Wednesday 15 April 2020

COVID-19 response: Pimpri Chinchwad Municipal Corp performs well in WASH services


Pimpri Chinchwad corporation sets up COVID-19 war room


कोरोना बाधितांवरील तातडीच्या उपचारासाठी नामवंत डॉक्टरांच्या टास्क फोर्सची स्थापना

एमपीसी न्यूज :  पुणे व पिंपरी चिंचवड महानगरातील कोराना-19 विषाणूच्या संसर्गाने रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण राज्य आणि राष्ट्रीय पातळीच्या मृत्यूदरापेक्षा जास्त आहे. वाढत जाणाऱ्या मृत्यूदरांचे प्रमाण कमी करण्याबरोबर कोरोना बाधित रुग्णांवर तातडीने उपचार करण्यासाठी पुण्यातील दहा नामवंत आणि तज्ज्ञ डॉक्टर्सचा टास्क फोर्स (कार्य बल गट) स्थापन करण्यात आला असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी […]

अत्यावश्यक कारणांसाठी आंतरजिल्हा प्रवासासाठी राज्य पोलिसांकडून ई-पासची सुविधा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातून महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांच्या हद्दीत जाण्यासाठी पोलिसांकडून ई-पासची सोय करण्यात आली आहे. मृत्यू, वैद्यकीय आणि इतर महत्वाच्या कारणांसाठी हे पास दिले जातील. त्यासाठी नागरिकांनी पोलिसांकडे आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. आंतरजिल्हा प्रवासासाठी – # आंतरजिल्हा प्रवासासाठी https://covid19.mhpolice.in या वेबसाईटवर जाऊन पिंपरी चिंचवड पोलीस येथे स्वतः रजिस्टर होऊन आवश्यक ते […]

तब्बल 85 चिकन व अंडी विक्रेते ‘होम क्वारंटाईन’, अंडी पुरवठादार निघाला कोरोनाबाधित

एमपीसी न्यूज – भोसरीतील एक अंडी पुरवठादार कोरोनाबाधित असल्याचे काल (मंगळवारी) निष्पन्न झाल्यानंतर खेड तालुक्यातील संपूर्ण प्रशासन खडबडून जागे झाले आहे. या अंडी पुरवठादाराच्या संपर्कात आलेल्या चाकणमधील तब्बल 85 चिकन व अंडी विक्रेत्यांना ‘होम क्वारंटाईन’ करण्यात आले आहे. शहरातील चिकन व अंड्यांची सर्व दुकाने बंद करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. भोसरी येथील संबंधित अंडी पुरवठादाराने […] 

मोकळ्या जागेत भाजी मंडईला परवानगी, हातगाड्यांसाठी स्वतंत्र आदेश निघणारv

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दिनांक 14 एप्रिल 2020 रोजी रात्री बारा वाजेपर्यंत शहरातील सर्व भाजी मंडई बंद करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले होते. तथापि, ज्या ठिकाणी भाजी मंडई सध्या कार्यान्वित आहे त्या ठिकाणच्या नजिकच्या मोकळ्या जागी भाजी मंडई सोशल डिस्टन्सिंगचा अंमल प्रभावीपणे करता येईल अशा ठिकाणीच सुरू केली जाणार आहे.

आमदार जगतापांची पोलिसांना मदत, संपूर्ण चेहरा झाकणारे ७०० विशेष मास्क केले वाटप

पोलिस बांधव कोरोना लढाईत धोका पत्करून काम करत आहेत. नागरिकांच्या संपर्कात आल्यामुळे काही पोलिसांना देखील कोरोनाची लागण होऊ लागल्याची प्रकरणे समोर येत आहेत. त्यामुळे पोलिसांना चांगली सुरक्षा साधने देण्याची आवश्यकता आहे. हीच बाब ओळखून आमदार लक्ष्मण जगताप हे पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मदतीला धावून गेले आहेत. आमदार जगताप यांनी पोलिसांना संपूर्ण चेहरा झाकणाऱ्या विशेष मास्कची मदत दिली आहे. सुमारे ७०० विशेष मास्क पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाकडे सुपूर्त करण्यात आले.

पिंपरी शहरात गेल्या 24 तासांत आठ पॉझिटीव्ह; एकूण पाॅझिटीव्ह 43

पिंपरी - शहरात गेल्या 24 तासांत तब्बल आठ पाॅझिटीव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण पाॅझिटीव्ह संख्या 43 झाली आहे. 

खोकला तरी पोलिसांना फोन

  • पोलिसांचे काम वाढले ः साडेतीन हजारांवर गुन्हे दाखल
पिंपरी – “करोना’मुळे सध्या शहरातील गुन्ह्यांचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. गुन्हे कमी झाले की पोलिसांचे काम कमी होणे अपेक्षित आहे. परंतु “करोना’मुळे पोलिसांच्या कामात भरच पडत असल्याचे दिसून येत आहे. सध्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्‍तालयातील नियंत्रण कक्षात दिवसाला सरासरी 75 ते 80 फोन येत आहेत. यामध्ये गर्दी केल्याचे सर्वाधिक फोन आहेत. आमचा शेजारी सारखा खोकतोय, अशी तक्रार करणारे फोनही पोलिसांना येत आहेत. यामुळे पोलिसांची चांगलीच छमछाक होत आहे.

पिंपरी-चिंचवडकरांनो सावधान… “करोना’ दाट लोकवस्तीत शिरतोय

  • शहरातील एकूण रुग्ण संख्या 37 
  • मंगळवारी सायंकाळपर्यंत दोन रुग्णांची वाढ
  • सक्रिय 25 रुग्ण उपचाराधीन
  • सहा दिवसांत अकरा नव्या रुग्णांची भरv

संचारबंदी मोडणाऱ्या 199 जणांवर गुन्हे दाखलv

पिंपरी  – प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन न करणाऱ्या 199 जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. आत्तापर्यंत तीन हजार 700 जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
करोनाचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित केले आहे. या लॉकडाऊनची मुदत पुन्हा 3 मे पर्यंत वाढविण्यात आली आहे. 

सील न केलेल्या परिसरातील दुकानांना वेळेचे बंधन नाही

आयुक्तांचे स्पष्टीकरण : शहरातील काही भागांमध्ये मात्र ठराविक वेळेतच दुकाने उघडी
पिंपरी -“करोना’चे अधिक रुग्ण आढळलेलले काही भाग महापालिका प्रशासनाकडून सील करण्यात आले आहेत. याच भागात जीवनावश्‍यक वस्तुंची दुकाने निश्‍चित करुन दिलेल्या वेळेत उघडण्यात येतील, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्‍त शहरातील इतर भागांमध्ये किराणा दुकानांना वेळेचे बंधन घालण्यात आलेले नाही. परंतु शहरात काही प्रमुख भागांमध्ये ठराविक वेळेतच दुकाने उघडी ठेवण्यास सांगून अन्य वेळेत सरसकट दुकाने बंद करायला लावली जात आहेत. अशा प्रकारे दुकानदार आणि नागरिकांना वेठीस धरण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांपासून होत आहेत. 

पिंपरी भाजी मंडईत पोलिसांचा सौम्य लाठीमार

पिंपरी  – पिंपरी चिंचवड महापालिका आणि पोलीस प्रशासन यांच्यातील समन्वयाअभावी नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण होत आहे. या गोंधळातूनच पिंपरी भाजी मंडईत बुधवारी (दि. 15)पहाटेपासून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. अखेर पोलिसांची जादा कुमक आल्यावर सौम्य लाठीमार करीत गर्दी पांगविण्यात पोलिसांना यश आले.

Lockdown 2.0 : गृह मंत्रालयाने जारी केल्या ‘लॉकडाऊन 2’ साठी ‘सूचना’, ‘फेस कव्हर’ घालणं बंधनकारक, थुंकल्यास बसणार दंड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय गृह मंत्रालयाने कोरोना विषाणूमुळे लॉकडाउन पार्ट टू बाबत नवीन मार्गदर्शक सूचना जारी केली आहेत. नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार, आता घराबाहेर पडताना फेस कव्हर (मुखवटा) घालणे बंधनकारक असेल. याव्यतिरिक्त, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे दंडनीय असेल कारण कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउन कालावधी 14 एप्रिल ते 3 मे 2020 पर्यंत वाढविला आहे.

