Thursday 30 November 2017

एन्काउंटर स्पेशालिस्टचा ‘गेम’ फसला

पिंपरी : कुख्यात गुंडांचा एन्काउंटर करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याचाच गेम करण्याचा प्लॅन काही गुन्हेगारांनी रचल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. यासाठी परराज्यातून मोठ्या प्रमाणात पिस्तुले आणून या अधिकाऱ्यावर थेट गोळीबार करण्यात येणार होता. विशेष म्हणजे दोन वेळा दोन भिन्न टोळ्यांनी या अधिकाऱ्याला लक्ष्य करून त्यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदल घेण्याचे प्लॅनिंग केले होते. परंतु, त्यापूर्वीच पिंपरी-चिंचवडमधील अन्य गुन्ह्यांत दोन्ही टोळ्यांना अटक झाल्याने त्यांचे मनसुबे उधळले गेले.

[Video] स्मार्ट सिटीत गुंडांचे स्मार्ट नेटवर्क


Pune Police chief says serious about resolving knotty traffic issues, seeks ideas from residents

Two days after Pune Newsline reported about Ajit Pawar getting a taste of Pune’s traffic jam, days after Chief Minister Devendra Fadnavis was caught in a similar logjam, the Pune Police is waking up to the need to find a solution to the traffic snarls. Taking “first concrete” steps of its kind, Pune Police Commissioner Rashmi Shukla Tuesday asked the residents of Pune city and Pimpri-Chinchwad to exchange ideas to solve the city’s traffic issues by tweeting @CPPuneCity with the hashtag #MYCureForTraffic.

Sangvi gas crematorium shut for days

Pimpri Chinchwad Municipal Corporation at Sangvi has been closed for several days causing major inconvenience. "A neighbour died 12 days ago, but he could not be cremated at the gas crematorium as it was closed. We had to cremate him in a traditional manner using wood," said Keshav Kedari, a resident of Old Sangvi.

Heated exchanges at PCMC meeting

Pimpri Chinchwad: Heated exchanges were witnessed during the general body meeting
of Pimpri Chinchwad Municipal Corporation on Tuesday when corporators belonging to the ruling BJP and opposition parties sparred over theft of wild animals from civic-run Bahinabai Chaudhary Zoo in Akurdi and lack of public toilets at Nehrunagar area in Pimpri.

रेडझोनमुळे विकास ठप्प

पिंपरी - तळवडे आयटी पार्कमध्ये बारा मोकळे भूखंड असले, तरी रेडझोनच्या प्रश्‍नामुळे एमआयडीसीला ते उद्योग विस्तारासाठी कोणालाही देता येत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. रेडझोनमुळे या ठिकाणचा विकास ठप्प झाला असून, त्या संदर्भात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने संरक्षण मंत्रालयाच्या सचिवांशी पत्रव्यवहार केला असला, तरी त्यावर अद्याप काहीही निर्णय झालेला नाही. 

टाकावू प्लॅस्टिकपासून इंधन, हॅंडबॅग्ज अन्‌ चपलाही

पुणे - निसर्ग अनादी काळापासून मानवाचा मित्र राहिला; परंतु आपल्या बेजबाबदार वर्तनामुळे हा मित्र आपण गमावण्याच्या मार्गावर आहोत. ज्या अनेक कारणांमुळे आपण निसर्गाचा ऱ्हास करतो आहोत, त्यापैकी एक आहे प्लॅस्टिकचा अतिवापर. या अतिवापराचे दुष्परिणाम गेल्या दोन दिवसांत "सकाळ'ने मांडले. उगवत्या पिढ्यांचे भविष्य प्रदूषणापासून सुरक्षित करू पाहणाऱ्या काही प्रयोगांची दखल आजच्या अंकात.

राज्यात सर्व प्रकारच्या प्लास्टिकवर बंदी येणार

पुणे: राज्यात सर्व प्रकारच्या प्लास्टिकवर बंदी घालण्याचा राज्य सरकारचा विचार असून येत्या गुढीपाडव्याच्या दिवशी प्लास्टिक बंदीचा कायदा केला जाणार आहे अशी माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली आहे. हा कायदा करण्यापूर्वी येत्या ४ महिन्यांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. राज्यात प्लास्टिक वापरावर बंदी घालण्याबाबतच्या धोरणासंदर्भात पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील काउंसिल हॉलमध्ये बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत प्लास्टिक बंदीबाबतच्या धोरणावर चर्चा करण्यात आली

पीसीईटीच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा पेटंट नोंदणीसाठी अर्ज

चौफेर न्यूज –  वर्ग सुरु असताना बाहेरील पॅसेजमधील साफ सफाईचे काम करताना स्लिपरच्या आवाजामुळे शिक्षकांना व विद्यार्थ्यांना त्रास व्हायचा. साबण, ॲसिड, फिनाईल मिश्रीत पाण्यामुळे सफाई कर्मचारी अनेकदा पाय घसरुन पडले. त्यातून छोट्या मोठ्या दुखापती झाल्या. यावर काय तरी उपाय शोधला पाहिजे. या हेतूने प्रा. हरिष तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सफाई कर्मचारी सुनिता कांबळे आणि सहका-यांनी स्लिपर चप्पलवर अनेक प्रयोग करुन बहुउपयोगी स्लिपरचे डिझाईन तयार केले. यासाठी प्रा. राहुल बावणे यांनी सहकार्य केले.

पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाला नॅककडून ‘अ’वर्ग नामांकन प्रदान

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयास बेंगलुरु मधील नॅक समिती कडून ‘अ’वर्ग नामांकन प्रदान करण्यात आले.

…अखेर टेनिस कोर्टात प्रस्तावाचा “गोल’!

  • विरोधकांच्या मतदानानंतर मंजुरी: आयुक्‍तांनी केला सविस्तर खुलासा
पिंपरी, (प्रतिनिधी) – चेन्नई येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ओपन टेनिस स्पर्धा भरविण्यात अपयशी ठरलेली असोसिएशन ऑफ टेनिस प्लेअर्स (एटीपी) क्रीडा क्षेत्रातील नामांकीत संस्थेने पुण्यातील बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात यापुढे सलग पाच वर्षे आंतरराष्ट्रीय ओपन टेनिस स्पर्धा भरविण्यास राज्य शासनाला होकार दिला आहे. त्यानुसार संस्थेच्या खर्चाचा बोजा शासकीय अस्थापनांसह पिंपरी-चिंचवड महापालिकेवर टाकण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने एका वर्षाला एक कोटीप्रमाणे पाच वर्षांसाठी पाच कोटी रुपये द्यावेत, अशी सूचना राज्य सरकारने आयुक्तांना दिली आहे. मात्र, या स्पर्धेचा शहरातील एकाही टेनिसपटूला फायदा होणार नाही. त्यामुळे नागरिकांच्या कराचे पाच कोटी वायफळ जाणार आहेत, अशा शब्दांत विरोधकांनी या विषयाला विरोध केला. शेवटी आयुक्‍तांनी स्पर्धेचा सविस्तर खुलासा करताच विरोधकांचे मतदान घेऊन महापौर नितीन काळजे यांनी प्रस्तावाला मंजुरी दिली.

“वायसीएम’ रुग्णालयावर बहुमजली इमारत उभारणार

महासभेत मान्यता ः ऐनवेळी शंभर कोटीचे विषय दाखल

पिंपरी, (प्रतिनिधी) – महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय इमारतीवर आता बहुमजली इमारत बांधण्यात येणार आहे. याकरिता 50 कोटी रुपयांच्या सुधारीत खर्चाचा विषयासह नाशिक फाटा ते वाकड बीआरटी कॉरीडॉरमध्ये सुदर्शननगर चौकात ग्रेडसेपरेटर बांधण्यास 20 कोटी, तळवडे जकात नाका ते देहूगाव रस्ता विकसित करण्यास 30 कोटी असे एकूण 100 कोटी रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता घेण्यासाठी हे प्रस्ताव तातडीची बाब म्हणून महासभेत दाखल केला होता, त्याला मंगळवारी मान्यता देण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते.

पुणे-लोणावळा-पुणे लोकल सेवा महिनाभर विस्कळीत

पुणे – गेले काही दिवसांपासून कधी दुरुस्तीच्या नावखाली तर कधी तांत्रिक बिघाडामुळे विस्कळित होणारी पुणे-लोणावळा ही लोकल सेवा आता पुढील महिनाभर दुपारच्या काळात विस्कळित राहणार आहे. डिसेंबरमध्ये दररोज दुपारी मेगा ब्लॉक राहणार असल्याने काही लोकल बंद राहणार आहेत.

Blackstone gets bids from top global investors for Pune IT park

Global investors such as CPPIB, GIC and Brookfield, among others, have put in bids for an infotech park (IT park) put on the block by global investment firm Blackstone in Hinjewadi area of Pune, sources said.

More police will be deployed to check offences on Baner-Sus route

Q.Wrong-side driving by bikers, motorists, water tankers and three-wheelers has made life hell for pedestrians on the Sus Road — from Balaji Mandir to Sus Road and from Baner signal to the highway via Baner Smashan Bhumi Road. This happens round-the-clock. A few days of heavy cop presence and fines should do the trick. ( Shyamal Banerjee)
A. This is a serious problem. We have taken a note of this, and your suggestion is welcome. We will increase police presence in the area and will penalise rule violators.

पवनाथडीतील स्टॉलसाठी अर्ज करण्याचे आवाहन

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने ४ ते ८ जानेवारी २०१७ या कालावधीत  पवनाथडी जत्रा आयोजित केली जाणार आहे. जत्रेत स्टॉल मिळविण्यासाठी महिला बचतगटांनी अर्ज करावेत, असे आवाहन नागरवस्ती विकास विभागामार्फत करण्यात आले आहे.

न्यायालये गतीमान

पुणे - न्यायालयीन कामकाजात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाल्याने पोलिसांचे मनुष्यबळ, पक्षकारांचा खर्च आणि वेळ वाचण्यात मदत झाली आहे. गेल्या सहा महिन्यांत ‘स्काइप’ या ‘ॲप’च्या मदतीने तीन दाव्यात संमतीने घटस्फोट घेतला गेला. कारागृहातूनच प्रतिदिन शंभर ते दीडशे आरोपींना ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे सुनावणीसाठी हजर केले जात आहे.

दिव्यांगांना दरमहा दोन हजार पेन्शन

पिंपरी - शहरातील दिव्यांगांना दरमहा दोन हजार निवृत्ती वेतन (पेन्शन) सुरू करण्यास महापालिका सर्वसाधारण सभेने मंगळवारी (ता. २८) मंजुरी दिली. ४० टक्के व त्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या व्यक्तींना या योजेनचा फायदा मिळणार आहे. अंध व्यक्तींना मात्र टक्‍क्‍यांची अट नसेल. 

समित्या स्थापनेवर प्रशासनाचा भर

शासनाने निर्देश ः नगरसेवकांना मिळणार संधी
पिंपरी, (प्रतिनिधी) – महापालिकेतील शिक्षण मंडळ बरखास्त झाल्यानंतर त्याजागी शिक्षण समिती स्थापन होण्याचा निर्णय रेंगाळला असताना, महापालिका अधिनियमानुसार पालिकेत आणखी तीन नवीन समित्यांची नेमणूक प्रस्तावित आहे. माध्यमिक, पूर्व प्राथमिक शाळा आणि तांत्रिक समितीबरोबरच स्थापत्य समिती (सार्वजनिक बांधकाम समिती), वैद्यकीय आणि आरोग्य समिती आणि गलिच्छ वस्ती सुधार, गृहनिर्माण आणि समाजकल्याण समितीची स्थापना करण्याचा निर्णय महासभेसमोर आहे. पालिकेच्या प्रशासकीय कामकाजाची आवश्‍यकता विचारात घेऊन समिती स्थापनेचा निर्णय होणार आहे.

दीड हजारांत 'आयटीआय'

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोरवाडी आणि कासारवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) शहरातील तरुणांना केवळ वार्षिक दीड हजार रुपयांमध्ये प्रशिक्षण मिळणार आहे. सुधारित प्रवेशप्रक्रिया आणि प्रशिक्षण धोरणाअंतर्गत सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला. शहराबाहेरील प्रशिक्षणार्थींना या शुल्काच्या दोन ते अडीचपट शुल्क मोजावे लागणार आहे.