Tuesday 28 August 2018

[Video] #NigdiDapodiBRT प्रचंड गोंधळ, पळापळ अन 3 तास बसची वाट



Live Condition today 11:45am @ Pradhikaran Corner (Nigdi) BRT bus stop. Total Chaos!! लोकांचा प्रचंड गोंधळ उडाला आहे. 2 ते 3 तास त्यांना बससाठी थांबावे लागत आहे

PMPML Bus breakdown in BRTS lane, A traffic chaos called Khilare Patil street

A Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML) bus broke down in the bus rapid transit system (BRTS) route in Pimpri-Chinchwad area on Monday evening which led to traffic congestion. As a result, as many as six to seven buses were stranded on the route.
pune,brts,bus

बस बंद पडली अन्‌...

पिंपरी - पीएमपीची बस चौकातच बीआरटी मार्गात बंद पडल्याने, त्या मार्गात पीएमपीच्या सात-आठ गाड्या पाठोपाठ रांगेत अडकल्या. बीआरटी मार्गात असलेली अन्य वाहनेही अडकून पडली. निगडी-दापोडी बीआरटी मार्गावर मोरवाडी येथे अहिल्यादेवी होळकर चौकात सोमवारी दुपारी चार वाजून २५ मिनिटांनी ही घटना घडली. 

Day 4: BRTS troubles continue, PCMC sets up panel to put service on track

After three days of chaos on the newly launched Nigdi-Dapodi BRTS route, the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) and traffic police on Monday finally joined hands to ensure smooth running of the service. A four-member committee has been formed to monitor the operations.
Day 4: BRTS troubles continue, PCMC sets up panel to put service on track

बीआरटी मार्गात पीएमपीएमएल पडली बंद

दोन दिवसांपूर्वी दापोडी ते निगडी या चौदा किलोमीटर बीआरटी मार्गाचे उदघाटन महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते झाले होते. खरं तर बीआरटी मार्गात बस बंद पडने हे पिंपरी-चिंचवड करांसाठी नित्याचाच आहे, आज असाच काही प्रकार पाहायला मिळाला. यामुळे पाच ते सहा बस अडकल्या होत्या.

[Video] BRT बस बंद पडल्याने 6 बस BRT त अडकल्या


Day 3: BRTS services hobbled as traffic wardens go missing, buses skip route

For the third consecutive day on Sunday, the Bus Rapid Transit System (BRTS) route between Nigdi and Dapodi, on the 13-km Pune-Mumbai highway stretch, continued to be a nightmare for commuters. While traffic wardens went missing, traffic policemen didn’t cooperate with the Pimpri-Chinchwad Municipal Corporation to ensure that the service ran seamlessly. To add to the chaos, some PMPML drivers skipped the BRTS route.

[Video] मेट्रो च्या कामामुळे कासारवाडी येथे झालेला अपघात


ग्रेडसेपरेटर बनले दुर्गंधीचे आगार

पिंपरी ते आकुर्डी या मार्गावर पालिकेतर्फे उभारण्यात आलेले ग्रेडसेपरेटर दुर्गंधीचे आगार बनले आहेत. ग्रेडसेपरेटरच्या बाजूने करण्यात आलेल्या सुशोभीकरणाच्या भिंतीच्या ठिकाणी पाणी साचून राहिल्याने डास; तसेच दुर्गंधी पसरत आहे. काही ठिकाणी भिंतींवर शेवाळे साचले आहे. गटारींच्या बाजूने चिखल झाला असून, वाहने घसरण्याच्या घटना घडत आहेत. पिंपरीत ग्रेडसेपरेटरच्या छतातून पाणी झिरपत आहे. आकुर्डीत भिंतीवरील फरशा निघाल्या आहेत. पालिकेच्या आरोग्य विभागाने तेथे स्वच्छता करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. ग्रेडसेपरेटरची ही दुर्दशा टिपली आहे ‘सकाळ’चे छायाचित्रकार अरुण गायकवाड यांनी.

नाशिक रस्त्यालगतची अतिक्रमणे हटविणार

चाकण - पुणे-नाशिक महामार्गावर चाकण येथे वाहतूक कोंडीचा प्रश्न जटिल बनला आहे. हा प्रश्‍न सोडविण्याच्या दृष्टीने आमदार सुरेश गोरे यांनी आज पोलिस अधिकारी, रस्ते कंपनीचे अधिकारी यांच्यासह पाहणी केली. गोरे यांनी रस्ते कंपनीचे अधिकारी, नाणेकरवाडीचे सरपंच व इतरांना सूचना केल्या. महामार्ग आणि सेवा रस्त्यालगतची अतिक्रमणे हटविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

“देर आये पर दुरुस्त आये”, रिंग झालेल्या ३६० निविदा रद्द केल्याबद्दल आयुक्तांचे अभिनंदन – मारूती भापकर

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे लुट-मार करणाऱ्या नेत्यांचे बगलबच्चे, ठेकेदार, अधिकारी, नगरसेवक यांच्या संगनमताने ‘रिंग’करून ३६० हून अधिक निविदा तब्बल ५४ कोटीची कामे रद्द करण्याचा निर्णय आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतला. त्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे ‘देर आये दुरूस्त आये’ असं म्हणत सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर स्वागत केले आहे.

PCMC to seize properties if owners fail to clear arrears

The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will seize ..

रस्ता बाधितांची महापौरांसमवेत महापालिकेत बैठक

देहुगाव येथील मुख्य कमान ते तळवडे हा देहु-आळंदी मार्गावरील तीन किमी. रस्ता अनेक वर्षे रखडलेला आहे. त्या संदर्भात महापौर राहूल जाधव यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत बाधित शेतकरी व सार्वजनिक बांधकाम विभागाने भुसंपदनाची कार्यवाही पूर्ण करून रस्ता महापालिकेला द्यावा, असे महापालिकेने सूचविले आहे. त्यानंतर महापालिका तो चांगल्याप्रकारे विकसित करून देईल, अशी ग्वाही महापौर जाधव यांनी दिली.

“स्पाईन रस्ता’ बाधितांसाठी “श्रावण गिफ्ट’

78 नागरिकांना भूखंड मिळाला : 128 मिळकतधारक न्यायाच्या प्रतीक्षेत
पिंपरी – स्पाईन रस्त्यामुळे बाधित झालेल्या 78 नागरिकांना पहिल्या टप्प्यात भूखंड मिळाला आहे. त्यांना प्राधिकरणाने मंजूर केलेल्या पेठ क्रमांक 11 मध्ये 1 हजार 250 चौरस फुट भूखंडाचे वाटप करण्यात आले. त्यामुळे स्पाईन रस्ता बाधितांना महापालिका प्रशासनाकडून अनोखे “श्रावण गिफ्ट’ मिळाले.

“तो’ रस्ता नऊ मीटरचाच करा

नगरसेविका माया बारणे यांचे पालिका आयुक्‍तांना साकडे
वाकड – थेरगाव सर्वे नंबर 29 मधील मुख्य रस्त्यापासून आतील गृह प्रकल्पांकडे जाणारा रस्ता बारा मीटरचा करण्यास मूळ जमीन मालकांनी कडाडून विरोध दर्शवल्याने हा रस्ता नेमका किती रुंद होणार? असा प्रश्न या ठिकाणच्या सोसायट्यामध्ये वास्तव्यास आलेल्या शेकडो नागरिकांसमोर पडला आहे. दरम्यान स्थानिक नगरसेविका माया संतोष बारणे यांनी पालिका आयुक्‍त यांच्याकडे हा रस्ता नऊ मीटरचाच करावा, अशी मागणी केली आहे.

आंद्रा- भामा आसखेड पाणीसाठ्यास पुढील महिन्यात मान्यता; आयुक्त श्रावण हर्डीकर यांची माहिती

पिंपरी-चिंचवड शहरासाठी आंद्रा धरणातून 38 दशलक्ष घनमीटर लिटर (एमएलडी) आणि भामा-आसखेड धरणातून 60 एमएलडी असे एकूण 98 एमएलडी पाणी साठा आरक्षणाबाबतचा फेरप्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला आहे. तो प्रस्ताव मंत्रीगटाच्या समितीसमोर 10 दिवसांमध्ये ठेवण्यात येईल. सप्टेंबरअखेर या फेरप्रस्तावाला मान्यता मिळेल, असे विश्‍वास पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केला. मान्यता मिळाल्यानंतर सदर कामास तीन टप्प्यामध्ये तातडीने सुरूवात केली जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

खासदार बारणे-आमदार जगताप यांच्यात शाब्दिक युद्ध

‘आम्ही सगळे भाऊ सारे मिळुन खाऊ’ असा कारभार सध्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत सुरु आहे. सत्तेसाठी पक्षाचे झेंडे बदलणा-या जगतापांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे. स्वत: किती पक्ष बदलले हे कदाचीत त्यांना आठवतही नसेल. समाजवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, मनसेचा सहारा असा प्रवास करीत भाजपावाशी झालेल्या जगतापांनी दुस-या विषयी बोलणे हा मोठा ‘जोक’ आहे. पालिकेतील अनागोंधी कारभार, भ्रष्टाचार, रस्त्यांवरील अतिक्रमणे यावर गेल्या वर्षभरात जगतापांनी एकदाही तोंड उघडले नाही. अतिक्रमण आणि खाबूगिरीवर आम्ही केलेली टीका आमदार जगतापांना चांगलीच झोंबली. माझ्या प्रश्नांना उत्तरे द्यायची सोडून वैयक्तीक टीका केली आहे. तसेच महापालिका कोणाची जहागिरी नाही. तसेच थेरगावांविषयी कायमच आकस बाळगणा-यांना तेथील विकास दिसत नाही असेही ते म्हणाले.

सार्वजनिक सायकल सुविधा : पब्लिक बायसिकल शेअरींग’ प्रत्येक अर्ध्या तासाला 5 रूपये भाडे

पिंपरी-चिंचवड शहराची स्मार्ट सिटी अभियानात समावेश होऊन पावणे दोन वर्षे उलटल्यानंतर ‘पब्लिक बायसिकल शेअरींग’ हा पहिला उपक्रम सुरू करण्यात आला. या योजनेत स्मार्ट सिटी लिमिटेडचा एका पैशांचीही गुंतवणूक नाही. नवी मुंबई महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने पिंपरी-चिंचवड शहराचा त्या अभियानात तिसर्‍या टप्प्यात समावेश केला गेला.

दापोडीत तुटलेले उघडे चेंबर, बंद पथदिवे रहदारीस धोकादायक

जुनी सांगवी - दापोडी येथील गणेशनगर भागातील रेल्वेसिमाभिंतीजवळील रस्त्यावरील ड्रेनेज लाईनचे चेंबर झाकणाविना उघडे आहेत. तर काही चेंबरची झाकणे तुटल्याने हा रस्ता रहदारीसाठी नागरीकांना धोकादायक ठरत आहे. यातच येथील काही ठिकाणचे पथदिवे बंद असल्याने रात्री नागरीकांना अंधाराबरोबरच येथील उघड्या चेंबरचा सामना करत धोकादायकरित्या मार्गक्रमण करावे लागत आहे.

1 सप्टेंबरपासून होणार मोफत उद्योजकता शिबिर

निगडी:स्मार्ट सिटी स्मार्ट स्टार्टअप अंतर्गत पिंपरी-चिंचवडमधील नवोदित उद्योजकांना नवीन उद्योगांबाबत माहिती देण्यासाठी हे शिबिर राबविण्यात येत आहे. शंभर दिवसांच्या मोफत शिबिराचा जास्तीत जास्त तरुणांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते व भाजपा कार्यकारिणी सदस्य अमित गणपत गोरखे व अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे यांनी केले आहे.

महिलांच्या तक्रारींकडे दुर्लक्षच

पिंपरी - महाविद्यालया बाहेर, रस्त्यावर अनेकदा महिलांची छेडछाड होते. त्यातूनही एखादीने तक्रार देण्याचे धाडस दाखविले तर पोलिसांकडून तक्रारदार आणि तिच्या कुटुंबीयांसमोर भविष्यातील न्यायालयाच्या कार्यवाहीबाबत भीतीचा बागुलबुवा उभा केला जातो. तक्रार घेऊन रोडरोमिओंच्या मुसक्‍या आवळण्याऐवजी आरोपींकडून ‘तोडपाणी’ केली जाते. दोन पोलिस उपायुक्‍त महिला शहराची कायदा आणि सुव्यवस्था पाहात असतानाच पोलिसांकडून महिलांविषयी अनास्था दिसून येत आहे. 

वल्लभनगर आगाराची सुरक्षितता ऐरणीवर

पिंपरी – एस. टी. महामंडळाच्या वल्लभनगर येथील आगारात शनिवारी (दि. 25) एका मद्यपी प्रवाशाने वाहतूक नियंत्रकास शिविगाळ करुन धक्काबुक्की केली. यानंतर त्याने आगारात गोंधळ घातला. पोलिसांना हा प्रकार कळवूनही एकही पोलीस कर्मचारी याठिकाणी नाही. त्यामुळे आगाराच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

शिवलीलामृत ग्रंथ पारायण सोहळ्याचे उद्‌घाटन

पिंपळे-गुरव – पिंपळे-सौदागर येथे महादेव मंदिरात शिवशंभो सेवा मंडळाने दरवर्षीप्रमाणे तिसऱ्या श्रावणी सोमवारी शिवलीला अमृत ग्रंथ पारायण सोहळ्याचे आयोजन केले होते. नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे याच्या हस्ते दीप प्रज्वलन करून पारायणास सुरुवात करण्यात आली. यंदा पाऊस चांगला झाल्याने पवनामाई (पवना नदी) चे जल पूजन करण्यात आले. यावेळी शिवशंभो सेवा मंडळांचे संस्थापक ह.भ.प. माउली हांडे, अध्यक्ष गणेश काटे, जयसिंग चव्हाण, बाळासाहेब काटे, पुजारी ज्ञानेश्वर मुसंडे, भाविक व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिमल्याच्या सफरचंदाची आवक वाढली

पिंपरी – पिंपरी-चिंचवडमधील फळ बाजारात शिमल्यावरून सफरचंद मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. परंतु, पावसामुळे फळाला उठाव नसल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.