भारतीय रेल्वेची प्रवासी सेवा तीन मेपर्यंत बंदच राहणारb

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना लॉकडाऊनची मुदत तीन मेपर्यंत वाढवण्याचे घोषित केले आहे. भारतीय रेल्वे बोर्डने सुद्धा रेल्वेची प्रवासी वाहतूक तीन मेपर्यंत बंद ठेवणार असल्याचे स्पष्ट केले आहे, तर जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी फक्त मालगाड्या सुरू राहणार आहेत. भारतीय रेल्वे बोर्डाकडून काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, कोविड -19 च्या  उपाययोजनांच्या अनुषंगाने भारतीय रेल्वेच्या […]

अप्पर तहसीलदारांकडून विहिंप, बजरंग दलाच्या सेवाकार्याचा सन्मानपत्र देऊन गौरव

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या अपर तहसिलदार गीता गायकवाड यांनी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल पिंपरी-चिंचवड जिल्ह्याचे सन्मानपत्र देऊन कौतुक केले आहे. कोरोना या भयंकर विषाणु संसर्गामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आले. अशा आपात्कालीन परिस्थितीमध्ये गेली 15 दिवस विहिंप, बजरंग दल, पिंपरी चिंचवड जिल्ह्याच्या वतीने स्थानिक व पर राज्यातील स्थलांतरीत असलेल्या गोर- गरीब, निराधार व गरजु […]

निगडी बस स्टॉप येथे बेघर, निराधारांना मिळतेय दोन वेळचे जेवण; दररोज 400 नागरिकांना अन्नदान

एमपीसी न्यूज : कोरोनामुळे सुरु आलेल्या लॉकडाऊनमध्ये बेघर, निराधार, स्थलांतरित मजूर आणि गोरगरीब झोपडीधारकांसह दिव्यांगांचे अन्नावाचून होणारे हाल दूर करण्यासाठी भाजप युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष सचिन काळभोर यांनी पुढाकार घेतला. त्यानुसार निगडी बस स्टॉपयेथे अन्नदान सुरु करण्यात आले. या ठिकाणी दुपारी आणि संध्याकाळी सुमारे 400  नागरिकांना मोफत अन्नदान करण्यात येत आहे. तसेच येथे सोशल डिस्टंसिन्गचे […]

गरजू लोकांसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पुढाकार

पिंपरी - शहरातील गरजू लोकांसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि परिवारातील संस्था-संघटनांनी पुढाकार घेतला आहे. २३ हजार ८०५ जेवणाचे २३ हजार ८०५ इतके डबे घरपोच देतानाच गरजू कुटूंबांना १५ दिवसांचे धान्य देण्यात आले आहे. या शिवाय, विविध भागांतील अन्नछत्रांद्वारे सुमारे ४० हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था ही करण्यात आली आहे.

आयटी पार्क परिसरातील गावे स्वयंस्फूर्तीने बंद

पिंपरी - हिंजवडी आयटी पार्क परिसरातील गावांमधील नागरिकांनी स्वंयस्फूर्तीने पुढे येत आपला परिसर बंद ठेवला आहे. माण, मारुंजी, नेरे व जांबे या गावांमधील अंतर्गत रस्ते बंद असल्याने परिसरात शुकशुकाट आहे.

औद्योगिक क्षेत्राकरीता पासेसची सुविधा उपलब्‍ध : जिल्हाधिकारी

पुणे : आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशांतर्गत कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण आढळत असल्याने संपूर्ण देशात संचारबंदी लागू झालेली आहे. त्या अनुषंगीक औद्योगिक क्षेत्राकरीता आवश्यक त्या परवानग्या व पासेस उपलब्ध करुन देण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आदेश दिले आहेत.