Thursday 17 January 2019

Pimpri : पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे खेळाडूंचा गौरव

एमपीसी न्यूज – क्रीडा क्षेत्रात नैपुण्य प्राप्त करणा-या खेळाडूंचा पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे सत्कार करण्यात आला. स्थायी समिती सभापती ममता गायकवाड आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते खेळाडूंचा गौरव करण्यात आला.

Pimpri : भीमसृष्टीचे आंबेडकर जयंतीला लोकार्पण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा उद्यानात साकारल्या जाणा-या भीमसृष्टीतील 19 पैकी दोन म्युरल्स बसविण्यात आले आहेत. 20 फेब्रुवारीपर्यंत सर्व म्युरल्स बसविण्यात येणार असून येत्या 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला या भीमसृष्टीचे अनावरण करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे, अशी माहिती सभागृह नेते एकनाथ पवार यांनी दिली. 

Pimpri : महापालिकेचा अर्थसंकल्प वास्तववादी असणार , आकड्यांचा फुगवटा कमी होणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन 2019-2020 या आगामी वर्षाचा अर्थसंकल्प फेब्रुवारी महिन्यात स्थायी समिती समोर सादर केला जाणार आहे. यंदाचा अर्थसंकल्प वास्तववादी सादर करत आकड्यांचा फुगवटा कमी करणार असल्याची ग्वाही मुख्य लेखाधिकारी जितेंद्र कोळंबे यांनी दिली. 

ताजा भाजीपाला थेट गृहनिर्माण संस्थेच्या दारात

शेतकऱ्यांची ताजी भाजी पिंपरी चिंचवडमधील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या दारात थेट येणार आहे. जिल्हा सहकारी उपनिबंधक आणि महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळ यांच्या समन्वयातून गृहनिर्माण संस्थांमध्ये शेतकऱ्यांच्या ताज्या भाजीपाल्याची विक्री करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली असून, वाकड येथील एका सहकारी गृहनिर्माण संस्थेमध्ये शेतकऱ्यांचा माल थेट विक्रीसाठी आणायला सुरुवात झाली आहे.

शास्तीकराच्या घोषणेनंतर पिंपरीत भाजपविरुद्ध सर्वपक्षीय एकवटले

राज्यात भाजपची सत्ता आल्यापासून शास्तीकराच्या बाबतीत नागरिकांना दिलासा द्यावा, यासाठी भाजपचे स्थानिक नेते प्रयत्नशील होते.

थेट आरटीओकडे तक्रार केल्याने पीएमपी बसची योग्यता रद्द

पुणे : तुटलेले पत्रे, बंद पडलेले दिशादर्शक बल आणि खिळखिळ्या बसमधून सुरू असलेली प्रवासी वाहतूक आरटीओने सोमवारी थांबवली. बसमधील एका प्रवाशाने थेट आरटीओकडे तक्रार केली होती. यानंतर आरटीओ अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष केलेल्या पाहणीत बस मार्गावर चालवण्यासाठी योग्य नसल्याचे निदर्शनास आल्याने तिचे योग्यता प्रमाणपत्र रद्द करण्यात आले असून पीएमपीला दुरुस्ती करण्यास सांगण्यात आले आहे.

गर्दुल्यांवर आता बारिक लक्ष

पिंपरी - भोसरी-नाशिक मार्गावरील अमली पदार्थविरोधी पथक कार्यालयाचे मासुळकर कॉलनीलगतच्या भाजी मंडई आवारात स्थलांतर झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. २६ जानेवारीला कार्यालयाचे उद्‌घाटन होणार आहे. 

पिंपरी-चिंचवड पालिकेचा महसूल घटला

पिंपरी - महापालिकेने खोदाईच्या दरात केलेल्या वाढीमुळे पालिकेच्या तिजोरीमध्ये आठ महिन्यात केवळ १८ कोटी जमा झाल्याची माहिती समोर आली आहे. मागील वर्षी ही रक्कम १६५ कोटी होती. खोदाई शुल्क व केबल टाकण्यासाठीचा खर्च परवडत नसल्याने अनेक कंपन्यांची कामे प्रलंबित आहेत. 

रावेतमध्ये रस्त्यांचे जाळे

पिंपरी - पवना नदी, पुणे-मुंबई लोहमार्ग आणि देहूरोड संरक्षक विभाग यामुळे विस्ताराला मर्यादा असलेल्या रावेत परिसरात रस्त्यांचे जाळे विकसित केले जात आहे. सध्या मुख्य तीन रस्त्यांची कामे प्रगतिपथावर असून, सात रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. एकूण या दहा पक्‍क्‍या रस्त्यांमुळे परिसराच्या सर्वांगीण विकासाला गती मिळणार आहे. 

स्थानिकांना ‘महामेट्रो’त प्राधान्य

पुणे - शहर आणि पिंपरी- चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पात काम करणारे ६० टक्के कर्मचारी मराठी आहेत. प्रकल्पाच्या कामासाठी मनुष्यबळ नियुक्त करताना स्थानिक आणि मराठी व्यक्तींना प्राधान्य द्यावे, असे आदेश संबंधित कंत्राटदारांना दिले आहेत, असे महामेट्रोने एका पत्राद्वारे स्पष्ट केले आहे. 

पदपथ, रस्त्यात अतिक्रमणे

पिंपरी - पिंपरीतील संत तुकारामनगर परिसरात रस्ता आणि पदपथांवर खाद्यपदार्थ आणि विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असून, पदपथावरील अतिक्रमणांमुळे पादचाऱ्यांना ये-जा करणे अवघड झाले आहे

शिवसृष्टीचे काम प्रगतिपथावर

पिंपरी - महापालिकेतर्फे बिजलीनगर येथील उद्यानात शिवसृष्टी आणि पिंपरी गावातील उद्यानात संभाजी सृष्टी साकारण्यात येणार असून, दोन्ही उद्यानांतील कामे प्रगतिपथावर आहेत. जूनअखेरपर्यंत ही कामे पूर्ण होणे अपेक्षित आहेत.

समाविष्ट गावांसाठी १८ टीपी स्कीम

पिंपरी - समाविष्ट गावांच्या सुनियोजित विकासासाठी महापालिकेने नगररचना योजना (टीपी स्कीम) राबविण्याचे नियोजन केले आहे, त्यासाठी सल्लागाराची नियुक्ती केलेली असून, १२ गावांमध्ये १८ नगररचना योजना राबविण्यात येणार आहेत. त्याचे क्षेत्र सुमारे दोन हजार ६७४ हेक्‍टर आहे.

“ई-लर्निंग’चा निधी गणवेश, स्वेटर खरेदीसाठी

पिंपरी- महापालिका प्राथमिक शिक्षण विभागामार्फत बालवाडी आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी स्वेटर, खेळ गणवेश खरेदी करण्यात येणार आहे. मात्र, या खरेदीसाठी रक्कम कमी पडत असल्याने ई-लर्निंग या लेखाशीर्षावरील 85 लाख रूपये गणवेश, स्वेटर खरेदीसाठी वळविण्याचा निर्णय महापालिका शिक्षण मंडळाने घेतला आहे.

सभा विषयपत्रिका तीन-चार दिवस आधी सादर करा

पिंपरी – महापालिकेतील स्थायी समितीसह विविध समितींच्या सभा विषयपत्रिका वेळेत सादर केल्या जात नसल्याने सभांचे नियोजन कोलमडते. ही बाब लक्षात घेऊन संबंधित विभागाने सभांच्या विषयपत्रिका तीन ते चार दिवस आधी सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

खेलो इंडिया युथ गेम्स पुणे: कबड्डीमध्ये महाराष्ट्राला संमिश्र यश

पुणे: महाराष्ट्राला कबड्डीमधील मुलींच्या विभागात संमिश्र यश मिळाले. 21 वर्षाखालील मुलींमध्ये त्यांनी पश्‍चिम बंगालचा 33-27 असा पराभव केला. पूर्वार्धात त्यांनी 19-12 अशी आघाडी घेतली होती.

महापालिका आयुक्‍तांच्या चारचाकीला ‘ट्रिपल सीट’चा दंड

पिंपरी – वाहतुकीचा नियम मोडून वाहनचालक पळाल्यास वाहतूक पोलीस तातडीने नंबर लिहून पावती फाडतात. परंतु या घाईमध्ये कधी-कधी फजिती देखील होते, असाच प्रकार शहरातील वाहतूक पोलिसांकडून झाला आहे. वाहतूक पोलिसांनी चक्‍क मनपा आयुक्‍तांच्या कारच्या नंबरवर “ट्रिपल सीट’ दुचाकी चालवण्याची पावती फाडली आहे. क्रमांक लिहिताना डीएल ऐवजी सीएल लिहिले गेल्याने ही चूक घडली आहे.