Sunday 29 March 2020

मोठी बातमी : पिंपरी चिंचवडमधील आणखी पाच जणांना सोडणार घरी

'एनआयव्ही'कडील प्रथम अहवाल निगेटिव्ह; दुसराही निगेटीव्ह आल्यास होणार निर्णय
पिंपरी - कोरोना संसर्ग पाॅझिटीव्ह असलेल्या तिघांचे १४ दिवसांच्या उपचारानंतर एनआयव्हीकडील अहवाल निगेटिव्ह आलेत. त्यामुळे त्यांना शुक्रवारी (ता. २७) घरी सोडले. त्या पाठोपाठ आणखी पाच जणांचे प्रथम अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यांचा दुसरा अहवालही निगेटिव्ह आल्यास त्यांनाही घरी सोडले जाणार आहे. त्यामुळे शहरातील १२ पैकी आठ जण बरे होऊन घरी पोचतील. शहरासाठी ही समाधानाची बाब असेल. दरम्यान, गेल्या आठ दिवसांत एकही पाॅझिटीव्ह आढळलेले नाही. 

शहरात पुढील चार रात्री औषध फवारणी; नागरीकांनी घराबाहेर पडू नये

एमपीसी न्यूज – कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे विविध उपाययोजना केल्या जात असून उद्यापासून पुढील चार रात्री संपूर्ण शहरात औषध फवारणी केली जाणार आहे. सात अग्निशामक वाहनांनाद्वारे रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत औषध फवारणी करण्यात येणार आहे. नागरीकांनी घराबाहेर पडू नये, फवारणीच्या कामात व्यत्यय आणू नये असे आवाहन महापालिकेने केले आहे.  पिंपरी-चिंचवड […]

‘मी पिंपरी-चिंचवडकर’, ‘प्रशासनाला सहकार्य करणार, कोरोनाला हद्दपार करणार’, सोशल मिडीयावर मोहिम

एमपीसी न्यूज – कोरोना व्हायरबाबत जनतेमध्ये आता मोठ्या प्रमाणात जनजागृती होवू लागली आहे. त्यासाठी काही संघटनांनी घरात बसूनच आता पुढाकार घ्यायला सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोरोनाच्या विरोधात शहरामध्ये ‘मी पिंपरी-चिंचवडकर’, ‘प्रशासनाला सहकार्य करणार, कोरोनाला हद्दपार करणार’ ही टॅगलाईन घेवून सोशलमिडीयावर मोहिम राबविली जात आहे. व्हॉट्सअॅप डीपी, स्टेटस्, फेसबुकवर या बाबतचे फोटो झळकत […]

महापालिकेतर्फे बेघरांची पिंपरीत राहण्याची सोय

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे पिंपरीत बेघरांसाठी राहण्याची सोय उपलब्ध केली आहे. या ठिकाणी 100 जण राहू शकतात. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव राखण्यासाठी महापालिकेतर्फे विविध प्रभावी उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचधर्तीवर पिंपरी-चिंचवड शहरातील ज्या नागरिकांना घर नाही. राहण्याची सोय नाही. अशा नागरिकांसाठी महापालिकेने राहण्याची सोय केली आहे. पिंपरीतील इंदिरा गांधी पुल येथील

Pimpri Chinchwad police commissioner speaks to the citizens [Video]


Pimpri-Chinchwad housing societies want to show the door to Covid-19


In Pimpri-Chinchwad, senior citizen faces three-hour ordeal, obstacles at every step to get admission to YCM Hospital

In Pimpri-Chinchwad, senior citizen faces three-hour ordeal, obstacles at every step to get admission to YCM Hospital

पुणे विद्यापीठाच्या परीक्षा स्थगित

पुणे  -सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने करोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा 14 एप्रिलपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

“पीएम केअर्स’ निधीला सढळ हाताने देणगी देण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

नवी दिल्ली – करोनाच्या साथीमुळे संपूर्ण जग व्यापून टाकले आहे आणि जगभरातील कोट्यवधी लोकांच्या आरोग्यासाठी आणि आर्थिक सुरक्षेसाठी गंभीर आव्हाने निर्माण झाली आहेत. या आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या कार्यालयाकडे सरकारच्या मदतीसाठी सढळ हाताने देणगी देण्यासाठी उत्स्फूर्तपणे असंख्य लोकांकडून विनंती केली जात आहे.

नागरिकांना पैशाची चणचण भासणार नाही – सीतारामन

नवी दिल्ली – सध्याच्या परिस्थितीत बॅंकिंग व्यवहार सुरळीत चालणे आवश्‍यक झाले आहे. त्याचबरोबर नागरिकांना पैसे उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यामुळे लोकांना पैशाची चणचण भासणार नाही. यासाठी सर्व त्या उपाययोजना करण्यात येत असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.

