Friday 31 August 2018

जनकल्याण समितीच्या वतीने शनिवारी पिंपळेगुरवमध्ये सन्मान स्त्री-शक्ती कार्यक्रमाचे आयोजन

पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती पुणे जिल्हा यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यासाठी शनिवारी (दि. १ सप्टेंबर) सायंकाळी सहा वाजता पिंपळेगुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात सन्मान स्त्री-शक्तीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी व अॅक्सिस बँकेच्या उपाध्यक्षा अमृता फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत.
जनकल्याण समितीच्या वतीने शनिवारी पिंपळेगुरवमध्ये सन्मान स्त्री-शक्ती कार्यक्रमाचे आयोजन

बीआरटी मार्गातून अन्य वाहनांना प्रवेश बंदीचे पोलीस आयुक्तालयाचे आदेश

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात दापोडी ते निगडी या मार्गावर बीआरटी बस सेवा सुरू झाली आहे. सध्या बीआरटी मार्गातून अन्य वाहने धावत आहेत. त्यामुळे काही वेळेला बीआरटी सेवेसाठी अडथळा निर्माण होतो. त्यासाठी बीआरटी मार्गातून बस व्यतिरिक्त इतर वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी दिले आहेत.
बीआरटी मार्गातून अन्य वाहनांना प्रवेश बंदीचे पोलीस आयुक्तालयाचे आदेश

Civic body aims for 100% trash segregation by January 2019

The civic body is making renewed efforts to ensure 100% garb ..

Wide road ahead to end traffic snarls in Talawade

Daily traffic congestion on Spine Road could soon be a thin ..

PCMC staffers to raise funds for flood relief

The Pimpri Chinchwad Mahanagarpalika Karmachari Mahasangh is ..

Pune: PMPML chief visits Pimpri to ensure smooth operation on BRTS

After the Nigdi-Dapodi Bus Rapid Transit System (BRTS) saw chaotic traffic in the first five days after its launch, the PMPML administration finally swung into action on Wednesday to ensure that operations on the dedicated track ran smoothly.

4-member team to monitor BRTS commuters' problems

A four-member team has been formed to monitor the problems f ..

पिंपळे निलख येथील उद्यानासाठी चार कोटीच्या खर्चास स्थायीत मंजूरी

पिंपळे निलख येथील बाणेर पुलाजवळील मोकळ्या जागेत उद्यान विकसित करण्यासाठी येणाऱ्या सुमारे चार कोटी सहा लाख 82 हजार रुपयांच्या खर्चासह शहरातीलविविध विकास विषयक कामासाठी सुमारे 19 कोटी 69 लाख 72 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी मान्यता देण्यात आली.

वाहतूक कोंडीचा ‘आयटी’ला आर्थिक फटका

हिंजवडीतील माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे वार्षिक १५०० कोटींचे नुकसान; पायाभूत सुविधांचाही अभाव

राज्यातील सर्वात मोठे ‘आयटी पार्क’ अशी ओळख असलेल्या हिंजवडी ‘आयटी पार्क’कडे जाणाऱ्या रस्त्यावर होत असलेली प्रचंड वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे तेथील लहान-मोठय़ा कंपन्यांचे मिळून वार्षिक तब्बल पंधराशे कोटी रुपयांचे नुकसान होत असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. विशेष म्हणजे वाहतूक कोंडीमुळे हिंजवडी ‘आयटी पार्क’मध्ये पोहोचण्यासाठी कर्मचाऱ्यांना वार्षिक बारा लाख किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास करावा लागत आहे.

पुणे-मुंबई प्रवासाचा वेळ अर्ध्या तासाने वाचणार

पुणे - पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा वेळ सुमारे अर्ध्या तासाने कमी होऊ शकेल, अशा खालापूर- कुसगाव बोगदा तयार करण्याच्या राज्य रस्तेविकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) प्रस्तावाला राज्य सरकारने आज (ता. ३०) मंजुरी दिली. सुमारे १३ किलोमीटरच्या या बोगद्याचे काम पावसाळ्याच्या अखेरीस सुरू होणार आहे.   

सकाळ बातमीचा परिणाम, दापोडीत उघड्या चेंबरची दुरूस्ती

जुनी सांगवी - दापोडी येथील गणेशनगर भागातील उघडे तुटलेले धोकादायक चेंबर अखेर दुरूस्ती करून झाकणे बसविण्यात आली आहेत. याबाबत सकाळमधुन दापोडीतील नागरी सुविधा ऐरणीवर या शिर्षकाखाली सचित्र बातमी मंगळवार ता.२८ बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. शेजारीच रेल्वे लाईन लगत असलेल्या या रस्त्यावर रात्री नागरीकांना धोकादायकरित्या रहदारी करावी लागत होती. 

उद्योजकांच्या प्रश्‍नावर लवकरच मुंबईत बैठक

पिंपरी – पिंपरी-चिंचवड, चाकण, तळेगाव, रांजणगाव या औद्योजिक परिसरातील उद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्याबाबत पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांच्या नेतृत्वाखालील संघटनेच्या शिष्टमंडळाने उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी, उद्योगाशी संबंधित सर्व खात्याचे मंत्री व अधिकारी यांची लवकरच मुंबई येथे बैठक घेऊन उद्योग क्षेत्राच्या सर्व समस्या व मागण्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आश्‍वासन देसाई यांनी दिले.

स्मार्ट सिटीच्या २५० कोटींच्या कामात भ्रष्ट्राचाराचे स्मार्ट नियोजन: राष्ट्रवादीचा आरोप

पिंपरी-चिचंवड शहरातील केंद्र शासनाने स्मार्ट सिटी योजनेअंतर्गंत काढण्यात आलेल्या फायबर ऑप्टीक केबल टाकण्याच्या सुमारे २५० कोटींच्या निविदाप्रक्रियेत मोठा गफला झाला आहे. मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून यासाठी दबावामुळे महपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर या भ्रष्ट्राचाराचे स्मार्ट नियोजन करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

Traffic police, PCMC responsible for traffic jams on Pune-Nashik highway: Shivajirao Adhalrao-Patil

Shirur MP Shivajirao Adhalrao-Patil, who is also the chairman of the District Road Safety Committee, tells The Indian Express that tenders for highway widening work, along with construction of flyovers & subways, are likely to be floated by November. These projects are expected to end congestion on Pune-Nashik Highway
Traffic police, PCMC responsible for traffic jams on Pune-Nashik highway: Shivajirao Adhalrao-Patil

Pimpri cops detain 42 youths in drive against eve-teasing

A police team detained 42 youths and seized 24 two-wheelers  ..

शाळा, महाविद्यालयासमोर टवाळखोरी करणाऱ्यांवर दुसऱ्या दिवशीही कारवाई

शाळा, महाविद्यालया समोर होणारी छेडछाड, टिंगलटवाळी यामुळे विद्यार्थिनीमध्ये असुरक्षितता आहे. शहरातील अनेक ठिकाणी असे गैरप्रकार सुरु असल्यासाने बुधवार सकाळ पासून पिंपरी पोलिसांनी धडक मोहीम राबवली. दोन दिवसात एकूण ७७ तरुणांवर कारवाई करण्यात आली. आज दुसऱ्या दिवशी ३५ रोडरोमिओंना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर मुंबई पोलीस कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.

निर्विघ्न गणेशोत्सवासाठी पोलीस सज्ज

पिंपरी – गणेशोत्सवासाठी पिंपरी-चिंचवड आयुक्तालय सज्ज झाले आहे. पोलीस खाते महापालिकेशी समन्वय साधून शहरात फौजफाटा तैनात करणार आहे. सर्व गणेश मंडळांनी धर्मादाय आयुक्तालयाच्या नियमानुसार नोंदणी करणे अपेक्षीत आहे. अन्यथा नियमांचे पालन न करणाऱ्या मंडळांवर कडक कारवाई करण्यात होणार असल्याची माहिती अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी दिली.

पोलीस आयुक्‍तालयाचा महापालिकेला भूर्दंड

पिंपरी – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी महापालिका प्रशासनाने उपलब्ध दिलेल्या शाळेचे स्थलांतर चिंचवडमधील प्राधिकरणाच्या जागेत केले जाणार आहे. या 5037.00 चौरस मीटर भूखंडाकरिता महापालिकेने प्राधिकरणाला सुमारे सव्वा सहा कोटी रूपये देण्याच्या ठरावाला स्थायी समितीने आज (दि.29) मंजुरी दिली.

दापोडी, म्हाळुंगेत जुगार अड्ड्यावर छापा

भोसरी, हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापे टाकून दोन ठिकाणी कारवाई करून तिघांना अटक केली आहे.

एफएसएसआयतर्फे ‘हायजिन रेटिंग’ योजना अमलात येणार

एफएसएसआय’द्वारे ग्राहकांना मिळणार अन्न पदार्थ व सेवेची हमी
पुणे : शहरातील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना आता फूड सेफ्टी अ‍ॅन्ड स्टँडर्ड अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाकडून (एफएसएसआय) हायजिन रेटिंग देण्यात येणार आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंट्समध्ये उपलब्ध होणारे अन्न पदार्थ आणि सेवा यांच्या सुरक्षिततेची हमी त्या निमित्ताने ग्राहकांना मिळणार आहे. पुणे विभागातील सुमारे 1000 हॉटेल आणि रेस्टॉरंट्सनी ‘हायजिन रेटिंग’साठी अर्ज दाखल केला आहे.

प्रेरणा बॅंकेतर्फे तेरा टक्‍के लाभांश जाहीर

पिंपरी – प्रेरणा को ऑपरेटिव्ह बॅंकेची 20 वी वार्षिक सर्वसाधारण सभा थेरगाव येथे पार पडली. यामध्ये बॅंकेचे अध्यक्ष कांतीलाल गुजर यांनी सभासदांना तेरा टक्‍के लाभांश जाहीर केला. बॅंकेची निगडी शाखा येत्या सप्टेंबरमध्ये सुरु होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

Thursday 30 August 2018

पिंपरी चिंचवडच्या पवन शाहची १९ वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडच्या व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अॅकॅडमीचा धडाकेबाज फलंदाज पवन शाह याची आज १९ वर्षाखालील भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे.

पिंपरी चिंचवडच्या पवन शाहची १९ वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड

पिंपरी चिंचवड महापालिकेस सिंगापूर स्मार्ट सिटी शिष्टमंडळाची भेट !

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला सिंगापूर स्मार्ट सिटीच्या शिष्टमंडळांनी भेट देऊन महानगरपालिकेच्या कामांची माहिती घेतली. महापौर राहुल जाधव आणि सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी शिष्टमंडळाचे स्वागत केले.

निगडी-दापोडी बीआरटी नकोशी आणि असुरक्षितही

निगडी-दापोडी मार्गावर 'बीआरटी' सुरू करताना घाई करण्यात आल्याचा आरोप केला जात असतानाच, सामान्य प्रवाशांनीही या मार्गावर बीआरटी बसची आवश्यकता नसल्याची भावना व्यक्त केली आहे. तसेच, सध्याच्या मार्गावर दिली जाणारी बीआरटी सेवा सुरक्षित वाटत नसल्याचेही प्रवाशांचे म्हणणे आहे.

PMPML chief visits Pimpri to ensure smooth operation on BRTS

After the Nigdi-Dapodi Bus Rapid Transit System (BRTS) saw chaotic traffic in the first five days after its launch, the PMPML administration finally swung into action on Wednesday to ensure that operations on the dedicated track ran smoothly.

‘कॉल ड्रॉप्स’ला दोन टक्क्यांची कॅप

अधिक कॉल ड्रॉप झाल्यास 'ट्राय'कडून कारवाई

टेलिकॉम सेवा पुरवणाऱ्या विविध कंपन्यांची कनेक्शन्स वापरणाऱ्या कंपन्यांना कॉल ड्रॉपचा दर दोन टक्क्यांहून अधिक असता कामा नये, अशा स्पष्ट सूचना केंद्रीय दूरसंचार नियामक मंडळाने (ट्राय) दिल्या आहेत. त्यापेक्षा अधिक कॉल ड्रॉप झाल्यास संबंधित कंपनीवर कारवाई करणार असल्याचेही 'ट्राय'कडून स्पष्ट करण्यात आले आहे

मेट्रो मार्गावर इंटिग्रेटेड तिकिटिंग

पुणे - हैदराबादच्या धर्तीवर प्रवाशांच्या सोयीसाठी मेट्रो मार्गावर ‘इंटिग्रेटेड तिकिटिंग सिस्टीम’ राबविण्याचा निर्णय पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) घेतला आहे. त्यामुळे एकाच तिकिटावर प्रवाशांना मेट्रो, कॅब आणि पीएमपी बसमधूनही प्रवास करता येणार आहे.

कोडींमुक्त हिंजवडीसाठी ‘आयटी’ लढा

हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडीच्या समस्येने गंभीर स्वरूप धारण केले आहे.

20 टक्‍के पाणी “लिकेज’

– स्काडा प्रणाली निरुपयोगी : विस्कळीत पाणी पुरवठा तक्रारींत वाढ
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागविण्याकरिता पवना धरणातून दररोज केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्यापैकी 20 टक्के म्हणजेच 100 एमएलडी पाण्याची गळती (लिकेज) होत असल्याची धक्कादायक कबुली महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. परिणामी कोट्यवधी रुपये खर्च केलेली “स्काडा’ प्रणाली निरुपयोगी ठरली आहे.

पिंपरीत टवाळखोरांवर कारवाई

महाविद्यालयांबाहेर घुटमळणाऱ्या टवाळखोरांची पिंपरी पोलिसांनी धरपकड केली. महाविद्यालयाचे विद्यार्थी नसतानाही विनाकारण महाविद्यालय परिसर, तसेच महाविद्यालयाच्या बाहेर फिरणाऱ्या ४२ तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील काळात सर्वच शाळा-महाविद्यालय परिसरात ही कारवाई केली जाणार असल्याचे अतिरिक्त पोलिस आयुक्त मकरंद रानडे यांनी सांगितले.

Pimpri cops detain 42 youths in drive against eve-teasing

A police team detained 42 youths and seized 24 two-wheelers during a drive against eve-teasing and traffic congestion around colleges.

‘ना हरकत’नंतर परवडणारी घरे

पिंपरी - राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाचा ना हरकत दाखला (एनओसी) मिळाल्यानंतर नवनगर विकास प्राधिकरणाच्या भोसरी, पेठ क्रमांक १२ येथील गृहप्रकल्पाचे काम सुरू होईल. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी या प्रकल्पात चार हजार ८८३ घरे बांधण्यात येतील. त्यासाठी सुमारे ४५७ कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. 

