Sunday 1 July 2018

पकडलेले साप सोडायचे कुठे?

महापालिकेकडे यंत्रणेचा अभाव; दरवर्षी आढळतात तीन हजार साप 

पुनावळे, ताथवडे अंडरपासची उंची वाढवा अन्यथा आंदोलन

  • राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संदीप पवार यांचा इशारा
पिंपरी- पुणे-मुंबई महामार्गावरील पुनवळे आणि ताथवडे येथील अंडरपास पुलांची उंची मुख्य रस्त्यापेक्षा कमी झाल्यामुळे पावसाळ्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. परिणामी, वाहनांना अडथळा निर्माण होत असून त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व हमारा साथी हेल्पलाईनचे समन्वयक संदीप पवार व सागर ओव्हाळ यांनी केली आहे.
पुनावळे, ताथवडे अंडरपासची उंची वाढवा अन्यथा आंदोलन

PCMC gets 60% payment via online

PIMPRI CHINCHWAD: Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has collected nearly 60% property tax via online.

बोपोडी येथील झोपड्या अखेर जमीनदोस्त

औंध (पुणे) : प्रभाग क्रमांक आठ मधील बोपोडी येथील हॅरीस पुलाजवळ असलेल्या गांधीनगर झोपडपट्टीतील रहिवाशांनी घरे रिकामे करुन दिल्यानंतर अखेर आज पालिकेच्या वतीने ही घरे जमिनदोस्त करण्यात आली.

Pimpri residents and plot owner lock horns over access to road

While 300 families allege that the internal route was illegally blocked, the owner says it is his private property and was never opened for public use

PCMC looks to curb illegal tree felling

Pimpri Chinchwad: The civic body has appointed an agency to undertake Geographic Information System (GIS) mapping of trees to check illegal felling in Pimpri Chinchwad.

वनौषधी उद्यानाच्या जागेवर प्रवासी कंपन्यांचे अतिक्रमण

चिंचवड – औद्योगिक वसाहतीमधील आयुर्वेदिक वनौषधी उद्यानाच्या जागेवर खासगी प्रवासी कंपन्यांनी अतिक्रमण केले आहे. याबाबत महापालिका आणि एमआयडीसी प्रशासन एकमेकांकडे बोट दाखवत असल्याबद्दल नागरीक संताप व्यक्त करत आहेत.

प्लॅस्टिक पिशव्या द्या, रोपटे घ्या

वाकड – प्लॅस्टिक पिशव्या द्या आणि रोपटे घ्या या उपक्रमास नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला असून तब्बल 650 किला प्लॅस्टिक यावेळी जमा झाले. हा उपक्रम, आंघोळीची गोळी संस्था आणि शेखर चिंचवडे यूथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चिंतामणी गणेश मंदिर वाल्हेकरवाडी या ठिकाणी राबविण्यात आला.

पालिकेला मिळकतकरातून 178 कोटी रुपयांचे उत्पन्न

पिंपरी : महापालिका करसंकलन विभागाला मिळकतकरातून तीन महिन्यांमध्ये 177 कोटी 92 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. सर्वाधिक 102 कोटी 26 लाख रुपयांचा भरणा ऑनलाइन झाला आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी शनिवारी दिली. 

#PMPBus नव्या मिडी बसलाही ग्रहण

पुणे - शहर आणि पिंपरी- चिंचवडमधील गर्दीच्या रस्त्यांवर वाहतुकीची सुविधा देण्यासाठी पीएमपीने घेतलेल्या दोनशे नव्या मिडी बसपैकी बहुतांश बसमधील ‘इंटेलिजंट ट्रान्स्पोर्ट मॅनेजमेंट सिस्टिम’ (आयटीएमएस) बंद पडली आहे.

#SaathChal ‘साथ-साथ’ चालत घेऊ शपथ

पिंपरी - विठुमाउलीचा गजर करीत निघणाऱ्या आषाढी वारीमध्ये आपल्या जन्मदात्या माऊलीचे अन्‌ कुटुंबाचे आठवण करणारी ‘साथ चल’ ही अनोखी दिंडी सहभागी होणार आहे. या दिंडीत फक्त एक ते दीड किलोमीटरचे दहा टप्पे असून त्यापैकी कोणत्याही टप्प्यात सहभागी होऊन आपल्या माता-पित्यांप्रतीचा कृतज्ञता भाव पुणेकरांना व्यक्त करता येईल, तसेच कुटुंबस्वास्थ्याची शपथही घेता येईल.

होर्डिंगमुळे मोशीचे विद्रुपीकरण

मोशी : मोशी टोल नाका ते भोसरी दरम्यानच्या पुणे-नाशिक महामार्गावर होर्डिंग उभारले आहेत. यावरील फाटलेल्या बॅनर्सचे कपडे हवेत लोंबकळणे, त्यामुळे वाहनचालकांचे लक्ष विचलित होणे, बॅनर्सचे फाटके कापड रस्त्यावरच पडल्याने पादचाऱ्यांना त्रास होत आहे. या होर्डिंगमळे मोशीच्या विद्रुपीकरणात भर पडत आहे. 

पालिकाच लोटतेय नदीत कचरा

आळंदी : गेली आठवडाभरापासून पोकलेनच्या साहाय्याने इंद्रायणी नदीपात्रात आळंदी पालिका हद्दीतील स्मशानभूमी लगतचा कचरा थेट नदीपात्रात लोटून देण्याचे पाप सध्या पालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून सुरू आहे. मात्र स्थानिक पालिका प्रशासन आणि पदाधिकारी आपल्याला याबाबत माहित नसल्याचे सांगतात. पिंपरी महापालिकेकडून होणाऱ्या नदीप्रदुषणाबाबत नेहमीच ओरडणारी पालिका मात्र स्वताही याबाबत डोळझाक करत असल्याचे चित्र सध्या आळंदीत पाहायला मिळत आहे.

कारवाईत पालिकेकडून 26 हातगाड्या जप्त

पिंपळे गुरव – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने ड आणि ह क्षेत्रीय कार्यालय परिसरातील अनधिकृत अतिक्रमणावर धडक कारवाई करण्यात आली. यामध्ये 26 हातगाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.

पर्यावरण संवर्धनासाठी आणखी तीस विद्यार्थी तयार

वाकड – पर्यावरणाचे संवर्धन व्हावे, यासाठी हजारो विद्यार्थ्यांवर पर्यावरण संस्कार करणाऱ्या पर्यावरण संवर्धन समितीसोबत आणखी तीस विद्यार्थी तयार झाले आहेत. इसीए तर्फे गुरुकुल शिक्षण संस्थेच्या पुनावळे शाळेत विद्यार्थी पर्यावरण समिती स्थापन करण्यात आली आहे.

पालिकेतर्फे या कामासाठी कोट्यवधींची तरतूद; आठ महिन्यात काम पूर्ण करणार

‘संत ज्ञानेश्‍वर-संत नामदेव’ भेट समूह शिल्पाचे काम संथगतीने- विरोधकांनी व्यक्त केली नाराजी
पिंपरीः पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने आळंदी-पुणे या पालखी महामार्गावरील वडमुखवाडी येथे संत ज्ञानेश्‍वर महाराज-संत नामदेव महाराज भेट समुहशिल्प तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. गेल्या चार वर्षांपासून कोट्यवधी रुपयांची तरतूद करुनही हे काम रेंगाळले आहे. त्यामुळे विरोधकांनी नाराजी व्यक्त केली. तर, शिल्पाच्या कामासाठी कोट्यवधींची तरतूद करण्यात आली असून आठ महिन्यात काम पूर्ण होईल, असा दावा सत्ताधार्‍यांनी केला आहे. वारकरी संप्रदायाची आळंदी व देहू ही दोन्ही तिर्थक्षेत्रे पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीलगत आहेत. राज्य-परराज्यातूनही या दोन्ही ठिकाणी दरवर्षी लाखो भाविक येत असतात. त्यामुळे संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे मार्गक्रमण होणा-या पुणे-मुंबई महामार्गावरील निगडी येथे काही वर्षांपूर्वी महापालिकेने संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीचे समुहशिल्प तयार केले आहे. संत तुकाराम महाराजांची भक्ती आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शक्ती एकत्रित आल्याचे या समुहातून दर्शविल्याने आता हा चौक भक्ती-शक्ती चौक या नावाने ओळखला जात आहे. याशिवाय देहू-आळंदी रस्त्यावर मोशी चौकाजवळ वारीत सहभागी झालेली वारकरी महिला व बालकाचे छोटेखानी शिल्प उभारण्यात आले आहे.

लोकशाही दिन पुर्ववत सुरु करावा- विकास पाटील

खोट्या तक्रारींचे प्रमाण कमी होईल; शहराच्या पर्यावरणाची दुर्दशा चुकीच्या धोरणांमुळे
महापौरांना दिले निवेदन
पिंपरीः पिंपरी-चिंचवड शहरातील विकास व पर्यावरण ह्या मध्ये काहीतरी मोठी गडबड सुरु आहे. आपण आपल्या शहरातील सर्व नद्या प्रदुषित करीत आहोत. आपल्या शहरात अनावश्यक बाबीवर आपण जास्त लक्ष केंद्रित करीत आहोत. नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्‍नांवर आपण सोयीस्कर रीत्या पांघरूण घालुन प्रलंबित ठेवत आहोत. शहरातील अनेक गटारे थेट नदी पात्रात मैला पाणी सोडले जात आहेत, तेही शुद्धीकरण प्रकिया न करता. तसेच जलपर्णीसारखा गंभीर विषय फक्त बोलण्या पुरताच उरला आहे, अशा अनेक विषयांकडे डोळेझाक केली जात आहे, तरी या गोष्टींचा, इसिएतर्फे पर्यावरणासाठी केल्या जाणार्‍या सूचनांचा गांभीर्याने विचार करावा, अशा मागणीचे निवेदन महापौर नितीन काळजे यांना देण्यात आल्याचे विकास पाटील यांनी सांगितले.

सांगवीतील मधुबनमधील चेंबरमधुन सांडपाणी येतेय रस्त्यावर

जुनी सांगवी (पुणे) : जुनी सांगवी येथील मधुबन सोसायटी प्रमुख रस्त्यावरील सांडपाणी चेंबर तुंबण्याच्या प्रकारामुळे चेंबरमधुन रस्त्यावर पाणी येणे नित्याचे झाले आहे. मधुबनचा हा एकमेव प्रमुख रस्ता असल्याने संपुर्ण मधुबन रहिवासी या रस्त्याचा वापर करतात. जवळच गणपती मंदिर आहे. रस्त्यावर येणाऱ्या सांडपाण्यातुनच नागरीकांना रहदारी करावी लागत आहे.

जुनी सांगवीत सत्तर जेष्ठांचा विविध उपक्रमांनी वाढदिवस साजरा

जुनी सांगवी : पन्नास ते साठ वर्षांपुर्वी सर्वसामान्य कुटुंबात जन्मदिन तिथी वार तारीख लिहिण्याचे विशेष महत्व नव्हते.तर या बाबीकडे त्यावेळी विशेष गांभीर्याने घेतले जात नसायचे. अशिक्षितपणामुळे कष्टकरी समाज, मध्यमवर्गीय समाजात तर ख-या जन्म तारखेची वानवाच म्हणावी लागेल. अशा जन्म तारखेच्या घोळात सध्याची एक जेष्ठ पिढीच वंचित राहिली असल्यास नवल नसावे.