Thursday 30 August 2018

पिंपरी चिंचवडच्या पवन शाहची १९ वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडच्या व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अॅकॅडमीचा धडाकेबाज फलंदाज पवन शाह याची आज १९ वर्षाखालील भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे.

पिंपरी चिंचवडच्या पवन शाहची १९ वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड

पिंपरी चिंचवड महापालिकेस सिंगापूर स्मार्ट सिटी शिष्टमंडळाची भेट !

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला सिंगापूर स्मार्ट सिटीच्या शिष्टमंडळांनी भेट देऊन महानगरपालिकेच्या कामांची माहिती घेतली. महापौर राहुल जाधव आणि सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी शिष्टमंडळाचे स्वागत केले.

निगडी-दापोडी बीआरटी नकोशी आणि असुरक्षितही

निगडी-दापोडी मार्गावर 'बीआरटी' सुरू करताना घाई करण्यात आल्याचा आरोप केला जात असतानाच, सामान्य प्रवाशांनीही या मार्गावर बीआरटी बसची आवश्यकता नसल्याची भावना व्यक्त केली आहे. तसेच, सध्याच्या मार्गावर दिली जाणारी बीआरटी सेवा सुरक्षित वाटत नसल्याचेही प्रवाशांचे म्हणणे आहे.

PMPML chief visits Pimpri to ensure smooth operation on BRTS

After the Nigdi-Dapodi Bus Rapid Transit System (BRTS) saw chaotic traffic in the first five days after its launch, the PMPML administration finally swung into action on Wednesday to ensure that operations on the dedicated track ran smoothly.

‘कॉल ड्रॉप्स’ला दोन टक्क्यांची कॅप

अधिक कॉल ड्रॉप झाल्यास 'ट्राय'कडून कारवाई

टेलिकॉम सेवा पुरवणाऱ्या विविध कंपन्यांची कनेक्शन्स वापरणाऱ्या कंपन्यांना कॉल ड्रॉपचा दर दोन टक्क्यांहून अधिक असता कामा नये, अशा स्पष्ट सूचना केंद्रीय दूरसंचार नियामक मंडळाने (ट्राय) दिल्या आहेत. त्यापेक्षा अधिक कॉल ड्रॉप झाल्यास संबंधित कंपनीवर कारवाई करणार असल्याचेही 'ट्राय'कडून स्पष्ट करण्यात आले आहे

मेट्रो मार्गावर इंटिग्रेटेड तिकिटिंग

पुणे - हैदराबादच्या धर्तीवर प्रवाशांच्या सोयीसाठी मेट्रो मार्गावर ‘इंटिग्रेटेड तिकिटिंग सिस्टीम’ राबविण्याचा निर्णय पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) घेतला आहे. त्यामुळे एकाच तिकिटावर प्रवाशांना मेट्रो, कॅब आणि पीएमपी बसमधूनही प्रवास करता येणार आहे.

कोडींमुक्त हिंजवडीसाठी ‘आयटी’ लढा

हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडीच्या समस्येने गंभीर स्वरूप धारण केले आहे.

20 टक्‍के पाणी “लिकेज’

– स्काडा प्रणाली निरुपयोगी : विस्कळीत पाणी पुरवठा तक्रारींत वाढ
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागविण्याकरिता पवना धरणातून दररोज केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्यापैकी 20 टक्के म्हणजेच 100 एमएलडी पाण्याची गळती (लिकेज) होत असल्याची धक्कादायक कबुली महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. परिणामी कोट्यवधी रुपये खर्च केलेली “स्काडा’ प्रणाली निरुपयोगी ठरली आहे.

पिंपरीत टवाळखोरांवर कारवाई

महाविद्यालयांबाहेर घुटमळणाऱ्या टवाळखोरांची पिंपरी पोलिसांनी धरपकड केली. महाविद्यालयाचे विद्यार्थी नसतानाही विनाकारण महाविद्यालय परिसर, तसेच महाविद्यालयाच्या बाहेर फिरणाऱ्या ४२ तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील काळात सर्वच शाळा-महाविद्यालय परिसरात ही कारवाई केली जाणार असल्याचे अतिरिक्त पोलिस आयुक्त मकरंद रानडे यांनी सांगितले.

Pimpri cops detain 42 youths in drive against eve-teasing

A police team detained 42 youths and seized 24 two-wheelers during a drive against eve-teasing and traffic congestion around colleges.

‘ना हरकत’नंतर परवडणारी घरे

पिंपरी - राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाचा ना हरकत दाखला (एनओसी) मिळाल्यानंतर नवनगर विकास प्राधिकरणाच्या भोसरी, पेठ क्रमांक १२ येथील गृहप्रकल्पाचे काम सुरू होईल. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी या प्रकल्पात चार हजार ८८३ घरे बांधण्यात येतील. त्यासाठी सुमारे ४५७ कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. 

घाबरू नका, काळजी घ्या

स्वाइन फ्लू रुग्णांची संख्या वाढत असल्याचे निदर्शनास येताच राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयाला मंगळवारी दुपारी अचानक भेट दिली आणि आवश्यक खबरदारीच्या सूचना केल्या. नागरिकांनी घाबरून न जाता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

Now add names in voters’ list online


पारदर्शक कारभारामुळे विरोधी पक्षनेत्याची कोंडी; भाजप प्रवक्ते थोरात यांची साने यांच्यावर टिका

पंधरा वर्ष सत्ता भोगूनही शहानपण सूचले नाही
निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पारदर्शक कारभारामुळे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची कोंडी झाली आहे. त्यांच्यासमोर महापालिकेच्या कारभाराबाबत फक्त आरोप करण्यापलीकडे काहीच पर्याय उरलेला नाही. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शहरातील मतदार राष्ट्रवादीला चांगलाच धडा शिकवतील, असा इशारा पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे प्रवक्ते अमोल थोरात यांनी दिला आहे.

आमच्यावर टीका म्हणजे सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न : ढोरे

जुनी सांगवी : शहरातील स्मशानभूमीमध्ये पर्यावरणपूरक गॅस शवदाहिनी बसविण्याच्या कामात कोट्यवधी रुपये लाटण्याचा सांगवीतील माजी नगरसदस्याचा डाव महापालिका निवडणुकीच्या आधी भाजपनेच उधळून लावला होता. त्याआधीच सांगवीतील स्मशानभूमीत गॅस शवदाहिनी बसविण्याच्या कामात कोट्यवधींची मलई कोणी खाल्ली, हे शहरातील जनतेला वेगळे सांगण्याची गरज नाही. यांना ही मलई इतकी महागात पडली की महापालिका निवडणुकीत सांगवीतील मतदारांनी कायमचे घरी बसविले. सांगवीतील स्मशानभूमीच्या रखडलेल्या कामांवरून भाजपला टार्गेट करणे म्हणजे सांगवीतील नागरिकांची सहानुभुती मिळविण्याचा प्रयत्न असल्याचा घणाघात भाजपचे नगरसेवक हर्षल ढोरे यांनी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांच्यावर केला आहे.

स्मशानभूमीचे काम सत्ताधाऱ्यांनी रखडवले : प्रशांत शितोळे

जुनी सांगवी (पुणे) : ‘सांगवीतील स्मशानभूमीचे काम गेली एक ते दीड वर्षापासून संथ गतीने चालू आहे. नव्या सत्ताधाऱ्यांना स्मशानभूमीच्या जुन्या कामातून काही मिळत नाही, म्हणून त्यांच्याकडून काम करु दिले जात नाही. मात्र काम आमच्यामुळे रखडल्याची उलटी बोंब मारत आहेत. असा आरोप राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी पालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे सत्ताधाऱ्यांवर केला आहे.

उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी जाणून घेण्याचा मतदारांना अधिकार

सर्वोच्च न्यायालय: लोकप्रतिनिधींच्या अपात्रतेविषयीच्या याचिकांवरील निर्णय ठेवला राखून
नवी दिल्ली – गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असणाऱ्या लोकप्रतिनिधींना अपात्र ठरवण्यात यावे, अशी मागणी करणाऱ्या याचिकांवरील निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला. दरम्यान, उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी जाणून घेण्याचा अधिकार मतदारांना असल्याची टिप्पणी न्यायालयाने सुनावणीवेळी केली.