल्या तयार किल्ल्यांना वर्षागणिक मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे मुलांचे घरासमोर किल्ले बनविण्याचे प्रमाण कमी होत असून, बाजारात एक ते तीन फूट उंचीपर्यंतचे आकर्षक किल्ले उपलब्ध होत आहेत. 

“अभय’तून 21 कोटींचा मिळकत कर जमा

पिंपरी – महापालिकेच्या कर संकलन विभागाकडे अभय योजनेअंतर्गत 15 ऑक्‍टोबर अखेर 21 कोटी 37 लाख रुपयांचा कर जमा झाला असून 5 हजार 213 मिळकत धारकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेतर्फे आयोजित स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी – जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्था आयोजित वक्‍तृत्त्व स्पर्धेत पिंपरी-चिंचवड परिसरातील 24 शाळांनी तिसरी व चौथी तर 27 शाळांनी पाचवी व सातवी गटात सहभाग घेतला. बजाज प्रकल्प प्रमुख व विश्‍वस्त संजय भार्गव, प्रकल्प सल्लागार डॉ. चित्रा सोहनी, सहा. व्यवस्थापक के.बी.वाळके, सचिव पार्थसारथी मुखर्जी, तरसे परीक्षक म्हणून ललिता आगाशे, दत्तात्रय तापकीर, अनघा दिवाकर, मनीषा बोरा यांनी काम पाहिले. 

पाण्याची पातळी खालावल्याने पाणी पुरवठा विस्कळीत

पिंपरी – रावेत बंधाऱ्यातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराचा बुधवार (दि. 24) आणि गुरुवारी (दि. 25) पाणी पुरवठा विस्कळीत असणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली आहे.

शिक्षक वर्गीकरणाचा महापालिका तिजोरीवर “भार’

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेने राज्य शासनाच्या 2017 च्या निकषानुसार शिक्षक पती-पत्नी एकत्रीकरण आणि एकतर्फी बदली सेवा वर्गीकरणाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार महापालिकेच्या हद्दीबाहेरच्या शाळेतील मोठा पगार घेणारा शिक्षक पालिकेच्या शाळेत आल्यास त्याच्या मासिक वेतनाचा भार पालिकेच्या तिजोरीवर पडणार आहे. मुख्याध्यापकांच्या 6 आणि शिक्षकांच्या 124 पदांवर शिक्षकांचे वर्गीकरण होणार आहे. या शिक्षकांच्या वेतनावर होणाऱ्या खर्चाचा भार महापालिका तिजोरीवर पडणार आहे.

अखेर प्राधिकरणाचे एक पाऊल मागे

पिंपरी – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या (पीसीएनटीडीए) शैक्षणिक भूखंड भाडेपट्ट्याने देण्यासाठी इच्छूक संस्थांकडून दोनदा निविदा मागविण्यात आल्या. मात्र, त्याला प्रतिसाद न मिळाल्याने प्राधिकरणाने निविदेतील अटी-शर्ती शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे.

उद्योगनगरीत फसवण्याचे फंडे “स्मार्ट’

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात दिवसाआड आर्थिक फसवणुकीच्या घटना घडत आहेत. फसवणुकीचे फंडे एवढे “स्मार्ट’ आहेत की यामध्ये उच्चशिक्षित, उच्च पदस्थ अधिकारी देखील गळाला लागत आहेत. ऑनलाईन व धनादेशाद्वारे होणाऱ्या फसवणुकीचे प्रमाण अधिक असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या स्थापनेपासून म्हणजे ऑगस्ट ते ऑक्‍टोबर तीन महिन्यांत सुमारे 50 घटना घडल्या आहेत.

आकुर्डीतील डॉ. आंबेडकर सांस्कृतिक केंद्र धूळखात

पिंपरी – शहरातील आकुर्डी येथील विवेकनगर परिसरात असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्राची दूरवस्था झाली आहे. मद्यपींनी याठिकाणी कब्जा केला असून परिसरात बाटल्यांचा खच जमा झाला आहे. महापालिकेने लाखो रूपयांचा खर्च करून इमारतीचे काम केले आहे. मात्र, याठिकाणी सुरु असलेल्या गैरकारभाराबाबत स्थानिक संताप व्यक्त करत आहेत.

चिखली – स्पाईनरोड परिसरातील अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई

चौफेर न्यूज – चिखली परिसरातील अनधिकृत फ्लेक्स आणि होर्डींगवर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्यावतीने बुधवारी कारवाई केली. या कारवाईत ३७ बेकायदा फ्लेक्स आणि सुमारे १०० होर्डींग काढून टाकण्यात आले.

पोलिस आयुक्तालयातील 48 सहायक निरीक्षक, उपनिरीक्षकांच्या नियुक्त्या

चौफेर न्यूज  ः पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील 48 सहायक पोलिस निरीक्षक आणि उपनिरीक्षक यांच्या नियुक्त्या मंगळवारी (दि. 23) पोलिस आयुक्त आर.के.
पद्मनाभन यांनी केल्या आहेत. त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नियुक्त करण्यात आले आहे. याच महिन्यात तीन तारखेला पिंपरी, हिंजवडी, निगडी, चिखली आणि इतर पोलीस
ठाण्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.