Tuesday 14 August 2018

स्मार्ट सिटीचे निर्णय घेण्याचे अधिकार आयुक्तांना

पालिकेच्या मालमत्तांचा वापर करण्याचे सर्वाधिकार मिळणार
महासभेमध्ये होणार शिक्कामोर्तब
पिंपरी : पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीतील कामे करण्यासाठी महापालिकेच्या मालकीची जागा, रस्ते, उद्याने, विद्युत पोल, चौक, शाळा, इमारतींसह इतर मालमत्तांचा वापर करण्यास देण्याचे सर्वाधिकार महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना देण्यात येणार आहेत. याबाबतच्या प्रस्तावावर 20 ऑगस्ट रोजी होणार्‍या महासभेत शिक्कामोर्तब केले जाणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेचा केंद्र सरकारच्या बहुचर्चित स्मार्ट सिटी योजनेत तिसर्‍या टप्प्यात समावेश झाला आहे. त्यानंतर 9 जानेवारी 2017 रोजी पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड या विशेष उद्देश वाहन (स्पेशल पर्पज व्हेइकल) कंपनीची स्थापना करण्यात आली होती. स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आयएएस दर्जाचा अधिकारी अथवा त्यातील तज्ज्ञ व्यक्तीचा शोध सुरू आहे. तोपर्यंत आयुक्त श्रावण हर्डीकर यांची मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे

पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाला पारदर्शकतेची एलर्जी

पिंपरी (पुणे) : भाजपने आपल्या जाहीरनाम्यात पारदर्शक प्रशासनाची ग्वाही दिली. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिकेत पारदर्शकता दूरच, माहिती दडविण्यात प्रशासनाचा जास्त भर आहे. माहिती अधिकार कायदा कलम चार (1)(ख) प्रमाणे स्वतःहून 17 मुद्यांची माहिती विना शुल्क प्रकट करणे बंधनकारक आहे; परंतु प्रशासनाकडून कायद्याला केराची टोपली दाखवली जात आहे. 

पिंपरी-चिंचवड शहराचे विद्रुपीकरण

पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक ठिकाणे रस्ते, चौक, विद्युत डी. पी. बॉक्‍स, उड्डाण पुलाचे खांब, बस थांबे, विद्युत दिव्यांचे खांब, आदी ठिकाणी हॅंन्ड बील्स, भित्ती पत्रके लावून अनेकांकडून शहराचे विद्रुपीकरण केले जात आहे. शहर विद्रुपीकरण करणाऱ्यांना आळा बसावा यासाठी अशा व्यक्तींकडून महापालिका प्रति चौरस मीटर 750 रुपये दंड आकारून गुन्हेही दाखल करण्यात येणार आहे. अशा प्रस्तावास स्थायी समितीने मंजुरीही दिली आहे. (अरुण गायकवाड - सकाळ छायाचित्रसेवा)

फायनली…ऑटो क्लस्टर मधूनच चालणार आयुक्तालय

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन
पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरासाठी नव्याने सुरु होत असलेल्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा स्वतंत्र कारभार फायनली काही दिवसांसाठी चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथूनच चालणार आहे. तर आयुक्तालयाचे पहिले ध्वजारोहण चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे होणार आहे. त्यानंतर कंट्रोल रूमला कॉल करून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय सुरू होईल.

आहे त्या मनुष्यबळात चांगले काम करावे : पद्मनाभन

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय सुरु होण्यास अवघे काही तास राहिले आहेत. त्यामुळे पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन यांनी सोमवारी पंधरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची मीटिंग घेतली. सध्या अतिशय तोकडे मनुष्यबळ आहे. मात्र आहे त्या मनुष्यबळामध्ये चांगले काम करण्याची जबाबदारी ही आपली असून ती करुन दाखवायची आहे असे सर्व अधिकाऱ्यांना  पद्मनाभन यांनी सांगितले.

पोलिस आयुक्तालयाच्या कामांची आयुक्तांकडून पाहणी

पिंपरी - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय सुरू होण्याचे काउंटडाउन आता सुरू झाले आहे. पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी ठिकठिकाणी सुरू असलेल्या कामांची सोमवारी पाहणी केली.

पालिकेच्या व्यायामशाळेत पोलीस आयुक्‍तालयाचा नियंत्रण कक्ष

पिंपरी – महापालिकेच्या व्यायामशाळेत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा नियंत्रण कक्ष सुरु होणार असून येथूनच 15 ऑगस्टपासून खऱ्या अर्थाने कामकाजाला सुरूवात होणार आहे. यासाठी वायरलेस यंत्रणा बसवण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

दापोडीत बसविणार गर्डर लाँचर

पिंपरी - दापोडीत मेट्रो व्हायाडक्‍टच्या दोन स्पॅनवर गर्डर लाँचर बसविण्यात येत असून, त्याच्या आधारे व्हायाडक्‍टचे काम वेगाने सुरू होईल. नाशिक फाटा येथील मेट्रो स्थानकाच्या प्रारंभिक कामालाही सुरवात झाली आहे.

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पिंपरी स्थानकावर सरकता जिना

जीव धोक्यात घालून रेल्वे रुळ ओलांडतात
निगडी : वेळ आणि शारीरिक श्रम वाचविण्यासाठी बहुतांश प्रवासी पायर्‍यांचा जिना चढण्यास नापसंद करतात. जीव धोक्यात घालून बेकायदेशीरपणे रेल्वे रूळ ओलांडला जातो. यासाठी पिंपरी रेल्वे प्रशासनाने सरकता जिना बसविण्याचे काम हाती घेतले आहे. येत्या काही दिवसात हा जिना प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. पिंपरी रेल्वे स्थानकावर दोन जिने आहेत. परंतु या जिन्यांचा वापर अगदी मोजकेच प्रवासी करतात. बहुतांश प्रवासी जीव धोक्यात घालून बेकायदेशीरपणे रेल्वे रूळ ओलांडून जाणे पसंत करतात. यामुळे वेळ वाचतो आणि जास्त श्रमही करावे लागत नाही. परंतु अशा शॉर्टकटच्या नादात अनेकांनी आपला जीव गमावला आहे. बेकायदेशीरपणे रेल्वे रूळ ओलांडणार्‍या कित्येक प्रवाशांवर रेल्वे प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली आहे. तरी देखील ही परिस्थिती बदलत नाही.

पिंपरी पालिकेसमोर वाहनचालक वैतागले

पिंपरी-चिंचवड महापालिका भवनासमोर मेट्रो कॉर्पोरेशनच्या वतीने नुकतेच काम सुरू करण्यात आले आहे. मोरवाडी चौक ते खराळवाडीपर्यंतचा सर्व्हिस रस्ता अरूंद झाला असून वाहतुक संथ होत आहे. त्यामुळे वाहनचालक वैतागले आहेत.

नद्यांचे प्रदुषण रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा; आमदार महेश लांडगे यांचे अधिका-यांना निर्देश

पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणा-या मुळा, पवना आणि इंद्रायणी या नद्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नद्यांमध्ये दुषित, रसायनमिश्रित पाणी सोडले जाते. वाढत्या शहरीकरणामुळे व औद्योगिकरणामुळे शहरातून वाहणा-या नदीचे आरोग्य दिवसेंदिवस बिघडत आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने पाहून नद्यांचे प्रदुषण रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा, असे आदेश आमदार महेश लांडगे यांनी पालिकेच्या अधिका-यांना दिले आहेत. तसेच पाण्याचे नियोजन वेळेत करावे. पाणी गळती रोखण्यासाठी चिखली ते च-होली परिसरातील सर्व ठिकाणची गळती तपासून घेण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत.

अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या सल्लागार सदस्यपदी खासदार साबळे

केंद्र सरकारच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या सल्लागार समिती सदस्यपदी राज्यसभा खासदार अमर साबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शहरातील प्रत्येक रिक्षा स्टॅन्ड हे समाजसेवा केंद्र पाहिजे – बाबा कांबळे

प्रत्येक रिक्षा स्टॅन्डवर पाणपोई, वाचनालय, फोनबुकिंग केंद्र, सेवा केंद्र अशा सुविधा द्याव्यात तसेच रिक्षा स्टॅन्डवर येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना चांगली प्रवासी सेवा द्यावी, अशा प्रकारे चांगली सेवा आणि इतर अन्य सुविधा देऊन पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक रिक्षा स्टॅन्ड हे समाजसेवा केंद्र झाले पाहिजे यासाठी रिक्षा चालकांनी प्रयत्न करावेत असे आव्हान महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी रिक्षा चालकांना केले.

शहरासाठी तीन महिन्यांत रिक्षा अ‍ॅप!

पुढील दोन ते तीन महिन्यांत हे अ‍ॅप प्रत्यक्षात आणण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

प्लॅस्टिकचे झेंडे हद्दपार

– स्वातंत्र्य दिनासाठी बाजारपेठ “तिरंगी’
पिंपरी – स्वातंत्र्य दिन अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. प्लॅस्टिक बंदीचा सकारात्मक परिणाम बाजारपेठेवर दिसून येत असून यंदा केवळ कागदी झेंडे विक्रीसाठी आहेत. बिल्ले, चक्र, झुंबर, पतंग, छत्री, डॅगलर आदी विविध प्रकारचे साहित्य बाजारपेठेत दाखल झाले असून अवघी बाजारपेठ “तिरंगी’ झाली आहे.

“आलार्म’मुळे फसला चोरीचा डाव

पिंपरी – तेलवाहिनीजवळ जवळ खड्ड्‌ा खोदून तेल चोरी करणाऱ्या चोरट्यांनी “आलार्म’च्या आवाजाचे धूम ठोकली. त्यामुळे त्यांचा चोरीचा डाव फसला. ही घटना शनिवारी (दि. 13) पहाटेच्या सुमारास घडली.

वाल्हेकरवाडी येथे संत नामदेव महारांज सोहळा उत्साहात

पिंपरी :  संत नामदेव महाराजांच्या 668 समाधी सोहळा नामदेव शिंपी समाज संस्थेतर्फे वाल्हेकरवाडी येथे उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विठ्ठलरूक्मीणी व नामदेव महाराज यांच्या मुर्तीला अभिषेक घालण्यात आला. सत्यनारायण महापूजा करण्यात आली. गजानन महाराजांचे भजन व हरीपाठ, तसेच समाधी सोहऴ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. शेवटी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

मेट्रोचा विस्तार, पीएमपीची रडकथा

शाश्वत वाहतुकीच्या दृष्टीने आता मेट्रो, बीआरटी आणि वर्तुळाकार मार्गाचे अचूक नियोजन करण्याची वेळ आली आहे.

ई बस खरेदीच्या निविदा २५ ऑगस्टपर्यंत काढणार

पुणे - ई बससाठी केंद्र सरकारकडून सबसिडी मिळणार नाही, त्यामुळे ठेकेदाराने या बसेस घ्याव्यात आणि त्याला सबसिडी, बॅटरी चार्जिंगच्या खर्चासह प्रतिकिलोमीटर भाडे दर ठरविण्यात यावा, असा पर्याय निवडण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यातील ई बस खरेदीची प्रक्रिया सुरू केली जाईल आणि त्याच्या निविदा २५ ऑगस्टपर्यंत काढल्या जातील. 

पीएमपीचे रक्षाबंधनला 2 कोटी उत्पन्नाचे उद्दिष्ट

प्रशासनासाठी सर्वाधिक उत्पन्नाचा दिवस : जास्तीत जास्त बस रस्त्यांवर आणण्याच्या सूचना
पुणे – पीएमपीसाठी रक्षाबंधन हा सर्वाधिक उत्पन्नाचा दिवस असतो. या एका उत्पन्नात सरासरी 40 ते 45 लाखांची भर पडत असून यासाठी दरवर्षी जय्यत तयारी करण्यात येते. यावर्षी देखील रक्षाबंधनाच्यादिवशी जादा बसेस रस्त्यावर आणण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून 2 कोटी उत्पन्नाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.