Wednesday 18 December 2013

पिंपरीतील योजनांचे दिल्लीत सादरीकरण

पिंपरी - पिंपरी-चिंचवडमधील अडीचशे कोटी रुपये खर्चाच्या तीन प्रकल्पांचे सादरीकरण महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी मंगळवारी (ता. 17) दिल्लीतील शहर विकास मंत्रालयात केले. यासंदर्भात केंद्राकडून पंधरवड्यात सकारात्मक प्रतिसाद मिळण्याचा आशावाद डॉ. परदेशी यांनी रात्री दिल्लीहून परतल्यानंतर "सकाळ'शी बोलताना व्यक्त केला. केंद्र सरकारच्या "जेएनएनयूआरएम' अंतर्गत विकासकामांना निधी मिळणार आहे. त्यामुळे त्यांचे सादरीकरण केंद्रीय शहर विकास सचिव सुधीर कृष्णा यांच्यापुढे आयुक्तांनी केले. कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत व मकरंद निकम (पाणीपुरवठा व जलनिस्सारण) उपस्थित होते. शहराच्या 40 टक्के भागाला 24 तास पाणीपुरवठा करण्यासह महापालिकेत नव्याने समावेश झालेल्या ताथवडेच्या पाणीपुरवठा व मलनिस्सारण योजनेचे सादरीकरण केल्याचे आयुक्तांनी सांगितले.

Civic bodies to allot 5% in budgets for PMPML

The state government will issue directives to the Pune and Pimpri Chinchwad municipal corporations to allocate 5% of their annual budget for the Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited, the city bus transport company for augmenting its services.

YCMH to implement health scheme

Pimpri: Standing Committee of the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has approved implementation of the Central government’s Rajiv Gandhi Jivandayi Arogya Scheme in the civic-run Yashvantrao Chavan Memorial Hospital (YCMH).

Ill-kept Sant Dnyaneshwar Garden in Pradhikaran irks residents

PIMPRI: Local residents are irked by the lack of maintenance of the Sant Dnyaneshwar Garden (also known as Nakshatra Watika) in the Pradhikaran area.

Incidents of rape, molestation double in Pimpri, Chinchwad

PIMPRI: In the past one year, cases of rapes and molestations in Pimpri-Chinchwad have doubled.

स्वीडनमधील आंदोलन करणारे ‘अल्फा लावल’चे कामगार नाहीत - कंपनीच्या व्यवस्थापनाचा दावा

‘दापोडी येथील अल्फा लावल कंपनीच्या कामगारांच्या समर्थनार्थ स्वीडन येथे करण्यात आलेल्या निदर्शनात ‘अल्फा’च्या तेथील कामगारांचा समावेश नाही, असे अल्फा लावलच्या व्यवस्थापनाकडून स्पष्ट करण्यात आले.

११ महिन्यांत ४८ बलात्कार

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढतच आहे. परिमंडळ तीनच्या हद्दीतील ८ पोलीस ठाण्यात जानेवारी ते नोव्हेंबर २0१३ दरम्यान तब्बल ४८ बलात्काराच्या घटना घडल्या. हे प्रमाण पाहता आठवड्याला एक बलात्काराची घटना होत आहे. 

ज्येष्ठांचे अनुभव मार्गदर्शक

पिंपरी : नवृत्त वेतनधारकांनी आपला उमेदीचा काळ शासकीय, निमशासकीय सेवेत घालवलेला असतो. त्यांनी अनुभवाचा 
फायदा नवीन पिढीला करून द्यावा. अनुभवाचे मार्गदर्शनात रुपांतर केल्यास ते समाजासाठी उपयुक्त ठरेल, असे मत महापौर मोहिनी लांडे यांनी व्यक्त केले.

नागरिकांनी मांडल्या समस्या

नेहरूनगर : पिंपरी पोलीस आणि पिंपरी पोलीस दक्षता कमिटी यांच्या वतीने वास्तुउद्योग येथे महिला व नागरिक समस्या या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. या वेळी नागरिकांनी उपस्थित पोलीस पिंपरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन विधाते यांना प्रश्न विचारले. 

घरफोडीच्या घटना वाढल्या

पिंपरी : चिंचवडमधील टपाल कार्यालयासह विविध ठिकाणी घडलेल्या चार घरफोडींच्या घटनेत चोरट्यांनी सुमारे ७ लाखांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी भोसरी, हिंजवडी, पिंपरी आणि चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
चिंचवडमधील चापेकर चौकात असलेल्या टपाल कार्यालयाचा कडी कोयंडा उचकटून चोरट्यांनी २0 हजार ६७८ रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना शनिवारी रात्री साडेआठ ते रविवारी दुपारी एकच्या दरम्यान घडली. याप्रकरणी शंकर मुकिंदा मडेल (वय ५८, रा. नवी सांगवी) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

मतिमंद संगोपनासाठी मिळणार अर्थसाह्य

पिंपरी : महानगरपालिका हद्दीतील ५ वर्षांपुढील मतिमंदांचा सांभाळ करणारे पालक व संस्थांना महापालिकेतर्फे अर्थसहाय देण्याची योजना राबविण्यात येत आहे. सन २0१२-२0१३ या वर्षासाठी पात्र झालेल्या ७३२ लाभार्थींना एप्रिल ते सप्टेंबर २0१३ व ऑक्टोबर २0१३ ते मार्च २0१४ या कालावधीकरिता दरमहा एक हजार रुपयाप्रमाणे अर्थसहाय देण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे ८७ लाख ८४ हजार रुपये खर्चास स्थायी समिती सभेने मान्यता दिली. त्याचबरोबर सुमारे ७ कोटी ७२ लाख रुपये खर्चाच्या विविध विकासकामांनाही मंजुरी देण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी नवनाथ जगताप होते.

महिला सक्षमीकरण योजनेत घोटाळा

पिंपरी - महिला सक्षमीकरणाचा मुद्दा मंगळवारच्या (ता. 17) स्थायी समितीच्या बैठकीत गाजला. पालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाने गेल्या सात वर्षांत महिलांच्या सक्षमीकरणासाठी, त्यांच्या प्रशिक्षणासाठी 51 कोटी रुपये खर्चून एकही महिला स्वावलंबी झाली नाही; तसेच या योजनेत मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप आशा शेंडगे यांनी केला. त्यासंदर्भात मागितलेली माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या प्रशासनाचा त्यांनी काही काळ जमिनीवर बसून निषेध केला. 

पाचशेचार लाभार्थ्यांच्या सदनिका निश्‍चित

पिंपरी -&nbsp पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्वस्त घरकुल योजनेतील 504 लाभार्थ्यांच्या सदनिका संगणकीय सोडतीद्वारे मंगळवारी (ता.

हिंजवडी टप्पा तीनसाठी जमीन सक्तीने घेणार

पुणे -&nbsp हिंजवडी टप्पा तीनसाठी माण आणि भोईरवाडी येथील जमिनीचे भूसंपादन करण्यास शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे.

औद्योगिक प्रदर्शन केंद्राचा 'मास्टर प्लॅन' अंतिम करा



पिंपरी -&nbsp पुणे आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्राच्या बृहत्‌ आराखड्याबाबत (मास्टर प्लॅन) सुचविलेल्या विविध सूचनांचा समावेश करून त्याला अंतिम स्वरूप द्या, असे विभागीय आयुक्त तथा नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी मंगळवारी (ता.