Friday 1 December 2017

निगडीपर्यंत मेट्रोसाठी शुक्रवारी पिंपरीत मानवी साखळी

पिंपरी -पुणे व पिंपरी चिंचवड शहरात मेट्रोचे आगमन होत आहे. आपल्या पिंपरी चिंचवड साठी ही अभिमानाची गोष्ट आहे. तसेच शहराकरीता सोयीची आहे व आपण सर्वांनी याचे स्वागत करायचे आहे. मात्र, पहिल्या टप्प्यामध्ये मेट्रोचा मार्ग पिंपरी पर्यंतच आहे. तीच मेट्रो पहिल्या टप्प्यातच निगडीपर्यंत होणे गरजेचे आहे. हीच मागणी शांततेच्या मार्गाने मांडण्यासाठी पिंपरी चिंचवड सिटीझन फोरम तर्फे पिंपरीत मानवी साखळीचे शुक्रवारी (दि.30) आयोजन करण्यात आले आहे.

कोंडी सुटण्यास लागणार तीन महिने

पिंपरी - एम्पायर इस्टेट येथील उड्डाण पुलावरील वाहतूक सुरू झाल्याशिवाय पिंपरी कॅम्पातील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सुटणार नसल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्पष्ट केले. एम्पायर इस्टेट पुलावरील वाहतूक सुरू होण्यास आणखी तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. दरम्यान, पिंपरीतील वाहतूक कोंडी समस्या सोडविण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेण्याची मागणी नगरसेवकांनी केली आहे.

रेड झोनबाबत संरक्षणमंत्र्यांशी चर्चा - श्रीरंग बारणे

पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये संरक्षणविषयी अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या संदर्भात खासदार श्रीरंग बारणे यांनी संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेऊन चर्चा केली. रेडझोन, बोपखेल येथील संरक्षण विभागाच्या हद्दीतून जाणाऱ्या रस्त्याबाबत, मावळ येथील मिसाईल प्रकल्प व उरण येथील नौदल संवेदनशील भाग असे अनेक प्रश्न तपासून मार्गी लावले जातील, असे आश्‍वासन सीतारामन यांनी दिले. 

पुण्यात पाच नवीन आयटी पार्क सुरू

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात राज्य आघाडी घेत असून, राज्यात २५ नवीन आयटी पार्क सुरू झाले आहेत. यामध्ये पुण्यामधील पाच आयटी पार्कचा समावेश आहे. त्याचबरोबर बालेवाडी टेक पार्क लवकरच सुरू होणार आहे.

Cops & volunteers team up for women’s safety with helpline

Pimpri Chinchwad: A team of volunteers with the Pune police started 'Project Shaurya' for women's safety in Pune and Pimpri Chinchwad and rural areas of Maval taluka on Thursday. The project Shaurya will cover areas from Dehu Road to Khandala apart from the cities. A 14-point safety manual for women's safety and security and a 24x7 helpline, 9146123381, were launched

Five major Maharashtra wholesale markets: Govt likely to appoint officials as directors

Officials say the move will free the markets from political interference and allow for better implementation of schemes
Five major wholesale markets in the state, including Pune’s, are likely to see a major change in the way their board of directors are elected. Instead of elections to pick the board, the state government is likely to appoint senior officials as directors to run these markets. These five markets — the wholesale markets of Vashi, Nashik, Kolhapur and Nagpur, besides Pune — receive around 30 per cent of the commodities arriving from other states and have substantially large turnovers. Vashi’s is the largest wholesale market in the state and, besides Maharashtra, records arrivals from Gujarat, among other states. The move to appoint senior officials as directors is part of the new model Agricultural Produce Marketing Committee (APMC) Act circulated by the central government in March this year. The Act specifies markets with more than 30 per cent arrival from other states as markets of national importance.

पालिकेच्या सेवानिवृत्तांचा महापौरांच्या हस्ते सत्कार

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या तसेच स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या एकूण 12 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आज गुरूवारी (दि. 30) महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते शाल, स्मृतिचिन्ह, सेवाउपदान व अंशराशीकृत धनादेश सुपूर्द करुन सन्मान करण्यात आला.

GDP पोहोचला 6.3 टक्क्यांवर; पण हे नेमकं काय असतं?

गल्लीपासून दिल्लीपर्यंत 'जीडीपी' ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट अर्थात 'सकल राष्ट्रीय उत्पन' या संकल्पनेची नेहमीच चर्चा असते. पण हे जीडीपी नक्की असतं तरी काय?
गुरुवारी केंद्रीय सांख्यिकी संस्थेने या तिमाहीचा जीडीपी जाहीर केला. कोणत्याही देशाच्या आर्थिक आरोग्याचं सकल राष्ट्रीय उत्पन्न द्योतक आहे. एका विशिष्ट कालावधीत देशातल्या वस्तू आणि सेवांच्या उत्पादनाची किंमत म्हणजेच जीडीपी होय.

