Thursday 9 November 2017

[Video] टेंडर चा पण अजब इत्तेफाक...!

पिंपरी-चिंचवड मनपाचा अजब योगायोग

मोशीत अनधिकृत धार्मिक स्थळांवर महापालिकेचा हातोडा

पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांवर महापालिकेकडून कारवाई सुरु केली आहे. आज पुणे-नाशिक महामार्ग येथील अनधिकृत वीट बांधकाम असलेले काळूबाईचे मंदिर भुईसपाट केले.

क्‍लिष्ट प्रक्रियेमुळेच अनधिकृत बांधकामे

पिंपरी - बांधकाम परवाना देण्याची प्रक्रिया वेगवान आणि सोपी केल्याची माहिती ‘पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’चे (पीएमआरडीए) मुख्य कार्यकारी अधिकारी किरण गित्ते यांनी ‘सकाळ’ला दिली. तथापि, क्‍लिष्ट व वेळखाऊ प्रक्रियेमुळे नागरिक अनधिकृत बांधकाम करण्यास प्रवृत्त होत असल्याचे स्थानिक बांधकाम कंत्राटदारांनी स्पष्ट केले.

Parents must carry ID cards to pick up kids from school

Pune: While picking up your child from school, do not forget to carry the school-issued identity card. Without the ID, the school may very well refuse to let your child go home with you.

ना पाटी, ना खडू हाती पोछा नि झाडू

पिंपरी - फरशी पुसणे, पाणी भरणे, झाडू मारणे, भिंती-छपराला रंग देण्याचे काम विद्यार्थी (प्राथमिक) करतात का, याचे उत्तर निश्‍चितच नाही, असेच आहे. मात्र, जिल्हा परिषदेच्या हिंजवडीतील शाळेत ही सर्व कामे विद्यार्थ्यांकडून करून घेत असल्याचा धक्कादायक प्रकार आढळून आला. याबाबत शिक्षिकांकडे विचारणा केली असता, जिल्हा परिषदेकडून सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती होत नसल्याने, ही सर्व कामे विद्यार्थ्यांकडूनच करून घ्यावी लागत असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

‘सकाळ’मुळे आयुष्याला कलाटणी

पिंपरी - मुलीच्या शाळेची फी भरायची कशी, शस्त्रक्रियेला पैसे कोठून आणायचे, शस्त्रक्रियेला सुटी घेतल्यास घर कसे चालवायचे, कदाचित आपल्याला काही झाल्यास मुलगी आणि आई-वडिलांकडे कोण पाहणार? असे अनेक प्रश्‍न माझ्यासमोर होते. नैराश्‍य येत होते; मात्र ‘सकाळ’मध्ये माझ्याबाबत बातमी प्रसिद्ध झाली आणि आयुष्यालाच कलाटणी मिळाली. एका दिवसात सर्व समस्यांचे निराकरण झाले. जीवनाच्या निर्णायक क्षणी ‘सकाळ’ पाठीशी उभा राहिला. यामुळे मी ‘सकाळ’चे सदैव ऋणी राहीन, अशी भावना रोझमेरी जोसेफ यांनी व्यक्‍त केली.

पिंपरी-चिंचवडला गुरुवारी संध्याकाळचा पाणी पुरवठा बंद

पिंपरी – निगडी प्राधिकरण येथील सेक्‍टर क्रमांक 23 मधील जलशुध्दीकरण केंद्रातील पाणीपुरवठा विभागाची नियमीत दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. यामुळे येत्या गुरुवारी (दि. 9) सायंकाळी होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे, असे पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.

राष्ट्रवादी युवकचा जवाब दो मोर्चा पिंपरी-चिंचवड महापालिकेवर...

वाल्हेकरवाडी : पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजप सत्तेत येऊन जवळपास ८ महिने उलटून गेली. तरीही शहरातील नागरिकांच्या सर्व पातळीवरील असणाऱ्या मूलभूत समस्या सोडविण्यात आणि शहराच्या विकासा बाबतित कोणतेही सकारात्मक पाऊल न उचल्याने दिवसेंदिवस होत चाललेला शहराचा भकासपणा व शहराची होत असलेली अधोगती याबाबत सत्ताधारी भाजपाच्या विरोधात युवक राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र अध्यक्ष संग्रामदादा कोते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मोर्चाचे आयोजन 9 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता केले आहे.

मावळातील गृहप्रकल्पांवर मंदीचे मळभ

तळेगाव स्टेशन : नोटबंदीनंतर रेरा आणि जीएसटीचे ग्रहण बांधकाम व्यवसायाला लागलयामुळे, वर्षभरात व्याजदर कमी होऊनही मावळातील गृहप्रकल्प बांधकाम क्षेत्रात मंदीचे मळभ आहे. ताबा देण्याच्या टप्प्यापर्यंत पूर्णत्वास गेलेल्या गृहप्रकल्पांसाठी देखील पुरेशी नोंदणी न झालयामुळे, अर्थचक्र थंडावून बांधकाम व्यावसायिकांमध्ये अस्वस्थता आहे.

…आता विवाह नोटीस मिळणार ऑनलाइन

चौफेर न्यूज – मध्यस्थांचा वावर कमी व्हावा, तसेच विवाहाची प्रक्रिया पारदर्शक व्हावी, यासाठी विवाहासाठी द्यावयाची नोटीस आता ऑनलाइन पध्दतीने देता येणार आहे. राज्याच्या नोंदणी व मुद्रांक विभागाच्या संकेतस्थळावर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे घरबसल्या विवाह नोंदणी, ई पेमेंट, अर्जदारांना ई मेलवर 30 दिवस मुदतीची नोटीस देणे आदी सुविधा 1 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आल्याची माहिती राज्याचे नोंदणी महानिरीक्षक अनिल कवडे यांनी दिली.

अवघी देहु नगरी स्वच्छ झाली!

  • स्वच्छता अभियान : मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे दोन टन कचरा संकलीत
देहुरोड, (वार्ताहर) – मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट एकसंघ समितीच्या वतीने तीर्थक्षेत्र देहुगाव येथे स्वच्छता अभियान राबवण्यात आले. यावेळी इंद्रायणी नदी परिसरही स्वच्छ करण्यात आला.

डिजिटल व्यवहारांत चाळीस टक्के वाढ

पुणे - इंटरनेट बॅंकिंग, ऑनलाइन ट्रान्झॅक्‍शन, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे व्यवहार आणि मोबाईल ॲप्सद्वारे मनी ट्रान्स्फरच्या व्यवहारांना नोटाबंदीनंतर चालना मिळाली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत चाळीस ते पंचेचाळीस टक्‍क्‍यांनी डिजिटल व्यवहारांत वाढ झाली आहे. त्यामुळे कॅशलेस इकॉनॉमी नागरिकांच्याही हळूहळू अंगवळणी पडू लागली आहे. मात्र भारतीय रिझर्व्ह बॅंकेकडून अर्थपुरवठा होत असला तरीही आउटसोर्सिंग  एजन्सींच्या दिरंगाईमुळे अनेकदा एटीएममधून ग्राहकांना वेळेवर पैसे मिळत नाहीत. त्यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. 

मोकाट जनावरांचा सुळसुळाट

पिंपरी, प्रतिनिधी – पिंपरी येथील संत गाडगेमहाराज चौकात मोकाट जनावरांचा सुळसुळाट वाढला आहे. पिंपरी चौकात मोठ्या प्रमाणात वाहनांची ये जा होत असल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. मोकाट जनावरे रस्तयाच्या मध्येच ठिय्या मांडून बसतात. त्यामुळे वाहनांना जाण्या-येण्यास मार्ग उरत नाही. अचानकच उठून धावायला लागणाऱ्या आणि एकमेकांसोबत झुंजणाऱ्या या जनावरांमुळे अपघात होण्याची शक्‍यता आहे. कित्येकदा जनावरे नागरिकांच्या अंगावर ही धावून जातात, यामुळे नागरीक आणि वाहनचालकांना जीव मुठीत घेवून येथून जावे लागते.
या परिसरात त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे अशा मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

कामगार कल्याण मंडळाचे गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर

पिंपरी, (प्रतिनिधी) – महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे दिले जाणारे प्रतिष्ठेचे गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार आणि कामगार भूषण -2015-16 पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. शासनाने मान्यता दिल्यानंतर राज्यातील 51 कामगरांची गुणवंत पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड औद्योगिक वसाहतीमधील 10 कामगारांना देखील पुरस्कार मिळणार आहेत.