Friday 16 May 2014

प्रभागस्तरीय कामांचा आढावा घेण्यासाठी आयुक्तांच्या बैठका

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे शिथिलता आलेल्या महापालिकेच्या कामकाजाला गती देण्यासाठी आयुक्त राजीव जाधव हे 17 व 19 मे रोजी प्रभागस्तरीय बैठक घेणार आहेत.
लोकसभा निवडणुकीचा उद्या (शुक्रवारी) निकाल जाहीर होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे गेली दीड महिने विकास कामांचा खोळंबा झाला आहे. त्यातच पावसाळा तोंडावर आला आहे. विधानसभेची निवडणुकही तोंडावर आली आहे. त्यासाठीही दीड-दोन महिन्यांचा कालावधी आचारसंहितेमध्ये खर्ची होणार आहे.
या पार्श्वभूमीवर प्रभागस्तरावरील तातडीच्या कामांचा आढावा घेण्यासाठी आयुक्त जाधव हे लोकप्रतिनिधींच्या समवेत प्रभागस्तरीय बैठका घेणार आहेत. पावसाळा पूर्व कामांचा आढावाही त्यात घेण्यात येईल. दि. 17 मे रोजी 'अ', 'ब' आणि 'क' तर दि. 19 मे रोजी 'ड', 'इ', 'ई' या प्रभागांमध्ये बैठका होतील. तीन तासाची एक बैठक याप्रमाणे आयुक्त एका दिवशी तिन प्रभागांच्या सलग बैठका घेणार आहेत.

काळेवाडीतील दोन अवैध बांधकामे भुईसपाट

लोकसभा निवडणुकीच्या निकालाची धामधूम सुरु असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेने काळेवाडीतील दोन अनधिकृत बांधकामांवर आज (गुरुवारी) हातोडा टाकला. त्यामुळे भुईसपाट झालेल्या बेकायदा बांधकामांची संख्या 600 पर्यंत पोहोचली आहे.

चिंचवडच्या उड्डाणपुलाचा प्रश्न अजितदादांच्या दरबारात; मंत्रालयात बैठक - आयुक्तांचा कंपनीला इशारा

चिंचवडच्या ‘एम्पायर इस्टेट’ वसाहतीतील रहिवाशांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर हा तिढा सोडवण्यासाठी वेगवान हालचाली सुरू आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे.

20 मिनिटांची एक फेरी अन् धाकधूक !

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी आणि निकालास आता केवळ काही तासांचा अवधी शिल्लक राहिल्याने उमेदवार, कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. मतमोजणीची पहिली फेरी सकाळी नऊ पर्यंत पूर्ण होणार असून एका फेरीला 20 मिनिटांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे मिनिटा-मिनिटाला उमेदवारांची धाकधूक वाढणार आहे.

- पुणे, पिंपरी-चिंचवडला नवा खासदार मिळणार



लोकसभेमध्ये पुण्याचे प्रतिनिधित्व करणारा कारभारी कोण असेल, याचे उत्तर शुक्रवारी (१६ मे) दुपापर्यंत मिळणार आहे; जो निवडून येईल तो नवा खासदार असेल हे मात्र नक्की.