Friday 20 April 2018

अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रशिक्षण काम रद्द करावे – आमदार लक्ष्मण जगताप

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत वास्तव्यास असणाऱ्या विविध घटकांतील नागरिकांसाठी नागरवस्ती विकास योजना विभागातर्फे कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. त्यासाठी नागरिकांकडून अर्ज मागविण्यात येतात. या अर्जांची तपासणी, छानणी आणि पडताळणी करण्यात येते. त्यासाठी ‘अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था’ या संस्थेस नेमण्यात आले आहे. परंतु उक्त संस्थेच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार झाल्याचे चर्चेत आले आहे. उक्त संस्था महापालिकेस खड्ड्यात घालण्याचे काम करित आहेत. अशा संस्थामुळे पालिकेचे मोठ्या प्रमाणात रूपये खर्च होते. त्यामुळे महापालिकेने अशा उधळपट्टीस पायबंद घालावा. महापालिकेने अशा संस्थेकडील कामकाज रद्द करून टाकावे अशी सुचना आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.

DPR for Metro extension to take eight months

PIMPRI CHINCHWAD: The detailed project report (DPR) on the extension of the Pimpri-Nigdi Metro route, and the Nashik Phata-Chakan route, will be prepared in eight months.

नाशिकफाटा ते हिंजवडी मार्गावरील मेट्रोचा डीपीआर तयार करा

पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागरमध्ये दिवसेंदिवस गृहप्रकल्पांची संख्या वाढत आहे. त्यामुळे येथील लोकसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणारा बराच वर्ग याच पिंपळे सौदागर, कस्पटे वस्ती, वाकड परिसरात राहतो. त्यांच्या सुलभ वाहतूकीसाठी या मार्गावर बीआरटी सेवा देखील सुरू करण्यात आली आहे. भविष्यात ही सुविधा देखील अपुरी पडण्याची शक्यता आहे. म्हणून नाशिकफाटा ते हिंजवडी या मार्गावर मेट्रो सुरू व्हायलाच हवी, त्यासाठी मेट्रोचा डीपीआर लवकरात लवकर तयार करावा अशी मागणी नगरसेवक शत्रुघ्न काटे आणि नगरसेविका निर्मला कुटे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

निगडी तसेच चाकणपर्यंत मेट्रो धावणार; डीपीआर तयार करण्याच्या खर्चास स्थायीची मान्यता

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी ते निगडी (भक्ती शक्ती चौक) व नाशिक फाटा ते चाकण (मोशी मार्गे) या मार्गांवर मेट्रो सुरु करण्याबाबत सविस्तर प्रकल्प अहवाल (डी.पी.आर.) तयार करण्यासाठी येणा-या सुमारे ३ कोटी ४८ लाख रुपयांच्या खर्चास आज झालेल्या स्थायी समितीच्या सभेत मान्यता देण्यात आली. तसेच शहरातील विविध विकासविषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे १७ कोटी ७३ लाख ४३ हजार रुपयांच्या खर्चास स्थायीत मान्यता देण्यात आली. स्थायी समिती सभागृहात आज झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या.

लोकजागर : पिंपरीतील राजकारण्यांना आवरा!

देशातील सर्वाधिक श्रीमंत नगरपालिका असा लौकिक या शहराला मिळाल्याबरोबर सर्वच राजकीय पक्षांचे मुंगळे या शहराकडे धावायला लागले.

शहरबात पिंपरी : उद्योगनगरीत लोककलांचा भावसुंदर आविष्कार

उद्योगनगरीतील दोन दिवसाच्या या संमेलनाने लोककलांचा भावसुंदर आविष्कार अनुभवास आला.

समांतर पुलाचा वाढीव खर्च द्या

पिंपरी - हॅरिस पुलावरील वाहतुकीचा भार कमी करण्यासाठी त्याला समांतर पुलाच्या उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. पुण्याहून पिंपरीकडे येणाऱ्या पुलाचे काम बोपोडीजवळील झोपडपट्टीच्या पुनर्वसनामुळे अडकून पडले आहे. पुणे महापालिकेने हे काम मार्गी न लावल्यास या प्रकल्पाची किंमत वाढणार असून, ही वाढीव दोन कोटी रुपयांची रक्‍कम त्यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेला द्यावी लागणार आहे. यासंदर्भातील पत्र पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कार्यकारी अभियंत्यांनी पुणे महापालिकेच्या औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या सहायक आयुक्‍तांना पाठवले आहे. 

खासगी बसगाड्यांचे भाडे दुप्पट

पिंपरी - उन्हाळी सुटीनिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे या संधीचा फायदा घेत खासगी व्यावसायिकांनी बस भाड्यामध्ये दुपटीने वाढ केली आहे. विशेष म्हणजे भाडेवाढ केल्यानंतरदेखील या बसेसचे आरक्षण फुल झाले आहे. अहमदाबाद, राजकोट, सुरत, बडोदा, बंगळूर, हैदराबाद, नागपूर, लातूर, अमरावती या लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या तिकीट दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. 

पुणे - अखेर सांगवीत आयुक्तांनी केली जलपर्णीची पहाणी

जुनी सांगवी (पुणे) : जुनी सांगवीकर मुळा नदीपात्रातील जलपर्णीमुळे डासांच्या त्रासाने गेली तीन महिन्यांपासुन त्रस्त आहेत. प्रशासनाचे याकडे झालेले दुर्लक्ष जलपर्णी काढण्याची दिरंगाई यामुळे सांगवीकर नागरीकांना डासांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पालिका प्रशासन जलपर्णी काढण्यासाठी दिरंगाई करत असल्याने नागरीकांच्या तक्रारी वाढल्या आहेत.

पिंपरी : कंटेनर व ट्रक अडकल्यामुळे वाहतूक कोंडी

पिंपरी : नाशिक फाटा येथून चिंचवडकडे जाणाऱ्या तसेच चिंचवडकडून नाशिक फाटाकडे येणाऱ्या मार्गात पिंपरी येथील ग्रेड सेपरेटरमध्ये कंटेनर व मालवाहतूक ट्रक अडकल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.

“वेस्ट टू एनर्जी’ला भाजपमधूनच “खो’

पिंपरी – महापालिकेच्या मोशी कचरा डेपोत “वेस्ट टू एनर्जी’ या महत्वाकांक्षी प्रकल्पाला सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांचाच विरोध होऊ लागला आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या समर्थक नगरसेविका माया बारणे यांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे. जनतेच्या कर रुपी रकमेतून होणाऱ्या प्रकल्पाची सविस्तर माहिती देऊन पारदर्शीपणे हा प्रकल्प राबविण्याची मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली. त्यामुळे भाजपला कोंडीत पकडणाऱ्या विरोधकांना आयतेच कोलित हाती मिळाले आहे.

आता वृक्ष प्राधिकरण समितीची “टूरटूर’

पिंपरी – महापालिकेत पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या दौऱ्याचे चांगलेच पेव फुटले आहे. आता वृक्ष प्राधिकरण सदस्यांबरोबरच महापालिका अधिकारी देखील पुढील महिन्यात सिक्कम दौऱ्यावर रवाना होणार आहेत. याकरिता येणाऱ्या नऊ लाख 53 हजार रुपयांच्या खर्चाच्या ऐनवेळच्या विषयाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

Maharashtra Cricket Association not to draw water from Pavana river for IPL until further orders

The Bombay High Court, on Wednesday, reserved its order in the issue of more water usage for the six IPL 2018 matches which were shifted to Pune from Chennai.

Maharashtra Cricket Association Stadium

Indian Card Clothing Company to discontinue operations at Pimpri, Pune

Indian Card Clothing Company has entered into a Memorandum of Understanding (MOU) on the 18 April, 2018, with its Labour Union for permanent discontinuation of the operations at its factory situated at Pimpri, Pune.

महावितरणची उधळपट्टी

पुणे - बाजारात आलेले नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याच्या नावाखाली महावितरणकडून मीटर खरेदीवर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. वीजबिलातील मानवी हस्तक्षेप टाळावा, अचूक बिलांचे वाटप व्हावे आणि महसुलात वाढ व्हावी, या हेतूने महावितरणने ‘आयआर’ (इन्फ्रा रेड) आणि ‘आरएफ’चे (रेडिओ फ्रिक्वेन्सी) मीटर बसवले खरे, परंतु जुन्या पद्धतीने बिलांची रीडिंग घेतले जात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे काही हजार कोटी रुपयांचा नाहक खर्च झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

पीओपीचा पुनर्वापर शक्‍य

पुणे - प्लॅस्टर ऑफ पॅरिस (पीओपी) व्यवस्थित भाजले, दळले आणि पुन्हा पावडर केल्यास त्याचा पुनर्वापर करणे शक्‍य होईल, अशाप्रकारचे पीओपीच्या पुनर्वापराचे तंत्रज्ञान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संशोधकांनी विकसित केले आहे. प्रायोगिक तत्त्वावर एक टन पीओपीवर प्रक्रिया करून त्यातून पुन्हा ८०० किलो पीओपी तयार करण्यात संशोधकांना यश आले आहे. 

पॅकेजिंग इंडस्ट्रीजवर परिणाम

पिंपरी - प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयाचा पॅकेजिंग इंडस्ट्रीजवर मोठा परिणाम झाला असून, या कंपन्यांतील अनेक कुशल कामगारांचा रोजगार धोक्‍यात आला आहे.

बेकारीची कुऱ्हाड 30 हजार कामगारांवर

चिखली - प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयानंतर कुदळवाडी, तळवडे, भोसरी येथील उद्योग आता ठप्प झाले आहेत. प्लॅस्टिकशी संबंधित असणाऱ्या उद्योगांना त्याचा सरळ फटका बसणार असून, सुमारे ३० हजार कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार असल्याचा अंदाज उद्योग जगतातून व्यक्त केला जात आहे. 

बिर्ला रुग्णालयात आयुर्वेदावर परिषद

चिंचवड – आदित्य बिर्ला रुग्णालय येथे फॅमिली फिझिशियन्स असोसिएशन द्वारा आयोजित “फॅकॉन आयुर’ या आयुर्वेदाच्या एक दिवसीय परिषदेचा अडीचशे डॉक्‍टर्सनी लाभ घेतला.

क्रांतिवीर चापेकरांना पालिकेचे अभिवादन

पिंपरी – महापालिकेच्या वतीने क्रांतीवीर चापेकर स्मृतिदिनानिमित्त चापेकर चौक चिंचवड येथील त्यांच्या पुतळ्यास महापौर नितीन काळजे व सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

पवना धरणात 41.84 टक्‍के पाणी साठा शिल्लक…

चौफेर न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणात 41.84 टक्‍के पाणी साठा उरला आहे. तीव्र उन्हामुळे पाणी साठ्‌यामध्ये कमालीची घट होत असून सतरा दिवसात सहा टक्‍के साठा घटला आहे.