घाबरू नका, काळजी घ्या

स्वाइन फ्लू रुग्णांची संख्या वाढत असल्याचे निदर्शनास येताच राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयाला मंगळवारी दुपारी अचानक भेट दिली आणि आवश्यक खबरदारीच्या सूचना केल्या. नागरिकांनी घाबरून न जाता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

Now add names in voters’ list online


पारदर्शक कारभारामुळे विरोधी पक्षनेत्याची कोंडी; भाजप प्रवक्ते थोरात यांची साने यांच्यावर टिका

पंधरा वर्ष सत्ता भोगूनही शहानपण सूचले नाही
निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पारदर्शक कारभारामुळे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची कोंडी झाली आहे. त्यांच्यासमोर महापालिकेच्या कारभाराबाबत फक्त आरोप करण्यापलीकडे काहीच पर्याय उरलेला नाही. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शहरातील मतदार राष्ट्रवादीला चांगलाच धडा शिकवतील, असा इशारा पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे प्रवक्ते अमोल थोरात यांनी दिला आहे.

आमच्यावर टीका म्हणजे सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न : ढोरे

जुनी सांगवी : शहरातील स्मशानभूमीमध्ये पर्यावरणपूरक गॅस शवदाहिनी बसविण्याच्या कामात कोट्यवधी रुपये लाटण्याचा सांगवीतील माजी नगरसदस्याचा डाव महापालिका निवडणुकीच्या आधी भाजपनेच उधळून लावला होता. त्याआधीच सांगवीतील स्मशानभूमीत गॅस शवदाहिनी बसविण्याच्या कामात कोट्यवधींची मलई कोणी खाल्ली, हे शहरातील जनतेला वेगळे सांगण्याची गरज नाही. यांना ही मलई इतकी महागात पडली की महापालिका निवडणुकीत सांगवीतील मतदारांनी कायमचे घरी बसविले. सांगवीतील स्मशानभूमीच्या रखडलेल्या कामांवरून भाजपला टार्गेट करणे म्हणजे सांगवीतील नागरिकांची सहानुभुती मिळविण्याचा प्रयत्न असल्याचा घणाघात भाजपचे नगरसेवक हर्षल ढोरे यांनी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांच्यावर केला आहे.

स्मशानभूमीचे काम सत्ताधाऱ्यांनी रखडवले : प्रशांत शितोळे

जुनी सांगवी (पुणे) : ‘सांगवीतील स्मशानभूमीचे काम गेली एक ते दीड वर्षापासून संथ गतीने चालू आहे. नव्या सत्ताधाऱ्यांना स्मशानभूमीच्या जुन्या कामातून काही मिळत नाही, म्हणून त्यांच्याकडून काम करु दिले जात नाही. मात्र काम आमच्यामुळे रखडल्याची उलटी बोंब मारत आहेत. असा आरोप राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी पालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे सत्ताधाऱ्यांवर केला आहे.

उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी जाणून घेण्याचा मतदारांना अधिकार

सर्वोच्च न्यायालय: लोकप्रतिनिधींच्या अपात्रतेविषयीच्या याचिकांवरील निर्णय ठेवला राखून
नवी दिल्ली – गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असणाऱ्या लोकप्रतिनिधींना अपात्र ठरवण्यात यावे, अशी मागणी करणाऱ्या याचिकांवरील निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला. दरम्यान, उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी जाणून घेण्याचा अधिकार मतदारांना असल्याची टिप्पणी न्यायालयाने सुनावणीवेळी केली.

Wednesday 29 August 2018

[Video] वाहतूक पोलिसांच्या हप्तेखोरीमुळे रिक्षाचालक मुजोर, निगडी-दापोडी बीआरटी मार्ग फेल होण्याची शक्यता


PCMC commissioner gives a nod to new parking policy

Initiative to decongest roads, encourage citizens to use public transport

Day 5 | PMPML yet to catch up with BRTS tech: Doors of 100 buses fail to open

On the fifth consecutive day after its launch, the Bus Rapid Transport System (BRTS) track between Nigdi and Dapodi continued to cause confusion among commuters as PMPML buses plied on the track built for them, but also used the service road outside.

शहरबात : नियोजनशून्य बीआरटी

पुणे-मुंबई महामार्गावरील निगडी ते दापोडी या १२ किलोमीटर अंतराचा बीआरटी प्रकल्प पाच वर्षांपासून रखडलेला आहे.

PMPML bus breaks down on Nigdi BRTS corridor

A PMPML bus broke down along the newly inaugurated Nigdi-Dap ..

Maha-Metro digs into fully operational BRTS lane putting Nigdi-Dapodi commuters in a jam

Even as Pimpri-Chinchwad municipal corporation launched its bus rapid transport system (BRTS) on Nigdi - Dapodi stretch, Maha-Metro has continued its work in the BRTS lane which poses a question on future of the BRTS.
Pune,Maha-Metro,BRTS lane

पालिकेसमोर आता मेट्रोचे काम

पिंपरी - महापालिका भवनासमोरील सेवा रस्त्यावर महामेट्रोने या आठवड्यात कामाला सुरवात केल्यानंतर शहरवासीयांना खऱ्या अर्थाने वाहतुकीच्या कोंडीचा सामना करावा लागला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते अहिल्यादेवी होळकर चौकादरम्यान मेट्रोचे वीस खांब उभारण्यात येणार आहेत. त्यांच्या पायासाठी पाच ठिकाणी खोदकाम करण्यात येत आहे. या कामाला किमान सहा-सात महिने लागणार असल्याने शिल्लक राहिलेल्या अरुंद रस्त्यावरूनच पीएमपी गाड्यांसह सर्व वाहनांना जावे लागणार आहे. 

IT ministry launches Aadhar-based online registration, appointment system for government hospitals

The Ministry of Electronics & Information Technology has launched a new e-portal for online patient registration and appointments across government hospitals in India. The new online registration system (ORS) will link various government hospitals together and allow patients to fix appointments using their UID or Aadhar numbers. The process has been digitised with the help of Hospital Management Information System and the application is hosted on the cloud services of National Informatics Centre (NIC).

आरोग्यमंत्री डॉ. दिपक सावंत यांची वायसीएम रुग्णालयास भेट

चौफेर न्यूज – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ.दिपक सावंत यांनी मंगळवारी दुपारी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयास भेट दिली. शहरामध्ये स्वाईन फ्लूचे रूग्ण आढळून आल्याने रूग्णालयाकडून घेण्यात येणाऱ्या स्वाईन फ्लू प्रतीबंधात्मक उपाय योजनांचा आढावा घेतला. या अनुषंगाने स्वाईन फ्लू बाबत स्टँडर्ड प्रोटोकॉलचे पालन होते किंवा कसे याचीही माहीती घेतली. तसेच त्यांनी यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला भेट दिली. पदव्यूत्तर संस्था स्थापन करण्याच्या तयारी बाबत आढावा घेतला.

गावठी हातभट्टी गाळप ठिकाणावर कारवाई

पिंपरी, भाटनगर मधील बेकायदेशिररित्या सुरु असलेल्या गावठी गाळप हातभट्टी अड्यावर पिंपरी पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी छापे टाकले. यावेळी मोठ्या प्रमाणावर दारु साठा जप्त करुन दहाजणांवर कारवाई करण्यात आली आहे.

