Saturday 16 March 2019

पिंपरी-चिंचवडमध्ये शनिवारपासून दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सव

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड फिल्म क्लबच्या वतीने 16 व 17 मार्चला प्रथमच पिंपरी-चिंचवड आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवाचे (शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल) आयोजन करण्यात आले आहे. जगातील वेगवेगळ्या 50 देशांतून आलेल्या 246 लघुचित्रपटांपैकी परीक्षकांनी निवडलेले 41 लघुचित्रपट पाहण्याची संधी चित्रपटप्रेमींना मिळणार आहे, अशी माहिती फेस्टिव्हलचे संयोजक व पिंपरी-चिंचवड फिल्म क्लबचे प्रमुख अविनाश कांबीकर व दत्ता गुंड यांनी दिली. चिंचवडमधील […]

Moves afoot to eliminate use of paper at PCMC

PIMPRI CHINCHWAD: The Pimpri Chinchwad Smart City Limited (PCSCL) is working on making the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) ...

स्मार्ट सिटीच्या संगणक प्रणालीचे कामकाज पाहण्यासाठी अधिका-यांच्या नियुक्त्या

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीच्या माहिती व तंत्रज्ञान, संगणक प्रणालीचे कामकाज पाहण्याकरिता 8 अधिका-यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये माहिती व तंत्रज्ञान अधिकारी, कॉम्प्युटर प्रोगामर, ऑपरेटर यांचा समावेश आहे. महापालिका माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या अखत्यारीत जेएनएनयुआरएम, स्मार्ट सिटी, पंतप्रधान आवास योजना तसेच कॉपोरेट सोशल रिस्पॉन्सिबीलीटी सेल (सीएसआर) सिटी ट्रान्सफॉर्मेशन ऑफीस (सीटीओ) अमृत योजना आदी […]

बोअरवेल खोदाईवर निर्बंध कधी?

पिंपरी – वेगाने विस्तारणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात सर्रास बोअरवेल खोदाई सुरू आहे. महापालिका अथवा भूजल विकास विभाग यांचे याबाबत कोणतेही धोरण नसल्याने कोणतीही परवानगी न घेता बोअरवेल खोदल्या जात आहेत. त्यासाठी शासनाने ठरवून दिलेले खोदाईचे निकष धाब्यावर बसविण्यात येत आहेत. भूगर्भाची चाळण रोखणार कोण?, असा सवाल उपस्थित होत आहे.

शहरातील बेघरांचे होणार सर्वेक्षण


भोसरीचा आमदार ठरवणार शिरूरचा खासदार..!

पिंपरी (Pclive7.com):- आगामी लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. सर्वत्र राजकीय घडामोडींनी चांगलाच जोर धरलायं. त्यात सर्वाधिक लक्षवेधी मतदारसंघ म्हणून शिरूरकडे पाहिलं जात आहे. भोसरीचा आमदार ठरवणार शिरूरचा खासदार..! अशी पोस्ट सध्या सोशल मिडीयावर चांगला धुमाकूळ घालत आहे. त्याला कारणही तसचं आहे. भोसरी विधानसभेचे अपक्ष आमदार यांची भूमिका या निवडणुकीत महत्वाची ठरणार आहे. म्हणूनच महेश लांडगे समर्थकांकडून ही पोस्ट व्हायरल केली जात आहे.

प्लॅस्टिक वापरणा-यांवर धडक कारवाई; एका दिवसात 65 हजार रुपये दंड वसूल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने प्लॅस्टिकचा वापर करणा-यांवर पुन्हा धडक कारवाईला सुरुवात केली आहे. आज (मंगळवारी) एका दिवसात 65 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर, 40 किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले आहे. आगामी काळात महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, महापालिका संयुक्तपणे प्लॅस्टिक वापरणा-यांवर कडक कारवाई करणार असल्याचे महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. […]

इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडकडून निगडी पोलीस ठाण्यास प्रिंटर भेट

एमपीसी न्यूज- इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडकडून निगडी पोलीस ठाण्याला आगामी तंत्रज्ञान असलेला प्रिंटर म्हणून देण्यात आला. प्रिंटर देण्याचा कार्यक्रम आज (शुक्रवारी) निगडी पोलीस ठाण्यात झाला. या कार्यक्रमासाठी इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या अध्यक्षा अॅड. प्रतिभा जोशी दलाल, मुक्ती पानसे, साधना काळभोर, स्मिता ईळवे, रो. अर्जुन दलाल, निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश पवार

पाच सदस्यीय विशेष पथक करणार संवेदनशील गुन्ह्यांची उकल

पिंपरी- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ दोनच्या हद्दीमध्ये गुन्हेगारी वाढू लागली आहे. तसेच अनेक संवेदनशील गुन्ह्यांचा अद्याप उलगडा झाला नाही. या गुन्ह्यांचा उलगडा करण्यासाठी पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी एका विशेष पथकाची स्थापना केली आहे.

PCMC serves notices to three clerks

Pimpri Chinchwad: The property tax department of Pimpri Chinchwad Municipal Corporation has issued show-cause notices to three clerks for their allege.

इंद्रायणीनगरातील पाणी पिण्यास अयोग्य

भोसरी - येथील इंद्रायणीनगरातील पेठ क्रमांक दोनमध्ये व समर्थ कॉलनीत येणारे पाणी पिण्यास अयोग्य आहे, असा अहवाल जलशुद्धीकरण प्रकल्पाद्वारे प्राप्त झाल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली. स्वच्छ पाणीपुरवठा न केल्यास पालिका आयुक्त व संबंधित अधिकाऱ्यांना हे पाणी पिण्यास भेट देत आंदोलनाचा इशारा स्वीकृत सदस्य संजय वाबळे यांनी दिला आहे.

‘पवना’तील पाणीसाठा जुलै मध्यापर्यंत पुरेल

पिंपरी - शहरातील पाणीपुरवठ्यात टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येत असून, ती दहा टक्‍क्‍यांपर्यंत करण्यात येणार आहे. पवना धरणाच्या जलाशयात आज पुरेसा पाणीसाठा असून, तो जुलैच्या मध्यापर्यंत पुरण्याची शक्‍यता आहे. उन्हाळ्यात होणारे बाष्पिभवन, तसेच पावसाळा लांबल्यास सध्याचा पाणीसाठा जुलैअखेरपर्यंत वापरता येऊ शकेल, या पद्धतीने जलसंपदा व महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे नियोजन करण्यात येत आहे.

पिंपरी-चिंचवड शहराची सांस्कृतिक उंची वाढतेय

पिंपरी - ‘साऽ रेऽ, रेऽ गऽ, गऽ मऽ...’ असे सूर एकीकडे ऐकू आले. त्याचवेळी दुसऱ्या कक्षातून हार्मोनिअमचे स्वर कानी पडले. थोडं पुढे गेल्यावर ‘धाऽ धींऽ धींऽ धाऽ... धाऽ तींऽ तींऽ ताऽ...’ या तबल्याच्या बोलांनी लक्ष वेधून घेतले. प्रत्येक कक्षात विद्यार्थी भारतीय बैठकीत बसलेले होते. यात महिला व मुलींची संख्या लक्षणीय होती. गुरुजी तन्मयतेने शिकवत होते. शिष्य एकाग्रतेने ऐकून गुरुजींप्रमाणे गायन, वादन करीत होते. असे चित्र बुधवारी (ता. १३) महापालिकेच्या निगडीतील संगीत अकादमीत बघायला मिळाले. 

‘अल्पसंख्याक’ शाळांचे वाढते पेव

पिंपरी - सरकारी अनुदान लाटण्याबरोबरच आरटीई प्रवेश प्रक्रियेला फाटा देण्यासाठी शहरात काही शाळा अल्पसंख्याक शाळांचा दर्जा मिळवत आहेत. यावर्षीही दोन शाळांनी अल्पसंख्याक दर्जा मिळविला आहे. गेल्या दोन वर्षांत याअंतर्गत सहभाग घेणाऱ्या जवळपास ३० शाळांनी अल्पसंख्याक दर्जा मिळविल्याने शिक्षण हक्क कागदावरच राहण्याची भीती या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

पोलिसांवर मंत्रालयातूनच ‘निशाणा’

पिंपरी - स्वसंरक्षणाचे कारण पुढे करत अनेकांनी पोलिस आयुक्‍तांकडे पिस्तूल परवाना मागितला. मात्र, पोलिसांनी त्यांची मागणी धुडकावून लावली. त्यातील २६ जणांना थेट मंत्रालयातून पिस्तूल परवाना दिला असून, त्यात शहरातील गुंठामंत्र्यांची संख्या सर्वाधिक आहे. २६ जणांपैकी १५ जण हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारे आहेत. 

प्राधिकरणाच्या प्रकल्पांची वाट सुकर

पिंपरी - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या प्रमुख प्रकल्पांना लोकसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे संबंधित प्रकल्पांचे काम विना अडथळा मार्गी लागू शकणार आहे. पेठ क्रमांक सहामधील गृहयोजना अन्यत्र हलविण्याची नागरिकांची मागणी असल्याने सध्या संबंधित योजनेचे काम थंडावले आहे.

जीवावर उदार होवून ओलांडावा लागतो रस्ता

चिंचवड – एमआयडीसीची वर्दळ, चार शाळा महाविद्यालये यामुळे कायम गजबजलेला महात्मा बसवेश्‍वर चौक अपघाती झाला आहे. सिग्नल, गतीरोधक आणि वाहतूक पोलीस देखील याठिकाणी नसतात. त्यामुळे जीवावर उदार होवून रस्ता ओलांडण्याची वेळ पादचाऱ्यांवर आली आहे.

