Sunday 12 August 2018

अतिरिक्त हस्तांतर शुल्कवसुलीला चाप

पंचवीस हजारांपर्यंत आकारणीचे सहकार आयुक्तांचे आदेश

फ्लॅट अथवा गाळ्यांची विक्री करताना अव्वाच्या सव्वा हस्तांतर शुल्क (प्रीमियम) आकारणाऱ्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश सहकार आयुक्त डॉ. विजय झाडे यांनी दिले आहेत. महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यानुसार जास्तीत जास्त २५ हजार रुपयांपर्यंत हस्तांतर शुल्क आकारता येणार आहे, असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे फ्लॅटची खरेदी-विक्री करणाऱ्यांकडून मनमानी पद्धतीने शुल्क आकारणी करणाऱ्या सोसायट्यांना चाप लागणार आहे.

अभिजित लोंढे जर्मनीतही 'आयर्न मॅन'

शर्यत साडेबारा तासात पूर्ण; पिंपरी चिंचवडच्या शिरपेचात तुरा 

Why Pimpri-Chinchwad desperately needed a police commissionerate

With the State Home Department finally issuing a notification for setting up the Pimpri-Chinchwad Police Commissionerate on Friday, local residents have every reason to cheer. They have been demanding the police commissionerate for more than 15 years, to tackle the consistently rising crime rate in the industrial city.

पिंपरी-चिंचवड पोलिसांमध्ये आयुक्तालयाची लगबग

पिंपरी- चिंचवडच्या स्वतंत्र पोलिस आयुक्‍तालयाचा कारभार येत्या पंधरा ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्यामुळे पोलिस वर्तुळात आयुक्तालयाची लगबग सुरू झाली आहे. शासनाच्या गृह विभागाने शुक्रवारी (दि.10 ) याबाबतचा अध्यादेश जारी केल्यानंतर रंगरंगोटीसह इतर कामांना वेग आला आहे. 

स्वाईन फ्लू प्रतिबंधक लस खरेदी

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका स्वाईन फ्लू प्रतिबंधक लस खरेदी करणार आहे. दीड हजार बॉटल्ससाठी 3 लाख 88 हजार रुपयांचा खर्च येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव आगामी स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.

पिंपरी पालिकेत सुरू असते ‘वॉशिंग सेंटर’

महापालिकेच्या कारभारावर प्रशासनाचा वचक नाही, हे वारंवार सिद्ध होत आहे. सुटीच्या काळात पालिका आवारात चक्‍क वॉशिंग सेंटर सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे. पालिकेत स्वच्छता करणार्‍या बी.व्ही.जी.च्या सफाई कामगारांकडून  कर्मचार्‍यांची खासगी वाहने धुवून घेत आल्याचे निदर्शनास आले आहे.

ऑनलाइन फूड ऍप्समुळे हॉटेल व्यवसाय घटला !

पुणे - शहर आणि उपनगरांत 3 हजारांहून जास्त रेस्टॉरंट आणि हॉटेल्स आहेत. ऑनलाइन फूड ऍप्सवरून घरी, ऑफिस किंवा महाविद्यालयांमध्ये खाद्यपदार्थ मागविण्याचा कल तरुणांमध्ये वाढत आहे. परिणामी, शहरातील हॉटेल व्यवसायामध्ये 10 ते 20 टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. 

Illegal projects: MahaRERA to accept complaints

Consumers will be allowed to file complaints against unregis ..

दोन हजारांच्या नोटा चालू राहणार

नोटाबंदीनंतर बहुतांश नोटा बॅंकांत आल्या परत
नवी दिल्ली: मार्च-एप्रिलमध्ये दक्षिण भारतात नोटाटंचाई निर्माण झाली होती. प्रामुख्याने 2000 च्या नोटा बाजारातून गायब होत्या. ही नोट बंद होणार असल्याची चर्चाही होती. पण 2000 ची सध्याची नोट चलनात कायम असेल, रद्द होणार नाही, असे केंद्राने पुन्हा स्पष्ट केले.

