Wednesday 31 October 2018

Pune petrol prices down to 2-month low

PUNE: Petrol prices have come down by Rs6.26 since the Octob .. 

Pune: PMPML bus goes up in flames, 17th bus to catch fire in two years

Passengers of a PMPML bus had a lucky escape on Tuesday as the vehicle went up in flames seconds after they alighted from it. This is the 17th PMPML bus to catch fire in two years. Speaking to this paper after the blaze was doused, bus driver Shankar Hingmare said that it was his first trip from Vishrantwadi to the PMC headquarters.

मुख्यमंत्र्यांची सभा ऐतिहासिक ठरणार; पालकमंत्री गिरीश बापट यांचा दावा

पिंपरी (Pclive7.com):-  प्राधिकरणातील मदनलाल धिंग्रा मैदान आजवर दुरवस्थेत आणि दुर्लक्षीत राहिले. त्याला आम्हीच जबाबदार असल्याची कबुली देत भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी सभेच्या निमित्ताने मैदानाची दुरूस्ती केली असून यापुढे मैदान वापरात येईल, अशी माहिती दिली. तर, मावळ आणि शिरूर लोकसभा मतदार संघातील बारा तालुक्यातून पक्षाचे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या सभेला हजेरी लावणार आहेत. सभेची संपूर्ण तयारी धिंग्रा मैदानावर केली असून ही सभा ऐतिहासिक सभा ठरणार असल्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

स्वच्छ भारत अभियानासाठी पालिकेकडून जनजागृती

केंद्र शासनाच्या वतीने स्वच्छ भारत अभियान 2019 अंतर्गत घेण्यात येणार्‍या स्वच्छ शहर सर्वेक्षण स्पर्धेसाठी नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने थेट निविदा काढली आहे. घरोघरी जाऊन नागरिकांना सर्वेक्षणाची माहिती देणे, सुमारे अडीच लाख नागरिकांच्या मोबाईलवर अ‍ॅप डाऊनलोड करणे, शाळा व महाविद्यालयात पत्रके  वाटणे व चर्चासत्र आयोजित करणे आदी कामे खासगी एजन्सींच्या माध्यमातून केली जाणार आहेत.

लघुउद्योग संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त चिंचवड येथे 38 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्योजकांना भेडसाविणाऱ्या विविध समस्यांचा उहापोह करण्यात आला. पाठपुरावा करुनही वीज दरवाढ, शास्तीकर, माथाडी कायदा हे प्रश्‍न अद्याप प्रलंबित असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. 

स्मार्ट सिटीचे ‘स्मार्ट’ संचालक जाणार बार्सिलोना दौ-यावर!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीचे पदाधिकारी आणि अधिकारी 11 ते 17 नोव्हेंबर 2018 दरम्यान स्पेन देशाच्या दौ-यावर जाणार आहेत. स्पेन येथील बार्सिलोना शहरात 13 ते 15 नोव्हेंबर दरम्यान होणा-या ‘स्मार्ट सिटी एक्स्पो वर्ड काँग्रेस 2018’ या परिषदेत सहभागी होणार आहेत. 

स्थायी समिती झालीय ‘सल्लागार’ समिती; नगरसेवकांची उपरोधिक टीका

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नवीन स्थायी समितीची पहिले तीन महिने धोरण समिती म्हणून हेटाळणी केला जात होती. आता बाहेर सल्लागार समिती म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. सल्लागारांचे घर भरण्याचे काम सुरु असून स्थायी समिती राहिली नसून सल्लागार समिती झाली आहे, अशी उपरोधिक टीका नगरसेवक विकास डोळस यांनी केली. 

कुदळवाडीत अग्निशमन विभाग , व्यापारी, नागरिक याची बैठक घेण्याची मागणी

एमपीसी  न्यूज – दिवाळी सणादरम्यान संभाव्य आगीच्या घटना टाळण्यासाठी कुदळवाडीत अग्निशमन विभाग, व्यापारी, नागरिक याची बैठक घेण्यात यावी, अशी मागणी स्विकृत नगरसेवक दिनेश यादव यांनी महापालिका अग्निशामक विभागाचे  प्रमुख  किरण गावडे  यांच्याकडे केली.

