Monday 23 July 2018

मेट्रो स्थानकांच्या कामांना ‘वायरिंग’चे आव्हान

वनाज ते रामवाडी (रिच 2) या मेट्रो मार्गावर एकूण 16 मेट्रो स्थानकेआहेत. यापैकी काही स्थानके रस्त्याकडेला असणार आहेत. रस्त्याच्या बाजूने असणार्‍या अशा स्थानकांचे बांधकाम करतेवेळी लाईट, फोन व इतर अशा अनेक सुविधांच्या वायरिंगचे जाळे असल्यामुळे खोदकाम करताना  अडथळा होणाची शक्यता आहे. त्यामुळे येथील काम सुरू करण्यासाठी संबंधित कंपन्यांच्या एजन्सीजशी बोलणी करून मगच कामाला सुरुवात करावी लागणार आहे. त्यामुळे मेट्रोच्या इतर कामापेक्षा स्टेशनच्या कामाला वेळ होत आहे. 

हायपरलूपसाठी पुढचा टप्पा; सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू

पुणे – हायपरलूपसाठी प्रायोगिक तत्त्वावर उभारण्यात येणारा 15 किलोमीटर लांबीचा पहिल्या “डेमन्स्ट्रेशन ट्रॅक’चा पूर्व व्यवहार्यता पडताळणी अहवाल या महिन्याअखेर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) सादर होणार आहे. दरम्यान, संबंधित कंपनीशी करार करण्यासाठी कायदेशीर, आर्थिक आणि तांत्रिक सल्लागार नेमण्याची प्रक्रिया प्राधिकरणाकडून सुरू करण्यात आली आहे.

अधिकाऱ्यांनी विकास योजनांची अंमलबजावणी करावी

“दिशा’च्या बैठकीत खासदार आढळराव यांचे आदेश
पुणे – जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण (दिशा) समिती ही लोकविकासाच्या योजना राबविताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी आहे. त्यामुळे जनता आणि प्रशासन यामध्ये समन्वय साधणाऱ्या या समितीच्या सभेत देण्यात आलेल्या सूचनांनुसार अधिकाऱ्यांनी लोकविकासाच्या योजनांची यशस्वी अंमलबजावणी करावी, असे आदेश खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी दिले. विधानभवन येथील सभागृहात खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दिशाची बैठक पार पडली.

महापालिकेच्या रुग्णालयांसाठी ११ कोटींची औषध खरेदी

पिंपरी - महापालिकेची रुग्णालये व दवाखान्यांसाठी सुमारे साडेअकरा कोटी रुपयांची औषधे व वैद्यकीय साहित्य खरेदी करण्यात येणार आहे. सर्वसामान्य रुग्णांना त्याचा लाभ मिळणार आहे.

क्रांतिवीर चापेकर बंधूंनी देशभक्तीची ज्योत प्रज्ज्वलित केली – देवेंद्र फडणवीस

क्रांतिवीर चापेकर बंधूंनी देशभक्तीची ज्योत प्रज्ज्वलित केली. क्रांतीचे स्फुल्लिंग चेतावले. संकुचित विचारांपेक्षा देशाचा विचार केला. त्यांनी स्वातंत्र्याची बिजे रोवली. क्रांतीची लढाई उभारली.  त्यांच्या बलिदानाचे मोल जपायला हवे. देशासाठी बलिदान करणा-या चापेकर बंधूंचे विस्मरण होता कामा नये, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (सोमवारी) चिंचवड येथे केले. तसेच इतिहास विसरणा-या समाजाला वर्तमान असतो; मात्र भविष्य नसते. स्वराज्य मिळाले आहे. आता आपल्याला सुराज्याची लढाई सुरु करायची आहे, असेही ते म्हणाले.

