Saturday 28 July 2018

पक्ष्यांनी फिरवली पाठ

उद्योगनगरीत १४८ पैकी २०-२५ प्रकारचेच पक्षी उरले 

स्मार्ट सिटी मिशन च्या प्रदर्शनात चर्होली येथील पंतप्रधान आवास योजनेस मोठा प्रतिसाद

सिंहासन न्यूज : लखनौ येथे राष्ट्रिय स्तरावर आयोजीत केलेल्या पंतप्रधान आवास योजना, अमृत योजना आणि स्मार्ट सिटी मिशन च्या प्रदर्शनात सादर झालेल्या पिंपरी चिंचवड महापलिकेच्या चर्होली येथील पंतप्रधान आवास योजनेस मोठा प्रतिसाद मिळाल्याची महिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.

महापालिकेत ‘ऑफीसर ऑफ मंथ’ पुरस्कार आरोग्य विभागाचे सहायक आयुक्तमनोज लोणकर यांना

पिंपरी-चिंचवड महापालिकेत चांगले काम करणारा अधिकार्‍यांस ‘ऑफीसर ऑफ मंथ’ पुरस्कार देण्याची संकल्पना स्थायी समितीने चार महिन्यांपूर्वी मांडली होती. अखेर आरोग्य विभागाचे सहायक आयुक्त मनोज लोणकर यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

गहुंजे ते उर्से सर्व्हे सुरू

मुंबई-पुणे मार्गावर हायपरलूप तंत्रज्ञानावर आधारित अतिवेगवान रेल्वे प्रकल्पाची उभारणी करण्याच्या दिशेने महत्त्वाची पावले पडत आहेत. या प्रकल्पाच्या सर्व्हेला सुरुवात झाली आहे. दिवाळीनंतर कोणत्याही क्षणी हायपरलूपच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.

Roads marred by potholes trouble Chikhali residents

PIMPRI CHINCHWAD: Numerous potholes, in addition to trenches ..

Pune's underground metro work: Maha-Metro begins laying vertical shafts, eye 2021 deadline

The Maharashtra metro rail corporation (Maha-Metro) has commenced with work for the vertical shafts at Swargate and Agricultural College to facilitate the entry of tunnel boring machines and start the tunnel excavation work.

underground metro work,Maha-Metro,vertical shafts

मेट्रो मार्गात अर्धा किलोमीटरने वाढ

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत मेट्रोची लांबी सहाशे मीटरनी वाढविण्याचा निर्णय महामेट्रोने घेतला आहे. त्यामुळे संत मदर तेरेसा पुलापर्यंत मेट्रोचा मार्ग वाढणार आहे. त्या दृष्टीने एम्पायर इस्टेट बसथांब्याजवळ कामही सुरू केले आहे. बीआरटी मार्गालगत मेट्रोचे काम होणार आहे. त्यामुळे भविष्यात शहरवासीयांना या दोन्ही सेवा उपलब्ध होतील. 

निगडी-दापोडी बीआरटी मार्गावर अतिक्रमणांचे पेव

पिंपरी - निगडी ते दापोडी बीआरटी मार्गावर चिंचवडस्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झालेली आहेत. हातगाडी व्यावसायिक, किरकोळ विक्रेते, पदपथाचा पार्किंगसाठी वापर करणारे दुचाकीचालक, रस्त्यालगत मोटारी उभ्या करणाऱ्यांनी सायकल ट्रॅक, पदपथ गिळंकृत केले आहेत.

सावधान! ध्वनी प्रदूषण वाढतेय!

पिंपरी – पिंपरी-चिंचवड हे सध्या झपाट्याने वाढणारे शहर आहे. शहरात बांधकाम व वाहनांच्या संख्येतील वाढ देखील लक्षणीय आहे. यामुळे वायू प्रदुषणा बरोबरच ध्वनी प्रदूषण देखील वाढत आहे. महापालिकेच्या पर्यावरण अहवाल 2017-18 नुसार औद्योगिक क्षेत्राबरोबरच रहिवासी क्षेत्रात देखील ध्वनी प्रदुषणाची पातळी वाढली आहे. मानांकापेक्षा 30 ते 40 डेसीबलने ही पातळी अधिक असल्याने ती मानवी आरोग्यासाठी घातक मानली जाते.

महापालिकेत सल्लागारांना “अच्छे दिन’

सत्ताधारी भाजपचा कारभार : स्मशानभूमीलाही लागतो “सल्ला’

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपने प्रत्येक विकास कामांमध्ये सल्लागार नेमणुकीचा सपाटा लावला आहे. अनावश्‍यक सल्लागार पद्धतीवर वारेमाप खर्च होतोय, असा आरोप होत असतानाही पुन्हा चऱ्होली येथील स्मशानभूमीच्या कामाला सल्लागार नेमण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महापालिका सल्लागारांवर चालवली जातेय का? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

अबब… 18 हजारांचा एक “खड्डा’

प्रशासनाची उधळपट्टी? : “जेट पॅचर’च्या उपयुक्‍ततेवर प्रश्‍नचिन्ह

पिंपरी – महापालिका प्रशासन “पारदर्शी’ कारभार करीत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील तब्बल 85 टक्‍के खड्‌डे बुजवले आहेत, असा दावा प्रशासनाने केला आहे. तरीही विरोधी पक्षाने “सेल्फी विथ खड्डा’ उपक्रम राबवून “पारदर्शी’ कारभाराचा बुरखा फाडला. त्यावर कहर म्हणून आता “जेट पॅचर’मशीनद्वारे “झटपट’ खड्डा बुजवण्याची यंत्रणा राबवली जात आहे. विशेष म्हणजे, प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार, या यंत्रणेद्वारे एक खड्डा बुजवण्यासाठी सरासरी तब्बल 18 हजार रुपयांचा खर्च येणार आहे.

यशवंतराव चव्हाण स्मारकांचे थेट अनुदान देण्यास भाजप कार्यकर्त्यांचा आक्षेप ; मुख्यमंत्र्याकडे तक्रार

निर्भीडसत्ता न्यूज –
निगडी येथील कै.यशवंतराव चव्हाण स्मारक समितीला एका आमदारांच्या सांगण्यावरुन तब्बल पाच कोटी रुपये थेट पध्दतीने अनुदान देण्यास स्थायीसह महासभेने मान्यता दिली. हे अनुदान देण्यास भाजपचे सचिन काळभोर यांनी आक्षेप नोंदविला असून याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यासह ‘आपलं सरकार’ यावर तक्रार दाखल करण्यात आलीय. त्यामुळे यशवंतराव चव्हाण स्मारक समितीला दिला जाणारा अनुदानाचा चेक आयुक्तांना थांबवून ठेवला आहे.

महापौर, उपमहापौरानंतर पक्षनेत्यांची खांदेपालट

पिंपरी – पिंपरी-चिंचवडचे महापौर आणि उपमहापौरांनी आपल्या पदाचा राजीनामा नुकताच दिला आहे. त्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापायला सुरूवात झाली आहे. मात्र, सभागृह नेते पदाची मुदतदेखील आता संपली आहे. त्यामुळे महापौर, उपमहापौर बदलानंतर सभागृह नेते केव्हा बदलणार याची महापालिका वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

प्रभारी अतिरिक्‍त आयुक्‍तांवर आयुक्‍तमेहरबान

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे प्रभारी अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्याकडे तब्बल 21 विभागांचा कार्यभार सोपविला आहे. वैद्यकीय विभागाचा कोणताही अनुभव नसतानाही त्यांना आता मुख्य वैद्यकीय अधिकार्‍यांकडील खरेदीचे अधिकारही बहाल केले गेले आहेत. आयुक्त श्रावण हर्डीकर हे मेहरबान असल्याने महत्त्वाच्या विभागांवर आष्टीकर हे ‘बॉस’ म्हणून मिरवत आहेत. त्या कृपादृष्टीची खमंग चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे. 

महापौरपदासाठी भाजपमध्ये जोरदार मोर्चेबांधणी

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील महापौरपदासाठी सत्ताधारी भाजपमध्ये अनेक नगरसेवक तीव्र इच्छुक आहेत. या पदासाठी इच्छुकांनी थेट दिल्लीसह मुंबईतील पदाधिकारी मंत्र्यांना साकडे घातले आहे. त्या दृष्टीने जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे.  सव्वा वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्याने भाजपचे पहिले महापौर नितीन काळजे आणि उपमहापौर शैलजा मोरे यांनी मंगळवारी (दि.24) आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर या पदासाठी विशेषत: महापौरपदासाठी अनेक जण सरसावले आहेत. वर्षभरात लोकसभा  आणि विधानसभा निवडणुका आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या पदास आणखी महत्त्व प्राप्त झाले आहे. हे प्रतिष्ठीत पद पदरारात पाडून घेण्यासाठी स्थानिक नेत्यांसह दिल्ली व मुंबईच्या वार्‍याही काही जणांनी केल्या आहेत. 

वीजबिल भरणा केंद्र आज, उद्या सुरू राहणार

पुणे - थकबाकी व चालू वीजबिलांचा भरणा ग्राहकांना करता यावा म्हणून पुणे परिमंडलातील महावितरणची सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवार (ता. 28) आणि रविवारी (ता. 29) सुटीच्या दिवशी सुरू राहणार आहेत. 

अभ्यास हवा, पण दप्तर नको

पिंपरी - शाळेतील मुलांच्या दप्तराचे ओझे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. मुलाच्या वजनाच्या दहा टक्‍के दप्तराचे ओझे असावे, असे न्यायालय आणि सरकारने आदेश दिले आहेत. परंतु, बहुतांश शाळा याकडे दुर्लक्ष करतात. मुलाच्या वजनाच्या 25 ते 30 टक्‍के दप्तराचे वजन होत आहे. त्यामुळे मुले या ओझ्याखाली दबली जाऊ लागली आहेत. एवढे वजन पाठीवर घेत काही मुले अर्धा ते पाऊण तास चालत शाळेत येतात. त्यातून मुलांना अनेक व्याधी निर्माण होण्याची शक्‍यता आहे. दप्तराच्या वजनाबरोबरच मुलांच्या डोक्‍यावरील ताणही वाढत आहे. 

उघड्यावरचे खाद्य पदार्थ खाणे धोक्‍याचे

पिंपरी – शहरात पावसाळ्यामुळे काही भागात डबके साचले असून त्यामुळे आरोग्य धोक्‍यात आले आहे. तर दुसरीकडे रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी असलेल्या टपऱ्या व हॉटेलमध्ये उघड्यावर ठेवलेल्या खाद्य पदार्थामुळे आणि दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात येण्यासाठी निमंत्रण देण्यात आल्याचे चित्र शहरात दिसून येत असून उघड्‌यावरचे खाद्य पदार्थ खाणे टाळावे, असे आवाहन आरोग्य तज्ज्ञ करत आहेत.



प्लास्टिक पिशव्या द्या आणि रोपटे घ्या उपक्रम, तब्बल 152 किलो जमा

वाल्हेकरवाडी (पुणे) - प्लास्टिक बंदी वर शासनाच्या निर्णयात जरी बदल होण्याची शक्यता असली तरी प्लास्टिकच्या वापरामुळे होणारे दुष्परिणाम पहाता प्लास्टिक वापर टाळावा म्हणुन अश्याप्रकारचे जागरुकीकरण अभियान राबविण्यात येत आहे. गेला महिनाभर पिंपरी चिंचवडमध्ये अंघोळीची गोळी संस्था व सहगामी ग्रुप हयांच्या संयुक्त विद्यमाने सेलेस्टियल सिटी रावेत या ठिकाणी हा उपक्रम सकाळी 12 ते 2 या वेळेत संपन्न झाला. अश्याप्रकारचा हा चौथा उपक्रम घेण्यात आला. यामुळे प्लास्टिकचा वापर कसा टाळता येईल याबाबत जनजागृती घेण्यात येत आहे. 

पंकजा मुंढे यांच्या वाढदिवसानिमित्त काळभोरनगरमध्ये वृक्षारोपण

चौफेर न्यूज –  ग्रामविकास, महिला बालकल्याण मंत्री नामदार पंकजाताई गोपीनाथ मुंढे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड शहरात विविध कार्यक्रम घेण्यात आले. काळभोरनगर प्रभाग क्रमांक १४ या ठिकाणी वृक्षारोपण तसेच चिंचवडमधील तालेरा हॉस्पिटल येथे फळ वाटप असा दुहेरी कार्यक्रम घेण्यात आला.

ट्रान्सपोर्ट असोसिएशनची “गांधीगिरी’

पिंपरी – वाहतूकदार व्यावसायिकांच्या विविध मागण्यांकडे सरकारचे होत असलेले दुर्लक्ष तसेच सततच्या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ ऑल इंडिया ट्रान्सपोर्टर्स असोसिएशनने सलग सहाव्या दिवशी चक्‍काजाम आंदोलन केले. या बंदमध्ये सहभागी न झालेल्या वाहन चालकांना हात जोडून तसेच गुलाबाचे फुल देत “गांधीगिरी’ करण्यात आली.

आयकर विवरणपत्रासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

पुणे: या आर्थिक वर्षाचे आयकर विवरणपत्र दाखल करण्याच्या मुदतीत केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने ३१ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ दिली आहे. या मुदतीत विवरणपत्र दाखल न करणाऱ्या करदात्यांकडून दंड वसूल करण्यात येणार आहे. 

…आणि भोसरी पोलीसांवर आली शेळ्या संभाळण्याची वेळ

पिंपरी (Pclive7.com):- कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे. एका गुन्ह्यात चोरीस गेलेल्या ३२ शेळ्यांचा शोध भोसरी पोलिसांनी लावला आहे. मात्र न्यायालयाचा आदेश मिळेपर्यंत आता त्यांच्यावर शेळ्या संभाळण्याची वेळ आली आहे. 

पालिका शिक्षण विभागाची चौकशी करावी

नागरिकांच्या कररुपी निधीतून महापालिका करते कोट्यवधी रुपये खर्च

श्‍वेतपत्रिका काढावी : शिक्षण समिती सदस्य अश्‍विनी चिंचवडे यांची मागणी