Tuesday 19 December 2017

[Video] Vijay Kumbhar's Message to Fixed Deposit Holders of DSK

Help EOW, Economic Offences Wing of Pune Police - Public Police Participation is essential to recover your money - appeals Vijay Kumbhar to the Fixed Deposit Holders of DSK - D S Kulkarni Developers Ltd of Pune in this Marathi video

In 10 hours, 2.5 tonnes of e-waste collected from PCMC areas

As part of the drive, a team of 800 volunteers were stationed at 112 centres, in eight zones of Pimpri-Chinchwad area.
Electronic-waste, comprising 900 kg of cellphone chargers and USB chords, about 1,000 cellphones, including the latest models of iPhone, 17 LCD screen TVs, a total of 50 CPUs and UPS, and 21 monitors, was collected within 10 hours of a pilot drive conducted in the jurisdiction of the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) on Sunday. At the end of the day, the volunteers weighed in with more than 2.5 tonnes of collected waste.

“सिटी ट्रान्स्फॉर्मेशन’चे कामकाज सुरु

पिंपरी – केंद्र व राज्य शासनाचे पिंपरी-चिंचवड शहराच्या दृष्टीने महत्त्वपुर्ण प्रकल्प मार्गी लावणे, त्या प्रकल्पांच्या कामकाजास गती देवून ते पुर्ण करण्यासाठी समन्वयांची भूमिका बजाविणे, याकरिता मेसर्स पॅलाडीयम कन्सल्टींग इंडिया प्रा. लि. या संस्थेची नेमणूक करण्यात आली. त्यानुसार महापालिकेत सिटी ट्रान्स्फॉर्मेशन कार्यालयाच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. सद्यस्थितीत पॅलाडीयम संस्थेवर स्वच्छ भारत अभियानच्या सर्वेक्षणाची जबाबदारी सोपविली आहे.

शासनाने मागितला पालिकेच्या लेखापरिक्षणाचा अहवाल

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सन १९८२ ते २०१७ या आर्थिक वर्षांतील लेखापरिक्षणातील प्रलंबित आक्षेप आणि आक्षेपाधिन ठेवलेल्या रकमा  वसुल केलेल्या नाहीत. त्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीची दखल राज्य शासनाने घेतली आहे. या लेखापरिक्षणाबाबत सविस्तर अहवाल तत्काळ शासनाला पाठवावा, असा आदेश नगरविकास विभागाचे कार्यासन अधिकारी दिलीप वणिरे यांनी आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांना दिला  आहे.

पीएमआरडीएकडून कार्यक्षेत्राचा वाहतूक आराखडा

पुणे - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) आपल्या सात हजार २०० चौरस किलोमीटर क्षेत्राचा वाहतूक आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, एल ॲण्ड टी इन्फ्रास्ट्रक्‍चर इंजिनिअरिंग या कंपनीला हे काम देण्यात आले आहे.

मेट्रोच्या कामाला पिंपरीत गती

पिंपरी - पिंपरी ते रेंजहिल्सदरम्यान सुरू असणाऱ्या मेट्रोच्या कामाची गती वाढली आहे. खराळवाडीजवळ खांबावरील पुलाच्या बांधकामाला सुरवात झाली असून, त्याच्या पहिल्या सेगमेंटची उभारणी पूर्ण केली आहे. 
येत्या काही दिवसांमध्ये या कामाचा वेग आणखी वाढणार आहे. बॉक्‍स गर्डर तंत्रज्ञानाचा वापर करून या सेगमेंटची निर्मिती करण्यात आली असून, त्याचे वजन सुमारे ५० टनांच्या आसपास आहे. सेगमेंट बसविण्यासाठी मोठ्या क्रेनचा वापर करण्यात आला आहे. नाशिक फाट्याजवळील कास्टिंग यार्डमध्ये हे सेगमेंट तयार करण्याचे काम सुरू आहे. सध्या त्या ठिकाणी ४० सेगमेंट तयार करण्यात आले आहेत. 

स्वारगेट ते कात्रज मेट्रोही भूमिगत

पुणे - नियोजित स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्ग भुयारी असेल. त्यानुसार कृषी महाविद्यालयाच्‍या मागील बाजू ते कात्रज हा दहा किलोमीटर लांबीचा मार्ग भुयारी होणार आहे. या कामांच्या हालचालींना महापालिका आणि महामेट्रोच्या पातळीवर गती मिळाली आहे. या मार्गाची पाहणी करून लवकरच त्याचा सविस्तर अहवाल तयार करण्यात येईल, असे महापालिका प्रशासनाने सांगितले.

