Tuesday 28 November 2017

[Video] अधिकारी काम करत असेल तेथे सल्लागार नको – श्रावण हार्डीकर


बीआरटी १०० किलोमीटर

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात येत्या सहा महिन्यांत बस रॅपिड ट्रान्झिट (बीआरटी) सेवा देशात सर्वाधिक प्रवासी वाहतूक करणारी होईल. या काळात होणाऱ्या ४५ किलोमीटर मार्गामुळे सुमारे साडेतीन लाख प्रवासी प्रवास करतील, अशी अपेक्षा आहे. अहमदाबादमध्ये बीआरटीचे ९७ किलोमीटरचे जाळे असून, पिंपरी-चिंचवडमध्ये हा विस्तार शंभर किलोमीटर करण्याचे नियोजन आहे.

[Video] शिक्षणाच्या आयचा... घो!

दिवसा कॉलेज रात्री हॉटेल 

Maharashtra govt tells plastic bottle firms to set up recycling plants or shut business

The Maharashtra government has asked plastic bottle manufacturers and mineral water firms to set up recycling plants for bottles, without which they have to down their shutters.

The companies were asked to comply with the plastic waste management rules, according to which they are required to recycle plastic bottles. However, none of the units have recycling facilities.

Next year, Puneites will dial 112 for emergency services

Pune: Soon, people in the State will dial 112 to avail emergency services like police, fire or ambulance. In the first phase the ‘Maharashtra Emergency Response System’ (MERS) dial 112 will be launched in 16 districts including Pune.

[Video] देशातला सर्वात मोठा ध्वजस्तंभ


Boost for national pride

A brand new monument is set to greet travellers entering the city at Bhakti Shakti Chowk at Nigdi - massive Indian national flag. The idea of erecting monumental flags was brought forward by MP Naveen Jindal, the idea being to have a constant reminder of national pride all through the year.

Government mulls new land rules in an effort to check lease violation

PUNE: The state government may frame new land lease ruleswith the Public Accounts Committee (PAC) finding gross land lease violations across Maharashtra.

PAC has pointed out gross lease violations with respect to lands leased out by various district collectorates to educational institutions and local bodies. The violations pertain to non-renewal of lease to re-leasing of land without permission and non-usage of land for the purpose lease was granted.

संकल्प जलपर्णीमुक्त पवनेचा

पिंपरी - सामाजिक कामाच्या ध्येयाने झपाटलेल्या तरुणाने पवना नदी जलपर्णीमुक्‍त करण्याचा संकल्प केला आहे. त्यांच्या या कामाला सामाजिक संस्थांनीही आर्थिक पाठबळ दिले आहे. एकेकाळी जलपर्णीमुळे हिरवीगार दिसणाऱ्या पवना नदीतील पाणी आता दिसू लागल्याने पवनामाईने स्वच्छतेचा ध्यास घेतलेला आहे. 

माझी नदी, माझी जबाबदारी

पवना धरण ते दापोडी या पवना नदीच्या उगम ते संगम असलेले पात्र जलपर्णीमुक्त करण्याचा ध्यास सामाजिक संघटना आणि नागरिकांनी घेतला आहे. त्याअंतर्गत ‘माझी नदी, माझी जबाबदारी’ उपक्रमातील सहभाग वाढत आहे.
दर रविवारी नागरिकांनी एकत्र येऊन पवना नदी जलपर्णीमुक्त आणि स्वच्छ करण्याचा संकल्प सोडला आहे. त्याअंतर्गत सलग दुसऱ्या रविवारी रोटरी क्लब वाल्हेकरवाडीसह २२ संघटना, बचतगट यांनी उपक्रमात सहभाग नोंदविला. त्यामध्ये नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, सचिन चिंचवडे, शेखर चिंचवडे, संजय कुलकर्णी, प्रदीप वाल्हेकर यांनी भाग घेतला. प्रवीण लडकत, राजीव भावसार, सोमनाथ मुसुडगे यांनी मार्गदर्शन केले. गेल्या काही दिवसांत नदीच्या पात्रातून १५ ट्रक कचरा आणि जलपर्णी काढण्यात आली.

संतपीठाचा “डीपीआर’ लांबणीवर; प्रशासनाला मिळेना वेळ, अभ्यास दौरा होवूनही अहवालाची प्रतिक्षा

चिखली येथे महापालिकेच्या वतीने राज्यातील पहिले जगद्‌गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ उभारले जाणार आहे. या संतपीठाचा विकास आराखडा व त्यातील आवश्‍यक सोयी-सुविधा, संत साहित्य, वाडःमयाची रचना आदी माहिती मिळविण्यासाठी महापालिका पदाधिकारी, समिती सदस्य, अधिकाऱ्यांनी अभ्यास दौरा पुर्ण केला आहे. मात्र, त्या दौऱ्याचा अहवाल अद्याप प्रशासनाने आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्याकडे सादर न केल्याने संतपीठाचा आराखड्यांची मान्यता लांबणीवर पडली आहे. यामुळे वारकरी संप्रदाय वर्गातून तीव्र नाराजीचा सूर उमटला आहे.

पालकमंत्री बापटांनी घेतला पालिकेचा आढावा

शहरात नगरसेवक, पदाधिका-यांकडून विकासकामांना आप्तेष्ट, नातेवाईकांची नावे देण्याची परंपरा आहे. त्यावरून पालकमंत्री गिरीश बापट यांनी पिंपरी महापालिकेतील पदाधिकारी, अधिका-यांना खडसावले आहे. थोर, महापुरुषांची नावे प्रकल्पांना द्यावीत. घरातील किंवा कोणाचेही नाव देवू नका, असे स्पष्ट करत बापट यांनी त्याबाबत धोरण ठरविण्याच्या सूचना पालिका अधिका-यांना दिल्या आहेत.

