Friday 17 April 2020

महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात अत्यावश्यक सुविधा

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने वायसीएम रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, वार्ड बॉय तसेच रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांसाठी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर सॅनिटायझर टनेल लावण्यात आले आहे. 

भोसरी, दिघी रोड करोनाचे ‘हॉटस्पॉट’

करोनाबाधितांची संख्या 48 वर; तरीही निम्मे शहर व्यापले
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील करोना बाधित रुग्णांची संख्या 48 झाली आहे. शहरातील भोसरी, दिघी रोड या परिसराचा समावेश असलेल्या इ प्रभागामध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. त्यामुळे हा भाग शहरातील “हॉटस्पॉट’ ठरला असून याठिकाणी तब्बल 12 रुग्ण आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाने संसर्गाची पन्नाशी ओलांडलीv

चार जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह; रुग्णांची संख्या 52
पिंपरी - शहरातील कोरोना संसर्ग झालेल्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गुरुवारी (ता. 16) रात्री एक महिला पाॅझिटिव्ह आला होता. शुक्रवार सकाळ पर्यंत आणखी तिघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे शहरातील रुग्णांची संख्या 52 वर झाली आहे. आतापर्यंत 12 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

मॉर्निंग वॉकला गेलेल्या दहा जणांवर निगडी पोलिसांची कारवाई

पिंपरी – संचारबंदीमध्ये नागरिकांना रस्त्यावर फिरण्यास मनाई आहे. मात्र मॉर्निंग वॉक, कुत्रा फिरविण्यासाठी तसेच मास्क न वापरणाऱ्या दहा जणांवर शुक्रवारी (दि. १७) निगडी पोलिसांनी कारवाई केली. 

पीडब्ल्यूडी मैदानावर मंडई सुरू

पिंपळे गुरव – करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जुनी सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत भाजी, फळ विक्री शुक्रवारपासून (दि. 17) सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेतर्फे तात्पुरत्या स्वरूपात ही व्यवस्था करण्यात येत आहे. 

मगर स्टेडियममध्ये महापालिकेचे भाजीपाला विक्री केंद्र सुरू

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने अण्णासाहेब मगर स्टेडियममध्ये भाजीपाला विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राची महापौर माई उर्फ उषा ढोरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांच्याकडून पाहणी करण्यात आली. 

पिंपरीगावात दोन ठिकाणी भाजी-फळे विक्री केंद्र सुरू; नगरसेविका उषाताई वाघेरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना

पिंपरी (Pclive7.com):- कोरोनासारख्या वैश्विक महामारीचा सामना करण्यासाठी शासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन करत पिंपरीगाव प्रभाग क्रमांक २१ मधील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यासाठी नगरसेविका उषाताई वाघेरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. विशेषतः भाजीपाला तसेच फळे 

मांसाहार फक्त तीन दिवस

पिंपरी – चिकन, मटनची दुकाने सोमवार (दि. 20) पासून आठवड्यातील बुधवार, शुक्रवार आणि रविवार असे तीनच दिवस सुरू ठेवता येणार आहेत.b

आरबीआयकडून नाबार्डला २५ हजार कोटींची मदत जाहीर

मायक्रो बँकिंग क्षेत्रासाठी ५० हजार कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. नाबार्डला आरबीआयने २५ हजार कोटींची मदत जाहीर केली आह. करोना व्हायरसचा छोटया आणि मध्यम उद्योगाने सर्वाधिक फटका बसला आहे. रिव्हर्स रेपो रेट २५ बेसिक पॉईंटने कमी करण्यात आला आहे. आता रिव्हर्स रेपो रेट ३.७५ टक्के असेल. 

कोरोना प्रतिबंधक लसीच्या संशोधनात ६ भारतीय कंपन्या सहभागी

जगभरात झपाटय़ाने पसरणाऱ्या कोविड-१९ विषाणूच्या संसर्गासाठी लवकरात लवकर प्रतिबंधक लस शोधण्याचे प्रयत्न जगभरात सुरू असून, सहा भारतीय कंपन्याही त्यात सहभागी झाल्या आहेत. 

'रॅपिड’ तपासणीमधूनच ‘महामारी’च्या प्रसाराची माहिती मिळेल, जनतेनं आग्रह करू नये : Icmr (व्हिडिओ)


IT employees in Pune seek permission to continue working from home


Old-age home staff flee vulnerable spot


Pet care start-ups in city offer home delivery, online vet consultation during lockdown


यूपीएससीच्या परीक्षा, मुलाखती टाळेबंदीचा कालावधी संपल्यानंतरच

वैद्यकीय सेवा परीक्षा, भारतीय वित्तीय सेवा आणि भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा २०२० पुढे ढकलण्याची घोषणा यापूर्वीच करण्यात आली आहे 

महाविद्यालयीन परीक्षा योग्यवेळी जाहीर केल्या जातील : प्राचार्य महासंघ

पुणे : महाविद्यालयीन परीक्षा योग्य वेळी जाहीर केल्या जातील, त्याची सर्व माहिती विद्यार्थ्यांना सविस्तर दिली जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अफवांवर विश्वास ठेऊ नये. गोंधळून जाऊ नका, माहितीची खात्री करायची असल्यास थेट महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राचार्य यांच्याशी संपर्कात राहा, असे आवाहन प्राचार्य महासंघातर्फे करण्यात आले आहे. 

लाॅकडाऊनच्या काळात शालेय फी जमा करण्यासाठी सक्ती करु नये – वर्षा गायकवाड

एमपीसी न्यूज – राज्यातील कोरोना साथीची सद्याची परिस्थिती, संपूर्ण हालचालीवर घालण्यात आलेली बंदी, पर्यायाने नागरिकांना जाणवणारी पैशांची उपलब्धतता याबाबी विचारात घेता सर्व बोर्डाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना विद्यार्थी आणि पालकाकडून चालू वर्षाची व आगामी वर्षाची फी गोळा करताना सहानुभूती दाखविणे आवश्यक राहील तसेच कोणतीही सक्ती न करण्याची सूचना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकाद्वारे दिली […]b

लॉकडाऊनमध्ये कॉलेज फी मधून विद्यार्थ्यांना मिळणार सुटका

पुणे : लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक शुल्क अथवा प्रवेश शुल्क भरण्यासाठी शिक्षण संस्था आणि महाविद्यालयांनी तगादा लावू नये, असे स्पष्ट आदेश अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने दिले आहेत. 

Video : ...अरे बापरे गाईला झालाय ‘कोविड’!

पिंपरी - ऐकावं ते नवलंच! आपण नेहमीच चमत्कारीत नावे ऐकत असतो किंवा एखाद्या  ट्रेंड नुसार नाव ठेवत असतो. असंच एका व्यक्तीच नव्हे, तर चक्क एका वासराचे नाव "कोविड" ठेवले आहे. हे वासरू आहे काळेवाडीतील  माजी नगर सेवक  मच्छिंद्र तापकीर यांच्या गाईचे. या गाईने चार दिवसापूर्वी एका गोंडस वासराला जन्म दिला. तापकीर कुटुंबियांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जन्मलेल्या वासराचे अजब नामकरण केल्याने या नावाची चर्चा सगळ्या पंचक्रोशित रंगली आहे