महिला पदाधिकारी विनयभंग तक्रारीची पालकमंत्र्यांनी घेतली दखल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर भाजप महिला मोर्चाच्या एका पदाधिकारी महिलेने पक्षाच्याच तालुकाध्यक्षावर विनयभंगाच्या केलेल्या तक्रारीची पालकमंत्री गिरीश बापट यांनी दखल घेतली आहे. भोर- वेल्ह्यातील भाजपचा पदाधिकारी असलेल्या आनंद देशमाने याच्याकडून खुलासा मागविण्यात आल्याचे, पालकमंत्री बापट यांनी सांगितले. तसेच पिंपरी महापालिकेतील भाजपच्या नगरसेवकांवरील गुन्ह्याचे स्वरुप तपासावे लागेल, असेही ते म्हणाले. 

शहरबात पिंपरी : विस्कळीत पाणीपुरवठा आणि सत्ताधाऱ्यांची कोंडी

बाळासाहेब जवळकर balasaheb.javalkar@expressindia.com शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत असल्याने नागरिकांचे हाल सुरू आहेत. ठोस उपाययोजना करण्यात प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही. पाण्याच्या मुद्दय़ावरून सत्तारूढ भाजपला कोंडीत पकडण्याचे राजकारण अन्य पक्षांनी केले आहे. बुधवापर्यंत (३१ ऑक्टोबर) पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देत महापालिकेची तहकूब ठेवलेली सभा बुधवारी होत आहे.

‘धावेल भारत, जोडेल भारत’ :सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त ‘एकता दौड’ !

पिंपरी-चिंचवड: देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४३ व्या जयंती निमित्त ३१ ऑक्टोबर रोजी देशभरात राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड येथे देखील सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त ‘राष्ट्रीय एकता दौड’चे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी ३१ रोजी सकाळी ६.३० वाजता राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्सव समिती पिंपरी-चिंचवडतर्फे एकता दौड निघणार आहे. यावर्षी ‘धावेल भारत, जोडेल भारत’ असा संदेश देण्यात आला आहे. स्पाईन रोड, चिंतामणी चौक, वाल्हेकरवाडी मार्गे ही एकता दौड निघणार आहे. या एकता दौडमध्ये सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन संयोजक नगरसेवक नामदेव ढाके, नगरसेवक शितल उर्फ विजय शिंदे यांच्यावतीने करण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी जमविण्यासाठी शास्तीकराचे गाजर

पिंपरी चिंचवड : निगडीमध्ये दि. 3 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी जमविण्यासाठी भाजपाने पुन्हा एकदा शहरवासीयांना शास्तीकर माफीचे गाजर दिले आहे, असा आरोप महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केला आहे. शहरातील 600 चौरस फुट आकाराच्या निवासी बांधकामधारकांना शास्तीकर माफी आणि 601 ते 1 हजार चौरस फुट आकाराच्या बांधकामांना 50 टक्के शास्तीकर अशी सवलत पूर्वलक्षी प्रभावाने लागू केली जाणार आहे. दिवाळीनंतर संगणक प्रणालीमध्ये बदल केल्यानंतर 15 दिवसात या कामाचा प्रत्यक्ष लाभ दिवाळीनंतर मिळणार असल्याचे भाजपाचे शहरातील नेते एकनाथ पवार यांनी जाहीर केले आहे.

दिवाळीनंतर शास्ती कर सवलतीची “मिठाई’

पिंपरी – पिंपरी-चिंचवड मधील 600 चौरस फुटाच्या निवासी बांधकामांना शंभर टक्‍के, 601 ते 1 हजार चौरस फुटाच्या बांधकामांना 50 टक्‍के शास्ती करात सवलत देण्यात येणार आहे. त्यासाठी कर संकलन विभागाच्या संगणक प्रणालीत बदल सुरू असून दिवाळीनंतर त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळेल. राज्य शासनाच्या महापालिका अधिनियम कलम 267 अ मध्ये दुरुस्तीची अंमलबजावणी 4 जानेवारी 2008 पासून केली आहे. 1 हजार 1 चौरस फुटांपुढील सर्व प्रकारच्या बांधकामांना पूर्वीप्रमाणे 200 टक्के शास्ती कर आकारणार आहे, अशी माहिती पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिली. 

भाजपा कार्यकर्ता मेळाव्यास क्रीडांगणावर परवानगी देऊ नये -सचिन काळभोर

पिंपरी- भारतीय जनता पार्टीच्या पिंपरी चिंचवड शहरचा निगडी येथील मदनलाल धिंग्रा मैदानावर 3 नोव्हेंबरला कार्यकर्ता मेळावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होत आहे. मात्र,राजकीय पक्षांना कार्यक्रम घेण्यास बंदी ठराव असल्याने मेळ्याव्यास परिवानगी देऊ नये, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांना केली आहे. 

