Tuesday 5 February 2013

बस क्र. ४३ च्या रोज २ ऐवजी बारा फे-या

बस क्र. ४३ च्या रोज २ ऐवजी बारा फे-या: कात्रज ते निगडी बायपास हायवेमार्गे जाणा-या बसच्या (बस क्र.४३) फे-या वाढविण्यात आल्या असून आता दररोज दोनऐवजी बारा फे-या होणार आहेत. त्यामुळे आयटी कंपन्यांमधील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची सोय झाली आहे.

मेट्रोचे फायनल बजेट १० हजार कोटी रुपये!

मेट्रोचे फायनल बजेट १० हजार कोटी रुपये!: पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये राबविण्यात येणाऱ्या दोन्ही मेट्रोमार्गांचा खर्च दहा हजार कोटी रुपयांच्या घरात पोहोचला आहे. वनाझ ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या दोन्ही मेट्रोमार्गांचे काम पूर्ण करण्यासाठी २०१९ची डेडलाइन निश्चित करण्यात आली आहे.

‘राज्य संघटनांनाही क्रीडानगरीत अॅकॅडमीची परवानगी मिळावी’

‘राज्य संघटनांनाही क्रीडानगरीत अॅकॅडमीची परवानगी मिळावी’: ‘म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत काही खेळांच्या अॅकॅडमी सुरू आहेत. यातील काही अॅकॅडमी वैयक्तिक आहे.

Chinchwad youth held for stoning police van

Chinchwad youth held for stoning police van: Pune: The Pimpri Police detained a youth for throwing stones at a police van parked outside the DY Patil College at Sant Tukaramnagar in Chinchwad, on Monday.

Pimpri minor rape case: Accused remanded to custody

Pimpri minor rape case: Accused remanded to custody: Pune: A Pimpri court remanded the main accused in the gang-rape of a three-year-old girl to police custody till February 11.

Science park comes up at Chinchwad

Science park comes up at Chinchwad - Times of India:

Science park comes up at Chinchwad
Times of India
PUNE: A first of its kind science park, which will educate and enthrall the young and the old alike, has been developed by the PimpriChinchwad Municipal Corporation (PCMC) with funds from the central government. The science park, located at Chinchwad ...

पवना बंद जलवाहिनीच्या ठेकेदाराकडून नुकसानभरपाईपोटी साडेतीनशे कोटींची मागणी

पवना बंद जलवाहिनीच्या ठेकेदाराकडून नुकसानभरपाईपोटी साडेतीनशे कोटींची मागणी
पिंपरी, 4 फेब्रुवारी
शेतक-यांवरील गोळीबार प्रकरणामुळे वादग्रस्त ठरलेल्या पवना बंद जलवाहिनीवरुन पिंपरी-चिंचवड महापालिका वर्तुळात नवीन वादंग निर्माण होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. बंद जलवाहिनी प्रकल्पाला राज्य शासनाने स्थगिती दिल्याने मोठी आर्थिक हानी झाल्याचा दावा करत प्रकल्पाच्या ठेकेदाराने नुकसान भरपाईपोटी महापालिकेकडे सुमारे साडेतीनशे कोटी रुपयांची मागणी केली आहे.

पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीतील वाढत्या लोकसंख्येला मुबलक पाणी मिळावे, या हेतूने पवना धरणातून बंद नळाव्दारे पाणी आणण्याची योजना महापालिकेने 2008 मध्ये आखली. 1 मे 2008 रोजी तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमीपूजन झाले. या प्रकल्पासाठी 234 कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्र सरकारला सादर केला. जेएनएनयुआरएम अंतर्गत सादर केलेला हा प्रस्ताव मंजूर करत केंद्राने 117 कोटी रुपये अनुदान देण्याचे मान्य केले. उर्वरित 164 कोटी रुपयांचा खर्च उचलण्याची तयारी महापालिकेने दर्शविली.

पवना धरण ते रावेत जलउपसा केंद्र या 70 किलोमीटरच्या अंतरात बंद जलवाहिनी टाकण्याचे ठरले. जागा ताब्यात नसताना एनसीसी-इंदू प्रोजेक्ट यांना या प्रकल्पाचे काम देण्यात आले. प्रत्यक्ष काम सुरु होण्यास विलंब झाल्याने या कामाचा खर्च 398 कोटी रुपयांवर गेला. 70 किलोमीटर अंतरापैकी अवघ्या 9 किलोमीटर अंतरात जलवाहिनी टाकण्यात आली. 9 ऑगस्ट 2011 रोजी या प्रकल्पाविरोधात झालेल्या बंदिस्त जलवाहिनीच्या विरोधात झालेल्या आंदोलनात पोलिसांकडून झालेल्या गोळीबारात चार शेतक-यांचा बळी गेला. त्याची गंभीर दखल घेत राज्य शासनाने 10 ऑगस्ट 2011 रोजी या प्रकल्पाला स्थगिती दिली. महापालिकेने स्थगिती उठविण्याची मागणी शासनाकडे केली आहे. शासनाकडून या प्रकल्पाला 'ग्रीन सिग्नल' मिळण्याची चिन्हे अद्याप दिसत नाहीत.

महापालिकेने एनसीसी-इंदू प्रोजेक्ट यांना 25 कोटींची अगाऊ रक्कम दिली आहे. त्यानंतर बिलापोटी 142 कोटी रुपये अदा केले आहेत. मात्र विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या या माहितीनुसार, प्रकल्पाला शासनाकडून स्थगिती मिळाल्यामुळे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा ठेकेदार कंपनीने केला आहे. तसेच या नुकसान भरपाईपोटी सुमारे 350 कोटी रुपये देण्याची मागणी केली आहे. एकीकडे पवना बंद जलवाहिनी प्रकल्प अर्धवट स्थितीत असल्यामुळे महापालिकेला मोठा आर्थिक फटका बसला आहे. तर दुसरीकडे या प्रकल्पावर महापालिकेकडून एकही रुपया खर्च करण्यास सर्वपक्षियांचा विरोध आहे. त्यातच ठेकेदाराने केलेल्या नुकसान भरपाईच्या मागणीमुळे महापालिकेपुढे पेच प्रसंग उभा ठाकला आहे.

कमलनयन बजाज शाळेने पटकावला आमदार चषक

कमलनयन बजाज शाळेने पटकावला आमदार चषक
पिंपरी, 4 फेब्रुवारी
आंतरशालेय आमदार चषक क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत चिंचवडच्या कमल नयन बजाज शाळेने 60 गुण मिळवीत आमदार चषकावर आपले नाव कोरले. 55 गुणांनी दुस-या क्रमांकावर सिटी प्राईड स्कूलने आपले स्थान राखले तर च-होलीच्या वाघेश्वर विद्यालयाला 45 गुण मिळवीत तिस-या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

आमदार अण्णा बनसोडे यांनी पुरस्कृत केलेल्या व प्राधिकरणातील सिटीप्राईड शाळेने आयोजित केलेल्या आमदार चषक स्पर्धेचा आज समारोप करण्यात आला. बास्केट बॉल, व्हॉलीबॉल, योगासने या क्रीडा प्रकारासाठी ही स्पर्धा घेण्यात आली.
पारितोषिक वितरण आमदार अण्णा बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमहापौर राजु मिसाळ, आयआयसीएमआरचे संस्थापक मनोहर जांभेकर, शाळेच्या संचालिका डॉ. अश्विनी कुलकर्णी, डॉ. दीपाली सवाई आदी उपस्थित होत्या.

स्पर्धेचा सविस्तर निकालपुढील प्रमाणे,
बास्केट बॉल -
14 वर्षाखालील मुली - विजेता संघ - कमलनयन बजाज शाळा, उपविजेता संघ - सेंट उर्सुला हायस्कुल
14 वर्षाखालील मुले - विजेता संघ - कमलनयन बजाज शाळा, उपविजेता संघ - निर्मला बेथनी शाळा
17 वर्षाखालील मुली - विजेता संघ- कमलनयन बजाज शाळा, उपविजेता संघ - सी.एम.एस. शाळा
17 वर्षाखालील मुले - विजेता संघ - कमलनयन बजाज शाळा, उपविजेता संघ - इंदिरा राष्ट्रीय शाळा

व्हॉलीबॉल -
14 वर्षाखालील मुली - विजेता संघ - वाघेश्वर विद्यालय, च-होली, उपविजेता संघ - सिटी प्राईड शाळा
14 वर्षाखालील मुले - विजेता संघ- वाघेश्वर विद्यालय, उपविजेता संघ - क्रीडाप्रबोधिनी
17 वर्षाखालील मुली - विजेता संघ - वाघेश्वर विद्यालय, उपविजेता संघ सिटी प्राईड शाळा
17 वर्षाखालील मुले - विजेता संघ- क्रीडाप्रबोधिनी, उपविजेता संघ सिटी प्राईड शाळा

योगासने
14 वर्षाखालील मुली
प्रथम - जुईली पटवर्धन, ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कुल, द्वितीय - स्वरदा देशपांडे, ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय, तृतीय- श्रावणी कुलकर्णी, एसपीएम शाळा, चौथी - श्रुतीका भंडारे, सिटी इंटरनॅशनल शाळा, पाचवी - मृणाल भोसले, सिटी इंटरनॅशन शाळा, सहावी- निकीता गायकवाड, ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय
14 वर्षाखालील मुले
प्रथम - सुशात तरवडे ज्ञानप्रबोधिनी विद्यालय, द्वितीय - हर्षल भुरे, सिटी प्राईड शाळा, तृतीय- श्रीकृष्ण सुदर्शन अय्यंगर, सिटी प्राईड शाळा, चौथा - दिशांत शहा, सिटी प्राईड शाळा, पाचवा - सौरव कळसे, संत तुकाराम प्राथमिक विद्यालय, सहावा- धीरज जैस्वाल, संत तुकाराम प्राथमिक विद्यालय.
17 वर्षाखालील मुले
प्रथम - दीपक जैस्वाल, संत तुकाराम विद्यालय, द्वितीय- जतीन आव्हाड, ज्ञानप्रबोधनी नवनगर विद्यालय, तृतीय- मोहसीन शेख, संत तुकाराम विद्यालय, चौथा - राकेश कदम संत तुकाराम विद्यालय, पाचवा- दुर्गेश निखार, एम.एम.विद्यामंदिर, सहावा- घनश्याम बांकर, एम.एम.विद्यामंदिर.
17 वर्षाखालील मुली
प्रथम - वैष्णवी आंद्रे, ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय, द्वितीय - साक्षी महाले, ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय, तृतीय - ओवी मु-हे, ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय, चौथी - सुवर्णा पुराणिक, ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय, पाचवी - प्राची दातार, ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय, सहावी - मृणाल भट, ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय.

गहाणवटीच्या दागिन्याचा अपहार केल्या प्रकरणी सराफाविरुध्द गुन्हा

गहाणवटीच्या दागिन्याचा अपहार केल्या प्रकरणी सराफाविरुध्द गुन्हा
पिंपरी, 4 फेब्रुवारी
घर बांधण्यासाठी सोन्याचे दागिने सराफाकडे गहाण ठेवून कर्ज घेणा-या महिलेला सराफानेच गंडा घातला. गहाण ठेवलेल्या तीन लाख 63 हजार रूपयांच्या सोन्याच्या दागिन्याचा अपहार केल्याचा ठपका सराफावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात सराफाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छाया विजय येडगल्लू (वय-50, रा. सहकार कॉलनी, काळेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी योगेश कुलथे (रा. रिव्हर रोड, पिंपरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरीतील रिव्हर रस्त्यालगत योगेश कुलथे यांचे 'कुलथे सराफ' नावाचे सराफी दुकान आहे. छाया येडगुल्लू यांनी कुलथे यांच्या दुकानात एक एप्रिल 2012 व 16 सप्टेंबर 2012 रोजी तीन लाख 63 हजार 750 रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने योगेश कुलथे याच्याकडे गहाण ठेवून एक लाख 92 हजार रूपयांचे कर्ज घेतले होते.

गहाण ठेवलेले सोन्याचे दागिने सोडविण्यासाठी येडगुल्लू यांनी योगेश कुलथे यांना 3 जून 2012 रोजी एक लाख 14 हजार रूपये दिले. मात्र, येडगुल्लू यांचे दागिने कुलथे यांने परत केले नाही, असा आरोप येडगल्लू या महिलेने केला आहे. येडगुल्लू यांचे दागिने परत न करता विश्वासघात करून त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक एल. एन. सोनवणे तपास करीत आहेत.

शहरातील महाविद्यालय, औद्योगिक वसाहत, आयटी पार्कमध्ये तक्रारपेट्या

शहरातील महाविद्यालय, औद्योगिक वसाहत, आयटी पार्कमध्ये तक्रारपेट्या
पिंपरी, 4 फेब्रुवारी
पिंपरी-चिंचवड शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थिनी, औद्योगिक वसाहत आणि आयटी पार्कमध्ये काम करणा-या युवती, महिलांवर होणा-या अन्याय, अत्याचाराच्या तक्रारी निर्भयपणे देता याव्यात, यासाठी पोलिसांनी आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. शहरातील 70 महाविद्यालयाबरोबरच औद्योगिक वसाहत आणि आयटी पार्कमध्ये पोलिसांकडून तक्रार पेट्या बसविण्यात येणार आहेत.

पुणे शहर परिमंडल तीनमध्ये मुली, युवतींसाठी पिंपरी-चिंचवड शहरात स्वतंत्र हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. शाळा, महाविद्यालयामध्ये पोलीस ठाणे, सहायक पोलीस आयुक्त कार्यालय, उपायुक्त कार्यालय, अपर पोलीस आयुक्त कार्यालयाचे दूरध्वनी आणि स्वतंत्र हेल्पलाईन क्रमांक दर्शविणारे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. महिला व मुलींची छेडछाड व अत्याचारापासून बचाव करता यावा, याकरिता सोनाली बडवे यांनी कराटे प्रशिक्षक युवकांमार्फत मोफत कराटे प्रशिक्षण सुरू केले आहे.

शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला दक्षता समितीचे पुनर्गठण करण्यात आले. याशिवाय महिला दक्षता समितीमध्ये प्रत्येक महाविद्यालयातील एका युवतीची नियुक्ती करण्यात आली आहे. शहरात घडणा-या बलात्कार व विनयभंगाच्या घटनांच्या तपासात महिला दक्षता समिती सदस्यांना सहभागी करून घेण्यात येत आहे.

प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र स्वागत कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. त्या स्वागत कक्षात महिला पोलीस कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक पोलीस चौकीत एक महिला पोलीस कर्मचारी दिवसपाळीसाठी नेमण्यात आल्या असून, महिलांच्या तक्रारीची तत्काळ दखल घेऊन कारवाई करण्यात येणार आहे.

महिला व मुलींची छेडछाड रोखण्यासाठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंगसाठी 'महिला बीट मार्शल' ची नेमणूक करण्यात आली आहे. शाळा, महाविद्यालये व सार्वजनिक ठिकाणी महिला बीट मार्शल गस्त घालणार आहेत.

शहरातील महाविद्यालयात बसविण्यात आलेल्या तक्रार पेट्या प्रत्येक सोमवारी उघडण्यात येऊ तक्रारीचे निवारण करण्यात येणार आहे. तक्रार पेटीत पडलेल्या पत्रांची आणि तक्रारींची खातरजमा करून गंभीर दखल घेतली जाईल. मुली, युवतींनी पुढे येऊन तक्रारी देत द्याव्यात, असे आवाहन पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी केले आहे.

लोकशाहीदिनी 16 अर्ज प्राप्त

लोकशाहीदिनी 16 अर्ज प्राप्त
पिंपरी, 4 फेब्रुवारी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या लोकशाही दिनामध्ये 16 अर्ज प्राप्त झाले. त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश अतिरीक्त आयुक्त प्रकाश कदम यांनी दिले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील महापौर मधुकर पवले सभागृहात झालेल्या लोकशाही दिनी सहआयुक्त अमृत सावंत, शहर अभियंता एम. टी. कांबळे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. शामराव गायकवाड, अतिरीक्त आरोग्य अधिकारी डॉ. पवन साळवे, सहशहर अभियंता राजन पाटील, विकास अभियंता अशोक सुरगुडे, उपशहर अभियंता वसंत काची, सहायक आयुक्त शहाजी पवार, डॉ. उदय टेकाळे, ए. वाय. कारचे, प्रभाग अधिकारी पांडुरंग झुरे, डी. एम. फुंदे, कार्यकारी अभियंता रवींद्र दुधेकर, सतीश इंगळे, अय्युब खान पठाण, शिक्षम मंडळाचे प्रशासन अधिकारी डॉ. अशोक भोसले, प्रभारी शिक्षणाधिकारी यु. ए. कांबळे, प्रभारी कायदा सल्लागार सतिश पवार, नगरसचिव दिलीप चाकणकर, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी वि. रा, वालगुडे आदी उपस्थित होते.

मुदतीत प्राप्त झालेल्या 16 अर्जांमध्ये उद्यान स्थापत्य, अ प्रभाग जलनिःसारण विभागाशी संबंधित 3, प्रकल्प (मुंबई-पुणे रस्ता), क प्रभाग स्थापत्य विभागाशी संबंधित 2, ड प्रभाग जलनिःसारण, ड प्रभाग अधिकारी, भूमी आणि जिंदगी, क प्रभाग जलनिःसारण, वृक्षसंवर्धन, ब प्रभाग अतिक्रमण विभागाशी संबंधित प्रत्येकी एक अर्ज प्राप्त झाला आहे.

शासनाने लोकशाहीदिनासाठी नवीन अध्यादेश काढला आहे. त्यानुसार आता लोकशाहीदिनासाठी नागरिकांना 15 दिवस आधी दोन प्रतीमध्ये अर्ज सादर करावा लागणार आहे. ज्या विभागाशी संबंधित तक्रार आहे. त्या विभागाच्या विभागप्रमुखाकडे संबंधित अर्ज पाठविण्यात येईल. यावर केलेल्या कार्यवाहीच्या अहवालासह संबंधित विभागप्रमुख लोकशाहीदिनी हजर राहतील. हा अहवाल, अर्जदारांची विनंती, त्याबद्दलचे नियम, शासनाची भूमिका, तरतुदी आदींचा विचार करुन लोकशाहीदिन प्रमुख योग्य निर्णय देतील, असे अध्यादेशात नमुद आहे. महापालिका स्तरावर महापालिका आयुक्त हे लोकशाहीदिनाचे प्रमुख म्हणून काम पाहतील, असेही त्यात नमूद आहे.
-------------------------------

'त्या' हॉटेलवर कारवाईसाठी तात्पुरती स्थगिती

'त्या' हॉटेलवर कारवाईसाठी तात्पुरती स्थगिती
पिंपरी, 4 जानेवारी
पिंपरी चौकात वाहनतळाच्या जागेत उभारलेल्या अवैध हॉटेल व्यावसायिकाला शासनाकडे अपील करण्याची मुभा उच्च न्यायालयाने दिली आहे. हॉटेलवरील कारवाईसाठी न्यायालयाने महापालिकेला दोन आठवड्यांचा स्थगिती आदेश दिला आहे.

पिंपरी चौकाजवळील वाहतळाच्या जागेत रत्ना या नावाने हॉटेल सुरु करण्यात आले आहे. इमारतींमधील वाहनतळाच्या जागेत बेकायदेशीपणे सुरू करण्यात आलेल्या या हॉटेलवर कारवाई करण्याची मागणी पिंपरीतील एका सामाजिक कार्यकर्त्याने केली होती.

अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणा-या महापालिकेने या हॉटेलवर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. त्यावर महापालिकेने संबंधित हॉटेलला कारवाईसाठी नोटीस बजाविली. याविरोधात संबंधित हॉटेल व्यावसायिकाने न्यायालयात धाव घेतली.

न्यायालयाने वाहनतळाच्या जागेत हॉटेल नियमानुकूल करण्याचा दावा फेटाळला. त्यावर व्यावसायिकाने शासनाकडे अपील करण्याची मुभा न्यायालयाकडे मागितली होती. तोवर महापालिकेची कारवाई स्थगित ठेवण्याची याचना केली होती. त्यानुसार न्यायालयाने हॉटेल मालकाला शासनाकडे अपील करण्याची मुभा दिली आहे. त्यासाठी दोन आठवड्याची मुदत दिली आहे. या मुदतीमध्ये महापालिकेला कारवाई स्थगित ठेवण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती अतिरीक्त आयुक्त प्रकाश कदम यांनी दिली.

'ओडो फ्रेश'च्या कंत्राटात गोलमाल झाल्याचा शिवसेनेचा आरोप

ओडो फ्रेश'च्या कंत्राटात गोलमाल झाल्याचा शिवसेनेचा आरोप
पिंपरी, 4 फेब्रुवारी
मोशी कचरा डेपोच्या दुर्गंधीमुक्तीसाठी 25 लाख रुपये खर्चुन फवारणी केलेल्या 'ओडो फ्रेश'च्या कंत्राटात गोलमाल झाल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. 'ठराविक कंपनीचाच माल, एकाच कंत्राटदाराच्या विविध निविदा, अनावश्यक मालाची ज्यादा दराने खरेदी आणि अपात्र कंत्राटदाराचा निविदा प्रक्रियेत सहभाग आदी आक्षेपार्हह मुद्दे उजेडात आणत 'ओडो फ्रेश’ खरेदी प्रकरणाची चौकशी करा, पर्यावरण अभियांत्रिकी विभागाच्या कार्यकारी अभियंत्याविरोधात कठोर कारवाई करा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

शिवसेना नगरसेविका सीमा सावळे यांनी याबाबतचे निवेदन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांना दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, पावसाळ्यात कचरा कुजण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर होत असल्याने मोशी कचरा डेपो परिसरात दुर्गंधी पसरत असल्याचा कांगावा करत महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाने दुर्गंधीनाशक रसायनांची फवारणी करण्याचा घाट घातला. आरोग्य निरीक्षक प्रभाकर तावरे यांनी एका लेखी पत्राद्वारे ही मागणी केली. पावसाळयाच्या 4 महिन्यांच्या कालावधीत दररोज 2 लिटर याप्रमाणे 240 लिटरची आवश्यकता आहे. दोन लिटर रसायन 2 हजार लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास दुर्गंधी कमी होईल, अशी मखलाशीही त्यांनी केली. हे मागणीपत्र हाती पडताच पर्यावरण अभियांत्रिकी विभागाने घाईघाईने निविदा मागविल्या.

बायोलॉजिकल ओडर कंट्रोलचे उत्पादक अथवा अधिकृत विक्रेत्यांनीच निविदा भरावी. निविदादारानेच दुर्गंधीनाशक रसायनाची यांत्रिक पद्धतीने फवारणी स्वत:हून करावी आणि याकामाचा 3 वर्षांचा अनुभव असावा, अशा प्रमुख अटी निविदेत समाविष्ट होत्या. दिलेल्या मुदतीत, मेसर्स रुतू बायो सिस्टिम, मॅक्स वॉटर रेमिडीज आणि मल्हार एंटरप्रायजेस या तिघांच्या निविदा प्राप्त झाल्या. दोन कंपनीचा भागीदार असणा-या पुरवठाधारकानेच दोन स्वतंत्र निविदा भरत ’झोलझाल’ करण्यास सुरुवात केली. मेसर्स रुतू बायो सिस्टीम या एकाच कंपनीचे उत्पादक आणि विक्रेते असल्याचे दाखले तिघांनीही जोडले. या तिघांनीही संगनमत करत एकाच कंपनीच्या मालाची 3 विविध प्रकारची दरपत्रके सादर केली.

मॅक्स वॉटर रेमिडीज या कंपनीची स्थापन वर्षभरापूर्वीच झाल्याचे कागदोपत्री स्पष्ट होत असतानाही त्यांना अपात्रऐवजी पात्र करण्याची किमया घडली. तर, लेबर कॉन्ट्रक्टरचा व्यवसाय करणा-या मल्हार एंटरप्रायजेस यांना रसायन पुरवठादार म्हणून पात्र ठरविण्यात आले. तर, यांत्रिक पद्धतीने रसायन फवारणीचा कोणताही पुर्वानुभव नसलेल्या मेसर्स रुतू बायो सिस्टीम यांना पात्र करण्यात आले. निविदेत निकोप स्पर्धा झाल्याचे आभास निर्माण करत पर्यावरण यांत्रिकी विभागाने 25 लाखांचे काम 'ठरल्याप्रमाणे’ रुतू बायो सिस्टीम कंपनीला बहाल केले.

केवळ पावसाळी महिन्यात 240 लिटर दुर्गंधीनाशक रसायन खरेदी करण्याचे नियोजित असताना पर्यावरण यांत्रिकी विभागाने त्यात गफला केला. कंत्राटदाराच्या हितासाठी 1275 लिटर रसायनाची खरेदी केली. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर 17 लाख 50 हजार रुपयांचा बोजा पडला. नामांकीत रसायन कंपन्या केवळ मालाचा पुरवठा करतात, रसायन फवारणीचे काम करत नाहीत, हे माहित असूनही ठराविक कंत्राटदाराला डोळयासमोर ठेवूनच अटी-शर्ती निश्चित करण्यात आल्या. एकच माल, एकच कंत्राटदार आणि 3 वेगवेगळे दर असतानाही ही बाब आयुक्तांपासून लपविण्यात आली. निविदेत निकोप स्पर्धा न होताही वर्कऑर्डर देण्यात आली, असा आरोप सावळे यांनी केला आहे.

पुणे महापालिकेच्या कचरा डेपोत दररोज सरासरी 1700 मेट्रीक टन कचरा गोळा होतो. त्यावर पावसाळ्यात साडेसातशे लिटर दुर्गंधीनाशक रसायनाची फवारणी केली जाते. याऊलट, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी कचरा डेपोत दररोज 550 मेट्रीक टन कचरा गोळा होतो. त्यापैकी सुमारे 240 मेट्रीक टन कचरा हा यांत्रिकी खतनिर्मिती आणि गांडूळ खत प्रकल्पासाठी वापरला जातो. केवळ 300 मेट्रीक टन कच-यावर दुर्गंधीनाशक रसायन फवारणी करणे आवश्यक आहे. पुणे महापालिकेच्या आकडेवारीनुसार, या कामासाठी 150 लिटर रसायन पुरेसे असताना 1275 लिटर खरेदी कोणाच्या तुंबड्या भरण्यासाठी केली, असा संतप्त सवाल सीमा सावळे यांनी केला आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

अधिका-यांचे निघालेत अकलेचे दिवाळे !
पर्यावरण यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी यांनी मंजूर निविदेच्या पुष्ठ्यर्थ दर पृथ्थकरण (रेट अ‍ॅनालिसिस) केले आहे. हे दर पृथ्थकरण पाहून डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. रसायनाच्या प्रतिलिटर दरामध्ये फवारणीचा खर्च, मिनी ट्रॅक्टरभाडे, ट्रॅक्टरचालक व दोन मदतनीस, इंधनखर्च आदींचा समावेश आहे. संजय कुलकर्णी यांनी मान्य केलेल्या आकडेवारीनुसार, मिनी ट्रॅक्टर भाड्यापोटी महापालिकेने 2 लाख 87 हजार रुपये मोजले आहेत. चालू बाजारभावाप्रमाणे, नव्याको-या मिनी ट्रॅक्टरची किंमत 2 लाख 40 हजार रुपये आहे. मग महापालिकेने वर्षभराच्या कामकाजासाठी 2 लाख 87 हजार रुपये का अदा केले असा सवाल करत दोषींकडून याची वसूली करा, अशी मागणी सीमा सावळे यांनी केली आहे.

अपंगांच्या पालखी यात्रेस देहूगावातून प्रारंभ

अपंगांच्या पालखी यात्रेस देहूगावातून प्रारंभ
पिंपरी, 4 फेब्रुवारी
अपंगांच्या विविध मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या वतीने आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी देहूगावातून अपंग पालखी यात्रेस प्रारंभ झाला. मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानापर्यंत ही पालखी यात्रा नेण्याचा निर्धार प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या वतीने करण्यात आला आहे. या यात्रेत राज्याच्या विविध भागातून आलेले शेकडो अपंग, मूकबधीर व कर्णबधीर अपंग सहभागी झाले आहे.

अपंगाच्या मागण्यांसदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांसमवेत मोबाईल फोनद्वारे चर्चा केली. त्यावेळी पुढील सोमवारी यासंदर्भात बैठक घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले तसेच आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले, तथापि काही मागण्यांबाबत तरी आजच्या आज निर्णय झाला पाहिजे, असा आग्रह कडू यांनी धरला. त्याला मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने अखेर दुपारी तीनच्या सुमारास देहूगावातील गाथा मंदिरापासून पालखी यात्रेस प्रारंभ झाला. देहूगावातून देहूरोड येथे पालखी यात्रा पुणे-मुंबई महामार्गावर आली. अंधार पडेल त्या ठिकाणी महामार्गावर ठिय्या देण्याचा इशारा कडू यांनी दिला आहे.

राज्यातील जवळपास ९ टक्के अपंगांच्या विकासाकडे व त्याच्या प्राथमिक गरजांकडे शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. अपंगांच्या मागण्यांसंदर्भात शासनाला जाग आणण्यासाठी व अपंग बांधवांच्या कल्याणासाठीच हे आंदोलन करण्यात येत असल्याचे आमदार कडू यांनी सांगितले. शासनाचे अंदाजपत्रक ४५ हजार कोटी रुपयांचे असते. त्यातील ३ टक्के रक्कम शासनाने अंपगांच्या विविध योजनांवर खर्च करणे अपेक्षित आहे. मात्र, शासन या बाबत गंभीर नसून अवघा अर्धा टक्का निधी खर्च करीत आहे. गेली सहा महिने आम्ही शासनदरबारी या बाबत लढा देत आहोत. राज्याच्या मुख्य सचिवांशी चर्चा केली आहे. विधानसभेत औचित्याचा मुद्दाही उपस्थित केला आहे. परंतु शासन अपंगांबाबत दुजाभाव दाखवत असल्याबद्दल खंत त्यांनी व्यक्त केली.