रिक्षाप्रवास मीटरप्रमाणेच

पिंपरी - आपण कधी पुण्यात रिक्षाने प्रवास केला तर, मीटरप्रमाणे भाडे द्यावे लागते. पिंपरी-चिंचवड शहरात मात्र रिक्षाचालक सांगेल तेच भाडे द्यावे लागते. पुण्याचे जुळे शहर, औद्योगिक शहर, श्रीमंत महापालिका अशी बिरुदे मिरविणाऱ्या शहरात हा विरोधाभास का, असा प्रश्‍न निश्‍चित उपस्थित होत होता. मीटरसक्ती असूनही लागू होत नव्हती. रिक्षाचालक, संघटना, पोलिस, आरटीओ या यंत्रणाही ती लागू करण्यास तयार होत्या. तरीही प्रवाशांकडून मनमानी पद्धतीने भाडे आकारले जायचे. आता गुरुवारपासून (ता. १४) मीटरसक्तीची कडक अमंलबजावणी पोलिसांनी सुरू केली आहे.

मनपाच्या इमारतीचा अनधिकृत वापर?

पिंपरी – महापालिकेचे पिंपळे गुरव येथील सांस्कृतिक भवनाच्या इमारतीमध्ये ममता अंध अनाथ केंद्र अनधिकृतपणे सुरू आहे. त्यांनी भाजपच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून भवनाचा ताबा घेतला आहे. यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत असून, संबंधितांवर महापालिकेने कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

पिंपरी-चिंचवड वर्तमान – समाविष्ट गावांची दुष्टचक्रातून सुटका?

समाविष्ट गावांमधील रस्त्यांच्या विकासासाठी स्थायी समितीने नुकतेच 425 कोटींच्या खर्चाला मंजुरी दिली. 20 वर्षाच्या वनवासानंतर समाविष्ट गावांसाठी भाजपकडून सुखद पाऊल उचलले गेले आहे. त्यामुळे समाविष्ट गावांना अच्छे दिन येणार अशी चर्चा रंगली आहे. पायाभूत सोईसुविधांचा अभाव, अनधिकृत बांधकामे, रेडझोनमुळे विकासाला आलेल्या मर्यादा, अनधिकृत बांधकामे, वाढती अतिक्रमणे, त्यातच निधीच्या बाबतीत होत असलेला सवतासुभा या दुष्टचक्रातून समाविष्ट गावांची सुटका होईल का, हा प्रश्‍न अनुत्तरीत आहे.

उद्योगनगरीत लोकप्रतिनिधींचे बेसुमार नामफलक

पालिकेला उशिरा सुचले शहाणपण; उद्या सभेत नवे नामफलक धोरण
पिंपरी-चिंचवड शहरात लोकप्रतिनिधींच्या नामफलकांचा सुळसुळाट झाला आहे. राजकीय वर्तुळातील माननीयांचा ‘मान’ राखण्यासाठी पालिकेने जागोजागी फलक लावले असताना, अनेकांनी स्वत:हून मोक्याच्या ठिकाणी फलकबाजी करत मिरवण्याची हौस भागवून घेतली आहे. नगरसेवक नसणारे ‘स्वीकृत’ कार्यकर्ते नगरसेवक म्हणून झळकत आहेत. ‘माजी’ लोकप्रतिनिधींना फलक हवेच आहेत. अशा प्रकारच्या फलकबाजीमुळे शहरातील विद्रुपीकरणाला हातभारच लागला आहे. या संदर्भातील कारवाईत कुचराई करणाऱ्या पालिकेला उशिरा शहाणपण सुचले आहे. त्यामुळेच नवे नामफलक धोरण तयार करण्यात आले आहे. मात्र, तेही अर्धवट असल्यासारखे दिसून येते.

MSEDCL halts construction adjoining Pimple Saudagar society after its wall caves in

A formal complaint has been registered with Sangvi cops, demanding that the developer compensate the residents
A day after the Nisarg Nirman Co-operative Housing Society in Pimple Saudagar claimed that its retaining wall caved in along with eight big trees due to reckless excavation by the developer, the Kalewadi division of the Maharashtra State Electricity Distribution Company (MSEDCL) has issued a stop-work notice to the site in-charge of the Wonder Car construction project.