राजकीय आकसामुळे अण्णासाहेब मगर स्टेडियमची दुरवस्था!

पिंपरी – राजकीय आकसामुळे अण्णासाहेब मगर स्टेडियमची दुरवस्था झाली असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आला असून लवकरात लवकर या स्टेडियममध्ये सुधारणा करण्यात यावी, अशी मागणी एका निवेदनाने करण्यात आली आहे. महापालिकेच्या नेहरुनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियमची अवस्था भयावह झाली आहे. हे स्टेडियम राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांच्या प्रभागात येत असल्याने निधी देण्यात आखडता हात घेत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते कुणाल जगनाडे यांनी केला आहे.

महापौर जाधव यांनी केलेले वर्तन भारतीय संस्कृतीला साजेसे

महापौर राहुल जाधव यांनी राज ठाकरे यांना  वाकून  नमस्कार केल्याने ज्यांना पोटशूळ उठला आहे तो चुकीचा आहे. राज ठाकरेंना अभिवादन करणे म्हणजे ओबीसी चळवळ दावणीला बांधणे होत नाही. विरोधकांशी गळाभेट अथवा वयपरत्वे अभिवादन करण्याची अनेक उदाहरणे आहेत. महापौर राहुल जाधव यांनी भारतीय संस्कृतीला‌ साजेशेच वर्तन केले आहे. त्यावर  हरकत घेणार्‍याची कोल्हेकुई म्हणजे "चळवळीतील कामातून"सामाजिक कार्यकर्ता"म्हणून गेलेली पत मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे अशी टीका बारा बलुतेदार महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रताप गुरव यांनी केली आहे

राज ठाकरेंवरील प्रेमामुळे महापौर जाधव अडचणीत

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या भाजपवर कडाडून टीका करत असताना, पिंपरी चिंचवडमधील भाजपच्या महापौरांचं राज ठाकरेंवरील प्रेम दिसून आले. एका कार्यक्रमावेळी नवनिर्वाचित महापौर राहुल जाधव चक्क राज ठाकरेंसमोर नतमस्तक झाले.मात्र राज यांनी मंडल अहवालावरून केलेल्या वक्तव्याचा आधार घेत सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी महापौरांच्या कृतीस आक्षेप घेतला आहे त्यामुळे महापौर अडचणीत आले आहेत

‘इंदिरा’मधील विद्यार्थ्यांनी घेतले मुर्तीचे प्रशिक्षण

इसिएने केले कार्य शाळेत मार्गदर्शन

निगडी : एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन असोसिएशन अर्थात इ सिएने इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स, ताथवडेमध्ये शाडू माती मूर्ती बनविण्याचे मोफत प्रशिक्षण देण्याचा उपक्रम राबविला. यावेळी महा विद्यालयीन विद्यार्थी व प्राध्यापक यांच्यासाठी सुरु केलेल्या विशेष प्रशिक्षणाची माहिती व आवश्यक ता इसिए अध्यक्ष विकास पाटील यांनी समजावून दिली. प्रशिक्षणात नमूद केल्याप्रमाणे शाडू माती मूर्ती बनविण्याचे इंदिरा कॉलेज आवारात मोफत प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेस नेहेरू युवा केंद्राचे समन्वयक यशवंत मानखेडक र, इंदिरा कॉलेज प्राचार्य डॉ. जनार्दन पवार, पर्यावरण तज्ञ विकास पाटील, मूर्ती प्रशिक्षक विश्‍वास फडणीस, डॉ. चंद्रशेखर पवार, कार्यकारी अधिकारी स्नेहल पोवार, मीरा मानखेडकर, पृथ्वी इंगोले-राक्षे, सुमित ससाणे, प्रा.सुनिता गावडे, प्रा. पूनम पवार, प्रा. सारिका सावंत, प्रा. शिवेंदू भूषण, प्रा. सोनाली शोत्री, प्रा. अश्‍विनी शेंडे व इं दिरा कॉलेजचे 96 विद्यार्थी सहभागी झाले होते.