आयुक्‍तांचे कोट्यवधींच्या निविदांकडे दुर्लक्ष

एकाच ‘आयपी अ‍ॅड्रेस’वरून भरलेल्या 360 हून अधिक किरकोळ निविदांवर आयुक्‍त श्रावण हर्डीकर हे ढोंग करीत आहेत. पंतप्रधान आवास, ‘वेस्ट टू एनर्जी’, घरोघरचा कचरा संकलन व वाहतूक या कोट्यवधी रकमेच्या ‘रिंग’च्या निविदेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून एकप्रकारे अभय देण्याचे काम आयुक्त करीत आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी मंगळवारी (दि.28) केला.

पिंपरी-चिंचवड शहराचा गुरुवारी पाणी पुरवठा राहणार बंद राहणार

पिंपरी चिंचवड महापालिकेकडून विविध आवश्यक कामे करण्यासाठी गुरुवारी ( दि. 30) सायंकाळीच्या वेळेला शहरात होणारा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे, त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा पुरेशा साठा करुन काटकसरीने वापर करावा, असे आवाहन सहशहर अभियंता आयुबखान पठाण यांनी केले आहे.

पाच हजार सोसायट्या पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत

पुणे जिल्ह्यात १६ हजार गृहनिर्माण संस्था असून, अनेक संस्थांनी त्यांचे पुनर्विकसन केले आहे. मात्र, काही संस्थांच्या पुनर्विकसनात अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशा सुमारे चार ते पाच हजार गृहनिर्माण संस्था पुनर्विकसनाच्या प्रतीक्षेत आहेत.

पिंपरीत जागेअभावी फूलबाजार रस्त्यावर

पिंपरी कृषी उत्पन्न उप बाजार समितीने फूल विक्रेत्यांना विक्रीचे परवाने दिले आहेत.

पायाभूत चाचणीत सावळा गोंधळ

पिंपरी - प्रश्‍नपत्रिका अपुऱ्या आल्यामुळे, पायाभूत चाचणी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी मंगळवारी अनेक शाळांमध्ये दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना गोंधळाला सामोरे जावे लागले. विशेषतः सेमी इंग्रजी, हिंदी आणि उर्दू माध्यमांच्या शाळांमध्ये ही परिस्थिती उद्‌भवली. काही शाळांमध्ये प्रश्‍नपत्रिकेच्या छायांकित प्रती काढून उशिरा परीक्षा सुरू केल्या, तर एक-दोन शाळांवर परीक्षेचा पेपरच पुढे ढकलण्याची वेळ आली. 

…तर आमदारांनी राजीनामा द्यावा!

पिंपरी – भाजप व सहयोगी आमदारांना शहराच्या विकासाची एवढी चिंता वाटत असेल, तर त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन, महापालिकेत महापौर व स्थायी समिती अध्यक्षपद मिळवून महापालिकेचा कारभार बघावा, अशी उपरोधिक टीका विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांचा नामोल्लेख टाळत केली.

कमकुवत पोलिसांना पुणे शहर, ग्रामीणच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची दमबाजी

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये वाढती गुन्हेगारी कमी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाची निर्मीती करण्यात आली. पुणे शहर आणि पुणे ग्रामीण पोलीस दलातून पिंपरी चिंचवड आयुक्तालयात बदलून आलेल्या कमकुवत पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पुणे शहर आणि ग्रामीणच्या अती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दमबाजी करण्यात येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. ग्रामीणचे पोलीस अधिक्षक आणि पुणे शहर मधील काही वरिष्ठ अधिकारी पिंपरी आयुक्तालयात नेमणूक करण्यात आलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वैयक्तीक भेटी घेऊन त्यांना दमबाजी करत असल्याचा दावा केला आहे.

केरळ पूरग्रस्तांसाठी लघुउद्योजकही सरसावले

पिंपरी - केरळमधील पुरग्रस्तांसाठी अनेक जण मदतीचा हात घेऊन सरसावले आहेत. शहरातील उद्योजकांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.

Tuesday 28 August 2018

[Video] #NigdiDapodiBRT प्रचंड गोंधळ, पळापळ अन 3 तास बसची वाट



Live Condition today 11:45am @ Pradhikaran Corner (Nigdi) BRT bus stop. Total Chaos!! लोकांचा प्रचंड गोंधळ उडाला आहे. 2 ते 3 तास त्यांना बससाठी थांबावे लागत आहे

PMPML Bus breakdown in BRTS lane, A traffic chaos called Khilare Patil street

A Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML) bus broke down in the bus rapid transit system (BRTS) route in Pimpri-Chinchwad area on Monday evening which led to traffic congestion. As a result, as many as six to seven buses were stranded on the route.
pune,brts,bus

बस बंद पडली अन्‌...

पिंपरी - पीएमपीची बस चौकातच बीआरटी मार्गात बंद पडल्याने, त्या मार्गात पीएमपीच्या सात-आठ गाड्या पाठोपाठ रांगेत अडकल्या. बीआरटी मार्गात असलेली अन्य वाहनेही अडकून पडली. निगडी-दापोडी बीआरटी मार्गावर मोरवाडी येथे अहिल्यादेवी होळकर चौकात सोमवारी दुपारी चार वाजून २५ मिनिटांनी ही घटना घडली. 

Day 4: BRTS troubles continue, PCMC sets up panel to put service on track

After three days of chaos on the newly launched Nigdi-Dapodi BRTS route, the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) and traffic police on Monday finally joined hands to ensure smooth running of the service. A four-member committee has been formed to monitor the operations.
Day 4: BRTS troubles continue, PCMC sets up panel to put service on track

बीआरटी मार्गात पीएमपीएमएल पडली बंद

दोन दिवसांपूर्वी दापोडी ते निगडी या चौदा किलोमीटर बीआरटी मार्गाचे उदघाटन महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते झाले होते. खरं तर बीआरटी मार्गात बस बंद पडने हे पिंपरी-चिंचवड करांसाठी नित्याचाच आहे, आज असाच काही प्रकार पाहायला मिळाला. यामुळे पाच ते सहा बस अडकल्या होत्या.

[Video] BRT बस बंद पडल्याने 6 बस BRT त अडकल्या


Day 3: BRTS services hobbled as traffic wardens go missing, buses skip route

For the third consecutive day on Sunday, the Bus Rapid Transit System (BRTS) route between Nigdi and Dapodi, on the 13-km Pune-Mumbai highway stretch, continued to be a nightmare for commuters. While traffic wardens went missing, traffic policemen didn’t cooperate with the Pimpri-Chinchwad Municipal Corporation to ensure that the service ran seamlessly. To add to the chaos, some PMPML drivers skipped the BRTS route.

[Video] मेट्रो च्या कामामुळे कासारवाडी येथे झालेला अपघात


ग्रेडसेपरेटर बनले दुर्गंधीचे आगार

पिंपरी ते आकुर्डी या मार्गावर पालिकेतर्फे उभारण्यात आलेले ग्रेडसेपरेटर दुर्गंधीचे आगार बनले आहेत. ग्रेडसेपरेटरच्या बाजूने करण्यात आलेल्या सुशोभीकरणाच्या भिंतीच्या ठिकाणी पाणी साचून राहिल्याने डास; तसेच दुर्गंधी पसरत आहे. काही ठिकाणी भिंतींवर शेवाळे साचले आहे. गटारींच्या बाजूने चिखल झाला असून, वाहने घसरण्याच्या घटना घडत आहेत. पिंपरीत ग्रेडसेपरेटरच्या छतातून पाणी झिरपत आहे. आकुर्डीत भिंतीवरील फरशा निघाल्या आहेत. पालिकेच्या आरोग्य विभागाने तेथे स्वच्छता करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. ग्रेडसेपरेटरची ही दुर्दशा टिपली आहे ‘सकाळ’चे छायाचित्रकार अरुण गायकवाड यांनी.

नाशिक रस्त्यालगतची अतिक्रमणे हटविणार

चाकण - पुणे-नाशिक महामार्गावर चाकण येथे वाहतूक कोंडीचा प्रश्न जटिल बनला आहे. हा प्रश्‍न सोडविण्याच्या दृष्टीने आमदार सुरेश गोरे यांनी आज पोलिस अधिकारी, रस्ते कंपनीचे अधिकारी यांच्यासह पाहणी केली. गोरे यांनी रस्ते कंपनीचे अधिकारी, नाणेकरवाडीचे सरपंच व इतरांना सूचना केल्या. महामार्ग आणि सेवा रस्त्यालगतची अतिक्रमणे हटविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

“देर आये पर दुरुस्त आये”, रिंग झालेल्या ३६० निविदा रद्द केल्याबद्दल आयुक्तांचे अभिनंदन – मारूती भापकर

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे लुट-मार करणाऱ्या नेत्यांचे बगलबच्चे, ठेकेदार, अधिकारी, नगरसेवक यांच्या संगनमताने ‘रिंग’करून ३६० हून अधिक निविदा तब्बल ५४ कोटीची कामे रद्द करण्याचा निर्णय आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतला. त्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे ‘देर आये दुरूस्त आये’ असं म्हणत सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर स्वागत केले आहे.

PCMC to seize properties if owners fail to clear arrears

The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will seize ..

रस्ता बाधितांची महापौरांसमवेत महापालिकेत बैठक

देहुगाव येथील मुख्य कमान ते तळवडे हा देहु-आळंदी मार्गावरील तीन किमी. रस्ता अनेक वर्षे रखडलेला आहे. त्या संदर्भात महापौर राहूल जाधव यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत बाधित शेतकरी व सार्वजनिक बांधकाम विभागाने भुसंपदनाची कार्यवाही पूर्ण करून रस्ता महापालिकेला द्यावा, असे महापालिकेने सूचविले आहे. त्यानंतर महापालिका तो चांगल्याप्रकारे विकसित करून देईल, अशी ग्वाही महापौर जाधव यांनी दिली.

“स्पाईन रस्ता’ बाधितांसाठी “श्रावण गिफ्ट’

78 नागरिकांना भूखंड मिळाला : 128 मिळकतधारक न्यायाच्या प्रतीक्षेत
पिंपरी – स्पाईन रस्त्यामुळे बाधित झालेल्या 78 नागरिकांना पहिल्या टप्प्यात भूखंड मिळाला आहे. त्यांना प्राधिकरणाने मंजूर केलेल्या पेठ क्रमांक 11 मध्ये 1 हजार 250 चौरस फुट भूखंडाचे वाटप करण्यात आले. त्यामुळे स्पाईन रस्ता बाधितांना महापालिका प्रशासनाकडून अनोखे “श्रावण गिफ्ट’ मिळाले.

“तो’ रस्ता नऊ मीटरचाच करा

नगरसेविका माया बारणे यांचे पालिका आयुक्‍तांना साकडे
वाकड – थेरगाव सर्वे नंबर 29 मधील मुख्य रस्त्यापासून आतील गृह प्रकल्पांकडे जाणारा रस्ता बारा मीटरचा करण्यास मूळ जमीन मालकांनी कडाडून विरोध दर्शवल्याने हा रस्ता नेमका किती रुंद होणार? असा प्रश्न या ठिकाणच्या सोसायट्यामध्ये वास्तव्यास आलेल्या शेकडो नागरिकांसमोर पडला आहे. दरम्यान स्थानिक नगरसेविका माया संतोष बारणे यांनी पालिका आयुक्‍त यांच्याकडे हा रस्ता नऊ मीटरचाच करावा, अशी मागणी केली आहे.

आंद्रा- भामा आसखेड पाणीसाठ्यास पुढील महिन्यात मान्यता; आयुक्त श्रावण हर्डीकर यांची माहिती

पिंपरी-चिंचवड शहरासाठी आंद्रा धरणातून 38 दशलक्ष घनमीटर लिटर (एमएलडी) आणि भामा-आसखेड धरणातून 60 एमएलडी असे एकूण 98 एमएलडी पाणी साठा आरक्षणाबाबतचा फेरप्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला आहे. तो प्रस्ताव मंत्रीगटाच्या समितीसमोर 10 दिवसांमध्ये ठेवण्यात येईल. सप्टेंबरअखेर या फेरप्रस्तावाला मान्यता मिळेल, असे विश्‍वास पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केला. मान्यता मिळाल्यानंतर सदर कामास तीन टप्प्यामध्ये तातडीने सुरूवात केली जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

खासदार बारणे-आमदार जगताप यांच्यात शाब्दिक युद्ध

‘आम्ही सगळे भाऊ सारे मिळुन खाऊ’ असा कारभार सध्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत सुरु आहे. सत्तेसाठी पक्षाचे झेंडे बदलणा-या जगतापांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे. स्वत: किती पक्ष बदलले हे कदाचीत त्यांना आठवतही नसेल. समाजवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, मनसेचा सहारा असा प्रवास करीत भाजपावाशी झालेल्या जगतापांनी दुस-या विषयी बोलणे हा मोठा ‘जोक’ आहे. पालिकेतील अनागोंधी कारभार, भ्रष्टाचार, रस्त्यांवरील अतिक्रमणे यावर गेल्या वर्षभरात जगतापांनी एकदाही तोंड उघडले नाही. अतिक्रमण आणि खाबूगिरीवर आम्ही केलेली टीका आमदार जगतापांना चांगलीच झोंबली. माझ्या प्रश्नांना उत्तरे द्यायची सोडून वैयक्तीक टीका केली आहे. तसेच महापालिका कोणाची जहागिरी नाही. तसेच थेरगावांविषयी कायमच आकस बाळगणा-यांना तेथील विकास दिसत नाही असेही ते म्हणाले.

सार्वजनिक सायकल सुविधा : पब्लिक बायसिकल शेअरींग’ प्रत्येक अर्ध्या तासाला 5 रूपये भाडे

पिंपरी-चिंचवड शहराची स्मार्ट सिटी अभियानात समावेश होऊन पावणे दोन वर्षे उलटल्यानंतर ‘पब्लिक बायसिकल शेअरींग’ हा पहिला उपक्रम सुरू करण्यात आला. या योजनेत स्मार्ट सिटी लिमिटेडचा एका पैशांचीही गुंतवणूक नाही. नवी मुंबई महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने पिंपरी-चिंचवड शहराचा त्या अभियानात तिसर्‍या टप्प्यात समावेश केला गेला.

दापोडीत तुटलेले उघडे चेंबर, बंद पथदिवे रहदारीस धोकादायक

जुनी सांगवी - दापोडी येथील गणेशनगर भागातील रेल्वेसिमाभिंतीजवळील रस्त्यावरील ड्रेनेज लाईनचे चेंबर झाकणाविना उघडे आहेत. तर काही चेंबरची झाकणे तुटल्याने हा रस्ता रहदारीसाठी नागरीकांना धोकादायक ठरत आहे. यातच येथील काही ठिकाणचे पथदिवे बंद असल्याने रात्री नागरीकांना अंधाराबरोबरच येथील उघड्या चेंबरचा सामना करत धोकादायकरित्या मार्गक्रमण करावे लागत आहे.

1 सप्टेंबरपासून होणार मोफत उद्योजकता शिबिर

निगडी:स्मार्ट सिटी स्मार्ट स्टार्टअप अंतर्गत पिंपरी-चिंचवडमधील नवोदित उद्योजकांना नवीन उद्योगांबाबत माहिती देण्यासाठी हे शिबिर राबविण्यात येत आहे. शंभर दिवसांच्या मोफत शिबिराचा जास्तीत जास्त तरुणांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते व भाजपा कार्यकारिणी सदस्य अमित गणपत गोरखे व अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे यांनी केले आहे.

महिलांच्या तक्रारींकडे दुर्लक्षच

पिंपरी - महाविद्यालया बाहेर, रस्त्यावर अनेकदा महिलांची छेडछाड होते. त्यातूनही एखादीने तक्रार देण्याचे धाडस दाखविले तर पोलिसांकडून तक्रारदार आणि तिच्या कुटुंबीयांसमोर भविष्यातील न्यायालयाच्या कार्यवाहीबाबत भीतीचा बागुलबुवा उभा केला जातो. तक्रार घेऊन रोडरोमिओंच्या मुसक्‍या आवळण्याऐवजी आरोपींकडून ‘तोडपाणी’ केली जाते. दोन पोलिस उपायुक्‍त महिला शहराची कायदा आणि सुव्यवस्था पाहात असतानाच पोलिसांकडून महिलांविषयी अनास्था दिसून येत आहे. 

वल्लभनगर आगाराची सुरक्षितता ऐरणीवर

पिंपरी – एस. टी. महामंडळाच्या वल्लभनगर येथील आगारात शनिवारी (दि. 25) एका मद्यपी प्रवाशाने वाहतूक नियंत्रकास शिविगाळ करुन धक्काबुक्की केली. यानंतर त्याने आगारात गोंधळ घातला. पोलिसांना हा प्रकार कळवूनही एकही पोलीस कर्मचारी याठिकाणी नाही. त्यामुळे आगाराच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

शिवलीलामृत ग्रंथ पारायण सोहळ्याचे उद्‌घाटन

पिंपळे-गुरव – पिंपळे-सौदागर येथे महादेव मंदिरात शिवशंभो सेवा मंडळाने दरवर्षीप्रमाणे तिसऱ्या श्रावणी सोमवारी शिवलीला अमृत ग्रंथ पारायण सोहळ्याचे आयोजन केले होते. नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे याच्या हस्ते दीप प्रज्वलन करून पारायणास सुरुवात करण्यात आली. यंदा पाऊस चांगला झाल्याने पवनामाई (पवना नदी) चे जल पूजन करण्यात आले. यावेळी शिवशंभो सेवा मंडळांचे संस्थापक ह.भ.प. माउली हांडे, अध्यक्ष गणेश काटे, जयसिंग चव्हाण, बाळासाहेब काटे, पुजारी ज्ञानेश्वर मुसंडे, भाविक व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिमल्याच्या सफरचंदाची आवक वाढली

पिंपरी – पिंपरी-चिंचवडमधील फळ बाजारात शिमल्यावरून सफरचंद मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. परंतु, पावसामुळे फळाला उठाव नसल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.

Monday 27 August 2018

भाजपच्या पिंपरीतील चार नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार

पिंपरीः कोल्हापूर महापालिकेतील नगरसेवक अपात्रतेचे लोण आता राज्यभर पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातूनच पुण्यातील दोन, तर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या चार नगरसेवकांवरही ही अपात्रतेची तलवार आता लटकू लागली आहे. हे सहाही नगरसेवक सत्ताधारी भाजपचेच आहेत. निवडून आल्यानंतर सहा महिन्यात जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याने वा ते मुदतीनंतर दिल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द होण्याची शक्यता आहे.

`राष्ट्रवादी'च्या काळातच पिंपरी स्मार्ट; भाजप महापौरांची अप्रत्यक्ष कबुली

पिंपरीः ``पिंपरी चिंचवडचा "स्मार्ट सिटी'त समावेश होण्यापूर्वीच शहराच्या पिंपळे सौदागर भागात आल्यावर नवी मुंबईत प्रवेश केल्याचा भास होत असे. एवढा विकास येथे झालेला आहे,'' असे सांगताना भाजपचे महापौर राहूल जाधव यांनी हा भाग पूर्वीचे सत्ताधारी राष्ट्रवादीच्या काळातच स्मार्ट झाल्याची अप्रत्यक्ष कबुली आज दिली. भाजपचे स्थानिक आमदार लक्ष्मण जगताप व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या (त्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक) पाठपुराव्यामुळेच हा भाग स्मार्ट झाल्याचेही महापौरांनी आवर्जुन सागितले. 

नगरसेवक पत्नीच्या नामकरणाच्या ठरावाची नगरसेवक पतीकडून अंमलबजावणी

पिंपरी : पत्नीने नगरसेविका असताना केलेल्या बस टर्मिनल नामकरण ठरावाचा पाठपुरावा नंतर नगरसेवक झालेल्या त्यांच्या पतीने करून त्याची अंमलबजावणी करून घेतल्याची दुर्मिळ घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. त्यासाठी साडेतीन वर्षे लागली. योगायोगाची बाब म्हणजे त्यावेळच्या या मनसे नगरसेविकेच्या प्रस्तावाला अनुमोदक त्यांच्याच पक्षाचे नगरसेवक राहूल जाधव होते. सध्या ते महापौर आहेत. त्यांच्यात हस्ते या बीआरटी सेवा व बस टर्मिनलचे नामकरण नुकतेच (ता.24) झाले

नाशिकफाटा-चाकण मेट्रो प्रकल्पाचा ‘डीपीआर’ तयार

सिस्ट्राईकॉम-इजिस-राईटस या संस्थेने
पिंपरी : पिंपरी ते निगडी आणि नाशिक फाटा ते चाकण या मार्गावर मेट्रो धावणार असल्याचे निश्‍चित झाले आहे. या दोन्ही मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार झाला आहे. हा अहवाल सप्टेंबरमध्ये महापालिकेला सादर करण्यात येईल. दिल्लीतील सिस्ट्राईकॉम-इजिस-राईटस या संस्थेने हा डीपीआर तयार केला आहे. पहिल्या टप्यात मेट्रो पिंपरीपर्यंत धावणार होती. परंतु, मेट्रोचे काम वाढले असून एम्पायर इस्टेटच्या पुलापर्यंत गेले आहे. पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत सुरु करण्याची मागणी सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी केली होती. त्यासाठी मोठे आंदोलन छेडले होते. त्यानंतर पालिकेने मेट्रोला निगडीपर्यंतच्या मेट्रोच्या डीपीआर तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी नाशिकफाटा ते चाकण या मार्गावरदेखील मेट्रोे प्रकल्पाचा ‘डीपीआर’ तयार करण्याचे निर्देश पालिकेला दिले होते. त्यानुसार पालिकेने मेट्रोला या दोन्ही मार्गावरील डीपीआर तयार करण्याच्या सूचना दिल्या. त्यासाठी पुणे महामेट्रोला तब्बल 4 कोटी 31 लाख रूपये पिंपरी पालिकेने दिले होते.

Day 2 of BRTS chaos: Other vehicles trespass, buses try to find their way as traffic cops watch

The day after its launch, traffic movement on the Bus Rapid Transport System (BRTS) between Nigdi and Dapodi was far from smooth, as bus drivers remained confused, traffic police remained spectators and officials of the Pimpri-Chinchwad Municipal Corporation struggled to manage the route. On Saturday, buses could be seen plying on the BRTS route, then moving out of the designated track, only to make their way back to it after some time.

Bus stop confusion dogs BRTS commuters on Day 1

Utter confusion marked the day one of the much delayed Bus Rapid Transit System (BRTS) service on Pune-Mumbai highway on Friday.

दीड महिन्यात शहरात प्रत्यक्ष पार्किंग पॉलिसी : आयुक्त हर्डीकर

पिंपरी-चिंचवड शहरात क्षेत्रीय कार्यालयनिहाय ‘पार्किंग पॉलिसी’ची अंमलबजावणी केली जाणार आहे. येत्या दीड महिन्यात प्रत्यक्ष ती कार्यान्वित होईल. त्यासंदर्भातील कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे वाहतूक रहदारीला शिस्त लागण्यास मदत होणार आहे, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. पॉलिसी लागू झाल्यानंतर ठराविक रस्त्यावर वाहने लावण्यासाठी तासानुसार शुल्क द्यावे लागणार आहे.

स्मार्ट सिटी अंतर्गत सार्वजनिक सायकल प्रकल्पाचा प्रारंभ

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडमार्फत एरिया बेस डेव्हलपमेंट प्रकल्प राबवण्यात येत आहे. त्या अंतर्गत सार्वजनिक सायकल सुविधा प्रकल्पाचा प्रारंभ आज सकाळी कुंजीर क्रीडांगण कुणाल आयकॉन रोड पिंपळे सौदागर व त्यानंतर राजमाता जिजाऊ उद्यान पिंपळे गुरव येथे  झाला. यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, महापौर राहुल जाधव, पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पिंपळे सौदागर ते पिंपळे गुरव पर्यंत सायकलने जात पर्यावरणाचा संदेश दिला 

Abysmal traffic, potholes in Hinjawadi draw techies' ire

Pune: IT professionals commuting to and from the Hinjewadi I ..

इतके का आमच्या शहरात सुविधांचे उणे!

केंद्र सरकारने राहण्यायोग्य शहरांची यादी जाहीर केली. या यादीत शहर 69 व्या क्रमांकावर गेले. यास  पालिका प्रशासन जबाबदार असल्याचे सांगत सत्ताधारी भाजपने हात झटकले.  तर विरोधकांनी भाजपवर हल्लाबोल केला. भाजपची सत्ता आल्यानंतर बेस्ट सिटीची वेस्ट सिटी झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केला. सेेेनेेेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शहरातील गुंडगिरी, नियोजनशून्य कारभार, भ्रष्टाचार पाहता राहण्यायोग्य शहरांच्या यादीत पिंपरी चिंचवडचा खालून पहिला नंबर यायला हवा होता,  अशी तिखट प्रतिक्रिया दिली. मात्र पीछेहाट होण्याइतके का या शहरात सुविधांचे उणे आहे? असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे.महासाधू मोरया गोसावी यांच्या पवित्र स्पर्शाने पावन झालेल्या  पिंपरी-  चिंचवडने स्वातंत्र्य चळवळीत  महत्वपूर्ण कामगिरी बजावली.

PCMC to get PCNTDA's open spaces

Open spaces in the Pimpri Chinchwad New Township Development ..

प्राधिकरणाच्या मोकळ्या जागेवर महापालिका विकसीत करणार मैदाने, उद्याने

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या मोकळ्या जागा नाममात्र एक रुपया दराने घेण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महापालिकेने घेतला आहे. या जागेवर नागरी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. त्या जागांवर पालिका खेळाचे मैदान, उद्यान विकसित करणार आहे. प्राधिकरणाच्या जागा प्राधिकरण देणार असून गायरान जागा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मिळणार असून प्रक्रिया त्वरित केली जाणार आहे, अशी माहिती महापौर राहुल जाधव यांनी दिली.

अन् पुणे-नाशिक मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवायला आमदार महेश लांडगे रस्त्यावर उतरले

पिंपरी (Pclive7.com):- आज सर्वत्र रक्षाबंधनाचा सण साजरा केला जात आहे. आज दुपारी पुणे-नाशिक मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. अनेक नागरिक या कोंडीत अडकले होते. यावेळी बहिनींना आपल्या भावाला वेळेवर राखी बांधता यावी यासाठी हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनचे कार्यकर्त्यांचे वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचे मदत कार्य सुरू होते. हा सर्व प्रकार भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना समजताच ते स्वत: कुठलाच विचार न करता रस्त्यावर उतरले. त्यांनी केलेल्या या मदत कार्यामुळे अनेकांना रक्षाबंधनाचा सण वेळेवर साजरा करता आला. सध्या सोशलमिडीया आणि भोसरी परिसरात महेश लांडगे यांनी केलेल्या या मदत कार्याचे कौतुक होत आहे.

पिंपरी-चिंचवड वाहतूक नियंत्रण कक्ष वाकडमध्ये

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील वाहतुकीचे नियंत्रण वाकडमधून करण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात आला आहे. त्यासाठी भुजबळ चौक येथील वाकड पोलीस ठाण्याच्या जुन्या इमारतीची डागडुजी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले आहे.

केरळ पूरग्रस्तांना आमदार महेश लांडगे यांचा मदतीचा हात; दोन टन कांदा पाठवला

पिंपरी (Pclive7.com):- अतिवृष्टीने केरळमध्ये हाहाकार माजला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. महापुराने उद्धवस्त झालेल्या केरळला देशभरातून मदतीचा ओघ सुरु आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी देखील केरळमधील बांधवांना मदतीचा हात दिला आहे. लांडगे यांनी केरळ पूरग्रस्तांसाठी दोन टन कांदा पाठविला आहे. तसेच केरळ पूरग्रस्त बांधवांना आप-आपल्या परीने सर्वांनी मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

दापोडीत रंग नसलेले गतिरोधक ठरताहेत अपघाताचे कारण

जुनी सांगवी - दापोडी-सांगवी प्रमुख रस्ता व दापोडीतील अंतर्गत रस्त्यावर गतिरोधकांना पांढरे पट्टे नसल्याने असे गतिरोधक अपघाताचे कारण ठरत आहेत. दापोडी सांगवी रस्त्यावर एस.टी.कार्यशाळा वळणावर सांगवी व दापोडी दोन्ही बाजुने उतार रस्ता आहे. उतार रस्ता असल्यामुळे या वळणावर गतिरोधक करण्यात आलेला आहे. मात्र गतिरोधकाला पांढरे पट्टे नसल्याने वाहनचालकांच्या हा गतिरोधक नजरेस येत नाही. परिणामी वेगात असणारी वहाने आदळुन गतिरोधक अपघाताचे कारण ठरत आहे. 