सांडपाणी पुर्नवापराचा “मास्टर प्लॅन’

पिंपरी – महापालिकेकडून सांडपाण्यावर प्रक्रिया करुन हे पाणी उद्योगांना नाममात्र दराने देण्याचे प्रस्तावित आहे. राज्य शासनानेही त्याला हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे महापालिकेने सांडपाणी पुर्नवापराचा मास्टर प्लॅन तयार केला असून 80 दशलक्ष लिटर सांडपाण्याचा एमआयडीसीमध्ये फेरवापर शक्‍य होणार आहे.

चॉईस पोस्टिंग देणाऱ्या ‘त्या’ लिपिकाची बदली

पिंपरी : पिंपरी- चिंचवड आयुक्‍तालयात चॉईस पोस्टिंगच्या नावाखाली पैसे उकळणाऱ्या लिपिकाची बदली करून खातेनिहाय चौकशी सुरू करण्याचे आदेश पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी दिले आहेत. संबंधित लिपिक बदल्यांसाठी पैसे घेत असल्याची बाब लक्षात आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. तडकाफडकी करण्यात आलेल्या कारवाईमुळे खळबळ माजली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये पदपथ “उखडले’

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात प्रशस्त रस्ते असूनही पुरेशा प्रमाणात पदपथ नसल्याचे वास्तव आहे. त्यातच सेवा वाहिन्यांसाठी वेळोवेळी पदपथ खोदून त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने पादचाऱ्यांपुढील अडथळ्यांची शर्यत संपण्याचे नाव घेत नाही. खोदलेल्या पदपथांचा राडारोडा देखील उचलला जात नाही. त्यामुळे रस्त्याची रया गेली आहे. शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाला असताना पादचाऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याची भूमिका महापालिकेने घेतल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

नगरसेवकांच्या स्वीय सहाय्यकांसाठी कार्यशाळा घ्या ः संदीप वाघेरे

पिंपरी चिंचवड ः पिंपरी चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांच्या स्वीय सहाय्यकांना महापालिकेच्या कामकाजाविषयी अधिक माहिती व्हावी, यासाठी विधिमंडळाच्या धर्तीवर एक दिवसीय अभ्यास वर्गाचे आयोजन करण्याची मागणी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केली आहे. याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात वाघेरे यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिका नगरसेवकांच्या कार्यालयात स्वीय सहायकांचा सक्रिय, अनमोल, महत्वाचा वाटा असतो. स्वीय सहाय्यक हे लोकप्रतिनिधींना समस्या मुक्त करण्यासाठीचे विस्तारित हात, कान, आणि डोळे असतात. त्यांच्या महत्वपूर्ण मदतीमुळे लोकप्रतिनिधींना आपले काम शिस्तबद्धपणे करणे सोपे जाते.

वायसीएमएचमध्ये होणार 25 खाटांचा आयसीयू विभाग

पिंपरी चिंचवड ः पिंपरी चिंचवड महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएमएच) 25 खाटांचा तिसरा अत्याधुनिक सोयींयुक्त अतिदक्षता विभाग (आयसीयू) सुरू केला जाणार आहे. यामुळे चिंताजनक रुग्णांवर तत्काळ उपचार करणे सोईचे होणार आहे. त्यामुळे रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

निगडीत युवती कला महोत्सव

निगडी : लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 डी 2 आणि नृत्यकला मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त कला क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगिरी करणार्‍या युवतींचा गुणगौरव करणारा ‘युवती कला महोत्सव आणि सन्मान’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आजच्या युवती भविष्यातील सक्षम महिला असणार आहेत, त्यासाठी युवतींना प्रोत्साहन देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

चिखलीत ८ गोदामे जळून खाक

चौफेर न्यूज – येथे भंगारच्या गोदामाला आग लागल्याने भंगारची आठ गोदामे जळून खाक झाली आहेत. ही घटना गुरुवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडली.

पिंपरी चिंचवड शहरातील थकबाकीधारक 80 हजार मिळकतधारकांना जप्तीच्या नोटीसा

चौफेर न्यूज – कर संकलन विभागामार्फत ज्या मिळकतधारकांकडे थकबाकी आहे, अशा 80,000 मिळकतधारकांना जप्ती पूर्वीच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. मिळकत कराची थकबाकी असणा-या मिळकतधारकांनी जप्ती पूर्वीच्या नोटीसा बजाविल्यानंतरही 7 दिवसाचे आत मिळकत कराची रक्कम भरणा केलेली नाही, अशा मिळकतधारकांवर जप्तीची कार्यवाही करण्यात येणार आहे, अशी माहिती कर संकलन विभागाने दिली आहे.

चिंचवड येथील प्रिमियर कंपनीचे चाकणला स्थलांतर?

कामगा व्यवस्थापनाच्या विरोधात
चौफेर न्यूज – चिंचवड येथील प्रिमियर कंपनीतील कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यात अनंत अडचणी आल्यानंतर कंपनी 1 मार्चपासून चाकणला स्थलांतरीत करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याबाबत कामगार संघटनेशी कंपनी व्यावस्थापनाने कसलीही चर्चा केली नसल्याचे संघटनेच्या पदाधिका-यांनी सांगितले आहे