Tuesday 8 January 2013

तरुणाच्या खूनप्रकरणी सात जणांना जन्मठेप

तरुणाच्या खूनप्रकरणी सात जणांना जन्मठेप: पिंपरी चिंचवड परिसरातील दळवीनगर झोपडपट्टीत राहत असलेल्या एका पीठ गिरणी मालकाच्या मुलाचा तलवारी आणि दांडक्याने मारहाण करून खून केल्याप्रकरणी सोमवारी सात जणांना जन्मठेप आणि प्रत्येकी आठ हजार पाचशे रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. पी. उत्पात यांनी हा निकाल दिला.

विनयभंगातील आरोपीला महिलांकडून मारहाण

विनयभंगातील आरोपीला महिलांकडून मारहाण: पिंपरी। दि. ७ (प्रतिनिधी)

महिला व मुलींवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटनांबद्दलचा संताप सोमवारी पिंपरीत उफाळून आला. घरात घुसून नातीच्या वयाच्या मुलीचा विनयभंग करणार्‍या वृद्ध आरोपीला संतप्त महिलांनी चोप दिला.

मोरवाडी येथील न्यायालयात सोमवारी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास हा प्रकार घडला. आरोपीला न्यायालयात अक्षरश: पळवत नेण्याची तसेच मागच्या दाराने परत घेऊन जाण्याची वेळ पोलिसांवर आली. दरम्यान, या आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

घरात घुसून १५ वर्षाच्या मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार रविवारी सायंकाळी मोरवाडीत घडला होता. या प्रकाराबाबत वाच्यता केल्यास जिवे मारीन अशी धमकी देवून तो पळून जाण्याच्या तयारीत असताना मुलीने आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिकांनी त्याला पकडून बेदम चोप दिला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. पीडित मुलीच्या वडिलांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार देताच पोलिसांनी आरोपी हरभजनसिंग सुरनसिंग भामरा (६२, रा. वाघिरे एम्पायर, मोरवाडी, पिंपरी) याला रविवारी अटक केली होती.

पोलीस सोमवारी दुपारी दोन च्या दरम्यान भामरा याला न्यायालयात आणणार असल्याची कुणकुण काही राजकीय पक्षाच्या महिला पदाधिकार्‍यांना लागली होती. त्यामुळे शिवसेनेच्या सीमा सावळे, राष्ट्रवादीच्या सुरेखा लांडगे, भाजपच्या अपर्णा मणेरीकर, कॉँगेसच्या श्यामला सोनवणे, उत्तर भारतीय विकास परिषदेच्या बिंदू तिवारी, वैशाली मराठे, विमेन्स वेल्फेयर फाउंडेशनच्या अध्यक्षा अर्चना मिश्रा तसेच अन्य पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्या तसेच विविध पक्ष आणि संघटनांशी संबंधित महिलांनी न्यायालयाच्या आवारात गर्दी केली. भामरा याला चोप देण्यासाठी त्या काठय़ा घेऊन एकत्रित जमल्या. न्यायालय इमारतीच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर ठाण मांडून आरोपीवर कठोर कारवाई करा, पीडितीला न्याय द्या, अशा घोषणा दिल्या जात होत्या.

कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस निरीक्षक मोहन विधाते यांनी महिला कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. त्यामुळे अतिरिक्त बंदोबस्त मागविण्यात आला. भामरा याचे वकीलपत्र वकिलांनी स्वीकारू नये, असे निवेदन पिंपरी चिंचवड बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड. महेश नागरगोजे, उपाध्यक्ष दत्ता झुळूक यांना देण्यात आले. तब्बल पावणेचार तासांनी पोलिसांनी भामरा याला न्यायालयात आणले. तो मोटारीतून उतरताच त्याला धक्काबुक्की तसेच मारहाण करण्यात आली.

Pimpri: 62-yr-old held for molesting school girl, sent to judicial custody

Pimpri: 62-yr-old held for molesting school girl, sent to judicial custody - Indian Express:

Pimpri: 62-yr-old held for molesting school girl, sent to judicial custody
Indian Express
Police have arrested a 62-year-old man for allegedly molesting a 15-year-old school girl at her residence in Pimpri on Sunday. The suspect has been identified as Harbhajansingh Bhamra, a resident of Pimpri. Investigating officer S V Rakh said that ...
62-year-old arrested for molesting minorTimes of India

all 2 news articles »

महापालिका देणार प्रभागनिहाय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण

महापालिका देणार प्रभागनिहाय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

आणखी एका जकात 'एजंट' कर्मचा-याची गच्छंती !

आणखी एका जकात 'एजंट' कर्मचा-याची गच्छंती !
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

दोन सराईत गुन्हेगारांकडून दहा घरफोड्या उघडकीस

दोन सराईत गुन्हेगारांकडून दहा घरफोड्या उघडकीस
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणा-या आरोपीला महिलांकडून चोप

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणा-या आरोपीला महिलांकडून चोप
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

..अखेर शिक्षण मंडळाला मिळाले पूर्णवेळ प्रशासन अधिकारी

अखेर शिक्षण मंडळाला मिळाले पूर्णवेळ प्रशासन अधिकारी
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

जकात दर 'जैसे थे' ठेवण्याचा प्रस्ताव

जकात दर 'जैसे थे' ठेवण्याचा प्रस्ताव
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

बचत गटांनी लाटले 30 लाखांचे अनुदान

बचत गटांनी लाटले 30 लाखांचे अनुदान पिंपरी - शहरातील बेरोजगार महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून प्रत्येकी 30 लाख रुपयांचे अनुदान आणि बॅंक ऑफ बडोदाकडून 50 लाख रुपयांचे कर्ज घेऊन प्रत्यक्षात एकाही महिलेला रोजगार मिळवून न देणाऱ्या चारपैकी दोन बचत गट अखिल संघांना कर्ज थकविल्याप्रकरणी कर्जवसुली न्यायाधीकरणाने रविवारी (ता. 6) जाहीर नोटीस बजावली आहे. त्यामध्ये स्वाधार आणि राजमाता बचत गट अखिल संघांचा समावेश आहे. या दोन्ही बचत गटांच्या अध्यक्षांना 14 जानेवारी रोजी म्हणणे मांडण्यासाठी हजर राहण्याचे आदेश न्यायाधीकरणाने दिले आहेत. 

पालिकेतील चोरीची महापौरांना खबर नाही

पालिकेतील चोरीची महापौरांना खबर नाही पिंपरी - महापालिका मुख्यालयातील चोरीच्या प्रकरणाची शहरभर चर्चा असताना महापौर मोहिनी लांडे मात्र सायंकाळपर्यंत अनभिज्ञ होत्या. चोरीच्या घटनेबाबत पत्रकारांनी विचारले असताना, चोरीच्या घटनेची माहिती नसल्याचे महापौरांनी सांगितले. 
पिंपरी-चिंचवड महापालिकेने लाखो रुपये खर्चून बसविलेली सीसीटीव्ही यंत्रणा कुचकामी ठरली आहे. 

पालिकेतील चोरीची महापौरांना खबर नाही

पालिकेतील चोरीची महापौरांना खबर नाही पिंपरी - महापालिका मुख्यालयातील चोरीच्या प्रकरणाची शहरभर चर्चा असताना महापौर मोहिनी लांडे मात्र सायंकाळपर्यंत अनभिज्ञ होत्या. चोरीच्या घटनेबाबत पत्रकारांनी विचारले असताना, चोरीच्या घटनेची माहिती नसल्याचे महापौरांनी सांगितले. 
पिंपरी-चिंचवड महापालिकेने लाखो रुपये खर्चून बसविलेली सीसीटीव्ही यंत्रणा कुचकामी ठरली आहे. 

मेट्रोसाठी दिल्लीत बैठक

मेट्रोसाठी दिल्लीत बैठक: पुणे। दि. ६ (प्रतिनिधी)

पुणे मेट्रोचा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी केंद्रीय नगरविकासमंत्री कमलनाथ यांच्याबरोबर महापालिकेतील सर्वपक्षीय गटनेत्यांची १0 जानेवारीला दिल्लीत बैठक घेण्यात येईल, असे आश्‍वासन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आज दिले.

केंद्र शासन व राज्य शासनाकडे शहरातील विविध प्रकल्पांचे प्रस्ताव मान्यतेसाठी प्रलंबित आहेत. त्याविषयी शरद पवार यांच्याबरोबर महापौर वैशाली बनकर, उपमहापौर दीपक मानकर, स्थायी समिती अध्यक्ष बाबूराव चांदेरे, सभागृहनेते सुभाष जगताप, विरोधी पक्षनेते वसंत मोरे, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, भारतीय जनता पक्षाचे गटनेते अशोक येनपुरे, शिवसेना गटनेते अशोक हरणावळ, रिपब्लिकन पक्षाचे गटनेते डॉ. सिध्दार्थ धेंडे यांची बैठक झाली. त्यावेळी मेट्रो, नदीसुधार प्रकल्प, पाणी प्रक्रिया, शिवसृष्टी आदी विषयांवर तब्बल सव्वातास चर्चा झाली. अतिरिक्त नगर अभियंता श्रीनिवास बोनाला उपस्थित होते. कृषी महाविद्यालयाचा हरित पट्टा उठवून त्याठिकाणाहून मेट्रो मार्ग जाणार आहे का ? असा सवाल पवार यांनी उपस्थित केला. त्यावेळी महाविद्यालय परिसरातून भुयारी मार्गाद्वारे मेट्रो जाणार असल्याचे अधिका-यांनी सांगितले.

महापालिकेने कोथरुड येथे प्रस्तावित केलेल्या शिवसृष्टी प्रकल्पाला राज्य शासनाकडून अद्याप मान्यता मिळत नाही, अशी तक्रार दीपक मानकर यांनी केली. त्यावेळी राज्य शासनाकडे प्रलंबित प्रकल्पाविषयी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर चर्चा करून लवकरच बैठक घेण्यात येईल, असे आश्‍वासन पवार यांनी दिले.



लोंढय़ांचाही विचार करा!

शहर विकास आराखड्यातून पुन्हा अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) निर्माण होत असल्याने पुण्यात लोकसंख्येचा लोंढा वाढणार आहे, असा प्रश्न वसंत मोरे यांनी उपस्थित केला. शहरातील वाढती लोकसंख्या व खासगी वाहनांच्या वापराविषयी शरद पवार यांनीही चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, शहराचा विकास करताना वाढत्या लोकसंख्येचाही विचार करा !