अपंग बांधवांना संजय गांधी निराधार पेन्शन योजना, इंदिरा आवास योजना, जातीची अट न ठेवता सवलती मिळाव्यात. प्रत्येक जिल्ह्यात आधुनिक सेवा सुविधांयुक्त स्वतंत्र वसतीगृह, स्वतंत्र कला अकादमी उभारावी आदी २0 मागण्या शासनाकडे करण्यात आल्या आहेत.

चिखलीत टपाल कार्यालयाचे उद्‌घाटन

चिखलीत टपाल कार्यालयाचे उद्‌घाटन
पिंपरी, 4 फेब्रुवारी
चिखली येथे नुकतेच टपाल कार्यालय सुरू करण्यात आले असून त्याचे उद्‌घाटन नगरसेवक दत्ता साने यांच्या हस्ते झाले. चिखलीत सुरू झालेल्या या नवीन टपाल कार्यालयाचा पिनकोड 411062 असा आहे. सकाळी आठ ते सायंकाळी चार या कालावधीत टपालाचे कामकाज सुरू राहणार आहे. यामध्ये स्पीड पोस्ट, रजिस्टर, पार्सल, टेलिफोन बिल, पीएलआय मनिऑर्डर आणि विविध बचत योजनांचा लाभ नागरिकांना घेता येणार आहे.

याप्रसंगी टपला विभागाचे वरिष्ठ अधिक्षक के. वाय. कांबळे, एपीएमजी धर्माधिकारी, सहायक अधीक्षक एस. डी. मोरे, डी. आर. देवकर, के. एस. पारखी, डी. के. गोडसे, राजु कर्पे, अशोक अवघडे, पीआरआय एस. जी. डुंबरे, सुरेश शेलार, सामाजिक कार्यकर्ते विकास साने, रोहिदास मोरे, प्रमोद साने, विजय मोरे, प्रवीण पिंजण, श्री. पाखरे, चिंचवडचे उप पोस्टमास्तर श्री. सिंहस्थे आदी उपस्थित होते.

Pune techie arrested for molesting 12-year-old in cyber cafe

Pune techie arrested for molesting 12-year-old in cyber cafe: A 26-year-old software professional has been arrested by Nigdi police station for allegedly molesting a standard VI student in a cyber cafe. The girl had gone there for her science project on Saturday afternoon.

शाळेने केला तिचा कौतुक सोहळा

शाळेने केला तिचा कौतुक सोहळानवी सांगवी - कालपर्यंत ज्या शाळेत ती शिकली... इतर मुलींप्रमाणे दोन वेण्या घालून वावरली... ज्या रंगमंचावर कलाविष्कार सादर केला आणि रंगपेटी, कंपास अशी बक्षिसे पटकावली... त्याच शाळेत ती आज कौतुकाचा विषय ठरली. शाळेचा अन्‌ शिक्षकांचा अभिमान ठरली. दापोडीतील स्वामी विवेकानंद विद्यालयाची माजी विद्यार्थिनी उदयोन्मुख अभिनेत्री सुवर्णा काळे हिची ही कहाणी. 
शाळेने केला तिचा कौतुक सोहळा

पुणे-पिंपरीकरांना दिलासा देणार साहेब, बाबा अन्‌ दादा

पुणे-पिंपरीकरांना दिलासा देणार साहेब, बाबा अन्‌ दादा पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे विविध प्रकल्पांच्या उद्‌घाटनानिमित्त शुक्रवारी (ता. 8) प्रथमच एकाच व्यासपीठावर येणार आहेत. त्यामुळे शहरातील अनेक प्रश्‍न मार्गी लागतील, अशी अपेक्षा लाखो नागरिकांना वाटत आहे. 

महा-ई-केंद्रांवर शिधापत्रिका अर्ज स्वीकारणार नाही

महा-ई-केंद्रांवर शिधापत्रिका अर्ज स्वीकारणार नाही पुणे - शिधापत्रिकेसाठी सरकारी खर्च 70 ते 120 रुपये येत असून, या संदर्भात सरकारने नियुक्त केलेली ऑनलाइन सेवाही बंद आहे. त्याचा त्रास महा-ई-सेवा केंद्रचालकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे शनिवारपासून पुण्यातील सर्व 48 केंद्रांवर शिधापत्रिका अर्जांची स्वीकृती बंद करीत असल्याचे महा-ई-सेवा संघाचे सचिव विश्‍वास शिंदे यांनी शनिवारी सांगितले. 

'भवरा' एकांकिकेने पटकावला गडकरी करंडक

'भवरा' एकांकिकेने पटकावला गडकरी करंडक
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in