शेतकऱ्यांच्या हितासाठी "माण हायटेक सिटी'

पिंपरी - एखाद्या ठिकाणी उद्योग उभारणीसाठी एमआयडीसीकडून शेतकऱ्यांच्या जमिनीचे संपादन होणार असले, की त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा होते. पण, शेतकऱ्यांच्या जमिनीवर उभ्या राहणाऱ्या कंपन्यांची मालकी शेतकऱ्यांकडेच राहिली तर... त्यांना कायमस्वरूपी निश्‍चितच चांगला फायदा होऊ शकतो. या विचारातूनच माणमधील डॉ. यशराज पारखी यांनी "माण हायटेक सिटी' ही अनोखी योजना तयार करून ती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला दिली आहे.

विनापरवाना सापांचे प्रदर्शन पडले महागात

– भोसरीतील सर्प मित्रावर कारवाई 
– बाल दिनी अल्पवयीन मुलींकडून केले होते प्रदर्शन 
– घरात आढळले विना परवाना दोन सर्प व अंडी
पिंपरी – सर्प मित्र म्हणून असलेली ओळखपत्राची मुदत संपलेली असताना घरात साप व अंडी बाळगल्याबद्दल तसेच अल्पवयीन मुलींकडून सापांचे प्रदर्शन केल्याबद्दल भोसरीतील एका सर्प मित्रावर वन विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच त्याला न्यायालयात हजर केले असता पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला.

“त्या’ अधिकाऱ्यांनी घेतला धसका

पिंपरी – महापालिकेतील 2008-09 व 2009-10 या दोन वर्षांचे लेखापरिक्षण झालेले आहे. त्या वर्षांतील काही “रेकॉर्ड’ लेखा परीक्षणास उपलब्ध होत नव्हते. त्या-त्या विभागातील कर्मचाऱ्यांनी ते गहाळ केले होते. याबाबत आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी 47 अधिकारी व कर्मचाऱ्यांना नोटीस बजावून सात दिवसाची मुदत दिली. त्यामुळे नोटीस दिलेल्या सर्वांनी “रेकॉर्ड’ उपलब्ध करुन दिले असून, त्याची छाननी करण्यासाठी लेखा परीक्षण विभागाकडे पाठविण्यात आले आहे.

पद्यावती चित्रपटाविरोधात महापालिकेवर मोर्चा

पिंपरी – संजय लीला भन्साळी दिग्दर्शित पद्मावती चित्रपटात पद्मिनी राणीचा अपमान केला असल्याचा आरोप करत या चित्रपटाच्या विरोधात पिंपरी चिंचवड राजपूत समाज संघटनेने आज (सोमवारी) महापालिकेवर मोर्चा काढला. यावेळी आंदोलकांनी संजय लीला भन्साळी यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली. तसेच राजपुत समाज संघटनेच्या वतीने पालकमंत्री गिरीश बापट यांनी निवेदन देण्यात आले.

राष्ट्रवादीच्या माजी आमदार-माजी नगरसेवकात “फ्री स्टाईल’ हाणामारी

चौफेर न्यूज – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार अण्णा बनसोडे आणि माजी नगरसेवक काळूराम पवार यांच्यात भर चौकात “फ्री स्टाईल’ हाणामारी झाली. रविवारी (दि.26) सायंकाळी पाचच्या सुमारास चापेकर चौकात हा प्रकार घडला. दोघांनी चिंचवड पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार दाखल केली आहे.

स्वप्नील सावंत, स्वाती गाढवे यांनी पटकाविला महापौर चषक

चौफेर न्यूज  पिंपरी-चिंचवड महापालिका व पुणे डीस्ट्रीक्‍ट ऍथलेटिक असोसिएशन यांच्या वतीने सिटी ऍथलेटिक असोसिएशन सहकार्याने आज (रविवारी) चऱ्होली येथे अर्ध मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला खेळाडूंनी उत्स्फूर्त दिला. पुरुषांच्या गटात स्वप्नील सावंत तर महिलांच्या गटात यावेळी माजी महापौर कै. सादबा ऊर्फ आप्पासाहेब काटे महापौर चषक स्वाती गाढवे यांनी प्रथम क्रमांक पटकावत महापौर चषकावर मोहर उमटवली.

‘डी. वाय.’ ला “सेंटर ऑफ एक्‍सलन्स’ पुरस्कार

चौफेर न्यूज  – चेन्नई येथे झालेल्या देशभरातील नामांकित महाविद्यालयांच्या गुणगौरव सोहळ्यामध्ये आकुर्डी येथील डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट ऍन्ड रिसर्च महाविद्यालयाला व्हर्च्युसा कंपनीने “सेंटर ऑफ एक्‍सलन्स’ हा पुरस्कार प्रदान केला.

जैव कचऱ्याचा धोका

निगडी - आरोग्यासाठी अतिधोकादायक असणारा जैव वैद्यकीय कचरा (मेडिकल वेस्ट) शहरात विविध ठिकाणी उघड्यावर टाकला जातो. यातून काही वैद्यकीय व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई झाली; मात्र हा प्रश्‍न अजूनही कायम आहे.

वाकड पोलिसांना तणावमुक्‍तीची धडे

वाकड – नागरिकांना भयमुक्‍त आयुष्य जगता यावे यासाठी अहोरात्र दक्ष राहणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कायम मोठा शारीरिक आणि मानसिक तणाव झेलत असतात. सुरक्षेची जबबादारी सांभाळताना पोलिसांना जास्त तणावाशी झगडावे लागू नये, यासाठी वाकड पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लोणावळा येथील मनशक्‍ती प्रयोग केंद्र या संस्थेच्या वतीने तणावमुक्‍तीचे धडे देण्यात आले.