स्वत:च तयार करा ‘इको फ्रेंडली बाप्पा’

पुणे - आपल्या लाडक्‍या बाप्पाची मूर्ती स्वत:च्या हाताने तयार करण्याची व पर्यावरणपूरक गणेशमूर्ती घडविण्याची संधी देणारी अभिनव कार्यशाळा ‘सकाळ’ने ९ सप्टेंबर रोजी आयोजित केली आहे.

साथीच्या आजारांचा शहरवासीयांना “डंक’

प्रशासनावर ताण : “वायसीएम’मध्ये खाटांपेक्षा जास्त रुग्ण
पिंपरी – शहरातील बदलत्या वातावरणामुळे स्वाईन फ्लू, डेंग्यू, मलेरिया यासारख्या जीवघेण्या आजारांनी पुन्हा डोके वर काढले आहे. यामुळे, शहरातील महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचार घेण्यासाठी मोठ्या संख्येने रुग्ण दाखल झाल्याने खाटांची संख्या अपुरी पडत आहे. रुग्णालयातील काही विभागात क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण उपचार घेत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

महापालिकेतर्फे योगा एशियन चॅम्पीयनशीपच्या विजेत्यांना सात लाखांचे अर्थ सहाय्य

पिंपरी  – सिंगापोरमध्ये 2017 मध्ये झालेल्या सातव्या योगा एशियन स्पोर्टस चॅम्पीयनशीप स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंना महापालिकेतर्फे सात लाखांचे आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव महापालिकेच्या क्रिडा,कला,साहित्य व सांस्कृतीक समिती समोर ठेवण्यात आला आहे.

नागरवस्ती योजना विभागामार्फत नवीन तीन विभाग

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती योजना विभागामार्फत महिला व बाल कल्याण, समाज कल्याण आणि इतर विविध कल्याणकारी योजनांची सक्षमपणे वेळेत अंमलबजावणी होत नाही.

पोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशनच्या वतीने चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये रक्षाबंधन

पिंपरी (Pclive7.com):- पोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशनच्या वतीने चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला. सर्वसामान्य नागरिकांचे सण उत्साही वातावरणात साजरे व्हावेत यासाठी पोलीस आपले कर्तव्य बजावत असल्याचे मत पोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशनचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष गजानन चिंचवडे यांनी चिंचवडगाव येथे व्यक्त केले.

डाई-ईची कंपनीच्या स्थलांतरास कामगारांचा विरोध

पिंपरी (Pclive7.com):- पुणे मुंबई महामार्गावरील कासारवाडी येथील डाई-ईची कंपनीचे व्यवस्थापनाने बेकायदेशीररीत्या स्थलांतर सुरु केले आहे. याला कंपनीतील कामगारांनी तीव्र विरोध केला असून, शनिवार दि.२५ ऑगस्ट पासून कंपनी प्रवेशव्दारासमोर हिंद कामगार संघटनेच्या (इंटक) वतीने ठिय्या आंदोलन इंटकचे जिल्हा अध्यक्ष कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली सुरु करण्यात आले आहे. 

पिंपरीत स्वाइन फ्लूमुळे ११ दिवसांत पाच जणांचा मृत्यू

स्वाइन फ्लूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना डॉक्टरांनी सूचना केल्या आहेत. सर्दी, खोकला, ताप असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, त्यामुळे पुढील उपचार घेता येतात, असे डॉक्टरांनी सांगितले.

1 सप्टेंबरपासून मीटरचे रिडिंग मोबाईलवर

ग्राहकांना अवघ्या दोन ते तीन दिवसांत वीजबील होणार उपलब्ध
पुणे : ग्राहकांना दर्जेदार सेवा मिळावी, यासाठी महावितरण प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून येत्या 1 सप्टेंबरपासून वीज ग्राहकांच्या मीटरचे रिडिंग मोबाईलवर घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे ग्राहकांना अवघ्या दोन ते तीन दिवसांच्या आत वीजबील उपलब्ध होणार आहे. त्याशिवाय ग्राहकांना त्यांच्या बिलांची माहिती त्यांच्या मोबाईलवर एसएमएसच्या माध्यमातून तातडीने मिळणार आहे.

गणेशोत्सवानिमित्त वल्लभनगरमधून जादा गाड्या

कोकणात जाणार्‍या प्रवाशांची
पिंपरी : गौरी-गणपती सणाला कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांसाठी एसटीच्या पिंपरी-चिंचवड आगारातर्फे या वर्षीही 58 जादा गाड्यांची सोय करण्यात येणार आहे. चिपळूण, रत्नागिरी, दापोली, खेड, रत्नागिरी, गुहागरसाठी 9 ते 12 सप्टेंबर दरम्यान जादा गाड्या वल्लभनगर आगारातून सोडल्या जाणार आहेत, अशी माहिती वल्लभनगर आगाराचे व्यवस्थापक एस.एन.भोसले यांनी दिली. उद्योगनगरीच्या पिंपरी, ककाळेवाडी, आकुर्डी, निगडी, भोसरी भागात कोकणवासीयांची संख्या मोठी आहे. दरवर्षी गणपतीला ते आवर्जून गावी जातात. गणेशोत्सवास यावर्षी 13 सप्टेंबरपासून सुरवात होत आहे; तर गणपती प्रतिष्ठापना झाल्यानंतर तीन दिवसांनी गौरींचेही आगमन होत असते. त्यासाठी जादा गाड्या सोडण्याचे नियोजन एसटीच्या पिंपरी-चिंचवड आगारातून करण्यात आले आहे. आगारातून दरवर्षी 50 टक्के गाड्या या कोकण विभागासाठीच सोडल्या जातात. मात्र, गौरी-गणेशोत्सवात या गाड्यासुद्धा प्रवाशांना कमी पडतात. त्यामुळे यंदा सोडण्यात येणार्‍या जादा गाड्यांची संख्या वाढवण्यात आली आहे.

अनधिकृतपणे दिलेले वीजजोड त्वरित काढून घ्यावेत

राहुल कोल्हटकर यांनी केली मागणी
भोसरी : मोशी येथील नवीन आर.टी.ओ. कार्यालयाशेजारी प्रिव्हिया बिझनेस सेंटर या व्यावसायिक इमारतीला अनधिकृतपणे वीजजोड देण्यात आलेले आहेत. अनधिकृत कनेक्शन त्वरित काढून टाकण्याची मागणी महावितरणच्या संबंधित अधिकार्‍यांकडे केली. मात्र तक्रार मागे घेण्याबाबत दबाव आणला जात आहे, असे आरोप विद्युत वितरण समितीचे सदस्य राहुल कोल्हटकर यांनी केले आहेत. या संपूर्ण प्रकरणाबाबत आमदार बच्चू कडू यांना निवेदन देण्यात आले असून या प्रकरणी तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली आहे.

रेल्वेचा मोठा निर्णय : १ सप्टेंबरपासून ‘ही’ सुविधा होणार बंद

नवी दिल्ली – ऑनलाईन तिकीट बुकिंग सेवेमध्ये भारतीय रेल्वेने मोठा बदल करण्यात येणार आहे. पुढील महिन्यापासून म्हणजेच १ सप्टेंबरपासून फ्रीमध्ये मिळणारा विमा बंद करण्यात येणार आहे. हा विमा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास दिला जात होता. आता हा विमा प्रवाशांना स्वतः भरावा लागणार आहे.