अनधिकृत बांधकामांना दंड आकारण्याचा अधिकार महापालिकांना देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यभरातील अनधिकृत बांधकामे नियमितीसाठी कायद्यानुसार संबंधित बांधकामाला दंड आकारणीचा निर्णय राज्य सरकारने घेतला. परंतु, दंडाची रक्कम मोठी असल्यामुळे अनधिकृत बांधकामे नियमित होण्यास अडथळा येत आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकामांना किती दंड आकारायचे याचे सर्वाधिकारीमहापालिकांना देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (दि. २३) चिंचवड येथे केली. तसेच शास्तीकर आकारण्याच्या विधेयकातीलत्रुटी दूर करून सर्वसामान्यांना होणारा त्रास कमी केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

भाजपकडूनही आझम पानसरेंचा वापरच

समर्थकांकडून मुख्यमंत्र्यांना आज देणार निवेदन

महापालिकेतील सत्तांतर घडवून आणण्यात मोलाची भूमिका बजविणाऱ्या माजी महापौर आझम पानसरे यांना देखील भाजपने आश्वासनांचे गाजर दाखविल्याने त्यांचे समर्थक आता एकत्र आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज, सोमवारी पिंपरी-चिंचवडमध्ये येत असल्याने पानसरे समर्थकांनी आपला मोर्चा मुख्यमंत्र्यांकडे वळविला आहे. महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचा सुपडा साफ करण्यापूर्वी पानसरेंना दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यात येणार आहे.

औरंगाबाद महापालिकेच्या अगोदर पिंपरी महापालिका बरखास्त करण्यात यावी

सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांची मागणी
पिंपरी : औरंगाबाद महापालिका क्षेत्रात कचरा कोंडी होते आहे. कोंडी सोडविण्यासाठी 100 कोटी कचरा प्रक्रियेची निविदा आजवर पारदर्शकपणे पार पडली नाही. कचरा समस्या सुटण्यासाठी राजकीय पक्षांनी आडकाठी आणून जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न झाल्यास औरंगाबाद महापालिका बरखास्त करू असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला होता. परंतु, औरंगाबाद महापालिकेपेक्षा पिंपरी महापालिकेत मोठ्या प्रमाणात गैरव्यहार झाला आहे. त्यामुळे औरंगाबाद महापालिकेच्या अगोदर पिंपरी महापालिका बरखास्त करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले आहे.

रिडिंगशिवाय मोघम वीजबिलांचे वाटप

चिखली - घरगुती वीज ग्राहकांना रिडिंग न घेताच मोघम वीजबिले दिली जात आहेत. महावितरणच्या या मनमानी आणि अनागोंदी कारभाराचा फटका नागरिकांना बसत आहे. मोघम वीजबिल देणे बंद करून महावितरणने आर्थिक व मानसिक पिळवणूक थांबवावी, अशी मागणी नागरिकांनी केली. 

इकोफ्रेंडली घरासाठी…

पर्यावरण असेल तर आपण वाचू हे निर्विवाद सत्य आहे. त्यामुळे पर्यावरणरक्षणाप्रती आपण अधिक सजग झालो आहोत. मग प्लॅस्टिक पिशव्यांवरील बंदीचा निर्णय का असेना. प्लॅस्टिकऐवजी कापडी पिशवी आणि कागदाच्या पिशव्या वापरण्याकडे अधिक कल असला पाहिजे. त्यासाठी सध्या दंड आकारण्यासही सुरुवात झाली आहे. अर्थात, दंड भरण्यापेक्षाही जीवनशैलीत काही बदल आणि सवयींमध्ये बदल केल्यास पर्यावरण रक्षणासाठी आवश्यअक बदल नक्कीच करता येतील. काही किफायतशीर उपाय केल्यास आपले घर पर्यावरणपूरक होऊ शकते आणि निसर्गातील सौंदर्य आणि हिरवाई कायम राहू शकण्यासाठी जे प्रयत्न केले जातात ते अधिक पक्के होतात.