आयुक्‍तालयासाठी दोन सहाय्यक पोलीस आयुक्‍तांची नियुक्‍ती

पिंपरी- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्‍तालयासाठी दोन सहाय्यक पोलीस आयुक्‍तांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने सोमवार दि. 29 ला काढले. या नियुक्‍तीनंतर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्‍तालायकडे पाच सहाय्यक पोलीस निरीक्षक झाले असून आणखी फोन सहाय्यक पोलीस आयुक्‍तांची आयुक्‍तालयास आवश्‍यकता आहे. सहाय्यक पोलीस आयुक्‍त नीलिमा जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्‍त रामचंद्र जाधव यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे.

स्थायी समितीत आयुक्‍तच “फैलावर’

पिंपरी- भोसरी-इंद्रायणीनगरमधील बॅडमिंटन हॉलच्या विकासकामाचा विषय मार्गी लावण्यासाठी धोरण ठरवावे लागेल, असे उत्तर महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी स्थायी समिती सभेत दिले. स्थायीचा निर्णय झालेला असतानाही अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे फक्‍त भोसरीतील विकासकामांनाच धोरण ठरवावे लागत आहे, असे का? असा प्रश्‍न स्थायी समिती सदस्य विकास डोळस यांनी उपस्थित केला. यावर महापालिका आयुक्‍त मात्र निरुत्तर झाले होते.

श्रीमंत महापालिका अन गरीब पोलीस आयुक्‍तालय

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहराचे पोलीस आयुक्‍तालय सुरु होऊन तीन महिने होत आले, तरीही आयुक्‍तालयाला अद्याप पुरेसे मनुष्यबळ व वाहने उपलब्ध झालेली नाहीत. त्यामुळे आशिया खंडात श्रीमंत असलेल्या महापालिका हद्दीतील गरीब पोलीस आयुक्‍तालय, अशी खंत पोलीस आयुक्‍त आर. के. पद्मनाभन यांनी व्यक्‍त केली.

मेट्रो मार्गातील अतिक्रमणे तातडीने हटवा

पुणे – पुणे महामेट्रोचे काम कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या. तसेच शासकीय जागेमधील मेट्रोच्या मार्गिकेवरील अतिक्रमणे तातडीने हटविण्याच्या सूचना विभागीय आयुक्त यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

राज्यातील बचतगट आता होणार “हायटेक’

सॅनफ्रान्सिस्को  – राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या समवेत बचतगटांच्या महिलांनी सॅनफ्रान्सिस्को येथे फेसबुक मुख्यालयाला भेट दिली. यावेळी व्हॉट्‌सऍप व टीआयई संस्थेलाही त्यांनी भेट दिली. ग्रामीण बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी या दोन्ही माध्यमांचा वापर प्रभावीपणे करण्यासाठी महाराष्ट्र सरकारसोबत काम करण्याचे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले.

आता महाविद्यालयीन विद्यार्थी निवडणुका होणार!

पुणे – नवीन विद्यापीठ कायद्यात महाविद्यालयीन विद्यार्थी निवडणुकाची तरतूद होती. ह्या महाविद्यालयीन निवडणुका कशा पद्धतीने घ्यावेत, त्याविषयीचे परिनियम राज्य शासनाने आज जाहीर केले. त्यानुसार येत्या 30 जुलैपूर्वी विद्यार्थी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे आवश्‍यक आहे. त्यामुळे आता महाविद्यालयीन निवडणुका घेण्याच्या निर्णयावर शिक्‍कामोर्तब झाले आहे. पुढच्या शैक्षणिक वर्षापासून महाविद्यायलीन निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

एन्काऊंटर फेम राम जाधव यांची पिंपरी चिंचवड आयुक्तालयात नियुक्ती

पिंपरी :पोलीसनामा ऑनलाईन-महाकाली आणि शाम दाभाडे या कुख्यात गुंडांचा एन्काऊंटर करणारे राम जाधव यांची पिंपरी चिंचवड आयुक्तालयात नियुक्ती करण्यात आली आहे. राम जाधव यांच्यासह नीलिमा जाधव यांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे.