Friday 31 January 2014

Big online support for Dr Shrikar Pardeshi

Pimpri: The online campaign against the possible transfer of Pimpri Chinchwad Municipal Commissioner&nbsp Dr Shrikar Pardeshi is gaining momentum.

Not responsible for delay in works: Pardeshi

Pimpri Chinchwad municipal commissioner Shrikar Pardeshi has refuted allegations made by corporators that the pace of development works in PCMC limits had slowed down during his tenure.

India: City secures $6 million cover for employees working in "dangerous ...

The Pimpri Chinchwad Municipal Corporation in Maharashtra, India, has purchased insurance worth 397 million Indian rupees ($6.3 million) for staff "who work in dangerous conditions," including those from the anti-encroachment department, The Times of ...

आयुक्तांच्या बदलीविरोधात विद्यार्थ्यांची स्वाक्षरी मोहीम

विविध महाविद्यालयातून विद्यार्थ्यांची स्वाक्षरी मोहीम
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रीकर परदेशी यांच्या संभाव्य बदलीच्या विरोधात अनेक सामाजिक संस्था, राजकीय पक्षांनी विविध मार्गाने आपला निषेध व्यक्त केला आहे. आज, गुरुवारी पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी एकत्र येत स्वाक्षरी

जर्मनी, कॅनडा अमेरिकेतूनही पाठिंबा

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांची बदली होऊ नये यासाठी www.change.org या वेबसाइटवर सह्यांची मोहीम राबविण्यात येत आहे. त्याला केवळ भारतातूनच नव्हे तर जर्मनी, कॅनडा अमेरिका अशा जगाच्या कानाकोपऱ्यातूनही प्रतिसाद मिळत असून, तीन दिवसांत सुमारे एक हजारांहून अधिक जणांनी सही करून पाठिंबा व्यक्त केला आहे. 

वायसीएम परिचारिकांचा काळ्या फिती लावून निषेध

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या संभाव्य बदलीला शहरातील विविध स्तरांतून जोरदार विरोध सुरू आहे. आतापर्यंत महापालिका प्रशासनातील कोणी पुढे आले नव्हते. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वायसीएम) परिचारिकांनी हे धाडस दाखविले. कामावर असताना काळ्या फिती लावून संभाव्य बदलीचा त्यांनी निषेध नोंदविला, तसेच आयुक्तांच्या प्रशासकीय सुधारणांमुळे आम्हाला सुरक्षितरीत्या काम करता येते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. 350 कंत्राटी घंटागाडी कर्मचऱ्यांनीसुद्धा आयुक्तांना पाठिंबा दिला आहे. 

पिंपरी -चिंचवड फोटोग्राफर ...

पिंपरी-चिंचवड फोटोग्राफर असोसिएशनतर्फे काढण्यात आलेल्या 2014 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन पिंपरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकिशोर भोसले पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. 

भोसरी येथे रविवारी 'पाऊसखुणा'

पिंपरी-चिंचवड मधील पर्यटकांच्या पसंतीस उतरलेल्या स्पास टुर्स कंपनीच्या वतीने भोसरी येथे रविवारी (दि.02) 'पाऊसखुणा' हा गीत व गायनाचा  कार्यक्रम आयोजित केला आहे अशी माहिती संयोजक सुरेंद्र कुलकर्णी यांनी दिली. 
alt

रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी

पिंपरी-चिंचवड शहरातील मुख्य रस्त्यावरील अपघातास कारणीभूत ठरणारे खड्डे त्वरित बुजवावेत अशी मागणी जनकल्याण प्रतिष्ठानतर्फे महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्याकडे करण्यात आली आहे. 

सांगवीत पवनाथडी जत्रेला सुरुवात

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पवनाथडी जत्रेचे उद्‌घाटन महापौर मोहिनी लांडे यांच्या हस्ते आज (गुरुवारी) करण्यात आले. कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या शुभांगी वानखेडे यांना महापालिकेचा 'सावित्रीबाई फुले पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले.

पिंपरी महापालिकेच्या सहायक आयुक्तपदी सुनील थोरवे यांची नियुक्ती

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहायक आयुक्तपदी खेडचे प्रांतअधिकारी सुनील थोरवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते आज (गुरुवारी) महापालिकेत रुजू झाले.
मूळचे जुन्नर तालुक्यातील शिरोली येथील असलेले सुनील थोरवे

महापौर चषक राज्यस्तरीय फुटबॉल ...

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने तसेच पुणे जिल्हा फुटबॉल असोसिएशन व वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन यांचे मान्यतेने 1 ते 9 फेब्रुवारी या कालावधीत महापौर चषक राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

पुण्याला लाभणार निसर्ग मानचिन्हे! - देशातील पहिलाच अभिनव उपक्रम

प्रतीकात्मक निसर्ग मानचिन्हे एखाद्या प्रदेशाच्या नैसर्गिक तसेच जैविक साधन संपत्तीचे प्रतिनिधित्व करतात. पुणे जिल्ह्य़ाची निसर्ग मानचिन्हे ठरविण्यात येणार आहेत; तीसुद्धा लोकशाही पद्धतीने जनमताद्वारे!

भोसरीत रुग्णांचे हाल

नितीन शिंदे - भोसरी
महापालिकेच्या येथील रुग्णालयात नियोजनाच्या अभावामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. अतिशय अपुरी जागा, अस्वच्छतेमुळे रुग्णांच्या आरोग्यालाच धोका पोहोचत असून, चिमुरड्यांना घेऊन आलेल्या महिलांना भर उन्हात रस्त्यावर रांगेत थांबावे लागत आहे. डॉक्टर, कर्मचारी वर्ग पुरेसा असला, तरी येथील विविध विभागांत अनेक गैरसोई व कमतरता आहेत. त्यामुळे या रुग्णालयाचा इलाज तातडीने करण्याची मागणी होत आहे. 

अधिकार्‍यांचे कानावर हात

पिंपरी : निराधारनगरातील दारूअड्डय़ावर घडलेल्या दुर्घटनेतील वस्तुस्थिती ‘लोकमत’ने गुरूवारी चव्हाट्यावर आणताच राज्य उत्पादनशुल्क विभागाच्या कार्यालयात खळबळ उडाली. कर्मचार्‍यापासून वरिष्ठ अधिकार्‍यांपर्यंत सारेचजण हे प्रकरण एकमेकावर ढकलण्याचा प्रयत्न करू लागले आहेत.

छांदिष्ट शांतिदुतांच्या प्रेमात

मंगेश पांडे - पिंपरी
पिंपरी : प्रत्येकाला कोणता ना कोणता छंद असतो. ते आपआपल्या परीने छंद जोपासतात. नागरीकरण वाढत असताना राहण्यास जागा अपुरी पडत आहे. अशा परिस्थितीत शहरात कबुतरे पाळण्याचा छंद अनेकांनी जोपासला आहे. झपाट्याने विकसित होणार्‍या शहरात इमारतींचे उंच इमले उभारले जात असताना कबुतरांच्या ढाबळ अनेक ठिकाणी दृष्टिपथास येतात. कबुतरांच्या खरेदी-विक्रीतही मोठी आर्थिक उलाढाल होत आहे. 

महापालिका कर्मचाऱ्यांची अनधिकृत बांधकामे पाडली

पिंपरी- महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी केलेल्या अनधिकृत बांधकामांवर गुरुवारी (ता.