Friday 15 June 2018

महात्मा फुले शाळेला महापालिकेकडून सील

पिंपरी (पुणे) : पिंपरी चिंचवडचे प्रस्तावित पोलीस आयुक्तालय चिंचवडच्या प्रेमलोक पार्क येथील महात्मा फुले शाळेत होणार आहे. यामुळे ही शाळा दळवीनगर येथील नवीन इमारतीमध्ये स्थलांतरित केली आहे. या स्थलांतराला पालकांचा विरोध असल्याने शाळेला शुक्रवारी महापालिकेकडून सील ठोकण्यात आले आहे.

दुतर्फा पार्किंगमुळे वाहतुकीस अडथळा

पिंपरी - आकुर्डी चौकातून दळवीनगरकडे येणाऱ्या मार्गावर दोन्ही बाजूला मोटारी, अवजड वाहने उभी असतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असतो.

प्लास्टिक विल्हेवाटीची मुदत २३ जूनला संपणार

प्लास्टिकची विल्हेवाट लावण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेली मुदत २३ जूनला संपणार आहे. त्यानंतर पालिकेतर्फे प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलण्यात येणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात प्लास्टिक उत्पादकांवर कारवाई केली जाणार असून, त्यानंतर त्याचा साठा आणि विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना आणि नागरिकांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

[Video] प्लास्टिक बंदी श्रावण हर्डीकर आयुक्त पीसीएमसी

प्लास्टिक बंदी वर पालिकेची उपाय योजना श्रावण हर्डीकर आयुक्त पीसीएमसी

शहर परीवर्तनासाठी सर्वेक्षणासाठी सहकार्य करा – आयुक्त हर्डीकर

शहर परीवर्तन करण्यासाठी महापालिका नियोजन करत आहे. त्याबाबत महापालिकेकडून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी येणा-या स्वयंसेवकांना सर्वेक्षणाची माहिती देवून नागरीकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पत्रकारपरिषदेत केले.

Skill development courses to start in Pimpri

PIMPRI CHINCHWAD: For skill development under the Skill India initiative of the Central government, the Pimpri Chinchwad Municipal Corporation is planning to have six training courses at the reserved land as a part of the revised development plan at Pimpri ITI school.

Waiting for a respite from traffic jams at Hinjewadi? You'll have to wait 6 more months

With the delay in the completion of the alternate road to Rajiv Gandhi Infotech Park through Mhalunge-Maan area, close to two lakh people are likely to face traffic congestion on the roads leading to Hinjewadi for six more months .

Traffic congestion at Shivaji chowk in Hinjewadi on Tuesday.

निगडी पोलीस ठाण्याला पाच सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन भेट

महिला आरोग्यासाठी सातत्याने आग्रही राहत रोटरी क्लब ऑफ निगडीतर्फे सातत्याने विविध उपक्रम राबविले जातात. क्लबतर्फे सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालय, निगडी पोलीस ठाण्याअंतर्गत येणा-या आकुर्डी, यमुनानगर आणि प्राधिकरण पोलीस चौकी आणि निगडी वाहतूक विभाग कार्यालयात प्रत्येकी एक असे एकूण पाच सॅनिटरी व्हेंडिंग मशीन आणि इन्सिनरेटर मशीन भेट देण्यात आले.

54 हजार रुग्णांना मिळणार हेल्थकार्ड

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात रुग्णांसाठी हेल्थकार्ड मॅनेजमेंट सिस्टिमद्वारे तब्बल 54 हजार हेल्थकार्ड पुरवठा करण्यासाठी 8 लाख 10 हजार रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. रुग्णांसाठी 18 ऑगस्टपर्यंत हेल्थकार्ड वाटप सुरू राहणार आहे.

54 हजार रुग्णांना मिळणार हेल्थकार्ड

Water crisis: No new housing projects in PCMC limits until further notice

“Though the monsoon has begun, we have to save water till we get enough rainfall for this year.There is an increasing tendency to invest in housing projects.Recently, the civic body has given many project permissions in Wakad.To save water we have taken this decision,”said Mamata Gaikwad, chairman, standing committee.

Building permission is to be denied in Pimple Saudagar,Pimple Gurav, Ravet, Punawale, Kiwale,Tathawade and Wakad, among other areas, all within PCMC . 

PCMC school students protest police HQ move

PIMPRI CHINCHWAD: Students from a PCMC-run school and their parents protested against the civic body’s decision to rent out the school premises for the new police commissionerate.

India for Book any 4 Online Accommodations near Pimpri Chinchwad, Pune

Pimpri Chinchwad popularly called as Navi Pune, is a part of Pune city in the state of Maharashtra. Pimpri Chinchwad region is well connected by Road, Rail and Air. This area is viable to stay; you can find a good number of hotels near Pimpri Chinchwad, Pune and book them online at redbusThis place consists of a State Transport Bus stand Pimpri Chinchwad Bus Stand at Vallabhnagar. Here, PMPML operates the public transport system. The Pune Railway stations in PCMC area are 

पुनरुत्थान समरसता गुरुकुलमला "अच्छे दिन'

पिंपरी (पुणे)- गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात एक लाखांचे वीजबिल न भरल्यामुळे चिंचवडगाव येथील चाफेकर स्मारक समितीच्या पुनरुत्थान समरसता गुरुकुलम या निवासी आश्रमशाळेचा वीज पुरवठा महावितरणने खंडित केला होता. ही संस्था अडचणीत सापडल्याची बातमी (23 सप्टेंबर2017) दै. सकाळमध्ये प्रसिद्ध झाली. या बातमीची दखल एका खासगी कंपनीने घेत 15 लाख रुपयांचा सौरउर्जेचा प्रकल्प या संस्थेला भेट दिला. दरमहा चाळीस हजारांची वीजबचत होत असल्याने आता गुरुकुलमला "अच्छे दिन' आले आहेत. 

पिंपळे गुरव येथील स्मशानभूमी, रस्त्यांची कामे लवकर करावीत

जुनी सांगवी (पुणे) : पिंपळे गुरव येथील वैकुंठभुमी स्मशान भुमीचे काम गेली चार पाच महिन्यांपासुन सुरू असल्याने पिंपळे गुरव व परिसरातील नागरीकांना अंत्यविधीसाठी ईतर ठिकाणी जावे लागत आहे. यामुळे नागरीकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्मशानभुमीचे काम लवकरात लवकर पुर्ण करावे, याचबरोबर पिंपळे गुरव अंतर्गत रस्त्यांची कामे सुरू असल्याने नागरीकांना रहदारीसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.

पाणी शुद्धीकरणासाठी 72 लाखांचा खर्च

पिंपरी – महापालिकेच्या सेक्‍टर 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शुद्धीकरण प्रक्रिया केली जाते. द्रवरूप आणि पावडर स्वरूपातील पॉली ऍल्युमिनिअम क्‍लोराईड दोन ठेकेदारांमार्फत पुरवून पाणी शुद्ध केले जाते. पावसाळ्यात पाण्याची गढुळता जास्त वाढण्याची शक्‍यता असल्याने आणखी 471 टन द्रवरूप आणि पावडर स्वरूपातील केमिकल्स घेण्यात येणार आहे. त्यासाठी 72 लाख रूपये खर्च होणार आहे. स्थायी समितीच्या साप्ताहिक सभेत या प्रस्तावास मान्यता देण्यात आली.

भोसरीतील १६ गायरानपैकी ४ जमिनींचे हस्तांतरण – आमदार लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश

चौफेर न्यूज –  भोसरी विधानसभा मतदार संघाअंतर्गत गायरान जमीन पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाकडे हस्तांतरण करण्याच्या प्रक्रियेला आता गती मिळाली आहे. एकूण १६ गायरानपैकी ४ जमिनींचे हस्तांतरण झाले असून, लवकरच अन्य जमिनींची हस्तांतरण प्रक्रिया मार्गी लागेल, असा विश्वास आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला.

अनधिकृत मोटार ड्रायव्हिंग स्कूलचा सुळसुळाट

पिंपरी चिंचवड शहरात अनधिकृत मोटार ड्रायव्हिंग स्कूलची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याच्या तक्रारीची परिवहन आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे. अनधिकृत ड्रायव्हिंग स्कूलबाबतच्या तक्रारीची सखोल चौकशी करून केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश सहायक परिवहन आयुक्त राजेंद्र शिंदे यांनी दिले आहेत.

दुबार होणार 'डीबार'

जिल्ह्यातील सुमारे चार लाख दुबार मतदार वगळले जाणार?

पुणे : पुणे शहरातील आठ, जिल्ह्यातील दहा आणि पिंपरी-चिंचवडमधील तीन अशा २१ विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदारयादीत नाव असतानाही पुणे जिल्ह्याबरोबरच राज्यामधील अन्य जिल्ह्यांतील मतदारसंघांमध्ये नावे असणाऱ्यांचा निवडणूक विभागाने पहिल्यांदाच शोध लावला आहे. अशी दुबार नावे असणारे तीन लाख ८८ हजार ९२३ मतदार आढळून आले आहेत. संबंधित दुबार मतदारांना एकाच ठिकाणी नाव ठेवण्यासाठी संधी दिली जाणार असून, त्यानंतरही त्यांनी नाव वगळण्याबाबतचे अर्ज न भरल्यास त्यांची नावे मतदारयादीतून वगळण्यात येणार आहेत. त्यामुळे पुण्यात राहत असताना, मतदानासाठी मूळ गावी जाणाऱ्यांना कायमची चाप बसणार आहे.

मोशीतील प्रदर्शन केंद्रात शौर्यस्मारकाचा प्रस्ताव

पिंपरी – मोशीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रात भोपाळप्रमाणे शौर्यस्मारक उभारण्याचा प्रस्ताव प्राधिकरण सभेत मांडला आहे. यावेळी पीएमपी, पोलीस चौकी, अग्निशामक दल यांना जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला.

274 गुणवंतांना महापालिकेचे बक्षीस

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सन 2017-18 या आर्थिक वर्षाकरिता दहावी आणि बारावीमध्ये 80 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक गुण संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्यासाठी महापालिकेकडे अर्जांचा पाऊस पडला. त्यामध्ये 575 विद्यार्थ्यांचे अर्ज अपात्र ठरले होते. मात्र, त्यापैकी 274 विद्यार्थ्यांनी कागदपत्रांची पूर्तता केल्याने त्यांना पुन्हा संधी देत बक्षिसाची रक्कम देण्यात येणार आहे. त्यासाठी 32 लाख 45 हजार रूपये खर्च होणार आहे.