अपंगांसाठी स्वतंत्र सुविधा केंद्र निर्णयाचे स्वागत

पिंपरी– नवी मुंबई महापालिकेच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवडमध्ये महापालिकेच्या वतीने अपंग सुविधा केंद्र उभारण्यात येणार आहे. त्याद्वारे शहरातील अंध, अपंग, मतीमंद अशा विशेष व्यक्तींना एकाच ठिकाणी सर्व सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

प्लॅस्टिक हानीसाठी पथनाट्याद्वारे जनजागृती

पिंपरी– समाजसेवेचे बीज लहानपणापासूनच मुलांमध्ये रुजविण्यात यावेत, या हेतूने भोसरी इंद्रायणी नगरातील प्रियदर्शनी शाळेने प्लॅस्टीक वापराचे तोटे यासंदर्भात जनजागृती मोहिम खेड तालुक्‍यात राबविली आहे.
2017 – 18 या शैक्षणिक वर्षात शाळेने प्लास्टिक वापराला नकार हा प्रकल्प शाळा आणि समाजसेवेतून निवडला आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे खेड तालुक्‍यातील आसखेड या गावी जाऊन गावातील लोकांना प्लॅस्टिकच्या अति वापराचे तोटे याबाबत जनजागृती केली आहे.

ई- कॉमर्सला लागणार कर

नवी दिल्ली – ई-कॉमर्स कंपन्यांसह गुगल, जी-मेलला भारतातून एकत्रित होणाऱ्या डाटासाठी येत्या काळात कर द्यावा लागण्याची शक्‍यता आहे. दूरसंचार मंत्रालय टेलिकॉम पॉलिसीमध्ये अशा प्रकारच्या प्रस्तावावर विचार करीत आहेत. या इंटरनेट सेवा देणाऱ्या दूरसंचार कंपन्यांनाही कोणतेच शुल्क देत नाहीत. या स्थितीत एक समान प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या कंपन्यांना कराच्या जाळ्यात आणण्याचा विचार सुरू आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

एडस प्रतिऔषधांना दाद न देणाऱ्या विषाणूवर लवकरच संशोधन

पिंपरी – एडस हा जरी नागरिकांना भीतीदायक वाटणारा रोग असला तरी आता मनुष्याच्या शरीरात असे कोणते घातक विषाणू प्रवेश करतात (ड्रग्स रेजिस्टटंस व्हायरस) की जे एडसच्या प्रतिऔषधांवरही मात करतात जे औषधांना दाद देत नाहीत, अशा विषाणूना दाद न देणाऱ्या विषाणूचे प्रमाण आता लवकरच संशोधनाच्या माध्यमातून समजणार आहे. जागतिक एडस दिनानिमित्त येत्या काही कालावधीत हे संशोधन लवकरच घोषित केले जाणार आहे.

भोसरीत “प्रकाश” व्याख्यान माला

पिंपरी – भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीच्या प्रितम प्रकाश महाविद्यालय व शाहू शिक्षण संस्थेचे राणी पुतळाबाई महिला विधी महाविद्यालयाच्या विद्यमाने “प्रकाश” व्याख्यान मालेचे आयोजित केली आहे. शुक्रवार दि. 1 ते 3 डिसेंबर व्याख्यान माला आहे. आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते उद्‌घाटन होणार आहे. यावेळी शाहू शिक्षण संस्था व माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, भगवान महावीर सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अशोक पगारिया, डॉ. कैलास पाटेकर, अखिल भारतीय जैन कॉन्फरन्स पंचम झोनचे अध्यक्ष कांतीलाल बोथरा, नेवासा संत ज्ञानेश्‍वर विद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक शिंदे, महात्मा फुले विद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक भोईटे, अठराव्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रकाश रोकडे, राजमाता जिजाऊ विद्यालयाचे प्राचार्य डॉ. गौतम भोंग, मोनिका भंडारी उपस्थित राहतील.

पिंपरीत स्टूडंट ऑलम्पिक राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन

पिंपरी – स्टूडंट ऑलम्पिक असोसिएशन ऑफ पुणे जिल्हा यांच्या वतीने चौथ्या स्टूडंट ऑलम्पिक राज्यस्तरीय स्पर्धेचे 1 ते 3 डिसेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत राज्यभरातील 500 खेळाडू सहभागी होणार आहेत, अशी माहिती स्टूडंट ऑलम्पिक असोसिएशन ऑफ पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी दिली.