रेडझोनच्या हद्दीतील नागरिकांना कर्जासाठी ‘ना हरकत दाखला’ द्यावा

पिंपरी (Pclive7.com):- प्राधिकरण, निगडी, यमुनानगर, साईनाथनगर या भागातील तब्बल सात हजार घरे स्वत:च्या मालकीचे असतानाही ती केवळ रेड झोनच्या हद्दीत येत असल्याने त्यांना राष्ट्रीयकृत बँका कर्ज देत नाहीत. त्यामुळे स्वत:चे घर असूनही रहिवाशांना कर्ज मिळत नसल्याने आर्थिक कुंचबणा होत आहे. त्यात प्राधिकरणही कर्जासाठी ‘ना हरकत दाखला’ देत नसल्याने रहिवाशी आर्थिक कात्रीत सापडले आहे. या नागरिकांना ना हरकत दाखले देण्याची मागणी मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे. 

'कोर्टाची पायरी चढण्यापूर्वी" पुस्तकाचे प्रकाशन

पुणे - 'कोर्टाची पायरी चढण्यापूर्वी प्रकरणे आपापसांत मिटविण्याचा प्रयत्न नागरिकांनी करावा. त्यासाठी कायद्याची वेळीच माहिती घेतल्यास व्यवहारात चुका न होता कोर्टाची पायरी चढण्याची वेळ येणार नाही. त्यामुळे नागरिकांनी दैनंदिन व्यवहारात नेहमी लागणाऱ्या तेवीस दिवाणी कायद्यांची थोडीफार माहिती घेणे आवश्‍यक आहे,'' असे मत मुख्य जिल्हा न्यायाधीश श्रीराम मोडक यांनी व्यक्त केले.

निर्माल्यामुळे चिंचवड घाट परिसर अस्वच्छ

– मार्गशीर्ष व्रत समाप्तीनंतरची परिस्थिती 
– प्राधिकरण कृती समितीने घाट केला चकाचक
पिंपरी – मार्गशीर्ष महिन्यांचा समारोप झाल्यानंतर पुजेचे निर्माल्य टाकल्याने चिंचवड घाटावर अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले होते. मात्र, प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीने स्वयंस्फूर्तीने स्वच्छता मोहीम राबवून घाट परिसर स्वच्छ केला. घरातील कचरा रस्त्यावर टाकणाऱ्यांची मानसिकता बदलणार कधी, असा सवाल समितीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.

देशी गायींच्या संवर्धनासाठी केंद्राई ठरतेय रोल मॉडेल

पिंपरी – देशी गायींचे संवर्धन व्हावे, गो सेवा व्हावी तसेच हजारो आजारांवर औषध म्हणून उपयुक्त ठरणाऱ्या गायीचं शेण आणि गोमूत्रापासून रामबाण औषधीचा लाभ गरजुंना मिळावा या उद्देशाने गोशाळेचे व्यावसायिकरण न करताना गोसंवर्धनाला महत्त्व देणारी “केंद्राई’ गो शाळेत सध्या देशी गायींचे पालन केले जात आहे.

सांगवी फाट्यावर पादचाऱ्यांची गैरसोय

पिंपरी – शहरातील सांगवी फाट्यावर उड्डाणपूल व ग्रेडसेपरेटर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. शंभर कोटीचा उड्डाणपूल व ग्रेडसेपरेटर खर्च केले असले तरीही पादचारी नागरिकांची गैरसोय होवू लागली आहे. डांगे चौक रस्त्यावर असणाऱ्या नागरिकाला सांगवीकडे जाणाऱ्या रस्त्यावर जाण्याकरिता अधिकाऱ्यांनी पादचाऱ्यांसाठी कुठलीच सुविधा उपलब्ध केली नसल्याने “स्काय वॉक’ची मागणी होवू लागली आहे.

पिंपरीत भाजीपाल्याची आवक घटली

पिंपरी – पिंपरी उपबाजारात रविवारी फळभाज्यांबरोबरच पालेभाज्यांची ही आवक घटली. कांद्याची चार क्विंटल आवक होऊन, भाव 2700 रुपयांवर स्थिरावला. भेंडीची आवक 16 क्विंटलने घटून भाव मात्र स्थिर राहिले.