Coronavirus : महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय ! ‘या’ योजनेद्वारे ‘कोरोना’ग्रस्तांवर होणार ‘एकदम’ फ्री मध्ये उपचार

मुंबई, पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील कोरोनाबाधितांना दिलासा देणारा निर्णय राज्य शासनाने घेतला असुन महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत आता कोरोना उपचाराचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या रुग्णांना कॅशलेस उपचाराची सुविधा मिळणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Morning walkers booked in Nigdi


Friday prayers suspended as mosques close in Pune, Pimpri-Chinchwad

Friday prayers suspended as mosques close in Pune, Pimpri-Chinchwad 

टाटा ग्रुपनं ‘कोरोना’शी लढण्यासाठी दान केले 1500 कोटी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशावर आलेल्या प्रत्येक संकटाचा सामना करण्यासाठी टाटा ग्रुपकडून अनेकवेळा योगदान दिले आहे. टाटा ट्रस्टने कोरोनाशी लढण्यासाठी 500 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केल्यानंतर आता टाटा सन्सने देखील 1000 कोटी रुपयांची अतिरिक्त मदत जाहीर केली आहे. टाटा ग्रुपचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी सांगितले की, कोरोनाच्या संकटाला तोंड देण्यासाठी आणि गरजा भागवण्यासाठी तातडीची आपत्कालीन संसाधनांची गरज आहे.

कष्टकऱ्यांना केले धान्याचे वाटप | Ravet Police [Video]

राजेंद्र राजमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, रावेत यानी ख़ाकीतील मानुकीच दर्शन घडवले आहे , लॉकडाउन काळात ...

Thergaon: पिंपरी-चिंचवड महापालिकतर्फे थेरगावमधील बोट क्लबचे नुतनीकरण होणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकतर्फे थेरगाव येथील बोट क्लबचे नुतनीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी 96 लाख रूपये खर्च होणार आहे. महापालिकेचे थेरगाव येथे बोट क्लब आहे. पवना नदीकिनारी निसर्गरम्य वातावरणात असणा-या या बोट क्लबमध्ये दररोज शेकडो पर्यटक हजेरी लावतात. महापालिकेतर्फे या बोट क्लबचे नुतनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात आल्या. 1 […]

भाजीपाला स्टाॅल थेट सोसायटीच्या पार्किंगमध्ये; नाना काटे यांचा अभिनव उपक्रम

एमपीसी न्यूज – लॉकडाऊन काळात मंडईमध्ये होणारी संभाव्य गर्दी टाळण्यासाठी व शेतकऱ्यांच्या पिकालाही बाजार उपलब्ध व्हावा यासाठी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी पिंपळे सौदागर परिसरातील सोसायट्यांमध्येच नागरिकांना थेट भाजीपाला उपलब्ध करून दिला आहे. यावेळी सोशल डिस्टन्सिंग पाळत दोन ग्राहकांमध्ये तसेच ग्राहक व शेतकऱ्यांमध्ये विशिष्ट अंतर राखण्यात येत आहे. लॉकडाऊन काळात गर्दी टाळण्यासाठी तसेच स्वतःच्या सुरक्षिततेसाठी […

Coronavirus : शेअर ऑटोमुळे संसर्गाचा धोका

पिंपरी - कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. मात्र, शहरात धावणाऱ्या शेअर रिक्षामुळे संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी  काही दिवस शेअर ऑटोवर निर्बंध घालण्याची मागणी सुज्ञ नागरिकांकडून केली जात आहे.

Coronavirus : ...आता सोसायट्यांमधील नागरिकांचाच स्वच्छतेसाठी पुढाकार

पिंपरी - कोरोनाच्या धास्तीमुळे सोसायट्यांमध्ये काम करणारे अनेक सफाई कामगार त्यांच्या गावी गेले आहेत. त्यामुळे  मनुष्यबळाअभावी सोसायट्यांमधील नागरिकांनीच स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला आहे.

पिंपरीत अग्निशमन दलाला 'रेड अलर्ट'; जवानांच्या कामाचे तास वाढविण्याचा विचार

पिंपरी - कोरोना संसर्ग आणि 'लॉकडाऊन' च्या परिस्थिती मुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला 'रेड अलर्ट' देण्यात आला आहे. तसेच आवश्यकता भासल्यास पोलीस अथवा वैद्यकीय सेवेतील कर्मचारी वर्गाला मदत करण्यासाठी तत्पर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

Coronavirus : निर्जन रस्त्यावर माणुसकीचे दर्शन

पिंपरी - शहरातील रस्ते निर्मनुष्य झाले.. घरातच माणसे अडकून पडली.. हातावरचे पोट असलेल्या लोकांना उपाशी रहावे लागत आहे. मात्र, पिंपरी चिंचवड मधील काही मित्रमंडळी एकत्र येऊन घरोघरी जात त्यांना जगण्यासाठी आधार देत आहेत. 

Coronavirus : सावधान... तुम्ही स्वतःला फसवित आहात

पिंपरी - गाडीला किंवा हातात पिशवी घेऊन किराणा, भाजीपाला, औषध आणायला चाललो असल्याचे खोटे सांगत नाकबंदीच्या ठिकाणाहून सुटका करून घेणारे स्वतः ला चतूर समजतात. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली घराबाहेर पडणारे हे नागरिक पुन्हा रिकामीच पिशवी घेऊन घरी परततात असल्याचे अनेक ठिकाणी दिसून येत आहे. मात्र, यातून हे नागरिक पोलिसांना नव्हे तर स्वतःलाच फसवित असल्याने त्यांना कोण सांगणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे