Saturday 29 April 2017

पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरमच्या वर्धानपदिनानिमीत्त हेरिटेज वॉक उपक्रम

पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरमच्या  चवथ्या वर्धानपदिनानिमीत्त येत्या 1 मे रोजी शहरात हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड शहरात असलेल्या प्राचीन वास्तू, देवस्थानांचा इतिहास आणि त्याचे महत्व आताच्या पिढीला माहित असावे या उद्देशाने हेरीटेज वॉकचे आयोजन करण्यात आले आहे.


PCMC standing committee makes a provision of Rs 25 lakh for rail track between Pune and Lonavla

It said that the Pune Municipal Corporation, PCMC, the Pimpri Chinchwad New Township Development Authority and the Pune Metropolitan Regional Development Authority should share the cost on pro rata basis, i.e. in proportion to the length of the route ...

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी १६ मे पर्यंत अर्ज करण्याचे मनपाचे आवाहन

पिंपरी: महानगरपालिकेमार्फत प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत सर्वांसाठी घरे हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेमार्फत घरांचे मागणी सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणात अर्ज भरून देणा-या नागरिकांचा सर्वांसाठी घरे प्रकल्पासाठी नाव निश्चित केले जाणार आहे.

‘बाहुबली’साठी प्रेक्षकांची झुंबड

पिंपरी: भव्य सेट, स्पेशल इफेक्ट्स, सर्वात जास्त बजेट आणि सर्वाधिक कमाई यामुळे मागील दोन वर्षांपासून बॉलिवूडसह इतर चित्रपटसृष्टींमध्येही चर्चेत असलेल्या ‘बाहुबली’चा पुढचा भाग ‘बाहुबली२ : द कन्क्ल्युजन’ हा चित्रपट पिंपरी चिंचवडसह देशभरात एकाचवेळी प्रदर्शित झाला. या पहिल्याच दिवशी पिंपरी चिंचवड मधील सर्वच्या सर्व चित्रपटगृहांसमोर तिकिटासाठी रसिकांच्या लांबच लांब रांगा बघावयास मिळाल्या.

“अग्नीशमन’ यंत्रणा सक्षमीकरण

सात उपकेंद्र उभारणार : अतिरिक्‍त आयुक्‍त शिंदे यांची माहिती
पिंपरी,  (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहराची वाढ व प्रगती झपाट्याने होत आहे. अनेक नागरिकांची शहरात वास्तव्य करण्यास अधिक पसंती मिळू लागली आहे. त्यामुळे सध्याचे अग्नीशमन केंद्र अपुरे पडत आहे. वाढत्या आगीच्या घटना आणि अग्नीशमन विभागाला तत्त्काळ तिथंपर्यंत पोहोचण्यास लागणारा विलंब ओळखून शहरात सात नवीन अग्नीशमन उपकेंद्र उभारण्यात येणार आहे, अशी माहिती अतिरिक्‍त आयुक्‍त तानाजी शिंदे यांनी दिली.

रोहित्रांना सुरक्षा आवरण बसविण्याचे काम नियमानुसारच

पिंपरी – पुणे, पिंपरी-चिंचवड शहरामध्ये सार्वजनिक ठिकाणी असलेल्या धोकादायक रोहित्रांना लोखंडी पत्र्यांचे सुरक्षा आवरण बसविण्याचे काम हे नियमानुसारच करण्यात आले आहे. असा दावा महावितरण प्रशासनाच्यावतीने करण्यात आला आहे. या कामासाठी लोखंडी पत्र्यांचा पुरवठा करणे व संबंधित रोहित्रांना लोखंडी पत्रे बसवून देण्याच्या कामासाठी डिसेंबर 2015 मध्ये नियमानुसार व खुल्या पद्धतीने ई-निविदा प्रक्रिया करण्यात आली. याबाबत रितसर सहा वृत्तपत्रांमध्ये ई-निविदाची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली व ई-निविदा मागविण्यात आल्या. त्यात तीन ई-निविदा प्राप्त होऊन कमी दराच्या निविदेनूसार उल्हासनगर येथील एका कंपनीला हे कंत्राट देण्यात आले आहे. त्यानुसार पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील 469 पैकी 463 धोकादायक रोहित्रांना सुरक्षा आवरण बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे, तसेच चिंचवड येथील रोहित्राचा स्फोट झाल्याच्या घटनेपुर्वीपासूनच धोकादायक रोहित्रांना लोखंडी पत्र्यांचे सुरक्षा आवरण लावण्यात येत आहे, अशी माहिती महावितरण प्रशासनाच्या जनसंपर्क विभागाने दिली आहे