Monday 30 December 2013

PCMC recruitment notification 2014

उद्या दिनांक ३० डिसेंबर २०१३ पासून पिंपरी चिंचवड महापालिका यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाकरिता दरमहा एकत्रित मानधनावर विविध पदे हंगामी स्वरुपात ६ महिने कालावधीकरता Walk In Interview पद्धतीने भरणार आहे. या अभियानात २४५ पदे भरली जाणार आहे

अधिक माहितीसाठी, अटी, नियम जाणून घेण्यासाठी पालिकेने प्रसिद्ध केलेली नोटीस -https://www.pcmcindia.gov.in/admin/cms_upload/jobs/21263259931387784131.pdf

PCMC demolition drive kept industrial town on the edge

Over 500 structures razed since June ''12

लोकवर्गणीच्या सीसीटिव्हीत सोनसाखळी चोर कैद

घराजवळ भाजी घेण्यासाठी उभे असलेल्या वृध्द महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेले. निगडी येथील यमुनानगरमध्ये रविवारी (दि. 29) सकाळी साडेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला. लोकवर्गणीतून लावण्यात आलेल्या सीसीटिव्ही कॅमे-यामध्ये चोरटे कैद झाले आहेत.

महापालिकेचे नागरी सुविधा केंद्र खाजगीतत्वावर देणार

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पहिल्या टप्प्यात 24 नागरी सुविधा केंद्र सुरु करण्यात येणार आहेत. हे नागरी सुविधा केँद्र खासगी तत्वावर चालविण्यास देण्यात येणार आहे. त्यासाठी खासगी संस्थांशी करार करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीच्या सभेपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे.

‘घरकुल’ प्रवेश लांबणीवर?

पिंपरी : घरकुल प्रकल्पातील इमारती आणि सदनिका वाटपासाठी लाभार्थींची सोडत काढली, ताबा जाहीर झाला, पण प्रकल्पाची कामे अर्धवट असल्याने प्रत्यक्षात राहण्यायोग्य स्थिती नाही. घरकुलाच्या प्रतीक्षेत तब्बल ५ वर्षे घालविल्यानंतर झाले एकदाचे हक्काचे घरकुल अशी भावना झालेल्या लाभार्थींना गृहप्रवेशासाठी अर्धवट कामे पूर्ण होण्यासाठी आणखी काही महिने वाट पहावी लागणार आहे. 

‘वायसीएम’मध्ये रुग्णांना मोफत भोजन

पिंपरी : राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रु ग्णालयातील रु ग्णांना आता मोफत जेवणही मिळणार आहे. त्याला मंजुरी देण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने मंगळवारच्या स्थायी समिती सभेपुढे ठेवला आहे. 

दादा-बाबांचा बोलाचाच भात


पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील अनधिकृत बांधकामांबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तोंडी आश्वासने म्हणजे ' बोलाचीच कढी , बोलाचाच भात ' ठरत आहे. कायद्याची चौकट आणि उच्च न्यायालयाचा ...

घर वाचवायचे की नोकरी?

पिंपरी : दिलेल्या मुदतीत स्वत:हून अनधिकृत बांधकाम पाडले नाही, तर निलंबनाची कारवाई केली जाईल, असा इशारा स्थापत्य विभागाने दिल्यानंतर घर वाचवायचे की नोकरी या विवंचनेतील महापालिका अधिकारी, कर्मचार्‍यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापुढे व्यथा मांडली. त्यांची भेट घेतल्यानंतर घरे वाचतील, निलंबनही होणार नाही, अशी समजूत करून घेतलेल्या त्या अधिकारी, कर्मचार्‍यांवर कारवाईची टांगती तलवार कायम आहे. ३१ डिसेंबर ही निलंबन कारवाईतून वाचण्याची शेवटची संधी आहे. अनधिकृत घर वाचविणे मात्र अशक्य आहे. 

वर्षभरात हेल्पलाइनवरील 207 तक्रारींचा निपटारा

पुणे : जिल्हा प्रशासनाकडून सुरू केलेल्या हेल्पलाइनवर गेल्या वर्षभरात तब्बल 938 नागरिकांनी तक्रारी दाखल केल्या आहेत.

Hinjewadi burglaries: With no clues, cops at a dead end


The police officers claimed they have searched the slums of Pimpri andChinchwad for slums. They have checked the whereabouts of recently arrested burglars, but in vain. Senior police inspector PD Patil ofHinjewadi police station told dna, “After the ...
Citizens live in fear, cancel trips

Citizens live in fear, cancel trips

Residents of housing societies in Wakad and Hinjewadi that were targeted by burglars say that they are living under fear and have cancelled New Year celebration plans and outings.

सोसायटीच्या अध्यक्षाकडूनच चालवला जातोय मटका अड्डा

निगडीत एका व्यावसायिक सोसायटीच्या अध्यक्षाकडून बेकायदेशीररित्या मटका अड्डा चालवला जातोय, असा आरोप त्याच सोसायटीतील सभासदांनी केला आहे. या मटका अड्ड्याचा इथला  महिला व नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे, त्यासाठी तो बंद करण्याची मागणी सोसायटीच्या सभासदांनी पोलिसांकडे केली आहे.

वाहतूक प्रबोधनासाठी पोलिसांचा नवा फंडा

वाहतूक पंधरवडा आणि थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी वाहनचालक व नागरिकांच्या प्रबोधनासाठी नवी पध्दत सुरू केली आहे. पिंपरी चौकात आज (शनिवार) सकाळपासून वाहतूक पोलीस ध्वनिक्षेपकाच्या साहाय्याने नागरिकांना सूचना देताना दिसत आहेत. चौकात आल्यावर अचानक येणा-या सूचनांमुळे वाहनचालकही पुरते गोंधळून जात आहेत. पोलिसांचा हा नवा फंडा

अजितदादांचे तोंडी आदेशाने पाडापाडीच्या कारवाई मागे

अवैध बांधकामे करणा-या महापालिकेतील १६ अधिकारी कर्मचा-यांची घरे पाडू नका असा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा तोंडी आदेश येताच आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. दादांच्या आदेशामुळे ब प्रभागातील कर्मचा-याच्या घरावर पाडापाडीच्या कारवाईची तलवार अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याची वेळ प्रशासनावर आली.

रिक्षा कॅलिब्रेशनला ४ दिवस

मीटरचे कॅलिब्रेशन करण्यासाठी आरटीओने रिक्षाचालकांना दिलेली ३१ डिसेंबरची मुदत संपण्यास चार दिवसाचा अवधी बाकी आहे. या कालावधीत रिक्षाचालकांनी मीटरचे कॅलिब्रेशन करून न घेतल्यास नवीन वर्षात आरटीओकडून त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

एकतीसच्या रात्री हॉटेल, बार दीडपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा

हॉटेल, ढाबे, रेस्टॉरंट, रेस्टोबार आणि परमिट रूम चालकांसाठी ‘थर्टी फस्ट’ची रात्र उत्तम कमाईची ठरते.

काँग्रेसच्या ‘जनजागरण’ यात्रेला मुख्यमंत्र्यांचा ‘ठेंगा’?

पुण्यात सातत्याने दौरे करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये पक्षाच्या कार्यक्रमासाठी जराही उत्सुकता दाखवलेली नाही, अशी काँग्रेस कार्यकर्त्यांचीच तक्रार आहे.