Sunday 5 August 2018

PCMC drive hits encroachers, traders violating plastic ban

Navi Mumbai: After facing mounting criticism for its alleged .. 

Hinjewadi-Shivajinagar Metro: State to give 13.83 acres in Balewadi to top bidder as viability gap funding

The state government has decided to give 13.83 acres (5.60 hectare) of land in the heart of city, at Balewadi, as a land bank for developing the Hinjewadi to Shivajinagar Metro corridor on a public private partnership (PPP) basis.

सत्ताधार्‍यांचा रंगांचा नामफलक बदलला

भाजप नगरसेवकांच्या नावाच्या फलकावर बेकायदेशीरपणे झेंड्यांचे रंग असलेले फलक लावले होते. त्याबाबत मनसेच्या वतीने रूपेश पटेकर यांनी आयुक्‍तांना निवेदन देऊन हे फलक काढण्याची मागणी केली होती. त्यानुसार आयुक्‍तांनी नुकताच अध्यादेश काढून महापालिकेच्या पैशातून नामफलकाचा खर्च नको, अशा सूचना दिल्या आहेत. त्यानुसार सत्‍ताधार्‍यांचा रंगाचा नामफलक बदलला आहे. रूपेश पटेकर यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. या बाबत ‘पुढारी’मध्येही सविस्तर वृत्त देण्यात आले होते.

‘घरकुल’साठी नव्याने नंबर लागलेले हवालदिल

पंडित जवाहरलाल नेहरू पुनरुत्थान योजनेअंतर्गत (जेएनएनयुआरएम) चिखली येथे महापालिकेच्या वतीने घरकुल योजना उभी करण्यात आली आहे; परंतु प्रशासनाच्या दिरंगाईच्या धोरणामुळे अनेकांना नऊ वर्षांनी ‘लकी ड्रॉ’मध्ये घरे मंजूर झाली आहेत. ‘ड्रॉ’च्यावेळी भरलेले पैसे सोडून ‘स्वहिस्सा’पोटीच्या रकमेसाठी महापालिकेने नेमून दिलेल्या बँकेत सध्या कर्ज उपलब्ध होत नाही. संबंधित बँकांनी कर्ज देण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. त्यामुळे घराचे स्वप्न साकार होण्याचा आनंद औट घटकेचाच ठरतो की काय, अशी परिस्थिती घरकुल मंजूर झालेल्यांच्या पुढे निर्माण झाली आहे. 

पिंपरीत कार्यकर्त्यांच्या जल्लोषाची नागरिकांना शिक्षा; ११ दुचाकीस्वार पडले

पिंपरी- चिंचवड महापालिकेत शनिवारी महापौरपदासाठी निवडणूक झाली. यात भाजपाचे राहुल जाधव हे विजयी झाले. तर उपमहापौरपदाच्या निवडणुकीत सचिन चिंचवडे हे विजयी झाले.

Rahul Jadhav, former 6-seater rickshaw driver, becomes PCMC mayor

PIMPRI CHINCHWAD: Rahul Jadhav of the BJP, once a six-seater .. 

No school bag day: PCMC school students gear up for two days of less baggage, more fun

In a novel initiative, the Pimpri Chinchwad municipal corporation (PCMC) has decided to celebrate ‘no school bag day’ on the first and third Saturday of every month in civic-run primary schools.

PCMC lowers penalties for illegal hawkers

PIMPRI CHINCHWAD: The municipal body effectively halved the fines for the first-time offenders caught by its central  anti-encroachment cell

Pimpri Chinchwad top cop to initially work from auto cluster

PIMPRI CHINCHWAD: The new police commissionerate will start  .. 

Singapore Firm, KPMG Win Smart City Contract Near Pune


Singapore's Surbana Jurong, a major urban, industrial and infrastructure consulting firm, announced it will be providing project management and design services for India's Pimpri Chinchwad Smart City in Maharashtra.

शहराध्यक्ष, नाराज नगरसेवकांची दांडी

पिंपरी – महापालिकेच्या महापौरपदी आमदार महेश लांडगे गटाचे भाजप नगरसेवक राहुल जाधव तर उपमहापौरपदी शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप गटाचे सचिन चिंचवडे यांची निवड करण्यात आली. या दोन्ही पदांकरिता निवडणूक होत असताना महापौरपदाकरिता शत्रुघ्न काटे यांना डावलल्याने काटे, शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासह भाजपच्या अन्य दोन नगरसेवक या निवडीच्यावेळी अनुपस्थित राहिले. त्यामुळे भाजपातील हेवेदावे मात्र समोर आले आहेत.

12 आणि 18 टक्‍क्‍यांचा स्लॅब रद्द?

नवी दिल्ली – वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) यामध्ये केंद्र सरकार एकीकडे 28 टक्‍क्‍यांचा टॅक्‍स स्लॅब रद्द करण्याचा विचार करत आहे. तर दुसरीकडे 12 आणि 18 टक्‍क्‍यांचा टॅक्‍स स्लॅब रद्द करुन याचा एकच 14 टक्‍क्‍यांचा स्लॅब करण्याचा विचार करत आहे.

पोलीस आयुक्‍तालयासाठी तीन कोटींचे फर्निचर

पिंपरी – पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीच्या नुतनीकरणाबरोबरच फर्निचर खरेदीसाठीही महापालिकेने निविदा काढल्या असून त्यामध्ये 3 कोटींचे फर्निचर खरेदी केले जाणार आहे.
पालक मंत्री गिरीष बापट यांनी शुक्रवारी झालेल्या बैठकीत 15 ऑगस्टच्या आधीच पोलीस आयुक्तालय सुरु होईल असे सांगितले आहे. त्यानुसार आयुक्तालयाच्या कामाला वेग आला असून प्रेमलोक पार्क येथील इमारतीतील फेरबदल, रंगरंगोटी याबरोबरच फर्निचर खरेदीच्याही 3 कोटी 86 लाख 50 हजार 150 रुपयांची निविदा महापालिकेने काढली आहे. ही निविदा ऑनलाईन पद्धतीने 13 ऑगस्टपर्यंत भरायची आहे.

नदी संरक्षण समिती स्थापन करून नद्यांचे प्रदूषण रोखा, खासदार श्रीरंग बारणे यांची लोकसभेत मागणी

चौफेर न्यूज –  देशातील नद्यांचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी तसेच नद्यांचे संवर्धन करण्यासाठी ठोस उपाययोजना राबवावी अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी खाजगी विधेयकाद्वारे लोकसभेत केली. शहरातील सांडपाणी, रासायनिक द्रव्ये, कारखान्यातील सांडपाणी, पूजेचे निर्माल्य व इतर टाकाऊ वस्तू नदीमध्ये टाकल्याने नदीचे पाणी दुषित होते व याचा दुष्परिणाम नदी परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यावर होतो त्यामुळे नदीचे होणारे प्रदूषण रोखणे व नदीचे संवर्धन करणे अत्यंत गरजेचे आहे. या अनुशंघाने नदी संरक्षण समिती स्थापन करून

मोशी परिसरात दोन किलो प्लास्टीक कॅरीबॅग जप्त

चौफेर न्यूज –  – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क क्षेत्रिय कार्यालयाच्या वतीने प्लास्टीक व थर्माकॉल बाबत जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून, मोशी परिसरात झालेल्या मोहीमेत पाच हजार रूपये दंड वसूल करण्यात आला. तसेच, दोन किलो प्लास्टीक कॅरीबॅग जप्त करण्यात आल्या.

Pune: Work on Wakad to Balewadi bridge to resume after green signal

PUNE: The construction of a bridge on the Mula river between .. 

ऑटो क्लस्टर येथे आजपासून व्हिजन महाराष्ट्र प्रदर्शन

पिंपरी-चिंचवड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘व्हिजन इंडीया’ या प्रकल्पांतर्गत ‘व्हिजन महाराष्ट्र-पुणे’ या प्रदर्शनाचे आयोजन चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे करण्यात आले आहे. शनिवार ते रविवारपर्यंत असणारे हे प्रदर्शन सर्वांसाठी मोफत आहे. आयुश मंत्रालयाचे आयुर्वेदिक स्टॉल आणि खादी ग्रामोद्योग विभागाचे आकर्षक हस्तकला, हातमाग, खादी उत्पादने यांचे स्टॉल, अन्न औषध विभाग तसेच इंडियन कौन्सिल फॉर मेडीकल रिसर्च (आयसीएमआर), इस्त्रो – अंतराळ संशोधन व तंत्रज्ञान विभाग, संरक्षण आणि संशोधन विभाग, डीआरडीओ, खादी व ग्रामोद्योग विभाग, दिव्यांग विभाग, एनआरडीसी (राष्ट्रीय संसाधन संरक्षण परिषद), जागो ग्राहक जागो, सेल (स्टील थॉरिटी ऑफ इंडिया), एनआयएफ (नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशन), आयोग्य व आहार, स्किल डेव्हलपमेंट विभागांचे मार्गदर्शन करणारे स्टॉल असतील. प्रदर्शनास विद्यार्थी, युवक, लघुउद्योजक, उद्योजक, कामगार, शेतकरी, ग्रामीण भागातील विविध सहकारी संस्थांनी भेट द्यावी, असे आवाहन समन्वयक मनी वशिष्ठ यांनी केले आहे.

अनुदान रोखून लाभार्थ्यांवर होणार कारवाई

पिंपरी-चिंचवड : जनतेला पारदर्शक कारभाराची हमी देत पिंपरी-चिंचवड महापालिकेने थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रक्रियेवर भर दिला. त्यामुळे महापालिकेच्या कल्याणकारी योजनांचा लाभ लाभार्थींना वस्तू स्वरुपात नव्हे, तर रोखीने देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानूसार महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाने लाभार्थ्यांना सायकल व शिलाई मशीन थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) अतंर्गत देण्यात आला. परंतू, त्यात सुमारे शंभर जीएसटीच्या पावत्या बोगस आढळून आल्या आहेत. त्यामुळे त्या लाभार्थ्यांचे अनुदान रोखून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

‘राष्ट्रवादीने पाण्याचे राजकारण करू नये’

पिंपरी : महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस 15 वर्षे सत्तेत होती. मात्र, त्या काळात त्यांना आंद्रा व भामा-आसखेड धरणातून पाणी आणता आले नाही. तसेच, पवना बंद जलवाहिनी योजना पूर्ण करता आली नाही. त्यामुळे शहरात काही तांत्रिक कारणाने कमी दाबाने पाणी पुरवठा होत असताना राष्ट्रवादीने पाण्याचे राजकारण करु नये, असा टोला पक्षनेते एकनाथ पवार यांनी विरोधकांना लगावला आहे. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पाणीपुरवठा अधिकार्‍यांना कोंडले तसेच सत्ताधारी व प्रशासनावर आरोप केले. त्याला उत्तर देताना पवार बोलत होते. ते म्हणाले, राष्ट्रवादीने पाण्यावरून राजकारण करू नये. शहरासाठी अधिकचे पाणी घेण्यासाठी भाजप प्रयत्न करीत आहेत. त्या दृष्टीने यशस्वी पाठपुरावा सुरू आहे. पुढील आठवड्यात आंद्रा व भामा-आसखेड धरणातील पाणी साठ्याला परवानगी देण्याबाबत बैठक आहे. त्यात त्यावर अंतिम निर्णय होणार आहे.

पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी भाजपचे जाधव तर उपमहापौरपदी चिंचवडे यांची निवड

पुणे : पिंपरी-चिंचवडच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपचे राहुल जाधव यांची महापौरपदी तर भाजपचे सचिन चिंचवडे यांची उपमहापौरपदी निवड झाली. राहुल जाधव याना 80 मते मिळाली तर प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे विनोद नढे याना 33 मते मिळाली. सचिन चिंचवडे याना  79 मते तर प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या विनया  तापकीर याना 32 मते मिळाली. या निवडणुकीची चित्रमय झलक. 

पोलिस आयुक्तालयाचे कामकाज 15 ऑगस्टपूर्वी सुरू होणार; पालकमंत्री गिरीश बापट यांची माहिती

पिंपरी-चिंचवड शहर स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाचे कारभार 15 ऑगस्टपूर्वी चिंचवड येथील ऑटो क्‍लस्टर येथून सुरू केला जाणार आहे. पोलिस आयुक्तालयाची चिंचवड प्रेमलोक पार्कच्या नव्या इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केले जाणार आहे, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी (दि.3) झालेल्या बैठकीत दिली.

पिंपरीत विकास " थांबला "

भूमी जिंदगी विभागाचे कामकाज सुधारण्याची गरज

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या तळ मजल्यावरील भूमी जिंदगी विभाग अंतर्गत काय कामे केली जातात हे निवडून आल्यानंतर आज देखील आम्हाला कळालेले नाही. महानगरपालिकेने कित्येक स्थानिक भूमिपुत्रांच्या जमिनीवर आरक्षण टाकून विविध प्रयोजनासाठी जमिनी ताब्यात घेतलेल्या आहेत. त्या बहुतांश जमिनीवर महापालिकेने इमारती, व्यापारी गाळे, सभागृह, जलतरण तलाव, हॉकर्स झोन, शाळा, वाचनालये, स्पर्धा परीक्षा केंद्र, नाट्यगृह, पाण्याच्या टाक्या आदी उभारण्यात आले आहेत. परंतु सद्यस्थितीला या विभागाच्या ताब्यात विकसन करण्यात आलेल्या किती जागा आहेत याचा विचार करणे गरजेचे आहे. शहरामध्ये असंख्य बेरोजगार आहेत. हे व्यापारी गाळे व सभागृह भाडे तत्वावर किंवा लीजने दिल्यास तरुणांना रोजगार उपलब्ध होऊन महापालिकेच्या उत्पन्नात देखील वाढ होणार आहे. तरी याविभागाचे कामकाज सुधारण्याबाबत अधिकारी व कर्मचारी यांना त्वरित आदेश दिले जावेत. अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा नगरसेवक संदीप वाघिरे यांनी दिला आहे. याबाबत नगरसेवक वाघिरे यांनी निवेदनाद्वारा आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे मागणी केली आहे.