नागरवस्ती विभागाला कर्मचारी मिळेना

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या लोकाभिमुख असलेल्या नागरवस्ती विकास योजना विभागातील सहा समूह संघटकांच्या सहा महिने मुदतवाढीचा विषय स्थायीच्या मान्यतेकरिता ठेवण्यात आला आहे. तर महापालिका आस्थापनेवर समाजसेवक अभिनामाची चार पदे मंजूर असताना देखील केवळ एकावर कर्मचारी कार्यरत आहे. उर्वरित तीन पदांची अद्यापही भरती न झाल्याने या विभागात कंत्राटी कर्मचाऱ्यांचाच तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे लाभार्थींना लाभ देण्यात अडचणी निर्माण होत आहेत.

खड्डे बुजवण्याचे काम सुरू

रहाटणी : पिंपळे सौदागर परिसरात रहाटणीतील कोकणे चौक ते लिओन ओर्बिट सोसायटी येथे चालू असलेल्या मुख्य रस्त्याच्या कामामुळे सेवा रस्त्यावर खड्डे पडले होते. नगरसेवक नाना काटे यांनी महापालिकेच्या संबंधित अधिकार्‍यांना खड्डे लवकरात लवकर बुजवण्यात यावे अशा सूचना देण्यात आल्या. ते खड्डे पालिकेच्यावतीने आधुनिक पद्धतीने बुजवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

18 विद्यार्थ्यांना सायकल वाटप

पिंपरी : येथील ह्युमन्स सोसायटीच्यावतीने प्रयोगवन परिवार आणि टीम एकलव्यच्या सहयोगाने राबविले जाणार्‍या सायकलदान महाअभियानच्या अंतर्गत अहमदनगर येथील पिंपरकरणे गावात 18 विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले. यावेळी रेडिओ सिटीच्या आर. जे. सोनाली, प्रयोगवन परिवाराचे अध्यक्ष सत्तार शेख, ह्युमन्स सोसायटीच्यावतीने समाधान पाटील, गडवाट परिवाराचे बीएसएफ फोडसे, संदीप दराडे आणि शाळेतील अध्यापक आदी उपस्थित होते. हा सायकल वितरणाचा पहिला टप्पा असून, अजून बर्‍याच गरजू विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचणार असल्याचे सायकलदान महाअभियानचे समन्वयक समाधान पाटील यांनी सांगितले.

दिघीकरांना मिळणार माफक दरात भाजीपाला

शेतकरी आठवडे बाजारचे रविवारी उद्घाटन 
पिंपरी : महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळ यांच्या सहकार्याने जगदंब अ‍ॅग्रोटेक फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, नगरसेवक विकास डोळस आणि कुलदीप परांडे यांच्या संयुक्त विद्यमाने दिघीत शेतकरी आठवडे बाजारचे दर रविवारी आयोजन करण्यात येणार आहे. यामुळे दिघीकरांना ताजा आणि माफक दरात भाजीपाला मिळणार आहे, अशी माहिती नगरसेवक विकास डोळस यांनी दिली. दिघीतील, पोलाईट पॅनोरमा रोड येथे दर रविवारी दुपारी तीन ते रात्री नऊ या वेळेत ‘शेतकरी आठवडे बाजार’ भरणार आहे. सायंकाळी साडेपाच वाजता या उपक्रमाचे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे.

18 वर्षांच्या लढ्यास यश; महापालिकेला उच्च न्यायालयाचा आदेश

सफाई कंत्राटी कामगारांना तीन महिन्यात फरकाची रक्कम द्याराष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांची माहिती

“नो एन्ट्री’तील वाहनांवर कारवाई

पिंपरी – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर अनधिकृतपणे उभ्या असणाऱ्या चारचाकी वाहनांना “जॅमर’ लावणे व “नो एन्ट्री’त शिरणाऱ्या वाहनांवरील कारवाईची मोहीम गेल्या दोन दिवसापासून पिंपरी वाहतूक पोलिसांकडून राबविण्यात आली. यावेळी, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांकडून पंधरा हजारहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे.